मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघू आचार्य,
कृपया धाग्याच्या संदर्भात प्रतिसाद लिहिले तर बरं होईल.

बाईपण भारी देवा सप्टेंबरला OTT वर येणार होता ना.. जियो सिनेमा.. कोणाला काही आयडीया? न्यूज आहे का बघतोय पण सापडत नाहीये

बाईपण भारी देवा सप्टेंबरला OTT वर येणार होता ना.. जियो सिनेमा.. कोणाला काही आयडीया? न्यूज आहे का बघतोय पण सापडत नाहीये
>>> हो जिओ सिनेमा वर येणार आहे... न्यूज मध्ये आहे कि...
The Jio Cinema will be the platform to stream the movie because Jio Studios is the production company of the movie.

एक मराठी चित्रपटाचे ट्रेलर बघतीले पण नाव आठवत नाही ,शिवाजी महाराजांचे कोणी तरी मावळा शत्रू होतो ,गडाच्या भिंतीवर दोघानाच्या तलवारी टकरावतात ,निळ्या बॅकग्राऊंड मध्ये ,व शेवटी दोघे एक होतात

कोणाला आठवत असेल ?

डेट भेट नावाचा पिक्चर पाहिला. लेखन दिग्दर्शन लोकेश गुप्ते. कलाकार - सोनाली कुलकर्णी ज्यु. , हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकर. एकदा पाहायला बरा आहे. हलकाफुलका. खूप विनोदी नाही, मेलोड्रामा नाही. आवर्जून पाहावाच असाही नाही. पण काही उद्योग नसेल तर पाहायला ठीक. सोकुल ज्यु माझ्या डोक्यात जाते त्यामुळे तिच्याबद्दल काही मत देत नाही. जुवेकर आणि ढोमेचं काम बरंय.
पिक्चरात सोकुल साठी तिची आत्या ढोमेचं स्थळ आणते. तो लंडनला राहात असतो. सोकुल त्याला भेटायला म्हणून ७ दिवसांसाठी लंडनला जाते. त्याच्याच घरी राहते. या ट्रीप दरम्यान तिची ओळख जुवेकरशी होते. ढोमेशी तिचं लग्न होतं का, काय काय घडतं या ७ दिवसात याबद्दल सगळी स्टोरी आहे.

कोणाला आठवत असेल ? सुभेदार का?

रमड, मी पण कालच बघितला डेट भेट, बघितला म्हणण्यापेक्षा फॉरवर्ड केला. लोल
खूपच स्टीरिओटिपीकल, सुरवातीलाच अंदाज येतो काय होणार.
जुवेकरच्या फुड जॉईंट मधे त्याने एका पदार्थात बाकरवडीचा चुरा घातल्यामुळे सोकुल त्याला फार भारी म्हणते आणि क्रिस्पी डीपी म्हणजे दडपे पोहे
हे डोळे मिटून ओळखायला लावतो हा सीन बघून सुडोमी म्हणजे झोप लागली Wink

अजून कोणत्यातरी पिक्चरमधे सोकुलला असंच लंडनचं स्थळ आलेलं असतं मग ती त्याला तिकडे जाऊन भेटते वगैरे झिम्मा का?

हो तो झिम्मा. म्हणजे २-३ कलाकार लंडनला ४-५ दिवस नेऊन तेथे लग्नासंबंधी संवादांचे सीन्स चित्रीत करून एकापेक्षा जास्त पिक्चर्स मधे वापरलेले दिसत आहेत Happy

मॉड्युलर डिझाइन!

ढोमेशी तिचं लग्न होतं का >>> मी हा डेट भेट पाहिलेला नाही म्हणजे याला स्पॉईलर म्हणता येणार नाही. पण एका कंपनीच्या व्हिसावर येउन इथे आल्यावर एक दोन महिन्यांत दुसरी जास्त चांगली कंपनी दिसली तर जंप करत तसे काही आहे का? Happy

अरे यार, पिसं काढायला नकोत म्हणून डिसेंट परीक्षण लिहिलं तर तुम्ही लोकं चावी मारता! Proud

फा, अगदी अगदी. हे काय भारी डील आहे असंच माझंही मत झालं. Lol.

झिम्मा मध्ये पण तिचा होणारा नवरा ढोमेच आहे का? मग बहुधा एकात एक उरकून घेतला असावा पिक्चर. ढोमे किंवा इतर कोणाचं तरी लंडन मध्ये घर आणि ३-४ विमानाचे पास वगैरे आहेत की काय?

सुरुवातीलाच आपल्याला कळतं की सोकुलला ढोमे ने म्हणे रिटर्न तिकीट पाठवून भेटायला बोलावलेलं असतं. तिथे तर मला भरून आलं. असं स्थळ प्रत्येकीला येवो इ. इ. ढोमे फुल त्याच्या हातखंडा रोल मध्ये आहे. सोकुल फक्त टोमणे मारते. जुवेकरच काय तो बराय.

आता स्टीरिओटिपीकल आणि सुरुवातीलाच अंदाज येणारी स्टोरी असली म्हणून पिक्चर काय बाद करायचा का? किमान लोकेश गुप्ते साठी पाहूया असा विचार करून पाहिला पिक्चर. आताशा Netflix चे टेम्प्लेट रॉमकॉम असतात थोडा त्यातला प्रकार आहे हा. अगदीच टाकाऊ नाही असं आपलं मला वाटलं.

जुवेकरच बरा असं तिला वाटावं म्हणून पिक्चर मध्ये ढोमेची एक्स बायको पण आहे जिच्यात ढोमे अजूनही गुंतला आहे. म्हणजे हिला कारण मिळतं ना तेवढंच. बरं, अश्या माणसाशी लग्न करायला का बाबा इथे आली ही असं वाटायला नको म्हणून ती ही divorce झालेली. सगळं कसं सोयीसोयीने. जुवेकर फूड ट्रक वर नुसते डबे भरताना दिसतो. समोर खुर्च्या आहेत पण तिथे बराच काळ कोणी बसलेलं दिसत नाही. कदाचित त्या न-नाट्यासाठी ठेवल्या असाव्यात. सोकुल कधी खुर्चीत कधी ट्रकमध्ये काम करताना. बाई, तू आलीस कशाला इथे नक्की? फायनली १-२ सीन्स मध्ये गिऱ्हाईकं दिसतात आणि आपल्याला हुश्श वाटतं.

सोकुल काकू 'टॉम अँड जेरी बघतो आणि कॉम्प्लान पितो' म्हणून ढोमेला नावं ठेवतात हे पाहून माझं मत त्यांच्याबद्दल अजून वाईट झालं. ती बहुधा करण जोहर टाईप लाईफस्टाईल अपेक्षित धरून तिथे आलेली असते. एका सीन मध्ये (ज्यात ढोमे actually हसवतो) दोन ड्रेस दाखवून यातला कुठला घालू असं त्याला विचारते आणि इतकं करून जर्द पिवळी साडी आणि टीशर्ट सारखा दिसणारा काळा ब्लाऊज घालून तयार(!) होते. असो. गमती बऱ्याच आहेत. पण पिक्चर ओके आहे. निदान बाकरवडीच्या चुऱ्यासाठी तरी 'यांना आपलं म्हणा ' Proud

रच्याकने, मला अपील झालेला एकच सीन आहे ज्यात बनवाबनवी चा reference आहे. छान वापरलाय तो.

रमड , धमाल Lol
झिम्माचेच जरा एका कुटुंबापुरते रूप वाटले. लोकेश गुप्ते म्हणजे तोच नं, जो तोंडात रसगुल्ला घोळवल्यासारखं बोलतो.. ! नसला तरी काही उत्सुकता नाही आता Lol

लोकेश गुप्ते म्हणजे तोच नं, जो तोंडात रसगुल्ला घोळवल्यासारखं बोलतो >>> आयला हो? पुन्हा एकदा पहायला हवं. Wink लोगु म्हणजे वादळवाट मधला समर.

कदाचित त्या न-नाट्यासाठी ठेवल्या असाव्यात. >> Lol आणि लंडन मधेच असल्याने लॉस्ट इन ट्रान्स्लेशनही नाही. मूळ चेरिंग क्रॉसवरचे बर्फ चिराबाजारात पाडायचीही गरज नाही Happy

अश्या माणसाशी लग्न करायला का बाबा इथे आली ही असं वाटायला नको म्हणून ती ही divorce झालेली. सगळं कसं सोयीसोयीने >> Happy हिंदीत जशी शेवटी सगळी समीकरणे सोडवलेली असतात तसेच दिसते. म्हणजे दुय्यम हीरोची हिरॉइन मेलेली असली की क्लायमॅक्सला तोही मरतो. व्हिलनने आवर्जून मारला नाही तर नायकाला मारलेली गोळी आ बैल करत आपल्या अंगावर घेतो.

हेमंत ढोमे झिम्माचा दिग्दर्शक. त्यात अभिनयसुद्धा केला होता का ते आठवत नाही. त्याने झिम्मापाठोपाठ ललित प्रभाकरला घेऊन सनी हा चित्रपट काढला. यातही त्याची बायको क्षिती जोग आणि लंडन आहेत. म्हणजे खरंच काहीतरी लंडन कनेक्शन असावं.
मिथुनच्या मालकीची उटीला हॉटेल्स आहेत आणि त्याच्या चित्रपटांचं शूटिंग तो उटीका करून घेत असे . तसं काही.

"तिथल्या सरकारचा एक नियम आहे की जर तुम्ही तुमच्या चित्रपटाची ८० ते ८५ टक्के शूटिंग युकेमध्ये करत असाल तर तुम्हाला तुमच्या शूटिंगवर सबसिडी मिळते. म्हणजेच तुम्हाला तिथे शूटिंग करताना जेवढा खर्च आला असेल त्याच्या २० ते २५ टक्के भाग युके सरकार तुम्हाला सबसिडी म्हणून परत करतं."
https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...

मध्यंतरी माझ्या भावाच्या मागे मराठीतला एक होतकरू दिग्दर्शक लागला होता कि तू सिनेमा प्रोड्युस कर म्हणून. तो शाळेतला मित्र असल्याने थेट नकार देणे अवघड होऊन बसले होते. त्या काळात त्याने अनेकांशी गाठी भेटी घालून दिल्या.

एकदा बालगंधर्वला लोकनाट्याचा प्रयोग होता. जो कुणी कर्ताधर्ता होता तो मराठी चित्रपट निर्माता पण होता. त्याने या दिग्दर्शकाला सांगितले की सासू सून, सुनेचा छळ, देवाधर्माचा, देवदर्शनाचा असा पिक्चर बनवत असाल तर मी तयार होईन. त्याने घातलेल्या अटी.

जास्त नट नट्या नको.
खेडेगावातल्या घरात शूटींग होईल. कॅमेरामन फक्त आउटडोअर शूटींगसाठी एफटीआयचा पास आअट घ्यायचा. घरातल्या सीन्ससाठी कॅमेरा स्टॅण्डला उभा करायचा. त्याच्या अँगलच्या बाहेर जायचं नाही. खुंटीला टांगला तरी चालेल.

आउट डोअर लोकेशन खूपच गरजेचं असेल, तर दोन तीन निर्मात्यांशी टाय अप करू. एकदमच शूटींग करायचं म्हणजे खर्च विभागून जाईल

बाकिच्या अटी आणि सूचना इथे न सांगण्यासारख्या.

हो तो झिम्मा. म्हणजे २-३ कलाकार लंडनला ४-५ दिवस नेऊन तेथे लग्नासंबंधी संवादांचे सीन्स चित्रीत करून एकापेक्षा जास्त पिक्चर्स मधे वापरलेले दिसत आहेत

सोकुलला ढोमे ने म्हणे रिटर्न तिकीट पाठवून भेटायला बोलावलेलं असतं. तिथे तर मला भरून आलं. असं स्थळ प्रत्येकीला येवो

जुवेकरच बरा असं तिला वाटावं म्हणून पिक्चर मध्ये ढोमेची एक्स बायको पण आहे जिच्यात ढोमे अजूनही गुंतला आहे. म्हणजे हिला कारण मिळतं ना तेवढंच. बरं, अश्या माणसाशी लग्न करायला का बाबा इथे आली ही असं वाटायला नको म्हणून ती ही divorce झालेली. सगळं कसं सोयीसोयीने.

समोर खुर्च्या आहेत पण तिथे बराच काळ कोणी बसलेलं दिसत नाही. कदाचित त्या न-नाट्यासाठी ठेवल्या असाव्यात

आणि इतकं करून जर्द पिवळी साडी आणि टीशर्ट सारखा दिसणारा काळा ब्लाऊज घालून तयार(!) होते

हिंदीत जशी शेवटी सगळी समीकरणे सोडवलेली असतात तसेच दिसते. म्हणजे दुय्यम हीरोची हिरॉइन मेलेली असली की क्लायमॅक्सला तोही मरतो.
>>>> Lol Lol

भयंकर निरीक्षणे Happy

मला एक पिक्चर थिएटर मध्ये तिकीट काढून पाहिल्याचा कायम पश्चाताप होतो तो म्हणजे पिकनिक.एक तर एकच गाणं आहे तेही हिंदी.मध्यंतरानंतर पात्रांचा कपडेपट बदलत नाही.बाकीही अनेक बोअर गोष्टी आहेत पण त्या आठवायला पिक्चर परत पाहणार नाही.

हर्पा माहिती वाचून 'चलो लंडन' झालं.
सगळे प्रतिसाद वाचून असं वाटतंय , आपण सगळे मिळून एक सिनेमा काढू शकतो आता, कारण काय करायचं माहिती नसलं तरी काय नाही करायचं हे चांगलं माहिती आहे. सबसिडाईज्ड मराठी सिनेमा आणि गटग दोन्ही होईल. मग आपण आपली पावलं हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवू. फार झालं साऊथचं. Let's make our own 'subsidised' Rajnikant ..! Wink

अरे देवा! हा कुठला पिक्चर आहे? कधी आला होता?
>>> माझ्या माहितीप्रमाणे तो b ग्रेड चित्रपट होता.. फक्त प्रौढांसाठी वगैरे ...

अरे देवा! हा कुठला पिक्चर आहे? कधी आला होता?
>>> माझ्या माहितीप्रमाणे तो b ग्रेड चित्रपट होता.. फक्त प्रौढांसाठी वगैरे ...

लोल अस्मिता.. तुझ्याकडे तर पिसांची गादीच तयार झाली असेल एव्हाना Lol
हा पण बघ सहज टाईमपास म्हणून.

ढोमे आणी क्षिती जोग नवरा बायको ना? लंडनलाच राहत असतील.

Let's make our own 'subsidised' Rajnikant ..! >>> Lol

मला खुंटीला कॅमेरा अडकवण्याची कल्पना अनेक दिवसांपासून आवडली आहे. >>> Happy

मध्यंतरी महाराष्ट्र सरकारतर्फे बहुधा निर्मात्यांना १५ लाख मिळत मराठी पिक्चर्स करता. काहीतरी अनुदान असावे. तेव्हा भयंकर चीप पिक्चर काढून त्यातून पैसा कमावायचे प्रयत्न करायचे लोक असे वाचले होते.

चलो लंडन' झालं.
सगळे प्रतिसाद वाचून असं वाटतंय , आपण सगळे मिळून एक सिनेमा काढू शकतो >>> अगदी अगदी Lol माझं सेम मत आहे.

Pages