मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

'कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला' हे गाणं खूप आवडत. लताने हे गाणं लिहून घेतले होते असे वाचले. त्यातले काही शब्द मी चुकीचे गायचे. पण मला स्वतःला ते शब्द पटायचे. आता आता मला खरे शब्द कळले .

तुम्ही गेला आणिक तुमचे देवपण ल्याले (तुमच्या देवपण नावा आले)
सप्तस्वर्ग चालत येता थोरपण तुमचे कळले
संगीताचे (गंगेकाठी) घर हे अपुले तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला

रूणुझुणु रूणुझुणू रेघ मारा

दुसरी पासुन आम्हाला असणाऱ्या मराठीच्या बाई शिकवताना कठीण शब्दांखाली तो शब्द आला की परत एकदा उच्चारुन "रेघ मारा" असे म्हणत.
मग रुणूझुणू रुणूझुणू गाणे ऐकले त्यातले "रे भ्रमरा" मला "रेघ मारा" असे ऐकू आले. गाण्यात सगळे कठीण शब्द आहेत तेव्हा त्या बाई वर्गात शिकवत आहेत आणि त्या शब्दांखाली रेघ मारायला सांगत आहेत असे दृश्य मनात येई आणि त्यावरच हे गाणे असावे असे मला वाटले होते.

रेघ मारा Lol

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती ह्या दत्तगुरूंच्या आरतीत 'पराही परतली' असं आहे एका कडव्यात ते मी अजूनही 'पराही परतला' असं म्हणते. मी म्हणते ते बरोबर नाही पण लहानपणापासून तोंडात बसलंय.

याचा म्हणजे 'पराही परतली' चा अर्थ काय ते दुसऱ्या कुमार सरांच्या धाग्यावर विचारायला हवं. कोणाला माहिती असेल तर इथे लिहिलात तरी चालेल.

परा -वाचेच्या चार अवस्थांपैकीं पहिली. परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा.

"गाण्यातल्या ओळींचा अर्थ" असा धागा आहे का? कोणास माहीत असेल तर लिंक द्या. "तुम इतना जो मुस्कुरा रही हो" गझलेत "रेखाओंसे मात खा रही हो" अशी काहीतरी एक ओळ आहे. म्हणजे काय? (मला अर्थ लागत नसल्याने मौत खा रही हो, माती खा रही हो असे काय वाटेल ते ऐकू येतंय तिथे)

त्या हस्तरेषांच्या भविष्यावरच तू पराभव मान्य करणारेस!!? खरा निकाल जीवनात आहे इ. इ.
आधीचा कॉंन्टेक्स मध्ये कडू अश्रू गिळुन तू पण कडवट होशील, भरत आलेल्या जखमांना (आपले भरत नाही हो! Proud हा जोक मस्ट आहे :फिदी:) तू परत कशाला कुरवाळतो आहेस, की त्या ब्लीड करू लागतील! असाच पॉझिट्यु आहे.

ओह! क्या बात!
धन्यवाद भरत, आंबट गोड, अमितव

तेरा सरापा, ऐसा है हमदम

सरापा (उर्दू) म्हणजे संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत (human figure from head to foot)

हा शब्द सलापा असा ऐकत होतो. त्याचा अर्थ जवळीक किंवा सलोखा वगैरे असेल असे वाटायचे.

बाप रे! function at() {
[native code]
}उल तुम्हाला, चुकीच्या ऐकू आलेल्या ऊर्दू शब्दांचेही अर्थ माहीत असतात!!

मला ते 'सराफा' वाटलं. म्हणजे तुझ्या सोन्याच्या/मोत्यांच्या दागिन्यांची कलाकृती असं काहीतरी. पुढे जैसे चमके शबनम पण आहे ना.

ते सराफा असंच आहे. बहुतेक प्रेयसी इतकी देखणी की जणु चमचमता जव्हेरीबाजार असं काहीसं असावं.

होश उड़ा देता है मेरा
नूर-ए-मुजस्सिम ऐसा तेरा

तेरा सराफा ऐसा है हमदम
तेरा सराफा ऐसा है हमदम
जैसे चमके धूप में शबनम
जबसे हम हैं तुमसे मिले
कसम हम रहे नहीं हम
ओ किया किया क्या किया
क्या किया रे सनम
ओ किया किया क्या किया
क्या किया रे सनम

चेहरे पे तेरे है रौशन सवेरा
ज़ुल्फ़ों में तेरी है दिलकश अंधेरा
जानेजाँ लो मेरी जान
मैं तुझपे जान दे दूँ
दिल क्या चीज़ है
दिल के सारे अरमान वान दे दूँ
चेहरे पे तेरे है रौशन सवेरा
ज़ुल्फ़ों में तेरी है दिलकश अंधेरा
मेरी नज़र में तू ऐसा है जानू
रब जाने मेरा सच्ची और मैं ही जानूँ
क्या कह दिया है तुमने ये जानम
क्या कह दिया है तुमने ये जानम
ओ जबसे हम हैं तुमसे मिले...

यू आर माय लव, यू आर माय लाइफ
आई कान्ट गो लॉन्ग विदआउट यू बाय माय साइड
टू यू आई बिलोंग

तेरी अदाएँ हमने बेखुद बनाएँ
जादू चलाएँ कोई जादू चलाएँ
दिल की बात मेरे दिल की बात
जो तुमने जान ली है
तुमको क्या खबर तुमने जाँ मेरी
मेरी जान ली है
तेरी अदाएँ हमने बेखुद बनाएँ
जादू चलाएँ कोई जादू चलाएँ
मेरी खयालों में दिन रात हो तुम
मेरी वफ़ा हो मेरा साथ हो तुम
क्या कह दिया है...

आजा पिया तोहे प्यार दूँ
मोरे भैया तोहे मार दूँ

म्हणजे भैयाने पियाला रडवलेय म्हणुन त्याची समजूत काढायला म्हणतेय असे वाटले होते तेव्हा.

हे गाणं असं ऐकू आलेलं नाही, पण ते कानात वाजत राहतं ते चुकीचं.

साथिया तूने ये क्या किया
,
दो रंग मिलने के बाद
होते नही है जुलाब

आप जैसा कोई या गाण्यासाठी चापट खाल्लीय आईची.

मेरे जिंदगी मे आये नंतर
तो बाप बन जाये
म्हणून आम्ही गल्लीत किंचाळत होतो. आजूबाजूच्या बाया, मोठी पोरं खुसखुसत होते.
घरी बातमी गेल्यावर चापटपोळीचा प्रसाद मिळाला.
यात काही तरी भयानक अर्थ दडलेला असेल हे समजलं.

हे गाणं सगळेच बाप बन जाये म्हणायचे असं दिसतंय Happy
मुळात मराठी मिडीयम असल्याने आणि हिंदी 5वी नंतर चालू होत असल्याने 'बात बन जाये' असा एक वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ या दोन्हीही संबंध नव्हता

Pages