चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे फोटो सुंदर!
हा एक लहानसा, साधासा पण प्रिय पूल.
IMG-20230921-WA0012.jpg

उउ. .. भारीच की! कसं जायचं इकडे ते लिहून ठेवा. >>>>
ह्या ब्रिजचे नाव आहे - Glenfinnan Viaduct . Scotland च्या सिटीतून (Edinburgh, Inverness किंवा Glasgow) बर्‍याच वन्डे ट्रिप्स आहेत.
हा Highland चा संपुर्ण भागच फार सुंदर आहे. इथे बर्‍याच ठिकाणी हॅरी पॉटर चे शुटिंग झाले आहे.
किंवा जर स्वतःची कार असेल तर Fort William (Scotland मधील एक फेमस किल्ला) पासून २०-३० मिनिटाच्या अंतरावर आहे.

जर ह्या ब्रिजहून ट्रेन पास होतांना पहायची असेल तर ट्रेन टाइम टेबल पाहून जावे लागेल.

सु-सेंट-मरी, ओंटारिओ - सु-सेंट मरी, मिशिगन ना जोडणारा पूल.
फोटो फार छान नाही. हॉटेलच्या खिडकीतून काढलेला आहे.
sue-st-marie.jpg

हा स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा Øresund Bridge. जहाजांना ये-जा करण्यासाठी पॅसेज हवा होता आणि पलीकडेच कोपेनहेगन एयरपोर्ट असल्यामुळे उंच चालणार नव्हता. मग स्वीडन साईडने उंच पूल सुरु होतो आणि डेन्मार्क जवळ आलं की समुद्रात घुसतो आणि बोगदा बनतो Happy
हा पूलावर जाताना काढलेला फोटो असल्याने नीट कळत नाही पण वर विकीपीडीयाची लिंक दिलीय त्यात वरुन काढलेला भारी फोटो आहे.

HJQV6387.JPG

धन्यवाद अस्मिता Happy
मंदार hardanger आणि Oresund ब्रिज दोन्हीचे फोटो मस्त
राज, वरळी समुद्र सेतू चा एक फोटो मी टाकला आहे

हा लंडन च आयकॉन बनलेला टॉवर ब्रिज, ओपन होताना.

आम्ही ह्या पुलावर मस्त फिरत होतो, जिथे हा दुभंगतो तिथे थोडी गॅप आहे , ती बघितली. पुलाच्या पादचारी मार्गावरून चालत दोन्ही बाजूचं लंडन बघितलं, ह्या पुलाच टॉवर ब्रीज नाव सार्थ करणारा शेजारीच असणारा टॉवर ऑफ लंडन चा किल्ला पुलावरून सुंदर दिसत होता. नदीवरची गार हवा खात , बोटी बघत पुलावरून चालत होतो. मागे एक दोन वेळा पोलीसची शिट्टी वाजली पण झालं असेल काही तरी म्हणून फार लक्ष दिलं नाही. तिसऱ्यांदा मात्र पोलीस जवळ येऊन जोरात शिटी वाजवत होता म्हणून मागे बघितल तर पूल जवळ जवळ रिकामा झाला होता. फारच थोडी माणसं शिल्लक होती पुलावर. वाहन ही दुशीकडे थांबली होती. थोड्याच वेळात बोटींना वाट करून देण्यासाठी तो दुभंगायला लागणार होता. आम्ही धावत धावत पूल क्रॉस करून खाली उतरलो आणि तो पूल दुभंगताना बघितला.

IMG-20160901-WA0014_0.jpg

पुण्याजवळील ढवळगड ह्या किल्ल्यावरून टिपलेले हे छायाचित्र
गडाखालून बोगद्याबाहेर आलेली रेल्वे हि पुलावरून जाताना आपल्याला इथे बघता येते

IMG_20190711_173109-PANO-01.jpeg

Låtefossen, Norway

LF.jpg

Submitted by मंदार on 21 September, 2023 - 09:33 >>> अप्रतिम

बाकीचे फोटो ही खूप सुन्दर!

खुपच सुंदर फोटो सगळेच.
हा एका रेल्वे पुलाचा. लोणावळा, खंडाळ्याजवळ. व्हिस्टाडोम कोच होता म्हणून हा फोटो काढता आला.

Screenshot_20230919_211559_Gallery.jpg

नॉर्वे चे फोटो बघून पर्यटनाच्या यादीत अजून एका जागेची भर पडली.

एस एम जोशी पूल, पुणे.
IMG_20221206_074138~2 (1).jpg

माझ्या एका मित्राने दिवस उगवला तरी का बरे दिवे चालू ठेवतात असा एक प्रतिसाद दिला होता ह्या फोटो वर

Pages