Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56
हो,
तो परत येतोय...
एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.
एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.
एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.
आणि आता तो पुन्हा आलाय...
हजाराचे सव्वा हजार करायला...
पठाण आता जवान बनून आलाय
सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..
राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..
थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या
https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजनबी
अजनबी
माबो वर शा खा प्रेमाच अजिर्ण
माबो वर शा खा प्रेमाच अजिर्ण झाल आहे. सो र आ यांच्या मताशी सहमत. शा खा मला पण आवडतो. he is a gem, self made actor. पण त्याचे अलिकडचे बरेच सिनेमे बकवास आहेत पठाण पण. जवान अजुन बघितला नाही. बघितला की मग लिहितो. सिनेमा न बघता ह्या पेक्षा जास्त लिहिण्यात अर्थ नाही
शाहरूख न आवडणारे वेगळे
आचार्य,
शाहरूख न आवडणारे वेगळे
शाहरूखचा द्वेष करणारे वेगळे
दोन्हीत फरक आहे.
न आवडणारे आपली नावड व्यक्त करून मोकळे होतात.
द्वेष करणारे कुढत बसतात. त्याचा पिक्चर चालू नये म्हणून देव पाण्यात ठेवतात. पिक्चर न बघता त्यावर टीका करतात.. वगैरे वगैरे..
न आवडनाऱ्याच्या मतांचा आदर आहे.
द्वेष करणार्यांबदल सहानुभूती
आता तुमचे तुम्हीच ठरवा तुम्ही कुठे आहात.
मी तर प्रचंड प्रेमात आहे
पण त्याचे अलिकडचे बरेच सिनेमे
पण त्याचे अलिकडचे बरेच सिनेमे बकवास आहेत
>>>>
अगदीच.. मी तरी कुठे बघायचो..
पण जवान .. आई गग.. फुल राडा आहे.. मी पुन्हा जातोय बघायला.. वीकेंडला
आता तुमचे तुम्हीच ठरवा तुम्ही
आता तुमचे तुम्हीच ठरवा तुम्ही कुठे आहात >> त्याच्या बायकोने किंवा गर्लफ्रेंड हा प्रश्न विचारला असता तर समजू शकलो असतो. आता तुझं तू ठरव तू कोण ते.
करू मग माझं काम? कि तो मागचा भोकाड पसरलेला प्रतिसाद कॉपी पेस्ट करू?
माझ्या साठी शाहरुख खान हा स्वतःसाठी, कुटुंबासाठी पैसे कमावणारा माणूस आहे. तो प्रचंड श्रीमंत आहे. या बाबतीत माझी त्याच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. त्यामुळे या त्याचा द्वेष करण्याचा संबंध येत नाही. पण हे ही खरं कि मला माझं कुटुंब आहे. त्यासाठी पोटापाण्यासाठी काम करावं लागतं. या छोट्याशा वर्तुळात मीच हिरो आहे. रजनीकांत, अमिताभ बच्चन सब कुछ है.
या वर्तुळात शाहरूख खान माझ्या खिजगिणतीतही नाही.
जेव्हा मनोरंजन हवे असेल तेव्हा मी या मंडळींच्या दुकानात जातो.
पहिली पसंत अमिताभ बच्चन, धर्मेंद्र (बरे होऊ देत), विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, अमोल पालेकर, नासिर, कमल हसन, गोविंदा, नाना पाटेकर, सनी देओल हे आहेत.
त्यानंतर आमीर खान, अजय देवगण, आयुष्यमान खुराणा, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, इरफान खान, नवाजुददीन हे येतात.
स्वतःच्या नावावर सिनेमा चालवण्याची क्षमता असलेल्या श्रीदेवी, रेखा, ऐश्वर्या, मनिषा, विद्या बालन, नर्गीस, वहिदा सुद्धा आवडतात.
या लिस्ट मधे जे नाहीत त्यांचे काम चांगले असणारे आणि चांगले सिनेमे बघायला अडचण येत नाही.
याउप्पर आजूबाजूला दुःखद प्रसंग झाला असेल तर सिनेमा बघणे योग्य वाटत नाही. एखादा मेंदूला एड्स झालेला महामूर्ख इसम द्वेष करतो म्हणत असेल तर म्हणू देत. त्यांची संख्या एक ने वाढवावी असे मुळीच वाटत नाही.
माझ्या मुळे या धाग्यावर तीन प्रतिसाद कंपू सोडून आले.
इथे मी थांबतो. पुन्हा लगट नको ही विनंती.
नंतर उत्तर दिले कि भोकाड पसरू नये ही नम्र विनंती.
द्वेष करणारे
कुठेही चित्रपटाची अवास्तव जाहिरांत नाही पण किती सहजपणे पहिल्याच आठवड्यांत ५०० कोटी रु. चा टप्पा पार केला.
Submitted by उदय on 12 September, 2023 - 11:04
हे काम शाहरूख हेटर फुकटात करून देतात Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2023 - 12:56
...
हा उद्दय यांना दिलेला प्रतिसाद तुम्ही स्वतःवर का ओढवून घेत आहात हे अजून समजले नाही
मी यासाठी विचारले कि च्रप्स
मी यासाठी विचारले कि च्रप्स हा आयडी बोस्टन मधे राहतो असे कळाले होते. खरं खोटे काही असो, आपल्याला त्याने फरक पडत नाही. पोटापाण्यासाठी पुरेसे आहे. त्यातून करमणूक, दानधर्म जमेल तसे करता येते. मर्जीचे मालक आहे. जे सिनेमे आवडतात ते स्वतः जाऊन बघतो. फ्री मधे रिव्ह्यूज लिहीतो.
कुणी दलाल मागे लागले तर फीस घेतो.
नवीन Submitted by रघू आचार्य on 11 September, 2023 -
>>> पर्सनल अट्याक व्हायला सुरु झाले
हा उद्दय यांना दिलेला
हा उद्दय यांना दिलेला प्रतिसाद तुम्ही स्वतःवर का ओढवून घेत आहात हे अजून समजले ना >>>
आता तुमचे तुम्हीच ठरवा तुम्ही कुठे आहात >>
समर्थांनी काही लोकांची लक्षणे सांगितली आहेत. ती लागू पडतात का पहायला हरकत नाही.
पण जवान .. आई गग.. फुल राडा
पण जवान .. आई गग.. फुल राडा आहे.. मी पुन्हा जातोय बघायला.. वीकेंडला >>>>> ऋन्मेष, धागा काढ जवानवर.
माबो वर शा खा प्रेमाच अजिर्ण
माबो वर शा खा प्रेमाच अजिर्ण झाल आहे. सो र आ यांच्या मताशी सहमत. शा खा मला पण आवडतो. he is a gem, self made actor. पण त्याचे अलिकडचे बरेच सिनेमे बकवास आहेत पठाण पण. जवान अजुन बघितला नाही. बघितला की मग लिहितो. सिनेमा न बघता ह्या पेक्षा जास्त लिहिण्यात अर्थ नाही >>>>>>
संपूर्ण सहमती !
माझ्या मते तर थ्येट्रात जाऊन बघण्यासारखे शाहरुख चे मूव्ही नसतातच , शिवाय माझ्या कुटुंबातील एकाही यंग जनरेशनच्या प्रतिनिधीने शाहरुख चा मूव्ही थ्येट्रात बघितेला नाही .
उलट लांजेकर अष्टक मूव्ही ची क्वालिटी खास नसते तरी ते जातात .
मग प्रश्न पडतो की शाहरुख च्या मूव्ही ला गर्दी कोण करतंय ?
ऋन्मेष, धागा काढ जवानवर.
ऋन्मेष, धागा काढ जवानवर.
नवीन Submitted by सूलू_८२ on 12 September, 2023
काढला आहे परीक्षण धागा
माझ्या कुटुंबातील एकाही यंग
माझ्या कुटुंबातील एकाही यंग जनरेशनच्या प्रतिनिधीने शाहरुख चा मूव्ही थ्येट्रात बघितेला नाही .### अपेक्षित आहे. मूव्ही ना बघणे आणि शाहरुख चे मूव्ही न बघणे हे लहानपणापासून मेंदू धुतल्याने होत आहे. इथे एक पंडित होते, त्यांनी लहानपणापासून आपल्या मुलींना कटाक्षाने मुस्लिम मुले कित्ती वाईट वगैरे सांगून ठेवले होते.
<< पण जवान .. आई गग.. फुल
<< पण जवान .. आई गग.. फुल राडा आहे.. मी पुन्हा जातोय बघायला.. वीकेंडला
Submitted by ऋन्मेऽऽष on 12 September, 2023 - 05:02 >>
-------- शाहरुखचा जवान चित्रपट दुसर्यांदा बघण्यासाठी एव्हढा वेळ थांबणे म्हणजे मोठीच शिक्षा आहे. एक दिवस म्हणजे एक वर्ष वाटत असेल.
चित्रपट सृष्टी ठेपाळली असतांना अगदी सहजपणे आठवड्या भरांत सहाशे कोटींचा व्यावसाय करणे हे मोठे रेकॉर्ड आहे. लाखो लोकांना या व्यावसायातून रोजगार मिळतो हे सर्वात महत्वाचे आहे.
https://www.businesstoday.in/trending/box-office/story/jawan-box-office-...
Press Trust of India
Press Trust of India
@PTI_News
BJP cites Bollywood star Shah Rukh Khan's new movie "Jawan" to hit out at Congress, claims the film exposes 10 years of "corrupt and policy paralysis ridden" rule of Congress-led UPA
आता भाजपवाले जवानचे शोज लावणार का?
धर्म आणि राजकारण यावरून
धर्म आणि राजकारण यावरून शाहरूख वर टीका करणारे बिथरले आहेत.
कारण,
पिक्चर चालतोय आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे खूप मस्त आहे म्हणून चालतोय.. लोकं अक्षरशः शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत आहेत शाहरूखच्या प्रत्येक एन्ट्रीला..
जर मी शाहरूख हेटर असतो तर हे बघून माझ्याही घशाखाली अन्नपाणी उतरले नसते..
शाहरुखचा जवान चित्रपट दुसर्
शाहरुखचा जवान चित्रपट दुसर्यांदा बघण्यासाठी एव्हढा वेळ थांबणे म्हणजे मोठीच शिक्षा आहे. एक दिवस म्हणजे एक वर्ष वाटत असेल. Happy
>>>>
अश्यावेळी मायबोली आधार देते. इथे लिहावे, शाहरूखचे गुणगान गावेत, आणि हा प्रतीक्षेचा वेळ मजेत जाईल हे बघावे..
एका आठवड्यात ६५० करोड रुपये
एका आठवड्यात ६५० करोड रुपये जगभरात...
गणपती विसर्जन होईस्तोवर शाहरूख माझा शब्द राखणार.. सव्वा हजार कोटी कमावणार
सव्वा हजार कोटी कमावणार
सव्वा हजार कोटी कमावणार
अरे वा त्यातले तुम्हाला किती मिळणार?
शाहरूख माझा शब्द राखणार..
शाहरूख माझा शब्द राखणार.. सव्वा हजार कोटी कमावणार >> सर तब्येतीला जपा.
अरे वा त्यातले तुम्हाला किती
अरे वा त्यातले तुम्हाला किती मिळणार?
>>>>
मला पैसे का मिळतील..
मीच उलट त्यात सहाशे मोजले आहेत.
मला अफाट आनंद मात्र मिळाला...
आणि इथे तो दर पोस्टगणीक वाढत जातोय
हे म्हणजे असे झाले की लगीन
हे म्हणजे असे झाले की लगीन लोकाचे नाचत य
येड्या .....….. च
(No subject)
(No subject)
अश्लील असभ्य शब्द वापरले की
अश्लील असभ्य शब्द वापरले की विनोदाचा दर्जा घसरतो असे मला वाटते.
पण दुर्दैवाने लोकांना तेव्हाच हसू जास्त येते
असो, शाहरूखच्या धाग्यावर तरी अशी भाषा नको
त्याचे पिक्चर फॅमिली ऑडियन साठी असतात
धागा देखील तसाच राहू दे
(No subject)
https://youtu.be/2ItPVoSB_ik
https://youtu.be/2ItPVoSB_ik?si=Y5zYQX4JwGaMCPop
जवान २.०
जवान २.०
मला दुसरी वेळ हा पिक्चर बघता आला नाही.
पण मुलगी मात्र तिच्या फ्रेंडससोबत पुन्हा जाऊन आली.
आणि धमाल म्हणजे अगदी खुर्चीवर उभी राहून नाचून वगैरे आली.
श्या मी मिस केला हा माहौल .. पण तरी खुश आहे
बायकोला मात्र आवडला नाही फार.. ती लॉजिक वगैरे शोधत बसली.. काही गोष्टी तिला अचाट वगैरे वाटल्या.. तुम्हाला का इतका आवडला म्हणून मला आणि मुलीला शिव्या घालू लागली..
पण त्यातही बाप झालेला विक्रम राठोड शाहरूख तिला सुद्धा भारी वाटला
आता डंकी चा धागा काढा.. जवान
आता डंकी चा धागा काढा.. जवान चा रेकॉर्ड तोच ब्रेक करू शकतो...
डंकीचा नवा धागा काढून लोकांना
डंकीचा नवा धागा काढून लोकांना त्राही भगवान केले तरीही डंकी चालणारच. दक्षिणेच्या भाषेत डब केलेला असेल आणि दाक्षिणात्य कलाकार घेतले असतील तर रेकॉर्ड सुद्धा करेल. निव्वळ हिंदी भाषेत सुद्धा तुफान चालेल. मायबोलीवर मोहिमा राबवून शाहरूख खानचे चित्रपट फ्लॉप होणार नाहीत.
रविवारी मी घरच्यांची तिकीटे काढली. नेहमी बुकमायशो वरून तिकीटे काढतो. नेहमी जवळचे थिएटर सर्वात वरती असते. या वेळी मी लोकेशन ऑफ केलेले लक्षात नव्हते. थेटरवर सोडले आणि त्याने सांगितले ही इथली नाहीत तर २५ किमी वरची तिकीटे आहेत. इतक्या कमी वेळात पोहोचणे , पुन्हा आणायला जाणे शक्य नसल्याने ती सोडून देऊन तिथेच नवीन तिकीटे घेतली. अशा रितीने जवान हिट केला.
आता डंकी चा धागा काढा.. जवान
आता डंकी चा धागा काढा.. जवान चा रेकॉर्ड तोच ब्रेक करू शकतो...
>>>>
जरूर !
शाहरूखचा पिक्चर चालायला माझा खारीचा हातभार लागला तरी मला ते आवडते.. जवानाचा फायनल स्कोअर सेटल होऊ दे आधी. मग शाहरूखशी बोलून घेतो
Pages