कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये भारताची गुप्तहेर संस्था रॉ च्या कारवाया ? की अजून दुसरे काय ?

Submitted by फुरोगामी on 2 October, 2023 - 10:36

भारतास हवा असणारा खलिस्तानी अतेरिकी निज्जर कॅनडा मध्ये मारला जाण्याअगोदर पासूनच भारतास हवे असलेले पण पाकिस्तान आणि कॅनडा मध्ये आश्रयास असलेले तब्बल १८ टॉप मोस्ट अतेरिकी un known व्यक्ती कडून संपवले गेले होते .
जून महिन्यात निज्जर वर हल्ला झाला , त्या बद्दल भारतावर आरोप करण्यासाठी कॅनडाचा पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ला चार महिने लागले .
त्याच्या आरोपांना केराची टोपली दाखवल्या मुळे
आरोप करताना आक्रमक असलेला ट्रूडो आठ दिवसांत मवाळ झालेला दिसला .
इथे हिंसक कारवाया करून भारताच्या कानून के लंबे हाथ पासून कोसो दूर कॅनडा आणि पाकिस्तानच्या राजकीय छत्रछायेखाली हे अतेरिकी ऐश् करून समस्त भारतीयांना वाकुल्या दाखवत होते .
शिवाय ते अतेरिकी तेथील सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या दिमाखात सहभागी देखील होत होते .
या क्षेत्रातील जाणकारानुसार भारताची रॉ संघटना भाड्याचे हल्लेखोर घेवून या कारवाया करत आहे तर काहीच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानची आय एस आय त्यांना संपवत आहे .
एक मात्र नक्की जागतिक आर्थिक मदती कडे नजर लाऊन बसलेल्या पाकिस्तानला FATAF ग्रे लिस्ट मधून बाहेर पडण्यासाठी ज्या तरतुदी लावल्या गेल्या होत्या त्यात अतेरिक्यांच्या मुसक्या आवळण्याची देखील होती .
म्हणून कदाचित आय एस आय ने देखील पाकिस्तान मधील अतेरीकी संपवण्यास हाथ भार लावला असावा !
खरं खोटे कोणास ठाऊक , पण कॅनडा आणि पाकिस्तान मध्ये आश्रयास असलेल्या अतेरिक्यांना आपल्या कोर्टात आणून शिक्षा देणे भारतासाठी अवघडच झाले होते .
पण त्यांचा un known person काटा काढत आहेत यातच सर्व आले.
इस्रायलची मोसाद गुप्तचर संघटना इस्रायल विरोधी तत्वांना वेळीच वेसण घालते तशी वेसण रॉ ने घालायला सुरुवात केली काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

. तुमच्या फुग्यांना टाचण्या लावतोय. त्यासाठी उडावं लागतं.
बाकी तुमच्याशी वाद घालण्यात मजा नाही. समोरच्याचे शब्द फिरवून पुन्हा लिहिता. अगदीच शाळकरी.

गेल्या दोन चार वर्षांतील घटनांचा मागोवा घेतला तर भारत अमेरिका मधील व्यापारिक संबंध कोणासाठी जास्त महत्वाचे आहेत हे न समजण्या इतके लीब्रे दूधखुळे नाहीत .
आणि व्यापारिक फायद्यासाठी असल्या हजारो टन्नू ना उडवण्याची धमक अमेरिकेत आहे .
पण टन्नू केस मध्ये नक्कीच काहीतरी मोठे प्रकरण शिजलेले आहे , दिसते तेवढी सोपी केस नाही.

अमेरिकेने रॉच्या अधिकाऱ्यांना हाकलून दिलं. त्यांचं काम तुम्ही करणार की इथे लिहिणाऱ्या अमेरिकन मायबोलीकरांपैकी की कोणी?

{}म्हणूनच प्रत्येक प्रतिसादात आदराने लीब्रे असा उल्लेख करावा लागतोय Happy}
स्वतः:ची विकृती अभिमानाने मिरवायला फारच मोठा केमिकल लोच्या असावा लागतो.

तुमच्या सारख्या काही लोकांना केंद्रा मध्ये कोणताही पक्ष असू द्या , आपण आपल्याच देशाची बाजू मांडायची असते असे सांगावे च का लागते ?
परक्यांच्या पायाशी लोळण घेणारे इतरांना विकृत म्हणतात हा मोठ्ठा जोक आहे .
तो टन्नू जातीभेद करून दूतवासातील किंवा विमानातील लोकांना मारणार नाही हे लक्षात आहे ना ?
खलिस्तानी + पाकिस्तानी + लिबरे यांची एकी सतत होत असते हे मात्र नक्की .....

फुरोगामी सर, तुमच्यावर वाया घालवायच्या माझ्या वेळेचा आजचा कोटा मगाशीच संपला.

इतर कोणी सेन्सिबल लिहिणारं आलं किंवा काही नवी डेव्हलेपमेंट झाली तर इथे लिहीन. आजच्या पेपरातही याबद्दलची बातमी पहिल्या पानावर आहेच.

ललित -निरव मोदी इ.साठी तो मार्ग का निवडला आहे.>> अर्थिक घोटाळे करणारे आणि निष्पाप जनतेला किड्या मुंग्या प्रमाणे मारणारे यात काहीतरी फरक असतो की नाही?

आणि तुम्हांला नको असलेल्या बाहेरच्या देशातल्या लोकांना सुपारी देऊन उडवल्या वर, ते देश तुम्हांला प्रश्न विचारणार नाहीत का?>> कमी अधीक प्रमाणात प्रत्येक देश ती पॉलीसी वापरतच असेल. मुख्य उदाहरण अर्थातच अमेरिका, इस्त्रायल

मुळात सरकार म्हणतंय, आम्ही कोणाला मारलं नाही. It's not our policy. >> अहो कोणता देश छाती ठोकून सांगेल असे. अशा गोष्टी यापुर्वी झाल्याच नसतील कशावरून?

तुम्ही लोक कशाला उडताय इतके?>> सर इतकी चिडचीड बरी नाही हे मी नम्रपणे सांगू इच्छितो.

> सर इतकी चिडचीड बरी नाही हे मी नम्रपणे सांगू इच्छितो.>>>>>>
देशा बद्दल अभिमान दाखवण्यासाठी देखील टाळाटाळ करणाऱ्या बत्थड डोक्याच्या लोकांशी नम्रपणे बोलायला किती संयम ठेवावा लागतो रे बाबा !!!!!!

अर्थिक घोटाळे करणारे आणि निष्पाप जनतेला किड्या मुंग्या प्रमाणे मारणारे यात काहीतरी फरक असतो की नाही? >>> गुन्ह्याच्या तीव्रतेत असेल कदाचित. पण आर्थिक घोटाळा करून पळून जाणे हे सुद्धा देशाविरूद्ध आर्थिक युद्ध नाहीये का ? भरत यांना काय म्हणायचे ते मी सांगू शकत नाही. पण जर खलिस्तान्यांना सुपारी देऊन कंठस्नान ते ही परकीय भूमीवर हे जमत असेल तर आर्थिक गुन्हेगारांना पळवून नेणे,किडनॅप करून शर्तींवर वाटाघाटी करणे हे का जमू नये ?

अशा बुडालेल्या बँकेच्या बाहेर एक आत्महत्या झाल्याची बातमी होती ना ? मागे कोणती तरी बँक अशा घोटाळेबाजांनी बुडवली. त्या बँकेच्या बाहेर उभे राहिलेले नागरीक सांगत होते, मुलीचं लग्न आहे, आईच्या इलाजाचे पैसे होते, मुलाच्या शिक्षणाची फीस इत्यादी.

हा काही किरकोळ गुन्हा नाही. स्टेट बँकेने विविध चार्जेस निरपराध ग्राहकांना लावून पैसे वसूल केले आहेत.

रघू आचार्य +१.

आर्थिक गुन्हेगारांबाबत सरकारची इच्छाशक्ती कमी पडते आहे, असं वाटत नाही का तुम्हांला, वीरू सर? तुम्हांलाही त्याने काही फरक पडत नाही. त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याचा फटका आपल्या सगळ्यांना बसतो. बँकांचं नुकसान करदात्यांच्या पैशाने भरलं जातं. एरवी शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली, कुणाला काही फुकट दिलं की करदाते म्हणून आपण किती मोठा गळा काढतो. इथे शेतकरी , सामान्य माणसं कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करतात. आणि हे wilful defaulters परदेशात मजेत राहतात. याचा राग येत नाही का वीरू सर?

<आणि तुम्हांला नको असलेल्या बाहेरच्या देशातल्या लोकांना सुपारी देऊन उडवल्या वर, ते देश तुम्हांला प्रश्न विचारणार नाहीत का?>> कमी अधीक प्रमाणात प्रत्येक देश ती पॉलीसी वापरतच असेल. मुख्य उदाहरण अर्थातच अमेरिका, इस्त्रायल> तुम्ही माझ्या वाक्यातल्या पहिल्याच भागाचं उत्तर दिलंत. त्या देशाने प्रश्न विचारल्यावर काय? कोणाला उडवायचं तर ते काम तितक्या चलाखीने, मागमूस न ठेवता करायला हवं. इथे तो माणूस पकडला जातो. सरकार मधला त्याचा हस्तक कोण हे विदेशी चौकशी यंत्रणांना कळतं. यात देशाची नाचक्की होते असं तुम्हांला वाटत नाही का वीरू सर?

माझी चीड चीड झाली असं तुम्हांला का वाटलं वीरू सर? उलट कॅनडाने प्रश्न विचारल्यावर फुरोगामी सर आणि त्यांच्या वैचारिक बंधूं भगिनींची किती चिडचीड झाली होती आठवतंय का वीरू सर? याच धाग्यावर खुणा आहेत.

फुरोगामी सरांच्या नव्या मुक्ताफळावर नवं अवतरण Patriot: the person who can holler the loudest without knowing what he is hollering about

गुन्ह्याच्या तीव्रतेत असेल कदाचित. पण आर्थिक घोटाळा करून पळून जाणे हे सुद्धा देशाविरूद्ध आर्थिक युद्ध नाहीये का ?>> Really !!?
आर्थिक घोटाळ्या मध्ये देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा motive असतो की स्वतःची तुंबडी भरणे हा असतो?
मी / माझा भाऊ / मित्र/ माझ्या देशाचे निष्पाप नागरिक जर अतिरेकी हल्ल्यात किड्या मुंग्या सारखा मारले जात असतील तर कुणाला आवडो वा नावडो पण सरकार कोणाचेही असो त्याने कठोर कारवाई केलीच पाहिजे या मताचा मी आहे.

Really !!? >>>> पैसे बुडवून पळून गेलेल्यांना माफी असायला पाहिजे का ?
बेकायदेशीर रित्या हत्या शक्य असेल तर या गुन्हेगारांकडून त्याच पद्धतीने वसुली का नको ? हा मूळ मुद्दा आहे. दोन्ही गुन्हे सारखेच आहेत का किंवा माणसे मारली गेलीच तरच कारवाई व्हावी हा नाही.

जे आर्थिक गुन्हेगार पळून जाऊ दिलेत, त्यांच्या डोक्यावर सरकारचा हात होता, हे मान्य करणं कठीण जाणार. त्यामुळे त्याबद्दल लिहिणार नाहीत.

आमच्या माहितीनुसार अमेरीकेला बिलकुल खबरबात नव्हती की भारत, म्हणजे नया भारत, रॉ मार्फत अशा कारवाया करत आहे. कॅनडाच्या त्या ट्रुड्रूने (जमले का नावाचे विडंबन?) आगाऊपणा घेऊन भारताशी, म्हणजे नया भारतशी, पंगा घेतला आणि या धाग्यासारखे अनेक धागे सोशल मीडियावर निघाले भारताच्या , म्हणजे नया भारताच्या, धाडसाचा जयजयकार करणारे.
आता सिक्रेट गोष्ट सांगतो: ती अमेरिका आणि भारताच्या, म्हणजे नया भारताच्या, प्रगतीवर जळणारे इतर देश, आपल्या गुप्तहेरांमार्फत भारतातील सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून असतात बरं!.

तर अशा काही सिक्रेट गुप्तचरांनी असे धागे पाहिले आणि ते लगेच आपल्या सिक्रेट अड्ड्यावर परतले. एकजण पुढल्या स्त्यावर आणि एकजण मागच्या रस्त्यावर नजर ठेवून बसला आणि इतर दोघांनी पलंग सरकवून त्या खालील एक मोठी फरशी सरकवून खाली लपवलेला रेडिओ ट्रान्समिटर काढला आणि आपल्या अमेरिकेतील बॉसला कळवले की भारत, म्हणजे नया भारत, रॉ मार्फत काय काय करत आहे ते.
अमेरिका लगेच सतर्क झाली आणि त्यांनी तिकडून आपला तपास करून त्या गुप्ताला अटक केली आणि आपले ऑपरेशन फेल गेले, हस्तक उघडकीस आले.

तेव्हा माझी सर्व देशप्रेमी बांधवांना एकच विनंती आहे.
उत्साहाच्या भरात असे धागे काढू नका. आपल्याच देशाचे, आपल्याच गुप्तहेर संस्थेचे बिंग फुटते आणि आपले हस्तक पकडले जातात. हा धागाही उडवून टाका बघु वेमांना विनंती करून.
देशासाठी एवढा त्याग करायलाच पाहिजे!

भरत सरांची मेमरी जरा रिफ्रेश मारू या !
आयएफएस अधिकारी देवयानी खोब्रागडे भारत सरकारच्या वतीने अमेरिकेत दुतवासात नियुक्तीवर असताना त्याच मुजोर्ड्या अमेरिकेने नोकरानी ला कमी पगार दिल्याच्या शुल्लक कारणावरून अटक करून सामान्य गुन्हेगार सारखी वागणूक दिली होती .
भारताच्या दृष्टीने हा अभूतपूर्व प्रसंग असताना देवयानी च्या पाठीमागे सगळे पक्ष अंतर्गत भेदभाव विसरून एक जुटी ने उभे होते त्याच प्रमाणे काँगेसच्या मन मोहन सिंग सरकारच्या पाठीमागे देखील !
कारण बाहेरील शत्रूच्या विरोधात प्राणी देखील एकजूट करतात आपण तर माणूस आहोत .
अमेरिकेने देवयानी ला देश सोडून जायला सांगितले असता भारताने देखील एका अमेरीकन अधिकाऱ्याला हाकलून दिले होते .
मग भरत सरांच्या दिव्य दृष्टीने अमेरिका लावील ते आरोप नेहमी बरोबरच असतात तर अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या देवयानी ला भारताने समर्थन देणे चूकच असणार .
मग भारत सरकार ने देवयानी ला अमेरिकेच्या तुरूंगात खितपत पडून द्यायला हवे होते का ?

बेकायदेशीर रित्या हत्या शक्य असेल तर या गुन्हेगारांकडून त्याच पद्धतीने वसुली का नको ?>>
बातमी वाचा
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...

जरा उशीराने प्रतिसाद देतोय माफी असावी.

आर्थिक गुन्हेगारांबाबत सरकारची इच्छाशक्ती कमी पडते आहे, असं वाटत नाही का तुम्हांला>> नक्कीच कमी पडते. पण मग विरोधक काय करत आहेत? आणि त्या त्या बँका घोटाळे होईपर्यंत काय झोपा काढतात का? समजा एक व्यक्ती घोटाळा करून पळून गेली तर त्याच्या विरुद्ध मारेकरी पाठवायचे की काय आता!
विद्यमान कायद्यानुसार आर्थिक घोटाळेबाजांच्या मालमत्ता जप्त केल्या गेल्या आहेत हे माहित असेलच आपणास.

त्यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याचा फटका आपल्या सगळ्यांना बसतो. बँकांचं नुकसान करदात्यांच्या पैशाने भरलं जातं. एरवी शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली, कुणाला काही फुकट दिलं की करदाते म्हणून आपण किती मोठा गळा काढतो.>> पुन्हा तेच. ज्या बँकांच नुकसान होते त्या बॅकाचे अधिकारी कर्मचारी मॅनेजमेट काय करतात मग? फक्त पगार घेतात? आणि आपल्या बँकेत घोटाळा होतो हे त्यांनी / संबंधित यंत्रणांनी बघायचं की तुमच्या आमच्या सारख्यांनी बँकेच्या फायली तपासायला जायचं?
आणि शेतकर्यांची कर्जमाफी वगैरे म्हणाल तर करदात्याने कितीही गळे काढले तरी काही फरक पडतो का? उलट विरोधकांचाच (मग ते कोणत्याही पक्षाचे असोत) कर्जमाफी द्या म्हणून थयथयाट सुरु होतो.

आणि हे wilful defaulters परदेशात मजेत राहतात. याचा राग येत नाही का>> येतो की राग, पण मा.न्यायालयाच्या आदेशानुसार
त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरुच असते की.

कोणाला उडवायचं तर ते काम तितक्या चलाखीने, मागमूस न ठेवता करायला हवं. इथे तो माणूस पकडला जातो. सरकार मधला त्याचा हस्तक कोण हे विदेशी चौकशी यंत्रणांना कळतं. यात देशाची नाचक्की होते असं तुम्हांला वाटत नाही का>> आता अमेरिकेने लादेनाला पाकिस्तानात उडवलं, इस्त्रायल ने कितीतरी नाझींना
वेगवेगळ्या देशात पकडून पकडून मारलं. ते जाऊ द्या नेपाळी मंत्री मिर्जा बेग ची नेपाळ मध्ये हत्या झाल्यावर कोणावर आरोप झाले होते माहित असेलच. मग काय त्या त्या देशांची नाचक्की झाली होती का? हे नाचक्की वगैरे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांसाठी असते हो. फारच भाबडे आहात बुवा तुम्ही Light 1

तात्पर्य हे की, आर्थिक गुन्हेगार पळाला तर तो पुन्हा देशात परतून नव्या जोमाने घोटाळे करायची शक्यता कमी पण एखादा दहशतवादी पळाला तर तो पुन्हा नवीन हल्ला करणारच नाही याची खात्री कोण देईल!

< पण मग विरोधक काय करत आहेत? > विरोधक सरकारची इच्छाशक्ती कमी पडते आहे, हे जनतेला सांगत आहेत. तुम्ही बँक कर्मचार्‍यांपर्यंतच का थांबलात? मल्ल्या, मोदी, मोदी, चोक्सी हे सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या जवळचे होते, हे जसं काय तुम्हांला माहीतच नाही.

<त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरुच असते की.> अशी कितीशी रिकव्हरी होते?

. अमेरिकेने पाकिस्तानात लादेनला मारलं तेव्हा पाकिस्तानची नाचक्की झाली. आम्ही पाकिस्तानात लादेनला मारलं असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने सगळ्या जगाला सांगितलं. भारत सांगू शकणार आहे का?

नाझी हे युद्ध गुन्हेगार होते. त्यावर सगळ्या जगाचं एकमत होतं.

इथे अमेरिकेत ज्याला मारायचा प्रयत्न झाला आणि कॅनडात जो मारला गेला त्याला ते ते देश गुन्हेगार मानत आहेत का? आणि नाचक्की होत नसती तर याबद्दलच्या बातम्या पहिल्या पानावर आल्या नसत्या. विशेषतः गुप्ताने जी काय मजा मजा केल्याचं अमेरिका म्हणते आहे, त्यानंतर.

<तात्पर्य हे की, आर्थिक गुन्हेगार पळाला तर तो पुन्हा देशात परतून नव्या जोमाने घोटाळे करायची शक्यता कमी पण एखादा दहशतवादी पळाला तर तो पुन्हा नवीन हल्ला करणारच नाही याची खात्री कोण देईल!> एकामागून एक आर्थिक गुन्हेगार पळत असतात, तेव्हा सरकार त्यांना सामील आहे असं तुम्हांला का वाटत नाही? पर्यावरणाबद्दल , मानवाधिकारांबद्दल बोलणार्‍यांना देशात अडकवता येतं. या लोकांना का येत नाही? हे प्रश्न तुम्हांला का पडत नाहीत?

दहशतवादी पळण्याबद्दल -. अशा एका दहशतवाद्याला एकदा आपले परराष्ट्रमंत्री स्वतः परदेशात सोडून आले होते आणि आताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तेव्हा त्यांच्यासोबतच होते, हे आठवलं. धन्यवाद.

वीरू़ सर, दहशतवाद्यांबद्दल तुमच्या भावना खूप तीव्र आहेत, चांगलेच आहे ते, म्हणून विचारतो. तुम्ही देविंदर सिंग या पोलिस अधिकार्‍याबद्दल ऐकलं आहे का? हा जम्मू काश्मीरमध्ये डी एस पी होता. तो सेवेते असताना एकदा सशस्त्र दहशतवाद्यांसोबत एकाच वाहनात पकडला गेला. त्याला अटक केली गेली व त्याच्यावर केस केली गेली.
पुलवामामध्ये झालेल्या सी आर पी एफ वरच्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हा तिथला इन चार्ज होता.
याशिवाय अफझल गुरू नेही यानेच मला दिल्लीला पाठवलं असं म्हटलं होतं.

तर हा दहशतवाद्यांसोबत पकडला गेल्यावर त्याला सेवेतून बरखास्त केलं गेलं. त्या ऑर्डरमध्ये म्हटलं होतं under provisions of Article 311 of the Constitution, Jammu and Kashmir Lieutenant Governor Manoj Sinha was “satisfied” that it was “not expedient to hold an enquiry” against Singh “in the interest of the security of the State”.

त्याच्यावरच्या केसचं पुढे काय झालं ? त्याला अटक केली जात असताना तो काय म्हणाला होता, हे तुम्ही कधी माहीत करून घेतलं आहे का ?

वीरू, मायबोलीवरचा तुमचा वावर मला आवडतो. मैत्री अशीच पुढे राहू द्यावी म्हणून मी इथे थांबतो. तुमच्या काही मतांशी मी सहमत नाही हे नोंदवणे पुरेसे वाटते. तुमच्याही लक्षात येईल तेव्हां तुमचे मत बदलेल ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा सर्वांकडून ठेवता येत नाही.

वीरू, मायबोलीवरचा तुमचा वावर मला आवडतो. मैत्री अशीच पुढे राहू द्यावी म्हणून मी इथे थांबतो.>> धन्यवाद आचार्यजी. मी पण थांबतो.

वीरू़ सर, दहशतवाद्यांबद्दल तुमच्या भावना खूप तीव्र आहेत, चांगलेच आहे ते, म्हणून विचारतो..>> भरतसर आपले प्रतिसाद अभ्यासू असतात, वाचायला आवडतात. आपल्या मतांचा आदर करून मी इथे थांबतो.
कृपया गैरसमज नसावा.

हे राहुल गांधी यांनी परदेशात केलेलं स्टेटमेंट जसंच्या तसं-
"The surprising thing is that the so-called defenders of democracy, which are the US, European countries, seem to be oblivious that a huge chunk of democratic model has come undone. The opposition is fighting the battle and it is not an Indian battle alone, actually it is much more of a bigger battle, a battle for a huge part of democratic people."

भारतीय मतदारानी लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून दिलेल्या पंतप्रधानाला पदच्युत करण्यासाठी अमेरिका, युरपियन देश व इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी हातमिळवणी करावी असं अधिकृत मागणंच त्यांनी केलं. आधुनिक जयचंद!
आता भारतीय लोकांना हेच सगळं हवं असेल तर चालू द्यात.
जयशंकर आणि मोदी यांनी लक्षात घ्यावं की लोकांना national security , sovereignty, protecting India's self interest, fourth largest economy, stable government यापैकी कशाचेही महत्व नाही.
त्यामुळे मोदींनी आता हे उपद्व्याप थांबवावे.
आणि हो, ते 'सुपारी' देण्याबाबत- तर कास्ट बेसिसवर ज्यू लोकांचं झालं तसं शिरकाण भारतात भाजपला मतदान करणाऱ्या जातसमूहांचे २०२४ नंतर होऊ शकेल. शक्यता absolutely आहे. त्यात संजय राऊतने प्रो हिटलर पोस्ट केली आहेच. सो आता हिटलरला legitimacy देण्याचे प्रयत्न किक ऑफ झाले आहेत.
पण राहुल गांधी सरकारवर टीका करणारे काहीही २०२४ नंतर मी तरी लिहिणार नाही. लोकांना मोदी सरकारपेक्षा पूर्णच १८० डिग्री उलट outcome बघायला मिळणार आहेत. बढिया आनंद लेलो!

बाकी अचानक आर्थिक घोटाळे व गुन्हे यांच्याबद्दल कळवळा आलेला बघून हसू आलं.
आपण ज्या राजकीय पक्षांचा व नेत्यांचा मायबोलीवर दिवसरात्र प्रचार करतो त्यांनी आर्थिक गुन्हे करून मिळवलेली disproprtionate संपत्ती दिसत नाही की हिटलर ज्यूविरोधी असल्यामुळे तो चांगला तसे आपले नेते हिंदूधर्मविरोधी असल्यामुळे त्यांचे आर्थिक गुन्हे स्वीकारार्ह आहेत? माल्या नीरव वगैरे मंडळी निदान तडीपार आहेत. तू तर भ्रष्ट घोटाळेबाज नेत्यांकडे देशाची सत्ता पुन्हा एकदा जावी म्हणून इथे दिवसरात्र लिहीत बसतोस.

भारतीय मतदारानी लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून दिलेल्या पंतप्रधानाला पदच्युत करण्यासाठी >>> !!! कोणत्या लॉजिकने त्या इंग्रजी वाक्याचा मोदींना हटवा असा अर्थ होतो? चेन्नई एक्स्प्रेस मधला कोट वापरायचा तर "कहाँसे लायी ऐसी बकवास डिक्श्नरी?" Happy

राजकारणात एखाद्या वाक्याचा लोक सोयीस्कर अर्थ लावून त्याप्रमाणे धोपटणार हे गृहीत धरून नेते लोकांनी बोलायचे असते वगैरे ठीक आहे. पण रागा ज्या लेव्हलला बोलत होते त्या लेव्हलवरून अर्थ समजावून घ्यायचा असेल, तर ते "भारतात लोकशाहीतील चेक्स अ‍ॅण्ड बॅलन्सेस मोडकळीला येत आहेत्/आणले जात आहेत. अमेरिका जर जगभर लोकशाही आणू पाहात असेल तर त्यांनी जरा इकडेही बघावे" अशा अर्थाने आहे. त्याच्या त्या दौर्‍यातील ३-४ मुलाखती/ भाषणे मी पूर्ण पाहिली/ऐकली आहेत. त्याचा मतितार्थ तो होता.

किंबहुना त्याने या विषयावरच्या एका प्रश्नाला अगदी चपखल उत्तर दिले होते. यावर तोडगा काय असे विचारल्यावर तो म्हंटला की फक्त (लोकशाहीतील सिस्टीम्समधे) सरकारी हस्तक्षेप बंद करावा. मूळ सिस्टीम्स इतक्या घट्ट आहेत की आपोआप पुन्हा काम करू लागतील.

तो कोठेही "हे सरकार हटवायच्या कटात सामील व्हा" टाइप म्हंटल्याचे पाहिले नाही. अगदी म्हंटला, तरी बायडेन वर सध्याच्या पंतप्रधानाची वट जास्त असेल, की एका कमकुवत व स्वघोषित "सोशालिस्ट" पक्षाच्या नेत्याशी!

आता त्याने अमेरिकेकडून किंवा एकूणच देशाबाहेरील शक्तींकडून अशी मागणी करावी का हा फेअर प्रश्न आहे. मलाही वाटले करू नये. पण वरचा अर्थ एकदम व्हॉट्सअ‍ॅपी आहे. बाकी व्यक्तीनुसार जयचंद, खंडोजी खोपडे, अनाजीपंत विशेषणे लावून अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप येत असते आणि फॉरवर्ड होतच असते.

मी मोदीविरोधक नाही. या सरकारने केलेली अनेक चांगली कामे मला माहीत आहेत. मोदींनी आपली पॉवर वापरून अनेक अनिष्ट गोष्टींना चाप लावावा आणि अजून ३०-४० वर्षे पंप्र राहावे. काही प्रॉब्लेम नाही.

आता त्याने अमेरिकेकडून किंवा एकूणच देशाबाहेरील शक्तींकडून अशी मागणी करावी का हा फेअर प्रश्न आहे. मलाही वाटले करू नये.///

इतकंच आहे ते. तुम्हाला वाटलं की विरोधी पक्षनेत्याने अशी मागणी परकीय शक्तींकडे करू नये. त्याच्या पुरोगामी समर्थकांना त्या स्टेटमेंटमध्ये काहीच चूक वाटलं नाही. त्यानेही त्याबद्दल माफी मागितली नाही. वर जे इंग्रजी कोट दिलं आहे ते direct, on the record आहे. बाकी interpretation प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असू शकेल पण मूळ स्टेटमेंटमध्येच ही फक्त आमची लढाई नाही वगैरे आहेच.

भारतीय मतदारानी लोकशाही पद्धतीने दोनदा निवडून दिलेल्या पंतप्रधानाला पदच्युत करण्यासाठी >>> !!! कोणत्या लॉजिकने त्या इंग्रजी वाक्याचा मोदींना हटवा असा अर्थ होतो? चेन्नई एक्स्प्रेस मधला कोट वापरायचा तर "कहाँसे लायी ऐसी बकवास डिक्श्नरी?" >>> चुकीचे अर्थ लावून त्याचा मोठा गाजावाजा करणे ह्या तत्वानेच मागची दहा वर्षे सरकार चालू आहे. भक्तमंडळी तोच फॉर्म्युला वापरात आहेत.

Pages