(निशिकांत यांच्या 'भार झाले' गझलेवरून ही सुचली. त्यांची मूळ गझल छानच आहे. ह्यातला काफिया की रदीफ की काय म्हणतात तो सोडला, तर बाकी तसा ह्या गझलेचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा गझल लिहिण्याचा काहीच अनुभव नाही, त्यामुळे ह्याला गझल म्हणत नसतील तर कृपया दुसर्या ठिकाणी हा धागा हलवावा ही विनंती.)
जन्म माझे फार झाले
अन् भुईवर भार झाले
जन्मत: होते खटारा
आज मी मोटार झाले
छान होता जाड पत्रा
तेच माझे दार झाले
वितळुनी लोखंड-तुकडे
लांबवीता 'तार' झाले
चाक रबरी फाटलेले
'काडिचा आधार' झाले
तापले बॉनेट माझे
पावसाने गार झाले
गंजुनी पाण्यात धातू
दो दिसांनी क्षार झाले
का 'रथा' पुल्लिंग जोडी?
कार परि मी 'नार' झाले?
मी दिला धक्का जयांना
तेच मजवर स्वार झाले
तोडिता बिन्धास्त सिग्नल
पोलिसी व्यापार झाले
आरसे जे तीन होते
ते फुटोनी चार झाले
चकचकी राखावयाचे
स्वप्न माझे ठार झाले
चुंबुनी आकाश घेण्या
लोक अंती घार झाले
कार झाले, क्षार झाले, गार झाले, घार झाले
नार झाले, ठार झाले, हेच माझे सार झाले
मस्त !मी दिला धक्का जयांना
मस्त !
मी दिला धक्का जयांना
तेच मजवर स्वार झाले >>> आवडले...
खुसखुषीत
खुसखुषीत
धन्यवाद
धन्यवाद
तुला मीटर आणि म्याटरची जाण
तुला मीटर आणि म्याटरची जाण आहे ऑलरेडी - आता खर्याखुर्या गझलदेखील लिही.
>>>>तुला मीटर आणि म्याटरची
>>>>तुला मीटर आणि म्याटरची जाण आहे ऑलरेडी - आता खर्याखुर्या गझलदेखील लिही.>>>+१
छान आहे!
छान आहे!
भारी जमलीय
भारी जमलीय
फार धमाल जमली आहे.
फार धमाल जमली आहे.
भारी आहे!
भारी आहे!
Lol
Lol
'काडिचा आधार' कळले नाही.
'काडिचा आधार' कळले नाही. विशेषतः हपांनी काडी हा शब्द र्हस्व लिहावा?
सामो,
सामो,
पंक्चर झाले की टायरमधे तिथे छोटी काडी खुपसून ठेवतात, ते वाटलं मला. र्हस्व लिहिण्याचं कारण म्हणजे मीटर मध्ये बसवण्यासाठी काही तरी मात्रांचा हिशोब असावा.
आता हर्पा सांगतील हे बरोबर आहे की नाही.
शक्य आहे अस्मिता.
शक्य आहे अस्मिता.
बुडत्याला काडीचा आधार असतो
बुडत्याला काडीचा आधार असतो तसं ह्या मोडकळीला आलेल्या मोटारीला फाटक्या रबरी चाकाचा आधार आहे.
बाकी,
र्हस्व लिहिण्याचं कारण म्हणजे मीटर मध्ये बसवण्यासाठी >> सही जवाब
विशेषतः हपांनी काडी हा शब्द र्हस्व लिहावा? >> या पातकाबद्दल क्षमा करा, सामो. अश्या बर्याच चुका मी करत असतो. _/\_
मला वाटलं एक पंक्चर आहे, इथे
मला वाटलं एक पंक्चर आहे, इथे तर टायरच फाटकं निघालं. फार आर्त गझल आहे ही.
फार आर्त गझल आहे ही >>
फार आर्त गझल आहे ही >>
गावातल्या म्हशीच्या धक्क्यातून सावरणार्या एष्टीला जवळून बघणार्या माणसाला मोटारीच्या आर्त भावना कळणं फारसं अवघड गेलं नाही.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद लोकहो!
तुला मीटर आणि म्याटरची जाण आहे ऑलरेडी >> इथेही मी यडपटपणे 'धन्यवाद' म्हणणार होतो, पण पुढचं "आता खर्याखुर्या गझलदेखील लिही." वाचल्यावर लक्षात आलं की ती आधीची शालजोडी होती.
(No subject)
ज्या गाडीचे बाद होण्याचे वय (
ज्या गाडीचे बाद होण्याचे वय ( मरण्याचे वय १५) जवळ आले आहे तिचा आर्तनाद किंवा टाहो कसा असेल? अशा गाड्यांमधल्या एकीला हरीपाटर सिनेमात शेवटचे दाखवायचे भाग्य लाभेल. बाकीच्यांना शेवटची इच्छा तरी मिळेल का हातोड्याखाली जाण्याअगोदर?
पंधरा भागांची मालिका पंधरा ओळीत मांडलीय. भारी. यातून नवे धागे काढणारे बोध घेतीलच.
अशा कविता आमच्या शालेय जीवनात का नाही मिळाल्या? "भंगारात जाणाऱ्या गाडीचे आत्मवृत्त" लिहून पंधरा पैकी बारा गुण (हस्ताक्षराचे तीन गुण कापून) नक्की मिळाले असते ना.
Srd, जबरी प्रतिसाद! तुमचं
Srd, जबरी प्रतिसाद! तुमचं निरीक्षण अचूक आहे.
१५-१५चं गणित वाचून मला सुफला १५-१५-१५ खताच्या रेडिओ जाहिरातीची आठवण झाली.
फक्कड जमीये गझली वृतातली
फक्कड जमीये गझली वृतातली कविता !
हजलच आहे ही.
मस्तच जमली आहे हर्पा
मस्तच जमली आहे हर्पा
भारी
भारी
>>> आधीची शालजोडी होती
>>> आधीची शालजोडी होती

नाही नाही
एक आपली मित्रत्व/वडीलकीच्या नात्याने दिलेली कानपिचकी फारतर.
र आ, ममो, A M I T >> आभारी
र आ, ममो, A M I T >> आभारी आहे.
स्वा_आं >>
गझल डिटेल्स काही कळत नाहीत पण
गझल डिटेल्स काही कळत नाहीत पण हे आत्मवृत्त मस्त झाले आहे..
धन्यवाद mrunali. मी प्रतिसाद
धन्यवाद mrunali. मी प्रतिसाद द्यायला अंमळ उशीरच केला.
मस्तच जमली आहे
मस्तच जमली आहे
धन्यवाद तोमीन
धन्यवाद तोमीन
मस्तच.
मस्तच.