चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमचा मॉर्निंग वॉकचा पूल
इथे पाणी असते तेव्हा छान दिसते
मोबाईल नवा आहे. जुना फोटो शोधावा लागेल.

IMG_20230919_103210.jpg

फेसबूक वर पाणी???? Wink

फोटो खूप गोड आहे. गोल्डन गेट पण झकास!

असंच पोरांसोबत जंगलात भटकताना गवसलेला एक रहस्यमय पूल...

बाई दवे,
माझ्या फोटोंमध्ये पूल आणि मूल असे कॉम्बिनेशनच सापडणार.. त्याला माझा नाईलाज आहे. फोटो काढणे आणि पोरांवर लक्ष ठेवणे, दोन्ही कामे मी एकदमच करतो Happy

FB_IMG_1695124483651.jpg

.
सॉरी पूल नाही काठ आहे. फोटो काढून टाकलेला आहे.

.
सॉरी पूल नाही काठ आहे. फोटो काढून टाकलेला आहे.

अवल, तुम्हाला झब्बू. लायनी पलिकडून (योग्य किनार्‍यावरुन) क्वीनस्टन लुईसटन ब्रिज. Proud
niagara-power-station bridge.jpg

आणि हा अवलच्या पायाखालचा पूल. Lol अर्थात हायड्रोइलेक्टिक पॉवर प्लांट/ धरणावरचा पूल.
niagara power plant.jpg

Pages