एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
विद्युत्शक्ती बरोबर आहे की
विद्युत्शक्ती बरोबर आहे की विद्युतशक्ती?
केंद्रबिंदू बरोबर आहे की
के न ला द्र बिंदू बरोबर ?
पोस्ट सर्जरी रिहॅब साठी
पोस्ट सर्जरी रिहॅब साठी मराठीत पर्यायी शब्द काय आहे? वर्तमानपत्रात ‘पुनर्वसन’ वाचलं पण तो शब्द ह्या संदर्भात खटकतोय.
post surgery rehab =
post surgery rehab = शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन
पुनर्वसन हा शब्द का खटकतोय? पुनर्वसन म्हणजे Rehabilitation
“ पुनर्वसन हा शब्द का खटकतोय?
“ पुनर्वसन हा शब्द का खटकतोय?” - कल्पना नाही, पण पूरग्रस्तांचं किंवा निर्वासितांचं पुनर्वसन हा शब्दप्रयोग परिचयाचा आहे. खेळाडू इंज्युरीनंतर पुनरागमन करत असताना पुनर्वसन करतात हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाहीये.
शस्त्रक्रियोत्तर पुनर्वसन
शस्त्रक्रियोत्तर पुनर्वसन म्हणता येईल. शब्दशः भाषांतर.
पुनर्वसनचा शब्दशः आणि
पुनर्वसनचा शब्दशः आणि अभिप्रेत अर्थ पुन्हा वसवणे . वास - वसती ... इथे निवार्याशी सरळ संबंध आहे.
त्यामुळे तंदुरुस्ती संदर्भातल्या रिहॅबसाठी पुनर्वसन मला योग्य वाटत नाही.
पुनर्भरण कसा वाटतो ? भरून येणे या अर्थी.
भरणे चा एक अर्थ - अंगानें जाड, भरदार, दळदार होणें.
विद्युत्शक्ती बरोबर. सामासिक
विद्युत्शक्ती बरोबर. सामासिक शब्द. मूळ संस्कृत शब्द विद्युत् असा असेल.
केंद्रबिंदू बरोबर आहे. तुम्ही सुचवलेला पर्याय कळला नाही. केन्द्रबिंदू म्हणायचंय का? तेही बरोबर. केन्द्रबिन्दू सुद्धा बरोबर. पण केंद्रबिंदू लिहायची रीत आहे.
अवांतर - जिथे परसवर्णा (त्याच वर्गातील अनुनासिक ) ऐवजी अनुस्वार वापरल्याने अर्थबदल होऊ शकतो तिथे परसवर्णच हवा.
वेदान्त, वृत्तान्त, शालान्त, देहान्त. अनुस्वार वापरल्याने ती शब्दाची अनेकवचनी रूपे+ सप्तमी असा अर्थ लागू शकतो.
केन्द्रबिंदू म्हणायचंय का? >>
केन्द्रबिंदू म्हणायचंय का? >>>>> हो.
धन्यवाद भरत, शंकानिरसन झालं
मुंबई विमानतळावर इमिग्रेशन
मुंबई विमानतळावर इमिग्रेशन काउंटरच्या मागे , भिंतीवर अनेक भाषांमधे ' वेलकम टू मुंबई' अशा अर्थाची वाक्ये लिहिली आहेत. मराठीत मुंबईमध्ये आपले स्वागत आहे असे लिहिलेले आहे. . मुंबईमधे असे हवे होते का ?
रीहॅबला पुनरुज्जीवन म्हणता
रीहॅबला पुनरुज्जीवन म्हणता येईल का?
>>> मुंबईमधे असे हवे होते का ?
नाही, ‘मध्ये’च बरोबर आहे.
मुंबईत पाटी असेल तर मुंबईमधे
फा वि का टा आ
छ्या! वाचल्यावर तरी काढायचा.
छ्या! वाचल्यावर तरी काढायचा. काढला तर निदान सांगायचं नाही. आता उगाच उत्सुकता लागली काय होता म्हणून!
पुनर्स्वास्थ्यप्राप्ती कसा आहे रीहॅबसाठी?
भरत यांच्या ‘भरण’वरून शोधत गेले तर ‘बरणी’ ही खरंतर ‘भरणी’ असते असा शोध लागला!
तसंच मराठीत ‘नॉर्मल’ला चपखल प्रतिशब्द नाहीये असाही! मी ‘रीहॅब’ हे back to normal अशा अर्थाने भाषांतरित करता येईल का असा विचार करत होते.
विपूत देतो. इतर इच्छुकांनीही
विपूत देतो. इतर इच्छुकांनीही तिथे जाऊन वाचा.
पुनर्स्वास्थ्यप्राप्ती योग्य
पुनर्स्वास्थ्यप्राप्ती योग्य वाटतोय.
--
हपा, पुढचे वाक्य अनावश्यक आहे.
हपा, पुढचे वाक्य अनावश्यक आहे
हपा, पुढचे वाक्य अनावश्यक आहे. >> पुढचे वाक्य मला खालीलप्रमाणे दिसले :

"Submitted by मानव पृथ्वीकर on 9 January, 2024 - 10:20"
विद्युत्शक्ती बरोबर आहे की
विद्युत्शक्ती बरोबर आहे की विद्युतशक्ती? >>>
विद्युत शक्ती हे मराठी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. विद्युत् + शक्ती असे लिहिल्यास त्याचा संधि नियमानुसार विद्युच्छक्ती असा होईल, विद्युत्शक्ती असा होणार नाही.
व्यंजन संधि नियमानुसार, त् या व्यंजनापुढे श आला, तर त् चा च् आणि श चा छ होतो.
हो. हे लक्षात आलं नव्हतं.
हो. हे लक्षात आलं नव्हतं.
मृच्छकटिक मध्ये मृद् असावं. मृदा म्हणजे माती.
ते ही बरोबच हपा, ती कोणी
ते ही बरोबच हपा, ती कोणी लिहिलेय हे सहज ओळखता येईल.
विद्युत् + शक्ती असे लिहिल्यास त्याचा संधि नियमानुसार विद्युच्छक्ती असा होईल, विद्युत्शक्ती असा होणार नाही.>> हो की, बरोबर.
फक्त ही विसर्गसंधी नव्हे. त् + श् संधी नियम. या नियमास वेगळे नाव आहे की नाही माहीत नाही.
पुस्तकात दिलेले नियम त
पुस्तकात दिलेले नियम त संबंधीची आहेत. द चार उल्लेख नाही.
ह.पा. मृच्छकटिकात मृद् की मृत्? मृत्तिका असाही शब्द आहे हे आता आठवलं.
@अनघा, धन्यवाद!
@अनघा, धन्यवाद!
फक्त ही विसर्गसंधी नव्हे >>
फक्त ही विसर्गसंधी नव्हे >>
बरोबर. ही विसर्ग संधि नसून व्यंजन संधि आहे. माझी लिहिण्यात चूक झाली होती.
खात्री करून घेण्यासाठी
खात्री करून घेण्यासाठी धातुरूपमाला उघडून बघितली. भरत, तुमचं बरोबर आहे. मृच्छकटिकात मृद् आहे.
हं.
हं.
हपा
हपा

नागपूरच्या विमानतळावर ... नागपूरच्यामधात आपले स्वागत आहे पाहिजे.
मृच्छकटिक मध्ये मृद् असावं.
मृच्छकटिक मध्ये मृद् असावं. मृदा म्हणजे माती >>
हो. 'मृद् ' असंच आहे.
नागपूरच्यामधात
नागपूरच्यामधात
पुनर्स्वास्थ्यप्राप्ती >> इथे
पुनर्स्वास्थ्यप्राप्ती >> इथे र नको आहे. पुन:स्वास्थ्यप्राप्ती असा शब्द होईल. विसर्गापुढे स आला की त्याचा र होत नाही.
अमित
>>> नागपूरच्यामधात आपले
>>> नागपूरच्यामधात आपले स्वागत आहे पाहिजे


हो, आणि विमानतळाच्या नकाशावर पुण्यामुंबईत 'तुम्ही इथे उभे आहात' असेल तर नागपुरात बहुधा 'तुम्ही इथे उभारला आहात' असेल.
>>> पुनर्स्वास्थ्यप्राप्ती >> इथे र नको आहे. पुन:स्वास्थ्यप्राप्ती असा शब्द होईल.
हो, खरंच की! धन्यवाद.
विपू पोचली!
"तुम्ही इथे उभे राहून आहात"
"तुम्ही इथे उभे राहून आहात." चालेल. उभारला आहात हे वऱ्हाडी नाही.
हो का? मी परिचयातल्या नागपुरी
हो का? मी परिचयातल्या नागपुरी मेंब्रांकडूनच प्रथम ऐकलं होतं. कदाचित त्यांच्या बोलण्यावर दुसरा कुठला प्रभाव असेल.
Pages