अमेरिकेत दिवाळी फराळ ऑर्डर करणे

Submitted by sneha1 on 9 October, 2021 - 18:02

नमस्कार मंडळी!
दिवाळी आहे आता पुढच्या महिन्यात. तर, तुम्ही लोक दिवाळीचा फराळ कुठून ऑर्डर करता? अमेरिकेतल्या आणि भारतातल्या, दोन्ही वेबसाईट्स सांगा ना प्लीज.
धन्यवाद!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर सप्रे फ़ुड्सची लिंक दिली आहे.
त्यांच्या साईटवर लाडूंचे घटक बघितले, त्यात वनस्पती घी लिहिलं आहे.
आणि सगळे पदार्थ २०० / १८० ग्रॅम पॅक मध्येच आहेत, अर्धा / एक किलो मध्ये नाही.

https://marathicartusa.com/shop?cat=pre-order-festival-specials
इथून पीठ वगैरे तर मिळतातच पण फराळ चितळे किंवा सोहम ब्रँडचा ऑर्डर करता येतो.
मला एकतर आई पाठविते किंवा मी घरी करते. त्यामुळ कधी ऑर्डर करीत नाही पण साईट्चा अनुभव चांगला आहे.
अवांतरः
फराळाशिवाय दिवाळी मला वाटतच नाही झाल्यासारखी. घरी कुणीही खात नसल तरी आई लक्ष्मी पुजनला पाहिजे म्हणुन सगळे पदार्थ करते. मला तीच सवय लागली आहे. लाडु चिवडा चकली तरी करतेच. आईने पाठवत असते तेव्हा पण निदान काजुकतली आणि एक लाडु करते.

आज हपिसात लिफ्ट पाशी वाट बघत होते तर मावशींना विचारते पूर्वी ते एक जण विकायचे ते अजून करतात का व्यवसाय फराळाचा तर आता नव्या लेबर्स ना माहीत पण नाही असे काही कोणी करायचे ते. आता कंपनी पार प्रोफेशनल झाली आहे.

पण फरा ळाचे आजकाल परवड तच नाही विकत घ्यायला असा फीडबॅक आला. हे पर्म नंट नोकरी असलेले लोक्स आहेत. घरा पुर ते पाव पाव किलो बनवते मी असे थोडक्यात सांगितले त्यांना. इथली महागाई बघता खरेच फराळाचे पदार्थ बनवून विकाय्चे तर मार्जिन फार नसेल मग रॉ मटेरिल मध्ये काहीतरी पैसे वाचवायचा प्रयत्न असणार.

म माझ्या सुग्रण मैत्रीणीने सांगितले की चितळे भाजणी पेक्षा केप्र ची चकली भाजणी बेस्ट आहे. सूच ना बर हुकूम केल्यास मस्त होत्यात चकल्या व तिने मुलींना अमेरिका क्यानडा इथे पाठविल्या आहेत.

मी तर स णा सुदीच्या दिवसात मिठाई काही मागवतच नाही भेसळ असेल म्हणून . दही दोन कप फक्त मागवते.

इथे जाहिरात असे समजू नका पण स्वीगी वर थिओब्रोमा आहे मुंबईत ठीक ठीकाणी आमच्या इथे पण एक आहे व व्हिवीआना मॉल मध्ये एक आहे. तर त्यांचे दिवाळी गिफ्ट हँपर मस्त वा टले. आमंड रॉक्स, चॉकोलेट्स सुरेख. प्लस कुकीज वगैरे. थिओब्रोमा क्वालीटी वर्ल्ड बेस्ट.
हे ही तसे महागच आहेत. पण अगदीच खास लोकांना द्यायला छान आहेत.

थिओब्रोमा जबरदस्त आहे.
पुण्यात थोडे उशिरा येते, मॉंजिनीज सारखे.पण मस्त केक्स, चिजकेक.महाग असतात.त्यामुळे अगदी कधीतरी आणले जातात.
लोकल बेकरीज चांगल्या आहेत आजूबाजूला.

फराळ शुद्ध तुपात घरी करायला परवडत नाही आपल्याला पण.मी दरवेळी 'गोड शंकरपाळे शुद्ध तुपात तळावे' वाक्य वाचून सोयीस्कर पणे ऑप्शन ला टाकून चिवडा इत्यादी पदार्थ करते.

तळायला तेल वापरू शकता ना?
प्रश्न गोड पदार्थांचा येतो, लाडू वगैरे, जिथे तूपच लागते.

ते 'तुपात तळावे' वालेच ऑप्शन ला टाकते.(याचा अर्थ मी बाकीचे साग्रसंगीत करते असा सोयीस्कर घेतला जावा या नरो वा कुंजरो वा अभिलाषेत Happy )

अनु,मानव,
तुप मला ४०० रुपये ते ८०० रुपये ला किलो दिसत आहे ऑनलाईन बघितल तर. ही किंमत बरोबर आहे का ? भारतात अप्पर मिडलक्लासला हे खुप महाग आहे का ? माफ करा. खरचं समजावून घ्यायचा पर्यत्न करीत आहे एक उत्सुकता म्हणुन. यावेळी भारतात गेलेले साधारण एक कॉफीला ४५ रुपये द्यावे लागत होते आणि फक्त ४-५ चमचे कॉफी मिळत होती कॅफेटेरिया मध्ये. शेवटी एके दिवशी वैतागून चार कॉफी एकत्र करायला सांगितले कारण इथे एकावेळी मोठा कप प्यायची सवय.

Punyaat koni changle courier mahit aahe ka? ghari jaun pack karun parcel US la pathavayche aahe. Aaj kaal sagle 800/850/KG rate wale distayt.

आमचा फराळ निघाला लंडनला... आपलं कॅनडाला. Happy
शेवटी एके दिवशी वैतागून चार कॉफी एकत्र करायला सांगितले >> Lol अरे चार पाच चमचे काय! शॉट म्हणा की! ग्लॅमर येईल! Proud

ग्लॅमरस नव्हती कॉफी अज्जिब्बात. Lol
यावेळी भारतात बरेच दिवस राहिले आणि झोमॅटोचा खुप वापर केला. पण ग्लॅमरस नावा वरून रेस्टॉरंट मध्ये तेच मिळेल अस अज्जिब्बात नाही. म्हण्जे उदा. नाव असेल रिसोटो . तुम्हाला वाटेल इटालिअन काहीतरी मिळेल पण नोप. मिसळ आणि बटाटे वडा.
यावेळची इंडीया ट्रिप एकदम मज्जेशीर होती. मी एकटिच विदाऊट नातेवाईकांचा गराडा , कोरोना आणि फक्त आई वडील बरोबर त्यामुळ असेल .

सीमा, आम्ही तूप जास्त खात नाही. मी ऑर्गनिक तूप आणतो, ते १२०० ₹ किलो आहे. अर्धा किलो आम्हाला दोघात दोन महिने पुरते. तसेच काही ठिकाणी खात्रीलायक गाईचे / म्हशीचे शुद्ध तूप मिळते ( यांच्या स्वतःच्या गाई म्हशी असतात) ते ६००-८०० ₹ किलोने मिळते. तेव्हा या रेंज मध्ये तुपाची किंमत योग्य वाटते. माझ्यामते अप्पर मिडल क्लासला हे फार महाग नाही.

इकडे हैद्राबादला आमच्या भागात आहेत चांगले कॅफेटेरिया चार पाच. ब्लॅक कॉफी म्हटले की मोठा मग पाऊणभर कॉफी मिळते १२० - १५० ला.

थिओब्रोमा मस्तच आहे, पिसौ मधले अगदीच सुमार आहे पण बाणेरचे छान आहे. दादूज चे पण मस्त आहे दिवाळी कलेक्शन.

@लिली युनिक वाले चांगले आहेत 650/ किलो आहे यंदा. घरी येतात , मागच्या वर्षी घरी आले होते कोविडमुळे एकदम नीट पॅकिंग करून देतात. किंवा मग कर्वे मंगल, शनिवारात त्यांचे ऑफिस आहे तिथून पण करता येतं पण फार गर्दी असते 2 तास आरामात जातात.

कोणाला काय 'नॉट व्हॅल्यू फॉर मनी' वाटेल सांगता येतं नाही.माझी आर्थिक क्षमता रोज तुपात तळलेले पदार्थ खायची असेल(हे उदाहरण हां, खरंच खाल्ले तर दार तोडून भगदाड करावं लागेल भिंतीत यायला जायला.) पण मला तळणीला तूप वापरणं महाग वाटेल.फोडणीत वापरणं ओके वाटेल.

डिशेस ची नावं आणि मिळणारा पदार्थ याबाबत तर बोलूच नये Happy पूर्णपणे बनवणाऱ्या च्या मर्जीवर चालतं. परवा कोकणे चौकातल्या गाजलेल्या बार्बेक्यू मिसळ ला गेलो.तिथे पंखा आणि बसायला चांगली जागा सोडून काहीच झेपलं नाही.मिसळ म्हणून कोणत्यातरी भाजीतलं जास्त झालेलं पाणी ग्लासात जमा करावं तसं 4 प्रकारचं पाणी होतं. बार्बेक्यू किधर हय विचारलं ओरिया वाढप्याला, मग त्याने एकदम भिंगातून बघून दिसेल असा चिमुकला कोळसा आणून ठेवला खाली.(त्या कोळश्यालाच पंख्याने थंडी वाजत असेल.)
दिवसाची सुरुवात, वर्किंग डे होता.संध्याकाळी जास्त चांगली सर्व्हिस देत असावे.गर्दी दिसते हॉटेल मध्ये.
फारच अवांतर झालं.पण त्या मिसळीला दिलेले प्रत्येकी 120 रु मी विसरणार नाही.इतक्यात पिसौ काटा किर्रर्र ला चविष्ट पोटभर पाणीदार नसलेली मिसळ, कट आणि पाव येतात.

मला तळणीला तूप वापरणं महाग वाटेल...... हो.आणि एक विचित्र वासही येतो. एकदा भावासाठी हा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला होता.तेव्हा जाम वैतागला होता त्या ओशट वासाने.त्यानंतर मात्र शंकरपाळ्या,तुपाचे मोहन घालून तेलात तळते.

देवकी ला मम. तूप परवडेल ही पण तुपात डीप फ्राय केलेल्या पदार्थाना एक अतिशय विचित्र वास येतो ज्यामुळे पदार्थ तोंडात ही घालवत नाही, त्यामुळे गोड पदार्थ मी तेलातच तळते. इव्हन बटाट्याच्या पापडाना ही मला तुपाचा भयानक वास येतो कधी कधी. असो. बाकी बाबतीत मी चिकित्सक नाहीये पण तुपाच्या बाबतीत आहे.

साधारण दिवाळीचे चार दिवस पुरेल एवढा फराळ घरी करते. घरचा फराळ आवडतो आणि संपतो ही खाऊन पण घरी quantity खूप करण्याची कपॅसिटी माझी कधीच नव्हती. विकतचा भरपूर आणू शकतो पण घरगुती म्हटलं तरी तो फारच व्यवसायिक असतो त्यामुळे तो ही आवडत नाही. असा झोल होतो फराळाचा.

घरी कुणी आलं दिवाळीत तर फराळ पुढे करते पण मी कोणाला जनरली फराळाचा डबा देत नाही. भेट देताना मिठाई ही न देता टिकाऊ ड्राय फ्रुटस देते जे सम्पवाव लागत नाही. सोयीने कधी ही वापरता येतात.

हो मला पण तळणी साठी साजूक तूप वापरणं म्हणजे तूप फुकट गेल्यासारखं वाटतं.
शंकरपाळ्या,तुपाचे मोहन घालून तेलात तळते.>>++ सेम पिंच देवकी

मी गेली ३,४ वर्ष डोंबिवलीत आत्ते बहिणीचा बिझनेस आहे तिच्याकडून फराळ ऑर्डर करते आहे. चव छान असते आणि आता माझ्याबरोबर आणखीन ५,६ जणांच्या ऑर्डर्स असतात.

मी ऑम्लेट करतो तुपात.
भुर्जी नाही. तुपात कांदा, टोमॅटो परतून होईस्तो वास सुटतो.

मला वाटते अनुंनी शंकर पाळी तुपात तळायला सांगितली असे लिहिले तिथून विषय निघाला. तुपात सगळं तळण असे मला आणि सीमांना पण म्हणायचे नसावे.

मी देवाशपथ सांगते तुपात तळलेले पदार्थ ही कन्सेप्ट मला नवीन आहे. आमच्या घरी (माहेरी) सगळे पदार्थ तेलातच बनतात. फक्त कोणे एकेकाळी साखि तुपाच्या फोडणीत बनत असे ती पण नंतर बंद केली गेली.
यात तूप परवडणे न परवडणे हा मुद्दा आहे का तुपाची तळलेली चव न आवडणे हा आहे ते माहीत नाही पण आमच्या घरी बेसिक पदार्थच बनतात आणि ते तेलात तळले जातात. सासरी काय असतं ते विचारते उद्या आईना.

मी एकदाच घरी दाल बाटी बनवली होती त्यासाठी इतकं तूप लागलं की आम्ही परत घरी बनवायची नाही हे ठरवलं.
आम्हाला 800 रुचं एक किलो तूप नाही परवडत असं मला वाटतं खरंतर. पण पुन्हा माझ्या आईच्या शब्दात सांगायचं तर 'एका वेळेला पिझ्झा वर 600 रुपये घालवायला जमतं तुम्हाला पण तुपाची बाटली आणली लगेच महाग महाग सुरू करता. पैशाचा नाही तुम्हाला चवीचा प्रॉब्लेम आहे'... आमच्याकडे फक्त माझा मुलगाच भरपूर प्रमाणात तूप खातो, बाकीचे आपले चमचा चमचा भर.

<<<<<<फराळाशिवाय दिवाळी मला वाटतच नाही झाल्यासारखी. घरी कुणीही खात नसल तरी आई लक्ष्मी पुजनला पाहिजे म्हणुन सगळे पदार्थ करते. मला तीच सवय लागली आहे. लाडु चिवडा चकली तरी करतेच. आईने पाठवत असते तेव्हा पण निदान काजुकतली आणि एक लाडु करते.
>>>>
1000000 वेळा अनुमोदन. आमच्याकडे मुलाला स्नॅक्स लागतात म्हणून चकली, गाठी शेव, शंकरपाळ्या वगैरे दिवाळी नसताना देखील बनवलं जातं
पण तरीही दिवाळीला ते बनलं नाही असं कधीच होत नाही.
माझ्यासाठी तर लक्ष्मीची रांगोळी,पणत्या, फराळ, किल्ला, मोती साबण(चंदन वाला), उटणं, बजाजचं बदाम तेल (सुवासिक) , आकाशकंदील, फुलबाज्या आणि साधे का असेना पण घरातल्या सगळ्यांसाठी नवीन कपडे हे सगळं असलं तरच ती दिवाळी म्हणायची नाही तर इतर कुठलाही सण असल्यासारखं च वाटतं.

@लिलि आणि लंपन - आमच्याकडे पण युनिक कडून येतो. मोस्टली ते डीएचएल ला फॉर्वर्ड करतात. सध्या त्यांचे शनिवारातले ऑफिस सुरू झाले आहे असे आमच्या घरी फोन करून कळवले त्यांनी.

तुपात सगळं तळण असे मला आणि सीमांना पण म्हणायचे नसावे.>> हो.
अनुनी 'फराळ शुद्ध तुपात घरी करायला परवडत नाही आपल्याला ' अस लिहलय म्हणुन विचारल.
तुप आवडत नाही किंवा फराळ तुपातला आवडत नाही अस असाव अस मला वाटलेल. (आणि बहुतांशी तेच कारण दिसत आहे.) Happy
मला पण तुपात तळलेले पदार्थ नाही आवडत. शंकरपाळीत कणीक मळताना तुप असतच पण तळताना नाही कधी वापरल. अनारशे मात्र बरेचदा तुपात केले जातात. पण मला तेही तेलातले जास्त वाटतात.

माझ्यासाठी तर लक्ष्मीची रांगोळी,पणत्या, फराळ, किल्ला, मोती साबण(चंदन वाला), उटणं, बजाजचं बदाम तेल (सुवासिक) , आकाशकंदील, फुलबाज्या आणि साधे का असेना पण घरातल्या सगळ्यांसाठी नवीन कपडे हे सगळं असलं तरच ती दिवाळी म्हणायची नाही तर इतर कुठलाही सण असल्यासारखं च वाटतं.>>>
रिया अगदी. Happy इथे पार्टी, नविन साड्या, डान्स, फटाके, भरपुर खाण अस तरी असतच. लायटींग तर म्हणुन आमच्या कम्युनिटी मध्ये बहुतेक वेळा ऑक्टोंबरपासून डिसेंबर एंड पर्यंत असत.

लिली..Falcon कुरिअर उत्तम service आहे...घरी येऊन pick up करतात..पॅकिंग पण स्वतः च करतात...Rates पण reasonable आहेत..तुम्हाला नंबर हवा असेल तर संपर्कातून कळवते..

हल्ली बर्याच ऑनलाइन फराळान्च्या याद्या व त्यावरचे रेट पाहुन बेसनचे लाडु घरी केले तर कसे पडतील याचा अन्दाज घेतला.

शुद्ध तुपाशिवाय बेसन लाडु अशक्य. सध्याचे माहित नाही पण मी मुम्बैत होते तेव्हा शुद्ध तुप ५०० ते ८०० च्या रेन्जमध्ये मिळत होते. अर्थात गिर गाइचे १६०० ते २४०० च्या रेन्जमध्ये बघितले आहे पण आपण तिथवर नको जाउया. गाइ म्हशीचे ६०० पर्यन्त धरले तर १ किलो लाडवान्ना पाउण किलो तरी हवे. म्हण्जे तुपाचे ४०० झाले. बेसन विकत घेतले तर ८० ते ९० पर्यन्त. चणाडाळ ७० पर्यन्त, दळायला ७ ते ८ रुअये. साखर ४० पर्यन्त. मिक्स काजु, मनुका, चारोळी (ही काजुपेक्शा महाग आहे), वेलची १०० रु.
म्हण्जे कच्चा माल साधारण ६२० ते ६५० पर्यन्त पडतो.

गॅसवर डाळ मन्दाग्नीवर भाजा, बेसन तुपावर मन्दाग्नीवर भाजा इ इ साठीचा गॅस, हे करणार्या व्यक्तिचे कष्ट व कौशल्य इत्यादीचा भाव लावणे कठीण आहे...

घरी एक किलोचे लाडु करतो तेव्हा बेसन एक किलो धरतो, त्यात इतर गोष्टी पडुन एक किलो बेसनाच्या लाडवान्चे वजन प्रत्यक्षात दोन-पावणे दोन किलोपर्यन्त जात असणार. विकतचे लाडु एक किलो म्हण्जे तयार लाडु एक किलो असावेत.

त्या हिशोबाने बेसन लाडु ८०० ते ९०० रु किलो भाव बरोबर असावा.. माझ्याकडे असलेल्या एका रेटकार्डवर १४०० आहे.

घरी कुणी आलं दिवाळीत तर फराळ पुढे करते पण मी कोणाला जनरली फराळाचा डबा देत नाही. भेट देताना मिठाई ही न देता टिकाऊ ड्राय फ्रुटस देते जे सम्पवाव लागत नाही. सोयीने कधी ही वापरता येतात.>>>>
मीपण.

मला दिवाळीच्या पहिल्या दिवशी फराळ हवाच... मोती साबण रान्गोळी आकाशकन्दील फटाके फराळ नवे कपडे हे सगळे हवेच.. आता मोती साबण फटाके नवे कपडे इत्यादी बाद केले लिस्टितुन पण फराळ हवाच...

यन्दा आईला बेसन लाडु मर्यादेत कर म्हणुन सान्गितले आहे..दरवर्षी अर्धे माझ्या पोटात जातात, यन्दा निग्रहाने डायेट करुन दिवसाला एकच लाडु खायचा असे ठरवले आहे Lol

मला तर वाटतं 5 आणि 5 लाडू करंजी करून आयुष्यभर पुरेल इतका शेव चिवडा करावा Happy लाडू आणि गोडाचं मिथ्या.शेव चिवडा चकली कडबोळी खारे शंकरपाळे हेच सत्य.

त्या हिशोबाने बेसन लाडु ८०० ते ९०० रु किलो भाव बरोबर असावा.. माझ्याकडे असलेल्या एका रेटकार्डवर १४०० आहे.

Submitted by साधना on 24 October, 2021 - 02:17

चिंचवडला order चे बेसन लाडू 550-650 च्या दरम्यान आहेत. चव चांगली वाटली. 1400 इथल्या मानाने जास्त वाटले.

त्या हिशोबाने बेसन लाडु ८०० ते ९०० रु किलो भाव बरोबर असावा.. माझ्याकडे असलेल्या एका रेटकार्डवर १४०० आहे. >> रेडिमेड घेतलेली वस्तू महाग पडतेच. किस काढत नाहीये पण विचार केल्यावर अस लक्षात आलं की कच्च्या मालाच्या किमतीबरोवरच , जागेच भाड ( घरीच केले तरी थोडं धरायलाच हवं कॉस्ट मध्ये ), लाईट बिल, भांड्यांची investment आणि भांडी धुण्याचा खर्च, स्किल आणि अंग मेहनत दोन्ही, ट्रान्सपोर्ट ( कच्चा माल आणि तयार माल दोन्ही साठी ), पॅकिंग, माल साठवण्यासाठी साठीची गुंतवणूक ( कपाटं, डबे, पेस्ट कंट्रोल वैगेरे ), एखादी बॅच बिघडली , कुरिअर मध्ये गहाळ होणे यावरची प्रोव्हिजन, माल कुठे विकला जाणार आहे ती area, मालाला असलेली मागणी, प्रतिस्पर्धी आकारत असलेली किंमत ह्या सगळ्याचा विचार होत असेल ह price fix करताना.

ऐपतीपेक्षा , फराळ करणं ह्यात आनंद आहे. कीस तर प्रत्येक गोष्टीचा काढू शकतोच पण आपल्याला जसे झेपेल व आवडेल असाच सण साजरे करावे. तोच आनंद व आठवणी. हा दृष्टीकोण असला की सगळी मजा वाटते.

मला आजकाल खाण्यापेक्षा( वजन लक्षात ठेवून) करायला व त्या आठवणी घोळवायला निमित्त मिळते , म्हणून मोजून ५-५ पदार्थ करते. माझी आई कशी २-३ किलो प्रत्येक पदार्थ करायची ह्याचे मला दरवेळी आश्च्र्य वाटते. त्यातही नोकरी , सगळ्यांचे मान-पान. त्यातही ती हे करताना आनंदी कशी रहायची ( ठेवायची) हा मलाच अजून प्रश्णच आहे. असो.

घरचे केलेल्या साजूक तुपाला अजिबात वास येत नाही अगदी ३-५ महिने पदार्थ राहिले तरी. तुप मस्त कढवोइनच काढायचे. इतकी वर्षे अनुभव आहे. बेसनाचे लाडू बाहेरचे डालड्यातले खावत नाहितच; फ्लेवर व रंग घालतात बाहेरच्या तूपात आणि म्हणून वास मारतो.

झंपी तुमच्याशी पूर्ण सहमत.
साजूक तूपात केलेल्या पदार्थाना अजिबात वास येत नाही.
घरी केलेल्या तुपातले लाडू ( बेसनाचे) , करंज्या, अनारसे, चिरोटे खूप दिवस टिकतात सुध्हा.
बाहेर कदाचित भेसळ असावी, किंवा व्यावसा यिक काहितरी शॉर्ट्कट करत असावेत.

लाडवांना नाही, तुपात काही डीप फ्राय केले तर लगेचच एक प्रकारचा वेगळा वास आणि वेगळी चव येते (जी मजा घालवते) असा अनुभव आहे. तर हेच तळण साजुक तुपात केले तर असे होत नाही का?

हेच तळण साजुक तुपात केले...... मी सागर की अमूल घीमधे shankarpale तळले होते.एक असह्य ओशट वास त्या पदार्थाला येत होता. नंतर राहिलेले तूप टाकताना वाईट वाटले होते.त्यानंतरच्या दिवाळीत मी तेलात तळले.घरचे साजूक तूप talanila वापरायला जीवावर येते.ते फक्त लाडवांना वापरले जाते.
आता कित्येक वर्षे गाईचे दूध घेत असल्याने साजूक तूप अगदी क्वचित मिळते.जे वरणभातासाठी जपावे लागते.बाहेरून आणलेल्या लोणी कढवून केलेल्या तुपाला,घरी केलेल्या तुपाचा वास,स्वाद नाही.

आमच्याकडे ग्राहकपेठेशी संबंधित असणाऱ्या एकानी सांगितले होते की बाहेरचे चांगले तूप आणले की घरी परत उकळवून घ्या.लक्षात नाही काय कारण सांगितले होते ते.एकदाच करून पाहिले होते.

देवकी, मोठ्या प्रमाणात तूप हवे असेल तर, क्रिम मिळते, कात्रज वगैरेचे. ते आणायचे विरजण लावायचे अन लोणी-तूप करायचे. सेम घरच्यासारखे होते. ओशट वास नाही येत

घरी केलेल्या साजूक तुपात गोडपदार्थ तळल्यास त्याला कुठलाही वास येत नाही असा अनुभव आहे. आम्ही आधी सगळे गोडपदार्थ तुपातच तळायचो पण दिवाळीच्या काळात रोजच तुप करायला लागायचं ! त्यामुळे शंकरपाळे आणि करंज्या तेलात टाळतो. चिरोटयांमध्ये तूप लावलेलं असल्याने ते तेलात तळायला नको वाटतात.

घरी केलेलं म्हणजे कॉस्कोच्या अनसोलटेड बटरच.

<< मुंबईत कात्रज क्रीम नाही मिळत >>
पारसी डेरी फार्मचे लोणी म्हणजे क्वालिटीच्या बाबतीत १ नंबर. एकदा वापरून बघा, दुसरे काही वापरणार नाही नंतर.
ता.क. मी त्यांचा प्रवक्ता नाही, कोणे एके काळी ग्राहक होतो फक्त.

धन्यवाद पराग, देवकी आणि लोणी आणुन घरी तूप बनवण्याची चर्चा. आता लोणी आणुन तूप करून पाहीन.

अमूल तूप काही महिन्यांपूर्वी आणले होते अर्धा किलो.
टेक्स्चर पाहून आणि मग चव घेऊन खात्री झाली शुद्ध तूप नाही, डालडा वगैरे काही मिक्स आहे. मग ते खायला वापरलंच नाही.

माझ्या कडे घरी दही विरजून काढलेल्या लोण्याचं च तूप असत. त्याचे लाडू, शिरा वैगेरे सुंदर होतात.पण त्यात तळलेले पदार्थ तोंडात घालवत नाहीत। निदान आमच्याकडे तरी. तळताना तूप खूप जास्त प्रमाणात तापवावे लागते त्यामुळे ते जळल्यासारखं होऊन भयानक वास येत असावा. पदार्थ गार झाला की ते तूप थिजत आणि आधीच तळलेले त्यात प्लस थिजलेले अस एक उमासे येतील खाताना अस अजीब रसायन तयार होत त्यामुळे डीप फ्राय पदार्थ साजूक तुपात ह्याला बिग नो .अर्थात हे माझं वैयक्तिक मत ...ज्यांना आवडत त्यांनी खुशाल enjoy करावं।

Pages