Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आजकाल काय काय चित्रपट बनतात
आजकाल काय काय चित्रपट बनतात काही दर्जाच राहिला नाही असा एक धागा काढला ना इथे. हल्ली चित्रपटात राम उरला नाही म्हणुन विचीत्रपट काढले त्यांनी:
आदीपुरूष, मिडीयम स्पायसी.
लोक त्यालाही नावं ठेवत आहेत.
शेवटी एकदाचा पूर्ण बघितला....
स्वतंत्र धागा काढतेय.
बंदिवान मी ह्या संसारी
https://www.maayboli.com/node/83929
कहर धमाल लिहीले आहे. पण इतके
दोनतासकुठंहोताकाकू >>> टोटली हाच प्रश्न पडला. इतकी पिव्होटल भूमिका असणार्या शेजारच्या काकूंचे काम कोणी केले आहे (ही क ची बाराखडी चुकून झाली आहे)?
नकली टकलाचे वाळवण, लेव्हल मेकप, पाटील टाइप माणूस, वाईट नजरेचे वर्णन, सत्ताविसावे रडके गाणे वगैरे सगळे सुपरलोल आहे
बाकी काकूंना निर्णायक क्षणी देतात ती माहिती कशी काय मिळाली? शांततापूर्ण कामांकरता देश अणुतंत्रज्ञान विकसित करतात तशा या काकू बहुधा चांगल्या उद्देशाने प्रायव्हसीचे उल्लघंन करत असाव्यात. काकूंना एक लाइकतरी बनतोच.
वरती उल्लेख असलेले अनेक मराठी
वरती उल्लेख असलेले अनेक मराठी पिक्चर्स शाळेत वगैरे असताना दूरदर्शन कृपेने अगदी लोकांकडे जाऊन बघितले आहेत.
फा , प्लीज इकडून तिकडे कर नं
फा , प्लीज इकडून तिकडे कर नं पोस्ट.
सावकाश चर्चा करू.
का पाहिलास पण?!
का पाहिलास पण?!
>>> काकूंना एक लाइकतरी बनतोच.

का पाहिलास पण?! >>> आम्ही
का पाहिलास पण?! >>> आम्ही नाही जा.....
स्वतंत्र धागा काढतेय. >>> हे
स्वतंत्र धागा काढतेय. >>> हे मस्त. हो पोस्ट करतो तेथे.
सुभेदार सुभेदार पाहिला. आहे
सुभेदार सुभेदार पाहिला. आहे भव्यदिव्य तरीही...
https://www.maayboli.com/node/83941
धाकली सून व थोरली जाऊ' ची वॉच
धाकली सून व थोरली जाऊ' ची वॉच पार्टी करूया >>> अरे नक्की! बोल कधी करायची?
ठरवा ठरवा लौकर
ठरवा ठरवा लौकर
"गुलाबजाम" थोडा पाहिला काल (स्लिंग वर). माबोवर कोणी लिहीले आहे का? वाचल्याचे आठवते. सुमारे अर्धा-पाऊण तास पाहिला आहे. मिश्र प्रतिक्रिया आहे. सिद्धार्थ चांदेकर चे काम चांगले आहे. पण तो ते सस्पेण्डर्स घालून का फिरतो कोणास ठाउक. मूळ कल्पना चांगली वाटते. पुण्यातील पेठांमधली ममव चव शिकणे वगैरे. पेठांमधले खत्रूट लोक हे जरा अजून दाखवायला हवे होते.
त्याला एका मित्राच्या डब्यात गुलाबजाम दिसतो आणि तो खाउन अगदी बालपणीच्या आठवणी त्या "रॅटाटुई" मधल्या समीक्षकाला येतात तशा येतात वगैरे ठीक आहे. पण तो गुलाबजाम खव्याचा वाटत नाही. चितळे/गिट्स ई चा वाटतो. तसेच नंतर सोकु च्या घरातील स्वयंपाक हा ४-५ जणांच्या कुटुंबाकरता केलेला वाटतो. एखादी बर्याच लोकांकरता पहाटे उठून डबा करणारी असेल तर रॉ फूड यापेक्षा बरेच जास्त हवे. त्या पोळ्याही पुर्यांच्या आकाराच्या वाटल्या. अगदी पुण्यातही इतक्या लहान पोळ्या कोणी करत नाही.
पुढे बघायचा आहे. पण अगदी खिळवून ठेवले नाही. स्ट्रीमिंग मधे इतके पर्याय आहेत की पेशन्स कमी पडतो.
गुलाबजाम वर खूप काथ्याकूट
गुलाबजाम वर खूप काथ्याकूट झाला होता इथे
कल्पना म्हणून ओके आहे तो.
मला चांगला वाटलेला गुलाबजाम.
मला चांगला वाटलेला गुलाबजाम.
पण जरा ओवरहाईपसुद्धा आहे. इतका ग्रेट सुद्धा नव्हता.
ऋन्मेष +१
ऋन्मेष +१
एकदा बघायला चांगला आहे. कल्पना चांगली आहे. अभिनय चांगला आहे. पदार्थ बघायला छान वाटतात. फारएण्डनी म्हटलंय ते बरोबर आहे.. डबे पुरवण्याच्या मानाने स्वैपाक कमी वाटतो.
नारबाची वाडी बघितला प्राईमवर.
नारबाची वाडी बघितला प्राईमवर.. खुसखुशीत.. आवडला..
रौंदळ अर्धा बघितलाय..पुढचा पण बघेन.. बरा वाटतोय..
वाळवी बरा वाटलेला.
वाळवी बरा वाटलेला.
अनिता दाते शोभत होती त्या रोलमध्ये.
पैठणी का काय असा सिनेमा पाहिला- ती नाकातल्या आवाजाची सायली संजीव बरी वाटली.
८०-९० चे सिनेमे कायच्याकाय असत. त्यात तो अलका कुबल वगैरेंचा भरणा होता.
निवडुंग : हा गाण्याकरता आवडलेला. कथा सुद्धा बरी होती.
आशा काळे म्हणजे निराशा असा आम्ही पुर्वी डायलॉग मारायचो. तिचा एक "हा खेळ सावल्यांचा" चित्रपट पाहून घाबरलेले ( भितीने नाही). त्यात तो काशिनाथ घाणेकर आणि तिचा नाच, गोमू संगतीने ..
काशिनाथ घाणेकर तर अगदी पिक्कड दिसतो.
अगदी घेवूनच आलेला सेटवर आणि शूटीम्ग केलय असे वाटते.
पण महेंद्रा कपूरचे गाणे खुप मस्त आहे; मराठी उच्चार पण उत्तम आहेत. वाटत सुद्धा नाही हा पंजाबी गायक आहे.
त्यातल्या त्यात मग जयश्री गडकर बरी असा प्रकार होता.
गुलाबजाम थेट्रात बघितला तर
गुलाबजाम थेट्रात बघितला तर जास्त चांगला वाटतो.
गुलाबजाम कार्ल्याला जाऊन
गुलाबजाम कार्ल्याला जाऊन पाहिला तर साखर वाढत नाही.
गुलाबजाम छान आहे. फूड
गुलाबजाम छान आहे. फूड फोटोग्राफी सुरेख. दोन सीन्स मध्ये येणारे still फ्रेम्स पण सुरेख.
गुलाबजाम पहिल्यांदा पाहिला
गुलाबजाम पहिल्यांदा पाहिला तेव्हा आवडला नव्हता पण दुसर्यांदा बघितला तेव्हा चांगला वाटला. अर्थात परत परत बघावा असा ही नाही.
एवढं काही आवडला नव्हता
एवढं काही आवडला नव्हता गुलाबजाम मला.
आता नक्की आठवत नाही पण त्यात ही काहीतरी रहस्य वैगेरे आहे अस वाटतय जे एवढं खिळवून ठेवणारं वाटल नव्हत.
गुलाबजाम ताटातच बरा ..
गुलाबजाम ताटातच बरा ..
कॅनव्हास नावाचा मराठी चित्रपट
कॅनव्हास नावाचा मराठी चित्रपट पाहिला. इथे चर्चा झालेली असेल तर क्षमा असावी.
सिरीयल किलरचा विषय आहे. किलर कोण हे समजेपर्यंत उत्कंठावर्धक आहे. संथ हाताळणी आहे. एकदा रहस्योद्घाटन झाल्यावर मग जी लांबण लावलेली आहे ती असह्य आहे. पार्श्वसंगीत म्हणून कुणीतरी एकजण एकतारी घेऊन बसवला आहे. तो सतत टुंग टुंग करत राहतो. पैसे वाचवता येतील तिथे वाचवले आहेत. समीर धर्माधिकारी देखणा आहे. हिरो मटेरियल आहे. अभिनयात सो सो आहे.
२२ जून नावाचा मराठी चित्रपट
२२ जून नावाचा मराठी चित्रपट युट्यूबवर सापडला. ( ओटीटी वर असेल, पण सध्या तिकडे शोधाशोध करत नाही).
प्रसाद ओक रात्री बेरात्री गावाच्या बाहेर जंगलात गाडीची वाट बघत असतो. पाऊस पडत असतो. त्याच्यासाठी कुणीच थांबत नसते. एक बैलगाडीवाला शंभर रूपये घेऊन त्याला रेल्वे स्टेशनला सोडायला तयार होतो. पण चार फर्लांग अलिकडे सोडेन या अटीवर.
कारण रात्री या भागात कुणी जात येत नसते. कुणी थांबवले तर थांबत नसते. कारण मालतीचे भूत आहे यावर त्यांचा विश्वास असतो.
अर्ध्या रस्त्यातच बैल पुढे जायचे नाकारतात. गाडीवान त्याला रस्त्यात उतरवून निघून जातो.
तिथे त्याला मुक्ता बर्वे भेटते. ती रेल्वे स्टेशनपर्यंत सोडते. प्रसाद ओक तिला रात्री बेरात्री भीती वाटत नाही का असे विचारतो.
ती सांगते कि रेल्वे स्टेशनच्या पलिकडच्या वस्तीतून ती गावात कामाला येते. त्यामुळे रोज असा उशीर होतो. ती दुरून रेल्वे स्टेशन दाखवते. तो तिकडे बघतो आणि पुन्हा फिरून तिच्याकडे पाहतो तर..
तिथे कुण्णी सुद्धा नसते.
पार्श्वसंगीत म्हणून कुणीतरी
पार्श्वसंगीत म्हणून कुणीतरी एकजण एकतारी घेऊन बसवला आहे. तो सतत टुंग टुंग करत राहतो
>> rofl
२२ जून काल संपवला. इथे
२२ जून काल संपवला. इथे सुरूवात लिहील्याने बघू नका हे सांगणे गरजेचे आहे.
मुक्ता बर्वे भूत बनून गाणे म्हणत फिरते त्या वेळी तिचा गेट अप ती फुलराणी मधल्या भक्ती बर्वेसारखा का केलाय समजत नाही. तिचे आडनाव देशपांडे असते, पण ती दोन पांढर्या रिबिनी लावून दोन वेण्यांची गुंडाळी करून फिरत असते. गाव कुठलं ते कळलं नाही. पण तिच्या सारखी केशरचना इतर कुणाचीच नसते.
सिनेमाचं टायटल बघून यात रँड पुण्यतिथीचा काही तरी कार्यक्रम असेल.
रँडेच्या मयतीला नाचू गाऊ
रंगात रंग मिसळून देऊ
ओ ओले शिकवे या शिकू दोस्तांनो
शत्रुही गळे पकडून जातो
असे गाणे असेल, त्यावर गाव नाचत असेल ही कल्पना फोल ठरली.
भूत आहे कि नाही हा सस्पेन्स ठेवलाय. कुठल्यातरी मराठी मालिकाच्या दिग्दर्शकाने ड्यायरेक्शन दिलेलं असणार. यांची बफर साईज बावीस मिनिटांची असते. म्हणजे बावीस मिनिटांची कथा ते लिहू शकतात. बावीसाव्या मिनिटाला धक्का द्यायचा, मग मालिका संपवायला सांगितली कि बघू कसा गुंता सोडवायचा हा खाक्या असतो. ते सगळे प्रेक्षकांच्या विस्मरणशक्तीवर विसंबून असतात.
इथे दिग्दर्शकाला आम्ही बुरसटलेले सिनेमे काढत नाही हे पण दाखवायचेय, त्याच वेळेला एण्ड पण लॉजिकल करायचाय. भले ते फिल्मी लॉजिक का असेना...
शिवाय मायबोली वाचत असल्याने " पिसं काढता होय ? पिसं ? बघा आता असा एण्ड करतो कि पिसं काढायचीच विसरून जाल" या थाटात कधीच कुणी विचार केलेला नाही असा शास्त्रीय सिद्धांत दाखवून सिनेमा एण्ड होतो.
अविनाश नारकरांना कुणी तरी सिद्धपुरूषाने तू आवाजाचा बेस बास मधे लावलास तर यशस्वी होशील असा मंत्र दिल्यापासून ते कायम त्याच सुरात रेकत असतात. इथेही त्यांनी अपेक्षाभंग केलेला नाही.
चार तास झाले !
चार तास झाले !
मुक्ता बर्वे पेहरावातून खेडवळ दाखवलीय, पण गाणी अगदी क्लासिकल ताना मारून म्हणत असते. लता आणि आशाचा आवाज ऐकून चाट पडलो. गायकीबद्दल वादच नाही. पण पहिल्यांदाच वृद्ध स्त्रियांचा आवाज आहे असे कानाला वाटले. पैसे वाचवताना व्हॉईस ब्युटीफिकेशन केलेले दिसत नाही. सिनेमा नेमका कधीचा आहे सांगता येत नाही. पण किमान दहा वर्षांपूर्वीचा असावा.
रघु आचार्य
रघु आचार्य
तिचे आडनाव देशपांडे असते, पण
तिचे आडनाव देशपांडे असते, पण ती दोन पांढर्या रिबिनी लावून दोन वेण्यांची गुंडाळी करून फिरत असते.
>>> नाही समजले नक्की काय विरोधाभास आहे यात...
नाही समजले >> नो प्रॉब्लेम !
नाही समजले >> नो प्रॉब्लेम !
Pages