लेखन उपक्रम ३: उठा उठा सकाळ झाली - कविन

Submitted by कविन on 28 September, 2023 - 08:10

शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... कर्णकर्कश आवाजात गजर वाजायला सुरुवात झाली.

"अरे दिनू अरे एss बाळा उठायचं नाही का तुला? आज सहल आहे ना!" आईने पांघरूण काढत विचारलं.

"पाच मिनिटं झोपूदे गं"

"पाच पाच करत पंधरा मिनिटं झाली. आता उठतोयस की पंखा बंद करु?"
यावरही त्याने फक्त "हुम्म्म!" म्हणत कुस तेव्हढी बदलली.

गधड्या उठ नाहीतर सहल बुडेल. दरवेळी काय तेच सांगायचं?
एरंडा एव्हढा वाढून पण जबाबदारीची काडी एव्हढी जाणीव कशी नाही रे तुला. बस ड्रायव्हर आहेस ना तू शाळेचा?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

आबा जी आंबा खाओ जी ।
बाट मत देखो जी ।
जस्ट एन्जॉय करो जी।
सिर्फ चिल करो जी ।
आबा जी आंबा खाओ जी ।

धन्यवाद मंडळी

शाळेचा हेडमास्तर च वर्जन वाचलं होत.>> Proud हो हो दिनू त्याच शाळेतला ड्रायव्हर आहे Lol शिकला असतास तर हेडमास्तर की रे झाला असतास असं त्याची आई त्याला नेहमी ऐकवते Lol

कविन, त्या हेडमास्तरांमुळेच ओळखले.. त्यांना मी सुद्धा आधी भेटलो होतो Lol

बाई दवे,
त्यादिवशी मी वाचले तेव्हा मॅगी यांनी कथेतील एक्सीडेंट शब्द खाऊन टाकला होता. म्हणून मला आश्चर्य वाटले असे कसे कोणाचे मरण ओळखले. ही तर काळी विद्या झाली Proud

Lol