एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
तूच गेल्या गणपतीत दात्यांचे
तूच गेल्या गणपतीत दात्यांचे दाखले द्यायचीस ना? कर्मा!

> चतुरस्र म्हणजे चोहीकडून
> चतुरस्र म्हणजे चोहीकडून सारखा, चौकोनी.
हे बहुदा चूक आहे. तुम्हाला अभिप्रेत असलेला शब्द चौरस असावा.
घोडदळ , पायदळ, हत्तीवरचे स्वार आणी उंटावरचे अशा चरही प्रकारचे सैनिक अस्लेले सैन्य चतुरस्त्र असे वाचलेले आठवते.
ते तुम्हाला धारेवर धरायला
@अमित
ते तुम्हाला धारेवर धरायला होतं.
>>> चरही प्रकारचे सैनिक
>>> चरही प्रकारचे सैनिक अस्लेले सैन्य चतुरस्त्र
नाही, ते चतुरंग सैन्य.
>>> कर्मा

चौरस - ज्याच्या चारही बाजू
चौरस - ज्याच्या चारही बाजू सारख्या, समतोल राखलेला
चतुरंग - चारही प्रकारची सैन्य
चौफेर - चारही बाजूंनी
चतुरस्र - बहुश्रुत, व्यासंगी
चतकोर -एक चतुर्थांश
चतुरस्र' बद्दल मला खात्री
चतुरस्र' बद्दल मला खात्री होती तर आता दाते 'चतुरस्त्र' म्हणतेय.
>>> दाते नाही हो!... ट्रान्सलिटरेशन करणारं सॉफ्टवेअर चतुरस्त्र म्हणतंय.
स्र हे अक्षर तुम्हाला ऑनलाईन दाते कोशात सापडणारच नाही. सगळीकडे सहस्त्र, स्त्राव. कारण ocr प्रणालीने ते तसंच वाचलं.
धन्यवाद स्वातीजी ! वय झालं
धन्यवाद स्वातीजी ! वय झालं माझं .
आपटे, वाळंबे, झांबरे
आपटे, वाळंबे, झांबरे एवढ्यांनी चतुरस्र बरोबर सांगितल़ंय.
आता स्र चा अर्थ शोधा.
हिंस्त्र चूक आणि हिंस्र बरोबर. हेसुद्धा नव्याने कळतंय.
>>> वय झालं माझं
>>> वय झालं माझं
मग मला का 'जी' म्हणताय?
मी चतुरस्र हेच बरोबर गृहित
मी चतुरस्र हेच बरोबर गृहित धरणार आहे.
'निर्भर्त्सने'साठी सर्वांना धन्यवाद.
>>> 'निर्भर्त्सने'साठी
>>> 'निर्भर्त्सने'साठी सर्वांना धन्यवाद.
anytime!
(No subject)
हिंस्त्र चूक आणि हिंस्र बरोबर
हिंस्त्र चूक आणि हिंस्र बरोबर. हेसुद्धा नव्याने कळतंय. ++++
पण मी जर हिंस्त्र चा उच्चार हिंस्र असा केला...तर बाकीचे सोडाच..माझेच मला चूक वाटत राहील!!
तसेच सहस्त्र, स्त्राव...बद्दल!
हिंस्र असाच उच्चार करतो की!
हिंस्र असाच उच्चार करतो की!
तसंच आपण सहस्र असाच उच्चार करतो. सहस्त्र कधीच नाही करत . विष्णूसहस्रनाम. सहस्रचंद्रदर्शन. सहस्रबुद्धे इ.
भूमीहीन बरोबर की भूमिहीन ?
भूमीहीन बरोबर की भूमिहीन ?
भूमिहीन. मूळ संस्कृत शब्द
भूमिहीन. मूळ संस्कृत शब्द र्हस्वान्त आहे.
हे शोधताना कळलं की वधूपरीक्षा आणि महीपाल बरोबर आहेत. हे दोन्ही शब्द दीर्घान्त आहेत.
निर्भर्त्सना आणि चतुरस्र - हे
निर्भर्त्सना आणि चतुरस्र - हे बरोबर आहेत. निर्भर्त्सनेबद्दल भरत यांनी माहिती दिली आहे ती उपयुक्त आहे (मूळ धातु - भर्त्स्).
आता स्र चा अर्थ शोधा >> सगळीकडे स्रच असतो असं नाही. स्रु / अस्र असेही असतात.
चतुरस्र = चतु: / चतुर् (चार) + अस्र (कोन) = चार कोन असलेला. या शब्दाला बरेच आयाम आहेत. चार कोन असणे हे चांगल्या खड्याचे / हिर्याचे लक्षण आहे. (तसंही सूक्ष्मात पाहू गेल्यास हिरा हा प्रत्येक अणूच्या चार कोनांना चार अणू लगडलेल्या कार्बननेच बनलेला असतो, अर्थात ह्यावरून तो शब्द आला नसणार).
स्रोत - मूळ धातु - स्रु/स्रव - वाहणे / स्रवणे इत्यादी. जिथून स्रवते तो स्रोत.
सहस्र - काही ठिकाणी व्युत्पत्ती स + हस्र अशी दिली आहे. हस्र / हजार - यांचं मूळ एकच असण्याची शक्यता आहे.
हिंस्र >> शब्दाची फोड मला नीट माहीत नाही. पण मूळ हिंस् असून पुढे र लागला आहे.
जो हिंसा 'करतो' तो हिंस्र. इथे 'हिंसक' असाच अर्थ आहे. क ऐवजी र कुठून आला बघायला पाहिजे ( याची थोडी माहिती काढून खाली दिली आहे). ज्याची हिंसा होते तो हिंस्य. प्रिडेटर - प्रे सारखी जोडी आहे ही.
"नमिकम्पिस्म्यजसकमहिंसदीपो रः – To denote an agent who performs an action because of his nature/habit or sense of duty or skill, the affix ‘र’ may be used following one of the verbal roots नम् / कम्प् / स्मि / जस् / कम् / हिंस् / दीप् ". पाणिनीच्या अष्टाधायीत हे सूत्र आहे, ज्यानुसार "The affix र comes in the sense of 'agent having such a habit etc.' after the verbs".
हिंसक हा शब्द हिंसा या शब्दाला घेऊन बनला आहे. हिंसाम् करोति इति हिंसक. हिंस्र हा थेट हिंस् धातुपासून बनला आहे.
(वरील मूळ घेऊन एकवेळ जस् + र वापरून अजस्र शब्द ओळखीचा वाटेल, पण बाकी कम्प्र/कम्र/दीप्र वगैरे कधी ऐकलेले नाहीत.)
स्र आणि स्त्र थोडेफार सारखेच दिसत असल्याने ते अनवधानाने एकाजागी दुसरे वापरले जातात आणि चुकीचं लिहिलेलंच वाचलं गेल्यास उच्चारही चुकीचाच लक्षात ठेवला जातो. काही जण इस्राईलचा उच्चार इस्त्राईल असा करतात तो यामुळेच. वेगळा उच्चार कानांना चुकीचा वाटतो. तो सवयीचा भाग झालेला असतो. शब्दांचं मूळ अश्या वेळी उपयोगी पडतं. 'कानांना चुकीचं वाटतं' ह्या प्रकाराचा मी इतका धसका घेतला आहे, की काय सांगू! 'दाही दिशा' या शब्दांच्या आधी कुणी 'मोकळ्या' असं म्हटलं तर मला चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. मोकलायाच बरोबर आहे.
धन्यवाद हे.पा. तुमचीच वाट बघत
धन्यवाद ह.पा. तुमचीच वाट बघत होतो.
दाते dsal वर अजस्त्र बरोबर म्हणताहेत. छापील शब्दकोशातून फीड करताना चुका झाल्या असतील का?
आणि अजस्रचा मोठा, प्रच़ंड याशिवाय किंवा मूळ वेगळा अर्थ दिसला.
त्यावरही प्रकाश पाडा.
अजस्र बरोबर आहे.
अजस्र बरोबर आहे.
श्रीचन्द्रवासु यांनी हे अर्थ आणि उदारहणे दिली आहेत. यांत वरती दिलेली पाणिनीची मूळ पदे + र करून शब्द आणि त्यांचे अर्थ आहेत. -
The affix र comes in the sense of 'agent having such a habit etc.' after the verbs 1. नम 'to bow' 2. क्मप् 'to shake' 3. स्मि 'to smile' 4. अजस् 'not to cease' 5. कम 'to desire' 6. हिंस 'to injure' 7. दीप 'to shine'.
Thus, नम्रं काष्ठं 'soft wood'; कम्प्रा शाखा 'shaking branch'; स्मेरं मुखं 'smiling face'; अजस्रं जुहोति 'he sacrifices perpetually'; कम्रा युवती 'a beautiful maiden'; हिंस्रं रक्षः 'the injuring Rakshas'; दीप्रं काष्ठं 'brilliant wood'.
The word अजस्रं is an adverb, and is derived from the root जस् 'to set free', with the negative particle अ, and the affix र; as अ + जस् + र = अजस्रं ।
नम्र = वाकणारे हे आता लक्षात आले
वा वा!
वा वा!
मस्त माहिती हपा.
मस्त माहिती हपा.
वाह! किती उद्बोधक चर्चा होते
वाह! किती उद्बोधक चर्चा होते या धाग्यावर! सर्वांचे आभार __/\__
भरत, भूमीहीन की भूमिहीन ह्या
भरत, भूमीहीन की भूमिहीन ह्या प्रश्नाच्या खुलाशाबद्दल आभार.
ह.पा., भारी!
ह.पा., भारी!
दाते dsal वर अजस्त्र बरोबर
दाते dsal वर अजस्त्र बरोबर म्हणताहेत. छापील शब्दकोशातून फीड करताना चुका झाल्या असतील का >> चुका फीड करताना पेक्षा स्र अक्षराच्या अभावाने झाल्या असाव्या असं वर धाग्यावेताळ म्हणताहेत. मला नक्की समजलं नाही म्हणजे नक्की काय ते.
हपा, तुमचीच वाट बघत होतो. मस्त पोस्ट.
धन्यवाद, हपा.
धन्यवाद, हपा.
उद्बोधक माहिती ह पा ....
उद्बोधक माहिती ह पा .....धन्यवाद
>>>>>>The affix र comes in
>>>>>>The affix र comes in the sense of 'agent having such a habit
ओह ओके. खूप छान.
सध्या बर्याच ठिकाणी मंगल
सध्या बर्याच ठिकाणी मंगल (पाय मोडलेला ल्) मूर्ती असे बरेच लोक म्हणताना ऐकू येतात. पूर्वी मंगल (पूर्ण ल) मूर्ती ऐकू यायचे.
मग कुठला उच्चार बरोबर? मंगल्मूर्ती / मंगलमूर्ती...
मंगलमूर्ती
मंगलमूर्ती
Pages