Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
..नम्र्ता सभेराव
..नम्र्ता सभेराव हास्यजत्रेच्या सेटवरुन थेट येवुन गाडित बसली असावी... ती मेल्यावर कलकलाट थान्बला म्हणून आपल्यालाच बर वाटत.>>>
धक्कातंत्र बर्यापैकी वापरलंय तसं. काही सीन्स ना दचकायला होतंच आणि काही सिन्स ना हसू आवरत नाही. चांगला बनवलाय सिनेमा. सिनेम्यॅटिक लिबर्टी पण जोरदार घेतलिये.
पेन्शन, मराठी युट्युबवर.
पेन्शन, मराठी युट्युबवर.
एक विधवा स्त्री-विमल (मोठी सो कु) तीचा मुलगा आणि सासू तिघे एका गावात राहत असतात..विमल गावात इतरांकडे छोटी मोठी घरकामं करत असते पण पैशांचा मुख्य स्त्रोत सासूची पेन्शन असते..सासू बेडरिडन असते.पेन्शन मिळायला एकच दिवस असतो आणि सासू जाते..ऐनवेळी पेन्शन हातची जाऊ नये म्हणून विमल काय काय करते,गावातील चित्रीकरण,सो कु आणि लहान मुलाचा अभिनय पाहण्यासारखे आहे..चांगला आहे सिनेमा..
मी वसंतराव युट्युबवर पाहिला
मी वसंतराव युट्युबवर पाहिला
आवडलाच ....सर्वांगसुंदर !
मिडियम स्पायसी बघितला. अत्यंत
मिडियम स्पायसी बघितला. अत्यंत फालतू चित्रपट आहे. केवळ कलाकार चांगले आहेत म्हणून शेवटपर्यंत बघितला. अधलेमधले काही प्रसंग चांगले आहेत. पण बाकी सगळं आनंदीआनंद गडे.
मिडियम स्पायसी बघितला. अत्यंत
मिडियम स्पायसी बघितला. अत्यंत फालतू चित्रपट आहे. केवळ कलाकार चांगले आहेत म्हणून शेवटपर्यंत बघितला. अधलेमधले काही प्रसंग चांगले आहेत. पण बाकी सगळं आनंदीआनंद गडे.
>>>
टोटली मान्य...
अरुंधती नाग रॉक्स... बाकी सगळे पानी कम
>>> मिडियम स्पायसी बघितला.
>>> मिडियम स्पायसी बघितला. अत्यंत फालतू चित्रपट आहे.
अनुमोदन!
मिडियम स्पायसी>>>> २५-३०
मिडियम स्पायसी>>>> २५-३० मिनटं बघून सोडला मी.
काल मी 'बंदिवान मी या संसारी'
काल मी 'बंदिवान मी या संसारी' बघितला. आशा काळे, निळू फुले, अविनाश खर्शीकर, खूपच मेलोड्रामा आहे. पण सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे. तिचे फार हाल हाल झाले, ते बघत कपड्यांच्या घड्या केल्या. 'मेड इन हेवन' तर कुणीही बघेल, हे बघून दाखवा.
प्लॅनेट मराठी वर थोडा वेळ एक
प्लॅनेट मराठी वर थोडा वेळ एक मुव्ही बघायचा प्रयत्न केला. मराठी पिक्चरचं नाव मात्र इंग्रजी आहे. गुड व्हाईब्ज ओन्ली.
एक पोरगेलीशी बाई आणि एक खरंच पोरगा सर्फिंग शिकायला आले असतात. आधी मला वाटलं हे नवरा बायको. पण नंतरच्या धेडगुजरी संवादातून कळलं की ते फक्त सर्फिंग शिकायला त्या ठिकाणी आलेत. तो पोरगा असा पहिल्यापासून गळेपडू का दाखवलाय काय माहित. नीट काही संवादच नाहीयेत किंवा त्या पात्रांना जमले नाहीयेत. एकूण काय व्हाईब्ज जुळले नाहीत. नकाच बघू.
अंजली धन्यवाद वेळ
अंजली धन्यवाद वेळ वाचवल्याबद्दल.
मेड इन हेवन' तर कुणीही बघेल,
मेड इन हेवन' तर कुणीही बघेल, हे बघून दाखवा >> You had me at आशा काळे
मिडियम स्पायसी कोणत्या चॅनेल वर आहे?
अस्मिता पुढच्या वेळी 'धाकटी
अस्मिता पुढच्या वेळी 'धाकटी सून ' पाहून बघ. बरं वाटेल जरा.
तिचे फार हाल हाल झाले, ते बघत
तिचे फार हाल हाल झाले, ते बघत कपड्यांच्या घड्या केल्या. 'मेड इन हेवन' तर कुणीही बघेल, हे बघून दाखवा.
>>>>>
पुढच्या वेळी 'धाकटी सून ' पाहून बघ. बरं वाटेल जरा.
>>>> पाहिलाय मी. तेवढाच रिग्रेसिव आहे..
आधुनिक सून - घर मोडणारी, तिचा नवरा बायकोचा गुलाम, धाकटी सून - शुद्ध देसी घीं मे बनी भारतिय नारी, कुठलाही निरोप/आगा पिछा न ठेवता नाहीसा झालेल्या नवर्याची वाट बघणारी, सासू सासर्यांना जपणारी व ते नाहीत या कल्पनेने जीव द्यायला निघालेली…अरे ती माणूस आहे रे, तिला या सगळ्या नात्यांशिवाय पण अस्तित्व आहे सांगावेसे वाटलेले….
अस्मिता,
अस्मिता,
कपड्यांच्या घड्या कडक झाल्या की मूळमुळीत ते सांगा आधी
आशा काळे ह्यांचे बरेच चित्रपट पाहिलेत दूरदर्शन कृपेने.
अर्धांगिनी आणि नरसुच भूत आणि गोमू संगतीनं माज्या तू येशील काय फेम चित्रपट पाहून घाबरलो होतो.
तर त्यांचाच एकटी नामक चित्रपट बघून फार वाईट वाटलेले.
त्यांच्याच एका चित्रपटात बहुद्धा बाळा गाऊ कशी अंगाई , त्या नवर्याच्या तळपायाला तेल लावून देत असतात वै प्रसंग बघून आहे.
लहानपणी पाहिलेले.
आता तितका।पेशन्स नाहीये.
एकटी सुलोचना.
एकटी सुलोचना.
पाहुणी, कुलस्वामिनी अंबाबाई, सतीची पुण्याई.
आशा काळे सोशिक सून, ललिता पवार सासू, निळू फुले नणंदेच्या नवरा आणि रंजना धाकटी बंडखोर सून असा एक सिनेमा होता. हा हिंदीत पण आला.
Kapoor and sons पाहिला
Kapoor and sons पाहिला
छान आहे
आधीच बघायला हवा होता.
टाळत होतो इतके दिवस.
कारण तेव्हा तो हिरो आवडायचा नाही. आता आवडतो.
एकटी सुलोचना }}}}}}}}
एकटी सुलोचना }}}}}}}}
Ok भरत , बरे झाले चूक सांगितलीत.
लहानपणी पाहिलेत सगळे त्यामुळे अर्धवट आठवतात.
त्या नवर्याच्या तळपायाला तेल
त्या नवर्याच्या तळपायाला तेल लावून देत असतात >>>>
डोके/डोळे उन्हाने तळावले असतील तर तळपायाला तेल लावतात. त्यामुळे ते एकवेळ क्षम्य. पण एका गाण्यात त्या विक्रम गोखलेचे बूट काढतात
बरे विक्रम गोखले काय पिऊन वगैरे पडलेले नाहीत. नुसतेच ऑफिसमधून घरी येऊन निवांत बसलेत. ते ही बघवेना.
नो वंडर...विक्रम गोखलेंना नयनतारा आवडल्या त्या पिक्चरमध्ये.
नवरा ऑफिसला जाताना त्याचे बूट
नवरा ऑफिसला जाताना त्याचे बूट घालून देणे, ते पदराने पुसणे हा प्रकार आशा काळे आणि रंजना दोघींनी केलाय. नवरा रवींद्र महाजनी.
Lol पुढच्या वेळी 'धाकटी सून '
Lol पुढच्या वेळी 'धाकटी सून ' पाहून बघ. बरं वाटेल जरा. >>>> थोरली जाऊ पण बघून टाक .
पिक्चरमध्ये करत असतील.
पिक्चरमध्ये करत असतील. भूमिकेची गरज.
प्रत्यक्षात करायच्या का?
कपूर आणि मुलं हा मराठी
कपूर आणि मुलं हा मराठी चित्रपट आहे?
फारएण्ड, प्राईमवर आहे मिडियम
फारएण्ड, प्राईमवर आहे मिडियम स्पायसी. पहा आणि लिहा
पिक्चरमध्ये करत असतील.
पिक्चरमध्ये करत असतील. भूमिकेची गरज.
प्रत्यक्षात करायच्या का?
>>> अहो पण असल्या गोष्टी का दाखवायच्या? कोणत्या बायका असे करायच्या? आणि असे करणाऱ्या बायकाच चांगल्या, सोशिक, कुटुंबावर/नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या असे दाखवून काय म्हणायचे होते दिग्दर्शकाला?
>>>>>>तिचे फार हाल हाल झाले,
>>>>>>तिचे फार हाल हाल झाले, ते बघत कपड्यांच्या घड्या केल्या.
साध्या साध्या कमेन्टस मधुन, विनोदाच्या असंख्य छटा मांडत असतेस.
Mazeman हा बूट काढताना
Mazeman हा बूट काढताना दाखवलेला तोच चित्रपट वाटतं बाळा गाउ कशी अंगाई.
गाणी ऐकायला चांगली आहेत असे आठवतंय.
बाकी चित्रपट सीन्स न आठवता हेच आठवतंय कारण ते नेहमी आजूबाजूला बघतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणूनच असेल.
फारएण्ड, प्राईमवर आहे मिडियम
फारएण्ड, प्राईमवर आहे मिडियम स्पायसी. पहा आणि लिहा >> धन्यवाद
कपूर आणि मुलं हा मराठी
कपूर आणि मुलं हा मराठी चित्रपट आहे? Uhoh
>>
सॉरी गल्ली चुकली.
माबोवर शंभर धाग्यावर हल्ली चित्रपटांचे चर्चा चालते. त्यामुळे गोंधळ उडतो
अंजली, धन्यवाद वेळ
अंजली, धन्यवाद वेळ वाचवल्याबद्दल.+१
सारखं ओटीपी मागते प्लॅनेट मराठी म्हणून सवयच गेली बघायची.
वावे, इतका बेकार आहे का 'मिडीयम स्पायसी'. इंग्रजी/हिंदी नावं असलेले मराठी सिनेमे आधुनिकतेचा आव आणून अजून बोअर करतात असं निरीक्षण आहे.
साध्या साध्या कमेन्टस मधुन,
साध्या साध्या कमेन्टस मधुन, विनोदाच्या असंख्य छटा मांडत असतेस.>>> खरंच ?
झकासराव, एकदम इस्त्री केल्यासारख्या घड्या झाल्या.
रमड, स्वस्ती, माझेमन,
'धाकली सून व थोरली जाऊ' ची वॉच पार्टी करूया...
भरत,
याच्यातही खर्शीकर एकदम भाऊ होऊन एक गुलाबी पातळ घेऊन देतो. तुम्ही मागे असाच एक सिनेमा सांगितला होता.
Pages