अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी जर डाकूंचा प्रोजेक्ट लीडर झालो तर डफली, ढोलकी वगैरे घेऊन आलेल्या बंजारा नृत्यांगनांना प्रवेश नाही, अशी पाटीच लावेन. >>> Lol

लोकांचे बंजारा क्रेडेन्शियल्स बघावे. सुमारे दहा वर्षे आधीपासून प्रत्येक व्यक्ती बंजाराच असली पाहिजे. येणार्‍या सर्वांनी मूळ चेहर्‍याने यावे - पुरूषांनी व्यवस्थित दाढी करून, कोणताही विग न लावता. पिक्चर च्या सुरूवातीला जसा "यात कोणत्याही प्राण्याला इजा केलेली नाही" टाइप डिस्क्लेमर लावतात तसा आगावू वेव्हर साइन करून "यात गाणे संपल्यावर उपस्थित लोकांना इजा करण्याचा, गेल्या वीस बावीस वर्षांतील कोणत्याही घटनेचा बदला घेण्याचा उद्देश नाही" मजकूर सही करून घ्यावा. तुम्ही गाणार्‍या गाण्यांत/नाचात खालील गोष्टी असता कामा नयेत
१. बंजारा लोकांबद्दल कॉमन नॉलेज. तुम्ही कसे असता वगैरे. तुम्ही प्रेमाकरता प्राण देता/घेता वगैरे - ते आम्हाला ऑलरेडी माहीत आहे. इथे तुमच्याआधी बरेच बंजारे येउन गेलेत.
२. तुम्ही कोणाचा कसा बदला घेणार वगैरे.
३. बंजारा /नावाखाली स्पॅनिश, मेक्सिकन, आफ्रिकन ई टोळ्यांचे वेष घालून येणे. केवळ ऑथेण्टिक बंजारा गणवेषच चालेल. तुम्ही बंजारे आहात की चेरोकी इण्डियन्स, अ‍ॅझ्टेक मधले दोन तीन शतकांपूर्वीचे लोक, किंवा स्पॅनिश लोककलाकार ते आधी ठरवा.
४. उगाच जाळामधून इकडून तिकडे उड्या मारणे
५. आम्ही शेवटपर्यंत नम्रपणे ऐकून घेतो म्हणून उगाच पकाऊ गाणी गाणे.

बंजारा क्रेडेन्शियल्स. !!
Lol
तो शवपेटी चा सीन अचाट आहे!
ती खरंच फोटो/ पोस्टर ठेवायची केस वाटते आहे! साइज पण किती लहान आहे!
कोण काढतं असे सिनेमे आणि त्यात असे कामचलाऊ सीन्स?

Lol
हवाहवाई, बुलाउंतोआऊंतो असल्या आचरट नावांची नोंद करणाऱ्यांना कुठल्याही चौकशी विना अपमानीत करून बाहेर काढल्या जाईल.

फा , संपूर्ण पोस्ट. Lol
तुम्ही प्रेमाकरता प्राण देता/घेता वगैरे>>> बरेचदा प्राण कबिल्याचा सरदार असायचा त्यामुळे हे प्रतिकात्मक साटंलोटं सुद्धा होतं आहे. Lol

मानव, अस्मिता, र आ, विकु, फा >>> Lol Lol कहर आहात सगळे

मी सध्या अनिता राजला पळवुन नेण्याचा सीन पाहिला. प्रयत्न सुरू असताना ती ‘नही! बचाओ!’ वगैरे नेहमीप्रमाणे ओरडत असते. आधीच्या एका सीनमधे यापेक्षा दुप्पट गुंडांशी हातापायी करून तिने त्यांना चीतपट केलेलं असतं. मग राज बब्बरने वाचवल्यावर त्याच्याशी ओळख करून घेताना ‘हॅलो आय’म इन्स्पेक्टर अनिता शर्मा’. अरे मग मगाशी आपला हुद्दा व स्किल्सचा विसर पडला होता का काय? गजनीची आद्य अवतार असावी का ही?

हवाहवाई, बुलाउंतोआऊंतो असल्या आचरट नावांची नोंद करणाऱ्यांना कुठल्याही चौकशी विना अपमानीत करून बाहेर काढल्या जाईल. >>> Lol

तुम्ही प्रेमाकरता प्राण देता/घेता वगैरे>>> बरेचदा प्राण कबिल्याचा सरदार असायचा त्यामुळे हे प्रतिकात्मक साटंलोटं सुद्धा होतं आहे >>> Lol

हम बंजारोंकी बात मत पूछो जी, जो प्यार किया तो प्यार किया, जो नफरत की तो नफरत की.. हे गाणे आठवले.
फा, श्रद्धा- पायस ने जसे नागीन वर लिहीले आहे तसेच बंजारे हाही हिंदी सिनेमांचा एक आवडता विषय आहे.
Happy
त्यावर लिहायचे मनावर घ्या कुणीतरी.

>> सगळ्या पोस्ट धमाल आहेत

+१११ Lol

यांच्या केमिकल्सच्या लॅब मध्ये टू टू आवाज येतोय इस्रो वगैरे असल्यासारखं.

शशी कपूरचा फोटो Lol त्याने नक्कीच फ़िल्म सोडली असणार मध्येच. प्रोड्युसर म्हणाला असेल कॉस्ट कटिंग करू शवपेटीत.

सगळा पिक्चर बघण्याची हिंमत नाही, पण वरच्या लिंक्समधले काही प्रसंग बघितले. त्या तंबू (?) तले रणजितचे संवाद actually चांगले आहेत. Lol
ती गोळी one size fits all आहे का? आपण आधी कोण आहोत आणि नंतर आपल्याला काय व्हायचंय त्यानुसार कस्टम मेड गोळी लागेल ना?

त्यात भाभूचा डायलॉग आहे पुढे "ये फॉर्म्युला मैने देश की भलाई के लिए और तरक्की के लिए बनाया है"
आता कायापालट करून देशाची भलाई आणि तरक्की कशी काय होईल? काया आणि मतिमध्ये यांचा गंभीर गोंधळ झालेला दिसतोय.

शशी कपूरचा फोटो Lol त्याने नक्कीच फ़िल्म सोडली असणार मध्येच >> डबिंग सचिनच्या आवाजात आहे. त्यामुळे शशीकपूर विनोदी वाटतो.

काही कमेंट्स मिसल्या होत्या मायबोली नीट लोड होत नसल्याने.
आता वाचतोय.
भाभूबाळाची गंमत >> अरे हे कुठे तरी वाचलेय म्हणून आठवत होतो तितक्यात तो धागा वर आला. मग आडवाच झालो.

भाभूची परिस्थिती 1984 ला खूप हलाखीची होती. बासरीवर तीन बोटं हलवून ट्यून वाजवत बासऱ्या विकायचा तेव्हा घर चालायच. नंतर शास्त्रज्ञ झाला तर रणजित हाल केले. बिचाऱ्याच्या नशीबात राहू केतू ड्युआयडीसह गोंधळ घालत असत..

Happy मला ते नं ४ असे वाढवायचे आहे. पण तेथे बदलता येत नाही आता.

४. उगाच जाळामधून इकडून तिकडे उड्या मारणे. जाळाचा शोध लागून बरीच वर्षे झाली. इतके एक्साइट व्हायचे कारण नाही.

जाळाचा शोध लागून बरीच वर्षे झाली. इतके एक्साइट व्हायचे कारण नाही. >>>> Lol Lol
आम्ही शेवटपर्यंत नम्रपणे ऐकून घेतो म्हणून उगाच पकाऊ गाणी गाणे.
>>> तर काय? आम्हांला कळत नाही काय की झिंगालाला हो, झिंगालाला हो, हुर्रर्र हुर्रर्र हे शब्द बंजारा नाहीत. ते संध्याकाळी घरी परतायच्या ऐवजी जंगलाच्या दिशेने गेलेल्या झिंगा आणि लाला नामक बैलांना हाकण्यासाठी वापरले गेलेत असे आमचे स्पष्ट मत आहे. बंजारे समुद्रकाठी सुरुबनात राहत नाहीत हे पण आम्हांला माहितेय. काहीतरी दाखवतात मेले.

आल्सो प्लीज नोट, हवाई हा अमेरिकन गणराज्याचा भाग आहे. तिथली भाषा इंग्लिश (फारच झाले तर मेक्सिकन किंवा गुज्जू) असते. तिथल्या बंजाऱ्यांनी ऊई ऊई वी वगैरे एक्सप्रेशन्स वापरायला ते काही फ्रांस किंवा क्वबेकमध्ये नाही.

दगा दगा वई वई वई हे शब्द लता मंगेशकरने गायले म्हणून मिनिंगफ़ुल ठरत नाहीत.

बंजारा नावाखाली स्पॅनिश, मेक्सिकन, आफ्रिकन ई टोळ्यांचे वेष घालून येणे >>>
करोलरी : किमान आपण कुठल्या प्रकारच्या टोळीचा वेष करणार आहोत याबाबत कंसिस्टन्ट असावे. घागऱ्याबरोबरची चोळी, ट्रॉयमधल्या ग्रीक योध्यांचा स्कर्ट आणि लेस-अप शूजमधल्या नुसत्याच लेसेस असले फ्यूजन खपवून घेतले जाणार नाही.

ब्लॅक सूट आणि जॉर्जेटच्या साड्या नेसून सर्वर कम बॉल डान्सरच्या मूव्हज करत बॅकग्राऊंडमध्ये ढोलकी वाजवत स्वतःला बंजारा म्हणवून घेऊ नये. लोक रफीला माफ करतात, तुम्हाला नाही. स्क्रीनटाईम मिळालेले इतरेजन भांगडा कम कोळी डान्स करत नाहीयेत ना याकडे विशेष लक्ष द्यावे.

बंजारावरच्या पोस्टींची मूळ पोस्ट मला अजून न दिसल्याने बरंच काही मिसल्याची भावना आहे.
घरी गेल्यावर बघेन.

त्यांनी शशी कपूर अ‍ॅव्हेलेबल नसल्याने त्याच्या बॉडीच्या जागी त्याचा हसरा फोटो वापरला आहे>>> हे कहर आहे Rofl
किती कीस पडला इथे Lol तरी हापिसात ती लिंक पाहिली नाहिये अजून..
बंजारा क्रेडेंशिअल्स काय Lol

बंजारा, रोडरोलरमुळे मरण पावलेल्यांची शवपेटी. ... हहपुवा Rofl

बंजारा credentials वर वेगळा धागा काढा बुवा.

खरंतर फा, श्र, अस्मिता, मानव यांनी मिळून 'आमचे येथे पिसे काढून मिळतील' असा युट्यूब चॅनल सुरू करावा.

यांच्या केमिकल्सच्या लॅब मध्ये टू टू आवाज येतोय इस्रो वगैरे असल्यासारखं. >>> Lol

आणि समस्त फ्लुरोसंट रंगाची केमिकल्स विविध आकाराच्या काचेच्या बाटल्यांत असतात. अरे लॅब आहे की होम इंटिरीयरचं शोरूम?

बंजारा क्रेडेन्शियल्स >>> Lol

यात 'आ गये आ गये' असं म्हणत येणार्‍या बंजार्‍यांवर बंदी घाला, विकु Proud एकदा यायला लागले की संपत नाहीत ते.

एका अ तर्क्य सीनचा शोध लागलाय - अनोखा अंदाज सिनेमामधल्या.
मनिषा कोईराला आणि तो कोण हिरो आहे माहित नाही. त्याच्यात त्या काळच्या बर्‍याच साईड अ‍ॅक्टर्सचा भास होतोय वेगवेगळ्या अँगलने.
असो. तर ४२ व्या मिनिटापासून पुढे या धाग्याचे शिर्षक सार्थ करणारा तो सीन आहे. कदाचित अख्खा पिक्चरच भयंकर असू शकेल. शितावरुन भाताची परिक्षा! एक खतरनाक कोरस हालचाली असलेलं गाणं पण आहे ३५व्या मिनिटाला.

तर त्या सीन मधे हिरोच्या बाईकचा मागच्या चाकामधला स्क्रू निघालाय आणि म को ने तो हाताने धरून ठेवलाय कारण रेस सुरू आहे.
शेवटी जेव्हा ते जिंकतात तेव्हा ती अचानक खाली पडायचंय हे लक्षात आल्यामुळे शिस्तीत खाली पडून मग बेशुद्ध होते. मग पुढचा अजून अतर्क्य लॉजिक असलेला सीन. हिरो बहुतेक म को ला रक्तदान करतोय. घरच्या घरीच हे स्गळे उद्योग सुरू आहेत बहुधा. कोणी व्हाईट कोट आणि स्टेथोधारी दिसत नाहीये. मग मधेच हिरो सुई काढून टाकत तिच्याजवळ जातोय. स्वतःच रक्त तिच्या अंगात भरायचा प्लॅन आहे बहुतेक त्याचा.
मग एक ते नेहेमी डोळे मारणारे काका यात आहेत ते म्हणतात अरे असं वेड्यासारखं करू नकोस तुमचा रक्तगट एक नसेल तर तिचा जीव जाईल. त्यावर तो ऐकवतो असं कसं होईल प्रेम करणार्‍यांची भले शरीरं वेगळी असतील पण जान एकच असते आणि जान एक असेल तर रक्तगट कसा वेगळा असेल?

https://www.youtube.com/watch?v=JK68F0Zrlbs

पिसं काढायला परफेक्ट मटेरिअल वाटतोय Lol

अरारारारा Lol तो हिरो उठून बसण्याआधी आपोआप रक्ताचा फ्लो थांबलेला दिसला. शरीरातलं रक्त संपलं असेल का त्याच्या? Wink

Pages