एका मोटारीचे गझली आत्मवृत्त
Submitted by हरचंद पालव on 30 August, 2023 - 04:58
(निशिकांत यांच्या 'भार झाले' गझलेवरून ही सुचली. त्यांची मूळ गझल छानच आहे. ह्यातला काफिया की रदीफ की काय म्हणतात तो सोडला, तर बाकी तसा ह्या गझलेचा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा गझल लिहिण्याचा काहीच अनुभव नाही, त्यामुळे ह्याला गझल म्हणत नसतील तर कृपया दुसर्या ठिकाणी हा धागा हलवावा ही विनंती.)
जन्म माझे फार झाले
अन् भुईवर भार झाले
जन्मत: होते खटारा
आज मी मोटार झाले
छान होता जाड पत्रा
तेच माझे दार झाले
वितळुनी लोखंड-तुकडे
लांबवीता 'तार' झाले
शब्दखुणा: