हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .
आजचा विषय - पूल ( Bridge)
रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
अमित आधी माहित असतं तर हाय
अमित
आधी माहित असतं तर हाय केलं असतं इकडून 
मस्त फोटो अमित
नायगारा किल्यात जातानाचा पूल
नायगारा किल्यात जातानाचा पूल

हि गोव्यातली एक ऑफबीट जागा
हि गोव्यातली एक ऑफबीट जागा आहे. केरी फूट ब्रिज. चोरला घाटाच्या टोकाला. खरे तर हि एक पाईपलाईन आहे आणी त्यावर हा पूल.

गर्द हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला. पलीकडचे टोक तर दिसत सुद्धा नाही.
निल्स काय सुंदर
निल्स काय सुंदर
सुरेख!! सर्व फोटो आवडले.
@निल्स, सुरेख!!
सर्व फोटो आवडले.
कोलंबस पूर्ण लाकडी पूल
कोलंबस पूर्ण लाकडी पूल

तोच पूल बाहेरून

आणखी एक कॅनडा अमेरिका बॉर्डर.
आणखी एक कॅनडा अमेरिका बॉर्डर. थाउजंड आयलंड पूल. शिशिर (का शिषिर?) ॠतुच्या सुरुवातीचा आहे.

समुद्रात दीपस्तंभ असावा तसा
समुद्रात दीपस्तंभ असावा तसा हा पूल जंगलात वाटत आहे.
लकडी पूल जोक केला की नाही मग?
लकडी पूल जोक केला की नाही मग?
#फ्रॉमरिअललकडीपूल
अमित मस्त फोटो, हाच फॉल्समधला
अमित मस्त फोटो, हाच फॉल्समधला काय दिसेल न

लकडीपूल, नाही मी पक्की पुणेकर नाही न
ओळखा पाहू पुणेकर
ओळखा पाहू पुणेकर

थँक्स सामो, अवल
थँक्स सामो, अवल
सगळेच फोटो छान आहेत सगळ्यांचे
हा उपक्रम नेहेमीच आवडतो.
(No subject)
जरा शोधावा लागेल, पण आहे हो
जरा शोधावा लागेल, पण आहे हो पूल
पुलदे उद्यान
ब्राईस कॅन्यनला जाताना. रेड
ब्राईस कॅन्यनला जाताना. रेड कॅन्यन आर्च

(No subject)
कूर्ग येथील दुबारे एलिफंट कॅम्प जवळील एक पूल ...
Mt. Rainier
Mt. Rainier
पडण्यापूर्वी सुस्थितीत असलेला
पडण्यापूर्वी सुस्थितीत असलेला पूल, आणि बांधण्यापेक्षा पाडण्यात सुख मानणारे कामगार.

अमित भारीच पहिला. अन दुसरा
अमित भारीच पहिला. अन दुसरा त्याहून भारी
अश्विनी, छंदीफंदी मस्त
इंडियानापुलिस<
इंडियानापुलिस
<
Mackinac बेटावरुन Mackinaw
Mackinac बेटावरुन Mackinaw City ला बोटीने येताना दिसणारा पूल..
Mt. Rainier
Mt. Rainier
Mini Train Bridge in
Mini Train Bridge in Milwaukee Zoo
निरु सुंदर फोटो
निरु सुंदर फोटो
मेट्रो पूल
मेट्रो पूल
वॉव. भंडार्याची उधळण!!!
वॉव. भंडार्याची उधळण!!!
माझा सर्वात आवडता पूल म्हणजे
मस्त विषय आणि मस्त प्रचि सगळेच.
माझा सर्वात आवडता पूल म्हणजे कोकणात आमच्या घराजवळ च्या व्हाळावर असलेला साकव म्हणजे लाकडी पूल. एक माणूस जेमतेम जाऊ शकेल एवढाच रुंद . लाकडाचा असल्याने आणि मध्ये आधाराचा खांब नसल्याने चालताना हलायचा. मुलं उड्या मारून आणखी हलवायची क्रॉस करताना. मे महिन्यात आंब्याची जड ओझी डोक्यावर घेऊन बायका झप झप चालत साकव पार करायच्या तेव्हा तर ठोका चुकत असे काळजाचा एवढा हलत असे साकव. आधाराच्या खांबांचा पाण्यातला भाग कुजत असे म्हणून तो कापण्याची किंवा खांब बदलण्याची डागडुजी दर वर्षी करावी लागे. साकवाची उंची जास्त नसल्याने पावसाळ्यात हौर् आला की पाणी साकवा वरून वाहू लागे ... मग सगळ ठप्प थोडा वेळ.
त्या पुलाच्या जागी नवा सिमेंट चा पूल बांधलाय अलीकडे आणि जुन्याच प्रकाश चित्र नाहीये माझ्याकडे म्हणून हे शब्दचित्र. असो.
ओंकारेश्वर देवस्थानला जायला पूर्वी बोटीने नर्मदा पर करावी लागे , हल्ली पूल बांधलाय तो हा पूल.
कोकरनाग झर्यावरचा चिमुकला
कोकरनाग झर्यावरचा चिमुकला ब्रिज - कोकरनाग बोटॅनिकल गार्डन

आत्ता जिथे अतिरेक्यांबरोबर चकमक चालू आहे तेच कोकरनाग. अनंतनाग जिल्ह्यातला नितांतसुंदर भाग.
मनीमोहोर, तुम्ही गावाकडच्या
मनीमोहोर, तुम्ही गावाकडच्या त्या पुलाच छान शब्दचित्र तयार केलत.
सगळीच प्र. चि. छान!
मनीमोहर , तुमचे साकव बद्दलचे
मनीमोहर , तुमचे साकव बद्दलचे शब्दचित्र वाचल्यावर केशवराज मंदिराकडे जाणारा रस्ता आठवला . तिथेही आता नवीन सिमेंट चा पूल बांधलाय, पण जुन्या साकवाचे अवशेष दिसतात .
Pages