Submitted by कुमार१ on 31 March, 2023 - 21:53
भाग १ इथे : https://www.maayboli.com/node/78349
......................................................................................................................
दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पहिल्या भागाची पृष्ठसंख्या बरीच वाढल्याने नवा भाग काढत आहे.
सर्व नव्याजुन्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे स्वागत !
नव्या वाचकांसाठी सूचना :
१. या भागात शक्यतो मराठी आणि अन्य मूळ भारतीय भाषांबद्दल लिहावे.
२. इंग्लिश आणि अन्य परदेशी भाषांमधील रंजक मुद्दे लिहिण्यासाठी हा धागा उपलब्ध आहे (https://www.maayboli.com/node/62893).
अर्थात ही विभागणी ढोबळमानाने आहे ;चर्चेच्या दरम्यान आंतरभाषिकता येऊ शकते.
सुस्वागतम !
येऊद्या भाषेविषयी काहीही..
अपभ्रंश, अर्थभ्रंश.. .. बहुरंगी आणि बहुढंगी शब्दप्रयोग.. आणि बरंच काही रंजन ..........
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनिच्छनीय ?
अनिच्छनीय ?
“ अनिच्छनीय परिणाम होतील “ असे छापील भविष्य वाचले आज पेपरला. काय असावे ?
अन् इच्छ नीय
अन् इच्छ नीय
ज्याची इच्छा नाही ते परिणाम भोगावे लागतील.
हा शब्द योग्य वाटत नाहीये, ओढूनताणून वाटतंय.
अवांच्छनीय हा शब्द रुळलेला
अवांच्छनीय हा शब्द रुळलेला आहे.
Undesirable
अवांछनीय हा हिंदी शब्द आहे.
अवांछनीय हा हिंदी शब्द आहे.
Undesirable साठी अनिष्ट हा अधिक सोपा शब्द मराठीत आहे.
अवांच्छनीय मराठीतही वाचला आहे
अवांच्छनीय मराठीतही वाचला आहे. मूळ संस्कृत.
अनिष्ट म्हणजे प्रतिकूल, वाईट. अर्थ वेगळा आहे.
उ बो बरोबर सांगत असावेत. कारण
उ बो बरोबर सांगत असावेत. कारण इच्छेचा मूळ धातू इष् हा आहे. त्यापासून धातुसाधित विशेषण इष्ट आणि नकारात्मक अनिष्ट. आता ... नीय शब्दांत अनीयर प्रत्यय वापरला आहे. त्यात आणि क भू धा वि मध्ये फरक आहे. कभूधावि इष्ट म्हणजे इच्छिलेला. वाछ - वाञ्छ म्हणजे पण इच्छिणे पण वाञ्छनीय म्हणजे इच्छिण्या योग्य. अनीय प्रत्यय लागतो तिथे 'च्या योग्य' असा अर्थ होतो.
हे मी संस्कृतातील अर्थ सांगत आहे. हिंदी मराठीत याच शब्दांचे अर्थ बदलले असू शकतात, कल्पना नाही.
मग “ अनिच्छनीय” मराठीत योग्य
मग “ अनिच्छनीय” मराठीत योग्य की अयोग्य ?
माझ्या मते अनिच्छनीय शब्द
माझ्या मते अनिच्छनीय शब्द इच्छनीय नाही आणि इच्छनीय शब्दही अनिच्छनीय आहे.
वा !
वा !
+१
मानव
मानव
अनिच्छनीय परिणाम झाले नाहीत, भविष्यवाणी खोटी ठरली
"इच्छा तृप्त होणें" या
"इच्छा तृप्त होणें" या अर्थी
बोचांडणें
असे एक क्रियापद आहे :
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9B...
ते वांछावरुन आलेले असावे (?)
अनिच्छनीय >> असा शब्द आहे की
अनिच्छनीय >> असा शब्द आहे की नाही माहीत नाही, पण असायला व्याकरणाची हरकत नसावी.
काही शब्दांमध्ये इ आणि वि
काही शब्दांमध्ये इ आणि वि यांच्या ऐवजी समाजात बरोबर विरुद्ध अक्षर उच्चारल्यामुळे अनेक अपभ्रंश निर्माण झालेत. अशा काहींची ही यादी :
इच्छा >> विच्छा
ईश्वर >> विश्वर
इंगळ/ इंगळा >> विंगळ/ विंगळा
विचार >> इचार
विघ्न >> इघ्न
विटकर >> इटकर
थोडक्यात मराठी जगातील एकूण इ
थोडक्यात मराठी जगातील एकूण इ आणि व हे अखेर तेवढेच राहतात. अश्या रितीने आपण इ-व अक्षय्यतेचा सिद्धांत मांडू शकतो.
इदर्भात फक्त वि चा इ होते
इदर्भात फक्त वि चा इ होते राजे हो, इ चा वि नाही होत.
कुठं याच्या उलट होते का शोधा लागन भाऊ, नियम मांडायचा असन तं.
‘वकील’ अरबी भाषेतून मराठीत
‘वकील’ अरबी भाषेतून मराठीत आलाय आणि चांगलाच स्थिरावलाय. त्याच्या काही समानार्थी शब्दांची व्युत्पत्ती रंजक आहे :
हेजीब : (अर. हाजिब्)
येलची/ एल्ची : (तुर्की ईल्ची)
आदॉगाद :(पोर्तु. अदवोगादो) (गोव्यातील शब्द)
अदवोगादो advocate शी साधर्म्य दाखवते. पण advocate Latin मधून आलेय.
व।। हे वकीलचे लघुरूप पण मजेशीर !
विद्याप्रशंसा
विद्याप्रशंसा
आज हा नवीन शब्द वाचला.
विद्याप्रशंसा = अविभक्त कुटुंबांतील व्यक्तीने स्वतःच्या विद्येने मिळविलेले धन. हे स्वकष्टार्जित धन त्या व्यक्ती चे खासगी धन, सामायिक कुटुंबाचे नाही
बर! वाक्यात उपयोग कसा होतो या
बर! नव्यानेच ऐकला. वाक्यात उपयोग कसा होतो या शब्दाचा? "हे पाचशे रुपये म्हणजे काकूंची विद्याप्रशंसा असल्यामुळे काकांनी त्यावर हक्क सांगणं त्यांना रुचलं नाही" - असं काहीतरी?
मी असे वाचले :
मी असे वाचले :
काशीयात्रेसाठी धन नव्हते. शेवटी XXभटांची साठवलेली
विद्याप्रशंसा कामी आली
विद्याप्रशंसा >>> रोचक !
विद्याप्रशंसा >>> रोचक !
वाक्य वाचल्यावरही अर्थ पटला
वाक्य वाचल्यावरही अर्थ पटला नाही.
https://bruhadkosh.org/words
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%...
इथे असा उल्लेख :
(ल.) महत्व; वजन; पर्वा; मातब्बरी (मनुष्य, वस्तु वगैरेंची) किंमत पहा. 'तो दुसरा ब्रह्मा करील उत्पन्न । मग ऐसियाची कथा कोण ।' -नव १६.६८. 'क्षुद्र पशु पक्ष्यांची काय कथा पांचही महाभूतें ।' -विद्याप्रशंसा (चिपळूणकर).
विद्याप्रशंसा हे
विद्याप्रशंसा हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या कवितेचे नाव आहे.
इथे पान ११ पासून वाचता येईल
हा फक्त कृष्णाशास्त्री
बरोबर. हेच लिहायला आलो होतो.
हे कृष्णशास्त्री
हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या कवितेचे >>>
ती डाऊनलोड व्हायला समस्या येते आहे. नंतर पुन्हा प्रयत्न करावा लागेल ..
विद्याप्रशंसा हे
विद्याप्रशंसा हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या कवितेचे नाव
नवीन माहिती !
धृतिमान ( = धैर्यवान )
धृतिमान ( = धैर्यवान )
हे नाव बंगालीत विशेष लोकप्रिय आहे.
(धृतिमान) चटर्जी, मुखर्जी, दास ही काही प्रसिद्ध उदाहरणे .
धन्यवाद अनिंद्य. चांगली चर्चा
धन्यवाद अनिंद्य. चांगली चर्चा चालू आहे.
मुक्तसङ्गोऽनहंवादी
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः।
योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी।।18.33।।
धृतिचा एक अर्थ धारणाशक्ती असाही होत असावा. मूळ धातू धृ - धारण करते, त्यापासून धरा म्हणजे पृथ्वी.
हे पार्थ, जी प्रवृत्ती यौगिक क्रियांनी अचल झाल्याने मन, प्राण व इंद्रियांच्या सर्व लालसांना किंवा सुखदुःखाना एकाच अव्यभिचारी दृष्टीने धारण करते-बघते, ती धृति सात्विक समजल्या जाते.
https://srimadbhagavadgitahindi.blogspot.com/2020/04/18-18-33-bg-18-33-b...
धन्यवाद अनिंद्य. चांगली चर्चा
धन्यवाद अनिंद्य. चांगली चर्चा चालू आहे. +१
Pages