चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि गोव्यातली एक ऑफबीट जागा आहे. केरी फूट ब्रिज. चोरला घाटाच्या टोकाला. खरे तर हि एक पाईपलाईन आहे आणी त्यावर हा पूल.
गर्द हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला. पलीकडचे टोक तर दिसत सुद्धा नाही.
Screenshot_20230919_120909_Gallery.jpg

थँक्स सामो, अवल Happy

सगळेच फोटो छान आहेत सगळ्यांचे

हा उपक्रम नेहेमीच आवडतो.

IMG_6893.jpeg

कूर्ग येथील दुबारे एलिफंट कॅम्प जवळील एक पूल ...

IMG-20230919-WA0028.jpg

Mt. Rainier

PXL_20230728_185229482 (1).jpg

Mt. Rainier

PXL_20230728_191210056~2.jpg

मस्त विषय आणि मस्त प्रचि सगळेच.
माझा सर्वात आवडता पूल म्हणजे कोकणात आमच्या घराजवळ च्या व्हाळावर असलेला साकव म्हणजे लाकडी पूल. एक माणूस जेमतेम जाऊ शकेल एवढाच रुंद . लाकडाचा असल्याने आणि मध्ये आधाराचा खांब नसल्याने चालताना हलायचा. मुलं उड्या मारून आणखी हलवायची क्रॉस करताना. मे महिन्यात आंब्याची जड ओझी डोक्यावर घेऊन बायका झप झप चालत साकव पार करायच्या तेव्हा तर ठोका चुकत असे काळजाचा एवढा हलत असे साकव. आधाराच्या खांबांचा पाण्यातला भाग कुजत असे म्हणून तो कापण्याची किंवा खांब बदलण्याची डागडुजी दर वर्षी करावी लागे. साकवाची उंची जास्त नसल्याने पावसाळ्यात हौर् आला की पाणी साकवा वरून वाहू लागे ... मग सगळ ठप्प थोडा वेळ.

त्या पुलाच्या जागी नवा सिमेंट चा पूल बांधलाय अलीकडे आणि जुन्याच प्रकाश चित्र नाहीये माझ्याकडे म्हणून हे शब्दचित्र. असो.

ओंकारेश्वर देवस्थानला जायला पूर्वी बोटीने नर्मदा पर करावी लागे , हल्ली पूल बांधलाय तो हा पूल.

DSCN1199.jpg

कोकरनाग झर्यावरचा चिमुकला ब्रिज - कोकरनाग बोटॅनिकल गार्डन
आत्ता जिथे अतिरेक्यांबरोबर चकमक चालू आहे तेच कोकरनाग. अनंतनाग जिल्ह्यातला नितांतसुंदर भाग.
Kokernag 3 copy.jpeg

मनीमोहर , तुमचे साकव बद्दलचे शब्दचित्र वाचल्यावर केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता आठवला . तिथेही आता नवीन सिमेंट चा पूल बांधलाय, पण जुन्या साकवाचे अवशेष दिसतात .

Pages