Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चरपस, तुम्ही म्हणताय 'तो'
चरपस, तुम्ही म्हणताय 'तो' वेगळा.
हा नॉर्मल सस्पेंस थ्रिलर होता.इथे गाणं मिळेल.
https://youtu.be/wdyYLnZZ22U?feature=shared
वरच्या काही पोस्ट वाचून
वरच्या काही पोस्ट वाचून झिम्मा चीच चर्चा वाटली.. त्यात जुवेकर कुठून म्हणून विचारात पडलो..
पिकनिक तो सई आणि अजून तीन
पिकनिक तो सई आणि अजून तीन पोरे असलेला ना? जुवेकर आहे वाटते एक.. एका तो सस्ती चीजो का शौक नही रखते आहे बहुधा..
मी बघितलेला टीव्हीवर.. आधी जरा राम गोपाळ वर्मा स्टाईल वाटला म्हणून बघितलेला.. मग नंतर घसरला..
>मध्यंतरी महाराष्ट्र
>मध्यंतरी महाराष्ट्र सरकारतर्फे बहुधा निर्मात्यांना १५ लाख मिळत मराठी पिक्चर्स करता. काहीतरी अनुदान असावे. तेव्हा भयंकर चीप पिक्चर काढून त्यातून पैसा कमावायचे प्रयत्न करायचे लोक असे वाचले होते.
हो! विशेषतः अमराठी निर्मात्यांनी भयंकर सिनेमे काढले.
हा पंधरा लाख फार झोलर आकडा
हा पंधरा लाख फार झोलर आकडा दिसतोय
आठवणी
आठवणी
(प्राईम व्हिडिओ)
डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, सुहृद वारदेकर आणि वैष्णवी करमरकर.
एका ( रूढ अर्थाने) असफल प्रेमाच्या पार्श्वभूमीवरील दुसऱ्या सफल प्रेमाची तरल भावस्पर्शी कथा.
दिग्गज कलाकार तर उत्तमच. सुहृद वारदेकर या तरुण कलाकाराने लेखकाची भूमिका छान केली आहे.
शेवट आशयगर्भ आणि सुंदर !
>>>>>>>आठवणी
>>>>>>>आठवणी
(प्राईम व्हिडिओ)
धन्यवाद कुमार सर. पहाते.
आठवणी ची कथा चांगली आहे पण
आठवणी ची कथा चांगली आहे पण सादरीकरण हॉरीबल आहे.
मोहन आगाशे आणि सुहास जोशी यांच्या भूमिका म्हणजे शेवटाकडे असलेले guest appearance आहेत. अगदीच थोडा वेळ, एखादा सिनपूरते हे दिग्गज कलाकार दिसतात. ते अर्थात उत्तमच काम करतात पण बिर्याणी गंडलेली असेल तर वरून चार केशर काड्या लावून काय फरक पडणार.
बाकीचा वेळ जो 'नायक' 'नायिका' नायकाचा मित्र वगैरे कलाकार आहेत ते अतिशय भयाण अभिनय करतात. जर चांगले ऍक्टर्स घेतले असते तर बराच फरक पडला असता. नायक नायिका केमिस्ट्री शून्य. त्या करमरकर ऐवजी पूजा सावंत /तेजश्री प्रधान /वैदेही परशुरामी/ अक्षया देवधर यांनी खूप चांगलं काम केलं असतं. नायकाच्या चेहऱ्यावर काहीच भाव नाहीत.
शाळेतले आणि कोलेजमधले सुहास जोशी आणि मोहन आगाशे म्हणून जे चार बाल /तरुण कलाकार घेतले आहेत ते तर अगदीच वाईट आहेत. अपवाद म्हणूनही कोणी बरं काम केलेलं नाही. अगदीच दुकानदार, क्लार्क अशा एकेक मिनिटाच्या रोलमधले कलाकार बरे म्हणावेत. त्यांच्याकडेच लक्ष जातं आपलं.
आत्म पॅम्फ्लेट बद्दल बरंच
आत्म पॅम्फ्लेट बद्दल बरंच चांगलं ऐकायला मिळतंय. कोणी पाहिला का हा चित्रपट?
आठवणी मी सुद्धा सुरू केला पण
आठवणी मी सुद्धा सुरू केला पण किती वेळ तो नवीन अॅक्टरच दिसत राहिला. मोहन आगाशेंचा पत्ताच नाही.
कथाही काहीच कळेना खूप वेळ बघून. बंद केला शेवटी.
आत्मप्लँचेट असेल.
आत्मप्लँचेट असेल.
गाभ्रीचा पाऊस, प्राईमवर..
गाभ्रीचा पाऊस, प्राईमवर..
खूप छान सिनेमा आहे.. गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, ज्योती सुभाष अप्रतिम अभिनय..
शेवटचे दहा मिनिटं मी शेवट पॉजिटिव असु दे देवा म्हणत होते मनात....
हा टीव्हीवर बघितलेला, रडायला
हा टीव्हीवर बघितलेला, रडायला आलं शेवटी.
सिद्धांत बघितला. मला कधीपासून
सिद्धांत बघितला. मला कधीपासून बघायचा होता पण आधी हिंदी डबड होता युट्युबवर, तसं नको होतं मला. आता मराठी ओरिजनल आहे. मला आवडला, सर्वांनी सुरेख अभिनय केलाय. अर्चिस तर फार आवडला, किल्लामध्येही छान सहज सुंदर अभिनय केलेला.
ही समज च्रप्स या आयडीला द्याल
सम्पादित
सर्व मराठी रसिक प्रेक्षकांनी
सर्व मराठी रसिक प्रेक्षकांनी आवर्जून बघावा असा कॉफी नावाचा चित्रपट prime वर आहे. स्पृहा जोशी सिद्धार्थ चांदेकर असलेला, नक्की म्हणजे कृपया बघावाच.
च्रप्स, का डिलिट केली कमेंट?
च्रप्स, का डिलिट केली कमेंट?
मोहन आगाशे आणि सुहास जोशी
मोहन आगाशे आणि सुहास जोशी यांच्या भूमिका म्हणजे शेवटाकडे असलेले guest appearance आहेत. अगदीच थोडा वेळ, एखादा सिनपूरते हे दिग्गज कलाकार दिसतात.>> त्यांनी काम करणे बरेच वर्शा पूर्वी थांबवले आहे. आपोआप चेह रे हलतात व त्याला काम म्ह टले जाते. पुण्याची पुण्याई आहे असे साधे संवाद बोलले तरी कौतूक होते. बोअर होतात मला हे म्हातारे कलाकार. दे डाँट अॅड एनी व्हॅल्यु.
अमा. पण ते असावेच लागतात
अमा. पण ते असावेच लागतात त्याशिवाय पिक्चर पूर्ण होत नाही आणि बघायला पब्लिक येईल याची खात्री नसावी.
सुहास बाई चेहरा मख्ख ठेवुन
सुहास बाई चेहरा मख्ख ठेवुन काय पण बोलायला लागली की जणू अमृतच ते ओघळ णार. तिरकी टोपी वाले काका कायम नानाच वाटत आलेत घाशिराम मधले. पुणे हाइप्ड पीपल.
अमा
अमा
अमा
अमा
फुलराणी बघितला प्राईमवर.
फुलराणी बघितला प्राईमवर. अगदीच पंधरा लाख बजेटवाला वाटतो, कलाकारांसकट. सुबोधने हा पिक्चर का केला असेल. त्या खोट्या विगपेक्षा तो आहे तसा चांगला दिसतो. ना धड प्रेम कथा, ना धड सौंदर्यस्पर्धा. आखिर केहना क्या चाहते हो, असं झालं. प्रियदर्शिनी अगदीच झगामगा अभिनय आणि वेशभूषा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा दाखवली असती तर तिची वेशभूषा शोभली असती. विक्रम काका असेच बळच रागीष्ट वगैरे. बापलेकाचा काय प्रॉब्लेम कळला नाय.
अमा
अमा
सुहृद वारदेकर >>> हा सध्या
सुहृद वारदेकर >>> हा सध्या कलर्सच्या शंकर महाराज सिरियल मध्ये असतो. पुर्वी एका सिरियलमध्ये फार मख्ख अभिनय, दिसायला चांगला मात्र (आधी आर जे होता). आता अभिनय सुधारला असेल तर चांगलं आहे, शंकर महाराज सिरियल मी हल्ली बघते पण फार अभिनय सुधारला असं वाटत नाहीये, पण पहिल्या सिरियलपेक्षा बेटर आहे. त्यात मेन शंकर महाराज भूमिका करतो तो संग्राम समेळ छान काम करतो त्यामुळे लक्ष जास्त त्याच्याकडे जाते.
पुणे हाइप्ड पीपल.>>>>... पुणे
पुणे हाइप्ड पीपल.>>>>... पुणे पीपल नीडेड फॉर खडूस लुकिंग अॅपिअरन्स... दे जस्ट हॅव टू बी देअर फॉर देअर वर्ल्ड फेमस फेस एक्स्प्रेशन्स!
अमा
अमा
मी खूप पिक्चर्स पाहिलेले नाहीत सुहास जोशींचे पण त्यांचा झिम्मा मधला रोल चांगला होता. तेथे त्यांचा हाच आविर्भाव जमून गेला.
Kaay role she is just
Kaay role she is just ordinary old lady in jeans.
सुहास जोशी आणि मोहन आगाशेंचं
सुहास जोशी आणि मोहन आगाशेंचं काम आवडतं.
झिम्मा मध्ये कुणाचं काम वाईट होतं अशातला भाग नाही. स्टोरी/ पटकथा कनविन्सिंग न्हवती ही समस्या होती.
मला जनरली सुहास जोशी आणि मोहन
मला जनरली सुहास जोशी आणि मोहन आगाशे- आगाशे जास्त आवडतात पण म्हणून त्यांच्या अॅक्टींग नसलेल्या रोलचं कौतुक करायचं प्रेशरही घ्यायची गरज नाही.
Pages