कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?

Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36

भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२०१८ साली लष्कर ए तैएबा च्या कमांडर ख्वाजा शहीद ने साथीदारांबरोबर काश्मीर मधील सुंज्वान मध्ये भारतीय लष्कराच्या कॅम्प वर हल्ला करून पाच जवान मारले होते .
त्या नंतर तो पाकिस्तानच्या छत्रछायेखाली ५ वेळा नमाजी झाला होता .
काही दिवसांपूर्वी त्याला अचानक दोनतीन जणांनी kidnap केले होते ,आता त्याचे शीर आणि धड वेगवेगळे सापडले आहे .
करणारे तेच अज्ञात ......

टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमीनुसार,पाक मधील LET चा कमांडर अक्रम गझीचा खतमा अज्ञात व्यक्तीने केला.

पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये अज्ञात व्यक्तींनी केलेल्या कारवाया बाबत लिब्रांडू गँग मध्ये दुःखवटा पसरलेला दिसतो , जसे काय यांचे जन्मदाते मारले गेले आहेत .
कारण देशभरातील लिब्रांडू च्या गँग मध्ये या बाबत भयाण शांतता आहे ......

मणिपूरमध्ये चाललेल्या प्रकाराबद्दल नेटभगव्यांमध्ये भयानक शांतता आहे. मणिपूर भारतात नसावा किंवा हे प्रकार कोण करवतंय हे त्यांना माहीत असावं.

त्या न्यायाने भारतातील दहशतवादी कारवायांत नेट हिर्व्यांचा हात होता असा अर्थ होईल !

पण तुम्ही तर म्हणताय मोदी आल्यापासून भारतात दहशतवादी कारवाया बंद झाल्या,

आपण आधी काय बोललो ते लक्षात ठेवलं तर बरं असतं. पण जिथे मोदीच ते लक्षात ठेवत नाही, तर तुमच्याकडून कशी अपेक्षा ठेवणार?

तमाम लिब्रांडू ची मानसीकता सडलेलीच का असते ?
यांचा काँग्रेसी दिवट्या म्हणतो चीन हमारे सैनिकों को मार रहा हैं
मग त्यावेळी आपले सैनिक हातात हात धरून बसले असतात का ? बर या चीन धर्जिण्याला हे ही माहीत असते की चीन चे किती सैनिक मारले गेले हे शेवट पर्यंत कळणार नाही .
तरीही आपल्याच सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करण्याची विकृती या लिब्रांडू च्या नेत्या पासून गुलामा पर्यंत ठासून का भरलेली असते ?

हात होता असा अर्थ होईल >>>
तो काँग्रेसच्या काळातील इतिहास आहे .
त्यावेळी पोलीस चकमकीत दहशतवादी मारला गेला तर सोनिया ला रडायला यायचे हे ही सर्वश्रुत आहे .
आता पोर्किस्तान ने भारतात पुन्हा दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आणि भारतातील स्लीपर सेलच्याही अंगलट येईल हे नक्की .....

एका मुद्द्यावर तोंडावर पडलं की दुसरं तुणतुणं आणायचं.

प्रश्न ना कोई आया है म्हणणाऱ्याला होता. तो आर्मीच्या मागे का लपतोय? तोच खरा चीनधार्जिणा. याने सगळ्यात जास्त चीनयात्रा केल्यात. चीनी नेत्यांसोबत माझी विशेष केमिस्ट्री आहे असं हाच म्हणाला‌

ती चकमक सीमेवर होती हे समजण्यापलकडचे आहे का ?
की भाजप आणि मोदिद्वेशाने पछाडल्या मुळे चीन्या चा विश्वास घात दिसत नाही ?
आणि काँग्रेसच्या काळात १५ वर्षापूर्वीच ए के अँटनी ने भर लोकसभेत सांगितले होते सीमेवर रस्तांचे जाळे नसल्यामुळे सैनिक हालचाली होऊ शकत नाही .
नेमकी ती उणीव मोदी सरकार ने दूर करून रस्त्यांचे जाळे उभे केले आणि गलवान चकमकी नंतर सैनिकी हालचाली त्वरेने करून चीनला नमते घ्यायला लावले !
पक्षीय मतभेद मूळे मोदी द्वेष समजु शकतो पण किमान आपल्या सैनिकांचा अभिमान ठेवायला या मानसिक विकृत लिब्रांडू ना काय अडचण असते तेच समजत नाही ,सगळे एकजात एक सारखेच असतात.....

शत्रूला देखील एक संधी देण्याची संस्कृती हिंदू धर्मात पूर्वीपासूनच आहे .
शेजारी बलाढ्य शत्रू राष्ट्र असणे कोणत्याही देशाला परवडणारे नसते , म्हणून कदाचित सुरुवाती च्या काळात चीन बरोबर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता !
पण गद्दारी नसानसात भरलेल्या चीनने पुन्हा विश्वास घात केला !
पण चीनच्या या विश्वासघाता बद्दलचे लिब्रांडू गँग चे कौतुक ओसंडून वाहताना दिसतय .....

20231114_085638.jpg
पाकिस्तान मध्ये अज्ञात व्यक्तींनी अजून एक विकेट पाडली !
त्या अज्ञात व्यक्तीं दिवाळीत स्वतः सुट्टी न घेता न थांबता काम करत आहेत , याचे प्रत्येक भारतीयांना कौतुक वाटले पाहिजे .
लिब्बू दुखवटा पाळतील याची कल्पना आहे .

भारतात दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या १3 अतेरीक्याना अज्ञात लोकांनी पाकिस्तान मध्येच मारल्या नंतर आज पर्यंत पाकिस्तान सरकार ने अधिकृत तक्रार केली नाही .
काल अजून एका मौलाना चे रुप घेतलेल्या अतेरिक्याला अज्ञात लोकांनी यमसदनी धाडले .

फुरोगामी सर, भारताने अमेरिकेला आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत आणि याची चौकशी सुरू आहे, असे उत्तर का दिले? पुरावे द्या असे कॅनडाला ठणकावून सांगितले, तसे अमेरिकेला का सांगितले नाही?

निज्जर ची केस कॅनडा च्या परराष्ट्र मंत्र्याचा सचिव देखील हाताळू शकला असता , पण त्या थर्डक्लास लिबऱ्या तृडो ने अती उतावळेपणा दाखवून त्यांच्या संसदेत भाषण देत सुटला .
त्या ट्रूडोला भारतीय सरकार भाव देत नाही यात भारतातील.सगळ्या नागरिकांना आनंद व्हायला हवा होता पण भारतातील काही लोकं त्याच्या बाबत इतके हळवे का आहेत कोणास ठाऊक ?
राहिला अमेरिका चा प्रश्न यात बायडेन ने लक्ष घातलेले नाही , कदाचित एअर इंडियाची विमाने ( अमेरिका कंपन्यांना हजारों कोटींच्या विमानाची ऑर्डर एअर इंडियाने दिलेली असताना ) उडवण्याची धमकी देणाऱ्या पन्नू ला आश्रय देणे अमेरिकेला देखील महागात पडू शकते . अँग्री खलिस्तानी पन्नू देखील हत्येचा कट उधळला गेल्या नंतर मिळमिळीत प्रतिक्रिया देतोय यातील काय अर्थ लावायचा तो लावा .
निज्जर ला अज्ञात लोकांनी उडवल्या नंतर अमेरिका सारख्या महासत्ता देशात त्यांच्या ग्रीन सिग्नल शिवाय पन्नू ला उडवण्याचा प्रयत्न कोण करू शकते का ?
कदाचित पन्नू ला गाशा गुंडाळून चालते होण्याचा सिग्नल देखील असेल .

फुरोगामी सर, ट्रुडोने संसदेत वक्तव्य देण्याआधी कॅनडाचे अधिकारी स्तरावर भारताशी याबाबत संपर्क साधला होता.
It is now known that Canadian National Security Adviser Jody Thomas made two trips to New Delhi in August and September to inform her counterpart, Ajit Doval, about the “credible allegations” linking India to Nijjar’s killing.

त्याची इतकी बाजू घेताय तर पुरावे मागा की !
कोणीही फालतु लोकांनी आपल्या सरकार वर आरोप केले की तुम्हां लोकांना आनंद का होतो ?

मी कुठे कोणाची बाजू घेतली?
आता अमेरिकेने पण तसाच आरोप केला तर तुमचे उत्तर वेगळे का एवढाच माझा प्रश्न आहे.
आणि फुरोगामी सर, एवढा धागा काढलात, तर त्याआधी थोडा अभ्यास करायचा होता. म्हणजे माझ्याकडून माहिती घ्यायची वेळ आली नसती.

भारतीय कायद्याला फाट्यावर मारणाऱ्या , फुटिरतेची भाषा करणाऱ्या निज्जर आणि पन्नू बद्दल इतकी आत्मीयता भरत सरांना का वाटते याचे कारण अजून कळले नाही .
केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून तुम्ही लोकं खलिस्तान्यांशी आपुलकी ठेवता ?
लानत हैं तुम पे !!!!

बिनडोक प्रतिसाद.
तुमची चीडचीड दिसते आहे.
पुन्हा विचारतो. भारताने कॅनडाला खडसावले, तसे अमेरिकेला कधी खडसावणार?
अमेरिका भारतावर असे आरोप करते, ते तुम्ही कसे सहन करता?

त्याची कड घेण्याची इतकी अनावर इच्छा होतेय तर त्याला सांगा ना पुरावे द्यायला , आणि त्यात भारत सरकार चा हात दिसलाच तर त्या निज्जर साठी पुन्हा एकदा बिर्याणी गँग गोळा करून बसा शाहीन बाग ला .
अवघड काय आहे त्यात ?
आणि सर्जिकल स्ट्राईक चे पुरावे मागायला लाज वाटली नाही तसे निज्जर हत्येचे पण मागायचे !

ट्रुडोला ढकला खड्ड्यात.

पुन्हा विचारतो. भारताने कॅनडाला खडसावले, तसे अमेरिकेला कधी खडसावणार?
अमेरिका भारतावर असे आरोप करते, ते तुम्ही कसे सहन करता?

मी दोन्हीही केसेस वाचलेल्या नाहीत पण तरी Wink कॅनडा वेगळा, अमेरीका वेगळी. अमेरिका आपली स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे. अलाय नाही, स्ट्रॅटेजिक अलाय आहे, म्हणजे आपले जोवर हित आहे, आपल्याला झळ नाही तोवर अमेरिकेच्या बाजूने.
अजुन एक हाताची पाच बोटे सारखी नसतात. प्रत्येकाला समान वागणूक द्यायला हे काही अध्यात्मिक शिबिर आहे का? शिष्टाई/डिप्लोमसी/पर राष्ट्र धोरण म्हणुन काही गोष्ट आहे की नाही.

सामो, म्हणजे पाकिस्तानने आगळीक केली तर लाल आंख आणि चीनने केली तर अळीमिळी गुपचिळी, असंच ना? Wink

आणि कॅनडात खलिस्तान्यांचा बळ मिळालं तर त्याची झळ बसते, अमेरिकेत मिळालं तर बसत नाही, असं आहे का?

इथे पहिल्या पानावर एक बातमी आहे. खलिस्तान्यांबाबत विचारल्यावर अमेरिकेने आम्ही प्रत्येकाच्या स्वात़ंत्र्याचा आदर करतो, असं म्हटल़ं.
थोडक्यात, कॅनडाला दम देणं शक्य आहे, अमेरिकेला नाही, हेच परराष्ट्र धोरण का?

Pages