अमेरिकेत दिवाळी फराळ ऑर्डर करणे

Submitted by sneha1 on 9 October, 2021 - 18:02

नमस्कार मंडळी!
दिवाळी आहे आता पुढच्या महिन्यात. तर, तुम्ही लोक दिवाळीचा फराळ कुठून ऑर्डर करता? अमेरिकेतल्या आणि भारतातल्या, दोन्ही वेबसाईट्स सांगा ना प्लीज.
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच फराळ. दिवाळी शुभेच्छा.

इथून स्फूर्ती घेउन मी पण स्टेशन पासच्या पितळे बंधू मिठाईवाले ह्या दुकानातून घरगुती फराळ घेउन आले. अर्धा किलो बेसन लाडू २५० रु.
शंकर पाळी गोडाची, करंज्या , साध्या चकल्या दोन पाकिटे प्रति पाकीट पाच चकल्या आहेत. व तेलकट आजिबात नाहीत. मूग चकली एक पाकीट शेव एक पाकीट हे सर्व मिळून रु. ९५० चे घेतले. दिवाळी अंक सर्व मिळून रु २३८०. थोडक्यात खुशी.

आहाहा अंजली. सही आहे, उचलून खावासा वाटतोय, अनरसे तर एक नंबर, किती नजाकत आहे........ +1. हो आणि सजावटही मस्त आहे.

अंजली, सुरेख फराळ.
मी यावेळी पणशीकर दादर इथून फराळ मागवलेला. अप्रतिम चव. Chirote, करंज्या, चकल्या, सगळेच पदार्थ उत्तम आहेत. कालनिर्णय, एक मस्त आयुर्वेदिक साबण अणि पणत्या सुद्धा होत्या. पॅकिंग चांगले केलेले. एकुणात चांगला अनुभव.

दर वर्षी प्रमाणे घेउन येत आहोत स्वच्छ, शुद्ध सनफ्लावर तेल आणि साजूक तूप वापरून बनवलेला दिवाळी फराळ .
ह्या वर्षी ऑर्डर आधी स्वीकारली जाईल. आयत्या वेळेला दिलेली ऑर्डर देणे अवघड होते, आणि बऱ्याच लोकांची निराशा करावी लागते.

तुमची ऑर्डर बुक करण्यासाठी हव्या असलेल्या पदार्थांची लिस्ट , quantity, WhatsApp- 8669530051 करावा व पूर्ण पत्ता सुद्धा पाठवावा. डिलिव्हरी चार्जेस एक्सट्रा असतील. एकदा ऑर्डर दिल्यानंतर कॅन्सल करता येणार नाही. आमच्याकडे उपलब्ध पदार्थ खालील प्रमाणे
*1)भाजणीची चकली
*2) सुक्क खोबरं करंजी
*3) साजूक तुपातील बेसन लाडू
*4)साजूक तुपातील रवा लाडू
*5)बुंदी लाडू
*6) गोड शंकरपाळी
*7)खारी शंकरपाळी
*8)मक्याचा चिवडा
*9)पातळ पोहे चिवडा
*10)साधी शेव
*11)तिखट शेव
*12)अनारसे
*13)चिरोटे
*14)ओल्या ना. करंजी
*15) कडबोळी
*16) खारी बुंदी
*17)शेंगदाणा लाडू.
*18) डिंक लाडू
*19) डिंक मेथी गहू पीठ मिक्स लाडू
*20) ड्राय फ्रुट ( Dry Fruit ) लाडूDiwali Faral.jpeg

आम्ही यावर्षी परत परांजपे फुड्स, डोंबिवली यांचाच ऑर्डर केला. कालच ऑर्डर केला.

गेल्यावर्षी बेकार गोंधळ घातलेला. पोहोचतोय की नाही पोहोचते, एकदा दिल्ली मग जर्मनी मग परत दिल्ली अशी मजल दरमजल करत उशीरा का होईना पोहोचलेला. चव चांगली होती, दर्जाही चांगला वाटला. गोंधळ होतोय त्याबाबतीत एकदम ट्रान्सपरंट होते, कम्युनिकेशन चांगलं होतं. परत फराळात कस्टमायझेशन आनंदाने करुन देतात. ह्या पॅकेज मध्ये हेच मिळेल हवं तर घ्या प्रकार नाही. करंज्यांना वास येतो आणि अनारश्यांना कोणी हात लावत नाही सांगितलं तर ते न देता दुसरं देतो हे आपणहुन सांगितलं. त्यामुळे परत शोधाशोध आणि क्वालिटी कशी असेल याच्या दोलायमान परिस्थितीत न जाता नोन डेव्हिलच (पद्धत हो... बरे वाटले तसे) बरा. परत आमच्या डोंबिवलीचे! Proud

पाठवतात
Paranjape Foods is feeling excited.
5 d ·
We have started accepting 2022 Diwali Faral orders for our International clients across the world.
Our family expands from the USA, Canada, UK, Europe to all the way up to Asia, New Zealand.
WhatsApp us at +91 82913 32666 Aniket Paranjape or +91 9561103234 Akshata Paranjape

हे परांजपे माझा मित्र दिसत नाहीये. तो बाहेर पाठवत नसावा, वेस्टला एक दुकान आहे बहुतेक परांजपे फॅमिली स्टोअर नावाने आणि ईस्टला अन्नपूर्णा पीठघर नावाने अशी दोन आहेत दुकानं.

मागे इथे परांजपे वाचल्यावर मला तोच वाटला पण तो नाहीये.

यंदा दोन घर मिळुन एकीकडे परांजपे आणि दुसरीकडे सप्रेंचा फराळ मागवला होता.
परांजपे कडून करंजी, तिखट गोड शंकरपाळी, चिवडा, चकली, शेव.
पैकी करंजी तेवढी आवडली. चकली जस्ट ओके. बाकी आवडले नाही.

सप्रेंकडून मेथीचे लाडु (मला माहित नव्हते कडु असतात, पण मला ओके वाटला प्रकार), चकली, चिवडा, लसुण शेव, तिखट शंकरपाळी. शंकरपाळी वगळता बाकी सगळे चांगले वाटले.

परांजपेकडे व्हॉट्सऍपवर ऑर्डर द्यायची, केव्हा तिथून पाठवायचे हे सांगायचे. सप्रेंना ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची. त्यात आपल्याला केव्हा पोचेलेले हवेत ते सांगता येते, पण ते न बघता ऑर्डर क्यू प्रमाणे लगेच प्रोसेस होते असे दिसते.

गेल्या वर्षी सप्रेंनी माझी ऑर्डर आधीच पाठवली होती. यावर्षी दिवाळीसाठी हा पर्याय निवडल्याने २० की २१ तारखेला आले.
https://patilkaki.com/ यांच्याकडून मध्ये काही पदार्थ मागवले होते म्हणून दिवाळीत चकल्या, चिवडा आणि बेसन लाडू मागवले.
बेसनाचे लाडू मस्त. प्रत्येक लाडू फॉइल मध्ये गुंडाळून देतात. चकल्या मला किंचित अळणी वाटल्या. यांचे दर जास्त आहेत.

सप्रेंच्या करंज्या जास्तच खुसखुशीत होत्या. काही मोडल्या होत्या. चकल्याही तशाच. चव ठीक ते छानच्या मध्ये. मीही मेथीचे लाडू मागवलेत. त्यात ड्रायफ्रुट न घालता ज्ये ना साठी एक व्हरायटी ठेवायला हवी. मी सुचवणार आहे.
यांच्याकडे अनारसे होते, पण सुटे विकत नव्हते. दिवाळी फराळ बॉक्स ऑर्डर केला तर त्यातच होते.

सप्रेंकडे करंज्या वेगळ्या मिळत नाहीत म्हणुन दुसरीकडे परांजपेसोबत अधिक मागवल्या. कदाचित नीट बघण्यात माझी चूक किंवा ऑर्डर केली त्या दिवशी साईटवर वेगळ्या न दिसणे असे काही झाले असावे.

मिळतात. सुक्या आणि ताज्या खोबर्‍याच्या अशा दोन्ही. दिवाळीआधी त्या बॉक्सेसमुळे पदार्थ सहज दिसत नव्हते. शोधावे लागत होते.

माझा फराळ डोंबिवलीहून येतो. माझ्या आत्तेबहिणीचा बिझनेस आहे. माझं ऑर्डर करायचं हे ५ वं वर्ष. माझ्याबरोबर इथल्या काही मैत्रिणीही ऑर्डर करतात. सगळ्याचीच चव छान असते. मी जनरली बेसनाचे लाडू, चकल्या, चिवडा, कडबोळी, शेव घेते. करंज्या सगळ्या फुटून येतात कार्गोमधून. चिरोट्यांचंही तेच. म्हणून ते घेत नाही.

*KHADYAM*
*FSSAI Registered*

Traditionally like past 15 years *Khadyam* this year has also brought...
*Diwali Faral*

1) Sweet/ Salty shankarpali:-320/kg
2) Poha chiwda:-340/kg
3) Maka chiwda:-340/kg
4) Bhajni chakli:-440/kg
5) Rava ladoo:-600/kg
6) Besan ladoo:-650/kg
7) Karanji:-600/kg
8) Shev:-320/kg

*Combo pack*
650/- only
[6 Karanji, 6 Besan ladoo; Chiwda, Chakli and Shev-250 gm each; Sweet and Salty shankarpali-125 gm each]

*Family pack*
2300/- only
[Bhajni chakli, Besan ladoo and Karanji-1 kg each; Pohe chiwda, Shev, Sweet and Salty shankarpali- half kg each (with surprise gift)]
Contact:
Satish Kathe 9223505717
Sonali Kathe 9833669075
Sangeeta Bagul
9833053305
*For shipping:- Packing and Courier charges extra.*
Hurry up and place your orders earlier.

मुंबईतल्या मुंबईत ( क्वचित ठाणे पुणे) पदार्थ घरपोच देणार्‍या नाववाल्या विक्रेत्यांचे भावही खूप जास्त आहेत. बेसन लाडू /रवा लाडू ३५० ग्रामला ४१९ रुपये. चकली ४०० ग्राम ३१९ रुपये. चिवडा ४०० ग्रामला २५९ रुपये. दिवाळी जवळ येईल तसे भाव बहुधा आणखी वाढत जातील.

कच्चा माल, तेल, मजुरी ह्यात वाढ झाली आहे असे मैत्रिणीचे म्हणणे आहे. मी तिची जाहिरात करतो त्यात मला काही कमिशन मिळत नाही हे नमुद करु इच्छितो Happy

इथे सुमा फूड्सचे रवा नारळ लाडू पंधरा डॉलरला जेमतेम दहा येतात. उत्तम आहेत पण यावेळी कुणाच्या नादी लागणार नाही. घरी थोडं करून खाऊन गप बसू. भारतातून मागवला तर दिडशे डॉलर घालून परातभर फराळ सुद्धा येत नाही. त्यात कालनिर्णय, मोतीसाबण व उटणे बघून आधी मजा यायची, आता तितकं काही वाटत नाही. अमेरिकेतली दिवाळी दिवाळीसारखी वाटावी म्हणून खूप वर्ष पुष्कळ खटाटोप केला तरीही ती भारतातल्यासारखी होतच नाही. त्यामुळे चिल रहाणार आहे. उगाच भारंभार मागवायचं, पुन्हा ते सादळेल म्हणून खा-खा खायचं, मग उरलेला स्वयंपाक कसाबसा संपवायचा आणि अबरचबर खाऊन पोट डब्ब झाले की कुकर लावून मुगाच्या डाळीची खिचडी करायची , हा पॅटर्न झाला आहे. Happy

++=११ अस्मिता..
माझे बाबा होते तोपर्यंत ते उत्साहाने स्वतः कुरीअर कंपनीत जाऊन रांगेत उभे राहून (तेव्हा लायनी असायच्या अमेरिकेत कुरिअर पाठवायला)
पार्सल पाठवायचे. तेव्हा खरंच फार भरून यायचं आईच्या हातचा फराळ, दिवाळी अंक, शास्त्र म्हणून मातीची पणती, उटणं, वगैरे बघून. बाबा गेल्यावर आईने सगळं बंदच केलं, आता तो पर्सनल टच नाही त्यामुळे हे विकतचं माझ्याकडून काही मागवलं जात नाही.

इथे काही केल्या तो दिवाळीचा फिल नसतो ( एक्स्पेटेड पण नाही दुसर्‍या देशात यावा) त्यामुळे मी पण चिल राहते आजकाल. जमलं तर चिवडा करते फक्त. बाकी लाडूला कोणी विचारत नाही मुलांना जे आवडतं पेढे, काजूकतली तेवढंच बाहेरून आणते. तळणं नको म्हणून नो चकली, शेव, शंकरपाळी, करंजी. काही करत नाही. प्रेशरही घेत नाही दुसरीकडून आलेल्या फराळाची परतफेड ड्रायफुट्स देऊन करते. Happy हॅपी लाईफ.

न्यूजर्सीचंच सायो. Happy
खरंच अंजली. फार लागत नाही फराळ आपल्याला, पण आपणच वहावत जातो.

फार लागत नाही फराळ आपल्याला, पण आपणच वहावत जातो.>> +१
आधी करायचे खरंच मी पण ... अगदी मोतीचूर लाडू सुद्धा घरी करण्याचा घाट करुन झालाय. पण जेव्हा नवरा दुसर्‍या वर्षी म्हटला घरी केले होते लाडू, कधी? तेव्हापासून सोडून दिलं काहीही (जीव तोडून, खपून) करणं Lol

Pages