चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-१ - पूल ( Bridge)

Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:24

हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .

आजचा विषय - पूल ( Bridge)

रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...

खेळाचे नियम व अटी -

१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नोव्हेंबर ते मार्च एण्ड पर्यंत स्नो एव्हढा जमा होतो कि पायी चालणे अशक्य होतं. म्हणून मग असे दगडी पूल तयार केले जातात. हा मी आणि सहकार्‍यांनी हाताने बनवलेला.
snow.jpg

हर्पेन , तुमच्य लेन्स मधून पुणे वेगळंच दिसतंय. >> धन्यवाद रघु

खास तुमच्यासाठी पुणेकरांनी लकडी पूल रिकामा केलेला असणार. >>>
रिकाम्यापुलाचे काय इतकं मोठं नाही १ ते ४ मधे जाऊन पहा Wink

पुणेकरांचा पुणेकर हे पुणेकरांकरता अर्थात (च) कौतुक (च) बाहेरच्यांकरता.. .. .. .. .. निव्वळ एक स्वप्न (च) बोले तो ऑल्टरनेट रिॲलिटी का काय म्हणतात ते Wink Proud

व्वा, पूलांचे फोटो विपूल प्रमाणात जमले आहेत इथे. जबरी फोटोज सगळे!

हा Copenhagen, Denmark मधल्या Rosenborg Castle ला जोडणारा पूल:

VDTR8487.JPG

पुणेकरांचा पुणेकर हे पुणेकरांकरता अर्थात (च) कौतुक (च) बाहेरच्यांकरता.. .. .. .. .. निव्वळ एक स्वप्न (च) बोले तो ऑल्टरनेट रिॲलिटी का काय म्हणतात ते >>> परफेक्ट हर्पेन Wink

Pages