अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय हे?
काल पासुन मी ती जुनी लिंक उघडून पहात होतो केव्हा येईल तिथे अ आणि अ किस्से.

https://fb.watch/mfkLDsTHFb/
ही कोणती सिरियल आहे?...मागे पतंगचा सीन पण यातलाच होता बहुतेक >> अवघड आहे :- D
उवांना पण नाही सोडलं.. नागफणी लिहीलेलं दिसतंय, at end of the scene

फारएण्डचा तिरंगा परिक्षण वाचुन उचापतीची या पोस्टची आठ्वण आली.

तुमच्यापैकी नविन सभासदांचे जर जुन्या मायबोलिवरचे या बीबी वरचे अफलातुन किस्से मिस झाले असतील तर.. त्यांच्यासाठी.. उचापती या आय डी ची माफी मागुन.. त्याने तिथे टाकलेले एक पोस्ट जसेच्या तसे इथे टाकतो.. आजही वाचताना हहपुवा!

“या बा.फ. वर अजुन पर्यंत “जानी” राजकुमारच्या सिनेमा बद्दल कसे लिहिले गेले नाही?

अचरटपणात “जानी” राजकुमारचे पिक्चर्स कशालाही हार जाणार नाहीत. त्याचा “तिरंगा” हा सिनेमा देखील असाच अचरटपणाने भरलेला होता. बरेच दिवसांपुर्वी पाहीला असल्याने फार तपशील आठवत नाहीत. ज़े आठवतात ते असे. सिनेमात प्रलयनाथ गुंडास्वामी (कि गेंडास्वामी) नावाचा खलनायक भारतात बॉम्बस्फोट, दंगली, अतिरेकी कारवाया वगैरे घडवुन अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामधे त्याला एका मंत्री सामील असतो. तो देशातिल तिन महत्वाची शहरे मिसाईलने उडवण्याचा प्लान करतो. त्या मिसाईल्स करता त्याला “फ्युज कंडक्टर” (?) नावाचा छोटासा पण महत्वाचा पार्ट लागणार असतो. त्या साठी तो भारतातिल नामवंत साईंटिस्टसना पळवतो व मारण्याची धमकी देउन “फ्युज कंडक्टर” मिळवतो. “जानी” राजकुमार ब्रिगेडीयर दाखवला असुन तो नाना पाटेकरच्या मदतिने खलनायकाला संपवतो व देशाला वाचवतो.
सिन क्र. 1 – गावा बाहेरील रानात प्रलयनाथचे गुंड हॅंड ग्रेनेड्स, बंदुका वगैरे कुठेतरी पाठवत असतात. एका ट्रेनी गुंडाला हॅंड ग्रेनेड बद्दल मुलभूत शंका निर्माण होते. त्याच्या शंका निरसनार्थ त्याचा सिनीयर गुंड त्याचे थोड्क्यात बौद्धीक घेतो व प्रात्यक्षिक म्हणुन एक हॅंड ग्रेनेड पिन काढुन रानातल्या झाडांमधे फेकतो. पण काय आश्चर्य़! ग्रेनेड फुटतच नाही. पुरेशी उत्सुकता ताणल्यावर झाडांमागुन राजकुमार ग्रेनेड चेंडु सारखा झेलत झेलत बाहेर येतो. नंतर त्या गुंडाचा तोच ग्रेनेड फेकुन खातमा करतो.
तात्पर्य : ग्रेनेड हा दिवाळीतिल आपटबारची मोठी अवृत्ती आहे. तो वरचे वर झेलल्यास फुटत नाही, जमीनीवर आपटल्यासच फुटतो.
शेवटचा सिन : यात नेहेमी प्रमाणेच खलनायकाचे पारडे वर आहे. प्रलयनाथने राजकुमार नाना पाटेकर यांना पकडुन बांधलेले आहे. त्यांनी जास्त गडबड करु नये म्हणुन त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा पकडुन बांधले आहे. राजकुमारला पाईप ओढण्याची सवय असते. राजकुमार काहीतरी(च) संवाद म्हणत पाईप कढतो व प्रलयनाथला डिवचतो. प्रलयनाथ चिडुन पाईप खेचतो व फेकुन देतो. त्याबरोबर फेकलेल्या पाईपचा स्फोट होतो व उडालेल्या धुराळ्यात काहीच दिसत नाही. धुराळा खाली बसल्यावर सर्व काही पुर्वी सारखेच असते. म्हणजे राजकुमार, नाना पाटेकर त्याच्या जागेवरच उभे, त्यांच्या वर रोखलेल्या बंदुका, बांधलेले कुटुंबीय सर्व तसेच असतात. प्रलयनाथ राजकुमारला डिवचतो. “बघ. आपल्या प्रिय देशाचा नाश मरण्यापुर्वी आपल्या डोळ्यांनी बघ.” आणी मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. पहिले मिसाईल फायर करतात. पण मिसाईल टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. वैतागुन प्रलयनाथ दुसरे मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. ते पण टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. तिसर्‍या मिसाईलची पण तीच गत होते. हे पाहुन प्रलयनाथ साईंटिस्टला गोळी घालुन मारून टाकतो. तेंव्हा राजकुमार हे आपणच केल्याचे व कसे केल्याचे सांगतो.
“प्रलयनाथ, हम जानते थे कि तुम हमारा पाईप छुओगे और फेकोगे जरुर. ईसलिये हमने उसमे डायनामाईट फिट किया था. ज़ब धमाका हुवा तब हमने तुम्हारे तिनो मिसाईलके “फ्युज कंडक्टर” निकाल लिये. अब तुम्हारे मिसाईलोमे धुवे के अलावा कुछ नही”

काय तो कॉंनफिडन्स. आणी डायनामाईट आपटबार सारखा नुसता फेकल्याने स्फोट होतो? मिसाईल मधे काय नुसता “धुंवा” आणी फ्युज कंडक्टर असतो? तसे असेल तर मिसाईल बनवणे फरच सोपे. फक्त फ्युज कंडक्टर मॅनेज करायचा. प्रलयनाथने बहुतेक “घरच्या घरी तयार करा” किंवा “हे तुम्हीही करू शकता” अशा सदरा खाली मिसाईल तयार करण्याची कृती वाचून मिसाईल्स तयार केली असावीत. कृती साधारणपणे खाली दिल्याप्रमाणे असावी.

घरच्या घरी मिसाईल तयार करा” (तुम्हीही घरच्या घरी मिसाईल बनवु शकता). साहित्य : एक 8-10 फुट लांबीचे व 8-10 ईंच व्यासाचे (डायमिटरचे) पत्र्याचे नळकांडे, एक दिड फुट उंच व 8-10 ईंच व्यासाचा पत्र्याचा कोन (शंकू), फ्युज कंडक्टर, 8-10 ईंच व्यासाची पत्र्याची तबकडी, थोडी लाकडे व काडेपेटी.
(टीप: नळकांडे, शंकू व तबकडी यांचा व्यास सारखा हवा). कृती : प्रथम नळकांडे घेउन त्याचे एका तोंडाला शंकू जोडावा. ज़ोडतांना शंकूचे तोंड नळकांड्यांच्या बाहेर राहील याची काळजी घ्यावी. नंतर लाकडे पेटवुन त्याची शेक़ोटी करावी. लाकडे नीट पेटायच्या आधीच नळकांड्यांचे उघडे असलेले तोंड शेक़ोटीवर धरावे. शेक़ोटीचा धुंवा नळकांड्यांत भरू द्यावा. धुंवा पुरेसा भरला गेल्यावर तबकडी घेउन नळकांड्यांचे तोंड सील करावे. तबकडीवर फ्युज कंडक्टर बसवावा. तुमचे मिसाईल तयार! आहे कि नाही सोपे. तर मग चला आपण घरच्या घरी मिसाईल बनवुया.

सिनेमात अजुन ही बराच मसाला आहे. ज्याला कुणाला सिनेमा आठवत असेल अजुन भर घालावी.”

Lol धन्यवाद मुकुंद. धमाल लिहीले आहे.

तात्पर्य : ग्रेनेड हा दिवाळीतिल आपटबारची मोठी अवृत्ती आहे. तो वरचे वर झेलल्यास फुटत नाही, जमीनीवर आपटल्यासच फुटतो. >>> Lol हे भारी आहे.

धमाल पोस्ट मुकुंद. Lol

फ्युज कंडक्टर कुणी काढुन टाकला आणि मिसाईल नुसते धूर सोडत असेल तर मास्क घालुन मिसाईल जवळ जावे. फ्युज कंडक्टर काढला त्या जागी हात घालुन फिरवावा, तीन दोऱ्या हाती येतील. एक जाडी, एक मध्यम जाडीची आणि एक बारीक. त्यातील नेमक्या जाडीची दोरी दोनदा खेचावी. मिसाईलच्या वरच्या भागातून टण टण असा आवाज येताच मिसाईल सुटेल.

नक्की कुठली दोरी खेचावी हे शास्त्रज्ञांव्यतिरिक्त फक्त राजेशखन्नाच सांगु शकतो. चुकीची दोरी ओढली तर मिसाईल तिथेच फुटते.

https://www.facebook.com/share/r/oRE4rTFZ8YT63huz/?mibextid=xCPwDs&s=yWD...
भाभूंनी स्वतःच का नाही खाल्ली ?
खालच्या कमेंट मधे 'रामू तो काला हो गया' लिहिले आहे. गोळीसोबत 'फेअर अँड लव्हली' सुद्धा खायला हवे होते. मिशीपण गायब झाली आहे. एका गोळीचे किती फायदे असावेत..! सिनेमा कुणाला माहीत आहे का ?

'भाभुबाळाच्या गमतीजमती'ही चाललं असतं >>> Lol Lol टोटल फुटलो.

मानव टोटल रिस्पेक्ट! वास्तविक या सीन आधी रणजित जे वेषांतर करतो ते फिल्मी लॉजिकने पुरेसे आहे. शक्ल वगैरे बदलायची गरजच नव्हती. इथे केवळ मिशा लावलेल्या किंवा हेअर स्टाइल बदललेल्या हीरोज ना त्यांचे कुटुंबिय ओळखत नाहीत. हे इतके करण्याची गरजच नव्हती.

हो, पण ती मीशी/ मोस केव्हातरी घसरेल, पावसात भिजल्यावर कुरळे केलेले केस दगा देतील याची भीती असतेच की.
जुडवा भाई घोषीत केले तरी आई नेमक्या वेळी हजर होऊन एक मुस्काटीत मारुन "शरम आती है तुझ जैसे बेटे को जनम दिया. इन्स्पेक्टर साब, मैने कभी जुडवे को जनम नही दिया. ले जाओ इस पापी को." करण्याची शक्यता असते.

दोघांनाही Lol
बघितले. टोटल रिस्पेक्ट खरंच.
आधीच शहरी लूक असलेले गुंड घेतलेत (अनिल धवन, रणजित शहरी गुंड दिसतात. ) आणि गोळीने खेडूत डाकू वेषांतर 'अनडन' करून शहरी सुसंस्कृत वेषांतर झाले आहे. चमत्कार...! भारतीय सिनेसृष्टी म्हणजे रत्नांची खाण आहे खाण. आपणच कमी पडतोय शोधायला.

मानव रिस्पेक्ट!

कहर चित्रपट आहे. दाढी काढून रणजीत राजरोसपणे पूर्ण चित्रपट वावरतो तरी त्याला ती वेषांतर गोळी पाहिजे. पण किमान दोन्ही बाजू कन्सिस्टंट आहेत. रणजीतचा आपण दाढी काढल्यानंतर आणि दिलीप राय असे गोंडस नामाभिधान घेतल्यानंतरही आपण रणजीतच दिसतो यावर पक्का विश्वास आहे. तर राज बब्बर/अनिता राजला तो रणजीतच आहे याचे पुष्कळ संकेत मिळत असतानाही त्याची हँडरायटिंग मॅच होईपर्यंत तो "रणजीतच कशावरून" हा प्रश्न पडतो. रच्याकने रणजीतचा असिस्टंट डाकू अनिल धवन नाही, सतीश कौल आहे.

पण सगळ्यात धमाल सीन मला हा वाटला - https://youtu.be/2SBvOFZK0Eo&t=7142
त्यांनी शशी कपूर अ‍ॅव्हेलेबल नसल्याने त्याच्या बॉडीच्या जागी त्याचा हसरा फोटो वापरला आहे Rofl

ती शवपेटीही अगदी चपटी आहे, त्यात एक डेड बॉडी असणे शक्य नाही.
या सीन नंतर लगेच 'दिलीप राय को रंजीत साबित करने के लिये उसकी हँडरायटिंग हासील करना जरूरी है'
शुभस्य शीघ्रम, बंजारा वेषांतर तयार !
मी जर डाकूंचा प्रोजेक्ट लीडर झालो तर डफली, ढोलकी वगैरे घेऊन आलेल्या बंजारा नृत्यांगनांना प्रवेश नाही, अशी पाटीच लावेन.

अनिता राजला माहिती आहे कि जर हा फॉर्म्युला रणजितच्या हाती पडला तर काय अनर्थ होईल.
पण जर मायबोलीच्या हाती लागला तर वविला त्या वर्षी अमिताभ बच्चन, सिल्वेस्टर स्टॅलोन, टॉम क्रूझ, अक्षयकुमार, आमीर खान, टॉम हँक्स , देव आनंद ग्रेगरी पेक असे सगळे हजेरी लावतील..

रच्याकने -शशीकपूर सचिनचा आवाज काढून का बोलतोय ?

ती शवपेटीही अगदी चपटी आहे, त्यात एक डेड बॉडी असणे शक्य नाही.>> हो ना.
शूटिंग सुरू आहे. नॉर्मल शवपेटी ऐवजी ऐनवेळी कुणीतरी अंगावरून रोडरोलर जाऊन मरण पावलेल्यांसाठीची शवपेटी आणलीय. दिग्दर्शक चिडलाय पण करणार काय. तेवढ्यात पोस्टरवाला येतो 'देख लो साब, सब पोस्टर बढिया बना के लाया हुं '
आणि मग आयडिया! टाका शसिकपूरचे पोस्टर त्या रोडरोलरवाल्या शवपेटीत.

Pages