Submitted by sneha1 on 9 October, 2021 - 18:02
नमस्कार मंडळी!
दिवाळी आहे आता पुढच्या महिन्यात. तर, तुम्ही लोक दिवाळीचा फराळ कुठून ऑर्डर करता? अमेरिकेतल्या आणि भारतातल्या, दोन्ही वेबसाईट्स सांगा ना प्लीज.
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली आपण फक्त नावभगिनी नाही,
अंजली आपण फक्त नावभगिनी नाही, आपले नवरे आपण खपून काही केलेलं विसरणारे आहेत, सेम पिंच
अंजली, लाडू केलेस तेव्हा ते
अंजली, लाडू केलेस तेव्हा ते उत्तम झाल्याची कबुली त्याच्याकडून वदवली नसणार म्हणून विसरला असेल
त्याला लाडू वळायला बसवलं
त्याला लाडू वळायला बसवलं नसणार, म्हणून विसरला असेल.
जीव तोडूनबिडून पदार्थ केलेत तर 'ळ'चा नियम लक्षात ठेवा : तळायला, वळायला, चाळायला, घुसळायला, ढवळायला, (निदान भांडी) विसळायला इतर सगळ्यांना कामाला लावायचं. काय बिशाद आहे विसरतील!
हो ना सगळं स्वतःच करायची हौस
हो ना सगळं स्वतःच करायची हौस भोवली ...
'ळ' चा नियम आवडलेला आहे
एकदा मी घंटाभर तोंड लाल करून
एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. तेव्हापासूनच काही आयडिया हाताशी ठेवल्यात... फक्त मुलींसाठी.
फराळाचा PTSD कसा द्यायचा?
1. कच्च्या मालासाठी वेगवेगळ्या दुकानात पळवायचं, तरी उणीवा काढून किरकिर करायची.
2. शंभर मेसेज-फोन करून जास्तीत जास्त महत्त्व अधोरेखित करायचं.
3. आठ दिवस आधी पासून शॉर्ट कट स्वैपाक करायचा, का विचारलं तर मोठ्याने 'फ रा ळ' एवढं म्हणायचं.
4. तो घरात असताना फोनवर इतरांना 'बाई गं ,फराळ बनवायला घेणारे, ठेवते आता ' म्हणायचं.
5. फराळ सुट्टीच्या दिवशीच करायचा, लक्षात ठेवा - सप्राईज वगैरे द्यायला आपलं काही नवीन लग्न झालेलं नाही.
6. जास्तीत जास्त गरदा करायचा, लॉन मो करताना खिडकीतून सांगत रहायचं की 'आता तू गराज आवर/ दिव्यांच्या माळांचा गुंता काढ/आकाशकंदीलासाठी एक्स्टेंशन केबल शोधून काढ/ वॅक्यूम कर / मुलांना आण/सोड. मला तर फराळ बनवायला घ्यायचा.
7. त्या दिवशी पसारा करून, घरच्यांना डिस्पोसेबलमधे खायला द्यायचं. भांडी घासून घ्यायची.
8. दुसऱ्या दिवशी 'तळणाच्या वासानं डोकं उठलं , आज तुम्ही सबवे खा' म्हणायचं.
9. थोडं निवांत बसलं की उठवायचं.
***फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे.
हलकेच घेणे, गंमत आहे.
दिवस रात्र आनंदाने सबवे/
दिवस रात्र आनंदाने सबवे/ शवारमा खाणारी माणसं आहेत हो!
आणि येवढं सगळं म्हणून नुसता चिवडा केला चकली नाहीच असं मात्र करू नका की झालं.
तोंड लाल करून>>>>>>>> :हहपुवा
तोंड लाल करून>>>>>>>>
धागा हायजॅक होतोय हळूहळू
(No subject)
>> एकदा मी घंटाभर गॅस जवळ
>> एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला>> हे वाचून ‘शेळी गेली जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड‘ म्हण आठवली.
ह्या बीबीवर असणार्या नवर्
ह्या बीबीवर असणार्या नवर्यांच्या बायका तुल धन्यवाद देतील अस्मिता.
>>> घंटाभर गॅस जवळ तोंड लाल
>>> घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला.
तो 'दम बिर्याणी' मीम माहीत नव्हता का तुला तेव्हा?
एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड
एकदा मी घंटाभर गॅस जवळ तोंड लाल करून 'लखनवी बिर्याणी' केली होती, नवरा आल्यावर 'आज भाजीपोळी नाही का' म्हणाला. >>> हाहाहा.
फराळाची दहशत निर्माण झाली पाहिजे. >>> मस्त आयडिया पण हे आमच्याकडे वर्कआऊट होणार नाही, मी हल्ली फक्त लाडू करते, बाकी फराळ रेडिमेड आणते. केलेलयाची किंमत नसते, मग होऊदे खर्च, हाहाहा.
जीव तोडूनबिडून पदार्थ केलेत
जीव तोडूनबिडून पदार्थ केलेत तर 'ळ'चा नियम लक्षात ठेवा : तळायला, वळायला, चाळायला, घुसळायला, ढवळायला, (निदान भांडी) विसळायला इतर सगळ्यांना कामाला लावायचं. काय बिशाद आहे विसरतील! Proud >>
हाहा!
सगळ्या पोस्टस भारी!
सगळ्या पोस्टस भारी!
फराळाचा पीटीएसडी आवडला.
'ळ' चा नियम
'ळ' चा नियम
फराळाचा PTSD भारी आहे!
तुम्ही सगळे नक्कीच ८०s बॉर्न
तुम्ही सगळे नक्कीच ८०s बॉर्न जनरेशन दिसताय.. कारण सध्या तरी फराळ करणे वगैरे कोणीही करत नाही… आणि फक्त बायकोच किचन मधे वगैरे वाचून टडोपा… अटलिस्ट माझ्या ओळखीत तरी असा कोणी दिसले नाही… नक्कीच फेकाफेकी चालुय इथे…
अंजली, अस्मिता ....
अंजली, अस्मिता ....
स्वातीचा ळ चा नियम भारीये.
च्रप्स, आवरा!!! स्वतःवरुन
च्रप्स, आवरा!!! स्वतःवरुन जगाची परिक्षा करु नका.
ही स्कीम आपल्यासोबत होतेय हे
ही स्कीम आपल्यासोबत होतेय हे आज कळाले
जय मायबोली
'ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
'ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
दोन्ही व्हायरल करण्याजोगे आहेत.
PTSD चं इ़ंडियन व्हर्शन बनवा . लॉन ऐवजी माळा साफ करवा.
इतके लोड का घेतात? आमच्या इथे
इतके लोड का घेतात? आमच्या इथे तर ह्या महिन्यात थेंक्स गिविन्ग च्या मील्स रेडीली अवेलेबल आहेत सर्वत्र व रिझर्वेशन करून मस्त हादडायला जाता येते. प्लस हॅलोविन थीम पार्टीज असतात. जिदर भी है खुश रहो. मजे करो.
इतके महाग व शिळे पदार्थ का खावे सणासुदीला? असा प्रश्न पडतो.
"ळ" कार फराळसहितम् आवडलाय.
"ळ" कार फराळसहितम् आवडलाय. फार फार वर्षांपूर्वी दिवाळीपूर्वी असं सगळं कुटुंब काव्यात, आपलं "कामात" रंगलेलं असे, असं पाहिलंय /वाचलंय.
अस्मिता> नवनीत मार्गदर्शकच्या धर्तीवर याचा उपयोग व्हायला हरकत नाही.
'ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
'ळ' चा नियम आणि फराळाचा PTSD
भारतात थॅन्क्सगिविंग पण करतात
भारतात थॅन्क्सगिविंग पण करतात का आता सेलेब्रेट??!! हे पहिल्यांदाच ऐकतेय
अमा, कोणी लोड बिड घेत नाही.
अमा, कोणी लोड बिड घेत नाही. ज्यांना खायची इच्छा करायचं ते घरी करतात किंवा ऑर्डर करतात आणि ज्यांना इच्छा नाही ते ह्यातलं काहीच करत नाहीत. आणि शिळं म्हणजे काय? घरी केलेला लाडू चिवडा आपण दोन आठवड्यांनीही खातोच की.
तुमच्या इथे कोणत्या देशाचं थॅन्क्सगिव्हींग करतायत? अमेरिका की कॅनडा?
सायो मै / स्वाती / अंजली /
सायो / मै / स्वाती / अंजली / अस्मिता : तुम्ही काय काय फराळ बनवणार आहात ते आधीच इथे सांगून ठेवा. त्याप्रमाणे 'फराळ टेस्टिंग' साठी बागराज्याची सफर प्लॅन करू आम्ही ....
फक्त तो ळ चा नियम थोडा बाजूला ठेवा ..
मज्जा! आता भारतात फोर्थ ऑफ
मज्जा! आता भारतात फोर्थ ऑफ जुलै पण सेलिब्रेट करायला लागले की भरून पावलो
कॅनडाचं होऊन दोन आठवडे उलटले
कॅनडाचं होऊन दोन आठवडे उलटले आणि अमेरिकन टर्की आणि क्रॅनबेर्या अजुन बाजारातच आहेत. बाकी थॅक्सगिव्हिंग एक दिवस असतं आणि ते ही घरी जेवण्याची पद्धत आहे. इथे एकही रेस्टॉरंट उघडं सापडायचं नाही. महिनाभर थॅंक्सगिव्हिंगची जेवणं बाहेर ती ही ऑक्टोबराच्या शेवटी म्हणजे अस्सल भारतीय पद्धत असणार.
अरुण, आपण गिळायला जाऊ की ळ च्या नियमांत.
अमा, लोड कसले? गमतीत घ्यायचे
अमा, लोड कसले? गमतीत घ्यायचे. आमच्याकडे सुरवातीला आम्ही दोघे मिळून करायचो, नंतर हळूहळू लेकही त्यात सामील झाला. तेव्हा चकली भाजणी वगैरे देसी ग्रोसरीच अप्रुपाची होती, रेडीमेड मिठाई वगैरे नव्हतेच. +१ चा कामासाठी ट्रॅवल, इतर अॅक्टिव्हिटीज यातून एका विकेंडला फराळ बनवणे मॅराथॉन असे आणि एका विकेंडला दिवाळीची हौस! असेच डिसेंबरात ख्रिसमस खाऊ बनवणे होई. आता जवळच्या शहरात छान ताजी देशी मिठाई मिळते. या उलट इथली अनुभवी कुक्/बेकर मंडळी वृद्ध झाल्याने पाय वगैरे मिळायचीच पंचाईत झालेय. शुगर क्रीम पाय साठी वणवण करायची वेळ येइल असे वाटले नव्हते.
लेक दुसर्या राज्यात. ' फराळ पाठवू नको, ख्रिसमसच्या सुमारास शटडाऊन असेल तेव्हा आपण करु' म्हणाला. त्याचे देशी आणि अमेरीकन मित्र मिळून जमेल तशी दिवाळी पार्टी करतात. गेल्या वर्षी चक्क डोसा गाडी बोलावली होती.
देशात थॅक्सगिविंग? अमेरीकन ? कशासाठी ? भारतात आलेल्या वसाहतवाद्यांना घालवायला इतकी शतके झगडावे लागले ना? इथे अमेरीकेतही नेटिव अमेरीकन्ससाठी हा National Day of Mourning असतो.
बाकी सुगी म्हणून आभारप्रदर्शन करायला भारताच्या प्रत्येक प्रांताचे आपापले उत्सव आहेत की!
आपण गिळायला जाऊ की ळ च्या
आपण गिळायला जाऊ की ळ च्या नियमांत. Proud >>>>
>> देशात थॅक्सगिविंग? Uhoh
>> देशात थॅक्सगिविंग? Uhoh अमेरीकन ? कशासाठी ? भारतात आलेल्या वसाहतवाद्यांना घालवायला इतकी शतके झगडावे लागले ना? इथे अमेरीकेतही नेटिव अमेरीकन्ससाठी हा National Day of Mourning असतो.>> खरंच असं काही मोठ्या शहरांतून करायला लागले असतील तर नुसता वेडेपणा आणि अंधानुकरण. आणखीन काय!!!
अमित
अमित
डील! पण फक्त गिळायचा फराळ. चावलात तर डील ऑफ!
He he kaai ki the full meal
He he kaai ki the full meal is available but you have to make reservations . We all have something to be thankful for these days.
देशात थॅक्सगिविंग?
देशात थॅक्सगिविंग?
हे मात्र अतीच होतेय. हॅलोवीन डे / ख्रिस्मस ट्री / सांता वगैरे लहान मुलाना एन्जॉय करायला ठीक आहे पण थँक्स गिव्हिंग ?
ते पर्युषण असेल आणि मिच्छामी
ते पर्युषण असेल आणि मिच्छामी दुक्कडमचे बोर्ड लावुन जैन जेवण देत असतील. मामी तुम्ही थँक्स गिव्हिंग समजुन बुक कराल आणि टर्की ऐवजी जैन थाळी येईल हो! जपून!
अमेरिकेतून भारतात
अमेरिकेतून भारतात थॅक्सगिव्हिंग डिनर ऑर्डर करायचे आहे. एखादी रीलायेबल साईट माहिती आहे का?
अमेरिकेतून कशाला ?
अमेरिकेतून कशाला ? डोंबिवलीला निमकरांच्या खाणावळीत डुकराच्या मांसाची तळलेली भजी मिळतात ना?
डोंबिवलीला निमकरांच्या
डोंबिवलीला निमकरांच्या खाणावळीत डुकराच्या मांसाची तळलेली भजी मिळतात ना? >>>> आणि त्यासोबत चीराबाझारातला बर्फ ????
विकु, अहो इथे पोर्क भजी मिळत
विकु, अहो इथे पोर्क भजी मिळत असताना निमकरांकडे जाऊन कशाला खाताय?
अमा , लोड कुठे हे तर
अमा , लोड कुठे हे तर लोडशेडिंग आहे.
अरूण, मी गॉड आणि गनच्या देशात रहाते. या तुम्ही. तुमच्या नशिबात जे असेल ते मिळेल, तहान लागल्यावर विहीर खणेन. पापोचि करून बसेन, नाहीतर छप्पनभोगही करेन. काही सांगता येत नाही आजकाल....
अमितला मात्र सबवेच
स्वाती ,चकली घशात अडकेल.
स्वातीताई, पोस्ट छान.
झकासराव
PTSD आवडलेल्यांना एक लाईक. देश व नवऱ्याप्रमाणे हवं तसं बदलून घ्या. अजूनही भर घालता येईल.
धाग्या , खरंच.
आपल्याकडे सोमि लेख व फॉरवर्डसच्या माध्यमातून प्लेगच्या ब्लँकेट वाटणं सुरु असताना , कशाला हवा वेगळा थँक्सगिव्हिंग ..! दिवाळीतील सदिच्छा भेटी, फराळ, औक्षण आणि ओवाळणी ही एकप्रकारची कृतज्ञताच आहे. हे कदाचित काहीजणांना पटणार नाही, पण आपल्या संस्कृतीत वर्षातल्या एका ठराविक दिवशी अचानक आज मी सगळ्यांचे आभार मानेन म्हटलं तर ते किती inorganic आणि फेक वाटेल. माझा तर कुत्राही उठून निघून जाईल.
'ळ' चा नियम आवडलाय..फरा"ळ"
'ळ' चा नियम आवडलाय..फरा"ळ" करायला घरच्या सग"ळ्"यांना कामाला लावणारे.
चितळे भाजणीच्या चकल्या आणि बेला..एवढाच फराळ करणार. (Not so) बारक्यांना एवढंच आवडतं.
आपल्याकडे थँक्स गिव्हिंग डे
आपल्याकडे थँक्स गिव्हिंग डे सुरु केला तर दुसऱ्या दिवशी थँकर्स उद्धार डे पण ठेवावा लागेल
या दिवशी "हॅ! थँक्स म्हणे. तू पण ना" अशा फार सभ्य आणि सौम्य ते भ च्या बाराखडतील तीव्र भाषेत थँक्स देणाऱ्यांचा प्रेमळ उद्धार करण्यात येईल.
(No subject)
पुण्यात गेली ३-४ वर्षे तरी
पुण्यात गेली ३-४ वर्षे तरी प्रॉपर हॅलोविन ड्रेस कोड फॉलो करणाऱ्या / invite only वगैरे पार्ट्या असतात! Thanksgiving dinner पार्टी पण घराबाहेर असतात.. मॉल्स पण डकोरेत . इकडे हे नॉर्मल होईल आता
‘ळ’ चा नियम आणि फराळाचा PTSD
‘ळ’ चा नियम आणि फराळाचा PTSD - सॉलिड!!
पुण्यात गेली ३-४ वर्षे तरी
पुण्यात गेली ३-४ वर्षे तरी प्रॉपर हॅलोविन ड्रेस कोड फॉलो करणाऱ्या / invite only वगैरे पार्ट्या असतात! Thanksgiving dinner पार्टी पण घराबाहेर असतात.. मॉल्स पण डकोरेत . इकडे हे नॉर्मल होईल आता Proud
+१ have seen it on facebook.
बाकी अमेरिकेत रिमोट वर्कर्सना डॉलरमध्ये पगार देण्याऐवजी भारतात ते जॉब मूव्ह करणं ही outsourcing ची एक नवीन लाट सध्या आली आहे. अगदी हायब्रिड म्हणजे आठवड्यातून एक दिवस ऑफिसला जाणाऱ्या एका ओळखीच्या देसीचा जॉब गेला.रादर त्याच्या पूर्ण टीमचे जॉब्स नुकतीच ऑफ़शोअरला नेलेत. त्यामुळे भारतीयांनी अमेरिकेला मनापासून थँक्स म्हणावेत आणि थँक्सगिव्हिंगची सुट्टी छान खाऊन पिऊन सत्कारणी लावावी अशीच परिस्थिती आहे सध्या भरल्या टर्कीऐवजी भरली कोंबडी किंवा व्हेज लोकांना भरली वांगी.
एकूणच जगभरचं फूड भारतात मिळतं त्यात हे एक अमेरिकन थँक्सगिव्हिंग menu नावाचं व्हेरिएशन. मेक्सिकन इटालियन मिळतं तसंच. गोरे expats राहतात तिथे बंगलोर etc ठिकाणी जोरदार असणार सेलिब्रेशन.
धमाल पोस्टी !
धमाल पोस्टी !
‘ळ’ चा नियम आणि फराळाचा PTSD भारी आवडलाय.
>>>>>>बाकी अमेरिकेत रिमोट
>>>>>>बाकी अमेरिकेत रिमोट वर्कर्सना डॉलरमध्ये पगार देण्याऐवजी भारतात ते जॉब मूव्ह करणं ही outsourcing ची एक नवीन लाट सध्या आली आहे.
होय बहुतेक.
थँक्सगिविंग आणि हॅलोविन इथे
थँक्सगिविंग आणि हॅलोविन इथे डोंबिवलीत बघितलं नाही अजून, म्हणजे मी रहाते तिथे आसपास तरी कानावर आलं नाहीये.
Pages