Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Kaay role she is just
Kaay role she is just ordinary old lady in jeans. >> अमा आज एकदम गोळीबार! फुल बाबूराव आपटे मोड मधे.
अॅक्टींगचा बराचसा भाग
अॅक्टींगचा बराचसा भाग दिग्दर्शकाच्या कौशल्यावरतीही अवलंबून असतो.
काय अमा, आज "संध्याकाळ" जरा
काय अमा, आज "संध्याकाळ" जरा जास्त झालीये का ?
कलाकार आवडत नसतील, बोअर होत असतील सगळं मान्य आहे पण तरीही उजीलाटा ??
Kaay role she is just
Kaay role she is just ordinary old lady in jeans >>> कोणाची फिकीर न करता स्वतःला पाहिजे ते एन्जॉय करणारी खट बाई मस्त रंगवली आहे त्यांनी. क्षिती जोग का दु:खी आहे कळल्यावर आपला नवराही गेला आहे पण मी रडत बसत नाही वगैरे म्हणते तो सीन मस्त आहे.
आत्मपॅफ्लॅट (लिहायला फार अवघड
आत्मपॅफ्लॅट (लिहायला फार अवघड आहे हे) बघितला. खूप छान आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट आहे. लोकांनो नक्की बघा.
80's च्या उत्तरार्धात जन्मलेल्या मुंबईतल्या एका मुलाची आत्मकथा. यात निरागस प्रेम आहे, तत्कालीन घटनांवर खुसखुशीत भाष्य आहे, राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घटनांचा सामान्य माणसावर जेवढा पडतो तेवढाच फरक यात दाखवला आहे. सुरुवात जरा रेंगाळणारी, शेवट जरा गुंडाळल्यासारखा झाला खरा, पण एकंदर चित्रपट इतका छान आहे की हे दोन मुद्दे माफ.
आणि, आशिष बेंडे जो ह्या चित्रपटाचा नायक आहे, तोच दिग्दर्शक आहे.
आत्मपॅफ्लॅट - हे नाव असं का
आत्मपॅफ्लॅट - हे नाव असं का आहे ???
काय अमा, आज "संध्याकाळ" जरा
काय अमा, आज "संध्याकाळ" जरा जास्त झालीये का ? Wink>> नाही. कोणाचा गैर समज होउ नये म्हणून क्लीअर करते.
उजीलाटा काय अस्ते? सरळ मत लिहिले आहे.
मोठ्यांचे चरित्र, छोट्यांचे
मोठ्यांचे चरित्र, छोट्यांचे पॅम्पलेट.
दिग्दर्शकाची स्वतःची प्रेमकथा आहे. पटकथेत तिचा विस्तार केला आहे.
उजीलाटा हा वाक्प्रचार डिजिटल
उजीलाटा हा वाक्प्रचार डिजिटल माध्यमात चपखल नाही.
उबोलाक(फ) योग्य वाटते.
उजीलाटा- उचलली जीभ… टाळ्याला
उजीलाटा- उचलली जीभ… टाळ्याला
उबोलाकफ-उचललं बोट लावलं कळफलकावर
आत्मपँफ्लेट चा ट्रेलर मस्त
आत्मपँफ्लेट चा ट्रेलर मस्त आहे! इकडे आला तर बघणार नक्की.
आत्मपम्फ्लेट
आत्मपॅम्फ्लेट
मस्त धमाल आहे चित्रपट. वेगळीच ट्रिटमेंट दिलेय. Coming of age (शाळाची आठवण येते) + धर्म, जाती इ वर खुसखुशीत कमेंटरी. बघाच एकदा.
कलाकारांच्या निवडीबद्दल 100 मार्क. वातावरण निर्मिती, वास्तवातील घटना आणि हिरोच्या आयुष्यातले टप्पे मस्त घेतलेत. साधा सोपा मनोरंजक चित्रपट. दिग्दर्शकाचा चित्रपट.
आज पाहिला आत्मपॅम्फ्लेट..
आज पाहिला आत्मपॅम्फ्लेट...मस्त आहे...खुसखुशीत संवाद....छान acting...आणि विशेष म्हणजे जातीभेदाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारा...खुसखुशीत पण तरीही अभ्यासपूर्ण वाटला चित्रपट...पण आपल्या समाजाचं दुर्भाग्य म्हणावं की अजून काय चित्रपट पाहायला आम्ही theater मध्ये मोजून 9 लोकं होतो..
मधल्या age मधला आशिष,त्याची आई ,बोर्या ,लहानपणीची सृष्टी विशेष आवडले..
आमच्या इथे नाही दिसते. पण
आमच्या इथे नाही दिसते. पण फ्रीमॉंट सीए, बारा, मॅसेच्युसेट्स इ. ठिकाणी या वीकेंडला दिसतोय. बघून या रे!
आत्मपँफ्लेट एडिसनला या
आत्मपँफ्लेट एडिसनला या शनिवारी दिसतोय पण फक्त दुपारचा शो. जो जमेलसं वाटत नाही.
पुढच्या वीकेण्ड पर्यंत राहील
पुढच्या वीकेण्ड पर्यंत राहील का ?
बराच डीमांड असेल तर एखादा
बरीच डीमांड असेल तर एखादा वीकेन्ड वाढवतात, पण या सिनेमाची फार कुणाला माहिती नसणार (बहुतेक)
खूपच वाईट मार्केटिंग आहे.
खूपच वाईट मार्केटिंग आहे.
गरज असेल तर शोधा आणि जाऊन बघा. परेश मोकाशी पुण्याचाच आहे.
शाळकरी मुलांची प्रेमकथा -अधिक
शाळकरी मुलांची प्रेमकथा -अधिक जातीची फोडणी हा मराठीत कधीच झालेला इनोव्हेटिव्ह विषय आहे.
ओटीटीवर आल्यावर नक्की बघणार.लवकरच येईल असं दिसतंय.
मुलुंडला आजपासून आत्म.. नाही.
मुलुंडला आजपासून आत्म.. नाही. दोन नवीन मराठी चित्रपट लागले आहेत. दिल दोस्ती दिवानगी (हिंदी नाव का बरे?) आणि खळगा. प्लाझाला आत्म.. आणि डाक असे दोन मराठी सिनेमे आहेत.
कोणी अंकुश बघितला का? केतकी
कोणी अंकुश बघितला का? केतकी चा…
गरज असेल तर शोधा आणि जाऊन बघा
गरज असेल तर शोधा आणि जाऊन बघा. परेश मोकाशी पुण्याचाच आहे.
>>> नाउ that makes sense.. पुण्यातील लोकाना माज फार.. असा चित्रपट आहे बघायचा तर बघा… मार्केटिंग वगैरे आम्ही काही करणार नाही…
अरे देवा!!! आठवणी पिक्चर
अरे देवा!!! आठवणी पिक्चर बघतेय आणि आता संपताना मला अमा ह्याच पिक्चरबद्दल बोलत होत्या हे कळलं. कसला मंदाड आहे तो नायक. एकच एक्स्प्रेशन चेहर्यावर. गर्लफ्रेंडबरोबर केमिस्ट्री शून्य आणि चालले लग्न करायला.
काल एक मराठी सिनेमा पळ्वत
काल एक मराठी सिनेमा पळ्वत पळवत बघितला. नाव इंग्रजीत. होम स्वीट होम. जोशी बिशींनीच दिग्दर्शित केलेला आहे. मोजो व रीमा लागू म्हातारे नवरा बायको. स्पृहा जोशीच परत ही वांड पेइंग गेस्ट कम नात्यातली तरुण मुलगी त्या एका काळातील अवखळ तरुणी वगैरे दिसायचा आटोकाट प्रयत्न करते. अग्निहोत्र लेव्हलचीच दिसते. टिशर्ट व खाली सल वार अशे घालून घरात आगाउ पणा, सारखे वॉकमन व हेडफोन्स लावुन. दात घास त नाही व्गैरे भाडिपा लेव्हल क्युटिअपा करत असते.
रिमाचा गोडवा वगिअरे फक्त हिंदीतच दिसतो. इथे कायम म्हण जे कायम करवादत असते व वैतागलेली दिसते. काही नाही म्हातार्यां चे घरगुती रुटीन चालू आहे. लिफ्ट नाही. गुडघे दूखतात. दादरच्या घराची किंमत काही करोड म्हणौन म्हातारी घर विकू व टावर मध्ये जाउ म्हणून मागे लागते. अधून मधून जुने घर त्या निमित्ताने गद्य काव्ये टा कलेली आहे त जोशी पणाची प्रा काष्ठा. एक दा टावार् ची ट्रिप करतात तिथे एक आयताकृती मराठी नटी आहे तीपण इथेच या म्हणून मागे लागते. पण मोजो खवळतो. पण कसाबसा तयार होतो. दिग्दर्शक जोशीनेच प्रॉपर्टी ब्रोक र चा चिवळट रोल केला आहे. तर कसे तरी डिल होते.
कोणाशी तर आपले फेवरिट अपरक्लास मराठी जोडपे. सुमीत राघवन व जिजाउ जी मृणालजी. ह्याला घर का विकायचे आहे ते पहिल्या झटक्यात कळ त नाही. पण डील डन झाल्यावर म्हातारे परत एकदा येतात तर एका खोलीत मॄणालजी क्यान्सर ग्रस्त असून चित्र रंगवत असतात. एक पोरगा पण साइडला रंगवत असतो.
लगे च मोजो व जोजो सॉरी रिमाला ते घर नको वाट्ते व आपला दादरचाच महाल बरा असे ठरवून डील कँ गसल करतात स्प्रू हा जोशी ला पण परत घेउन येतात. व लगेच पार्सल मधुन साबुदाणा वडे आणणे, लाफटर क्लब, योगा शिक्षिकेकडे लाळ गाळत बघणॅ वगैरे मँडेटरी अॅक्टिव्हि टी चालू होतात. रिमा व मोलकरीन लव्ह स्टोरी परत चालू. प्रॉपर्टी डीलर चा घरचा काही प्रॉब्लेम आहे. म्हातारी आई जागा कमी बायकोला हात लावता येत नाही वगैरे. ते मी काय लक्ष दिलेनाय. पण तो पण सेट असतो.
शेवटाला परत घराबद्दल गद्यकाव्य व म्हातारे ग्यालरीतून बाहेर बघत अस्ताना लाँग शॉट. फारच हार्ट वॉर्मिन्ग बोअरिन्ग सिनेमा. दुसरा फ्लॅट घ्यायचा की मग. इथे म्रू णाल व सुमीतला पण काहीही काम नाही तेच ते च एक्स्प्रेशन. ही बाई सुंदर न दिस्ता कशी दिसेल ते दाखवले आहे.
किमो म्हणून कॅन्सर वाली टोपी घातली आहे व चेहरा थोडा काळा केला आहे . सुमीत दु: खातील नवर्याचे बेअरिन्ग घेउन बसला आहे. कॅन्सर ग्रस्तांचा अपमानच वाटला मला तरी. पण ठीकाहे लुळी पांगळी श्रीमंतीचे एक व्हर्जन दाखवले आहे. एकदम ममव.
होम स्वीट होम नावाचा पिक्चर
होम स्वीट होम नावाचा पिक्चर मला सुद्धा दिसलेला कुठेतरी.. पण मी क्लिक केले नाही...
अमाचा रिव्ह्यू भारी !
अमांचा रिव्ह्यू भारी ! क्यूटिआपा , फेवरिट अपरक्लास मराठी जोडपे, मँडेटरी अॅक्टिव्हिटी >>
मी बघितलाय हा. चांगला वाटला
मी बघितलाय हा. चांगला वाटला होता बहुतेक. हृषीकेश जोशी ना? हा रीमा लागूचा शेवटचा सिनेमा आहे असं वाचलं. तिचं डबिंग नंतर निर्मिती सावंतने केलं.
हृषीकेश जोशीचा असेल तर मग
हृषीकेश जोशीचा असेल तर मग बघितला पाहिजे.
करवादणार्या म्हातारीचा रोल असला तरी गोडवा हव्वाच बरं!
मृणाल कुलकर्णी का? हल्ली बघवत
मृणाल कुलकर्णी का? हल्ली बघवत ऐकवत नाही ही अजिबात.
>>>>>>गर्लफ्रेंडबरोबर
>>>>>>गर्लफ्रेंडबरोबर केमिस्ट्री शून्य आणि चालले लग्न करायला.
हाहाहा
Pages