Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केस
केस कापायला गेल्याअवर त्या केस कर्तनकाराच्या दुकानातील TV आणि झी सिनेमा कृपेने एका चित्रपटाचा एक तुकडा पहायला मिळाला.
त्यात डॅनी (भाइजी) सुनिल शेट्टी (इन्स्पेक्टर) हे दोन ओळखीचे आणि नाव माहीत असलेले कलाकार दिसले.
त्यातले डायलॉक जबरी होते.
खाली आहे नमुना.
डॅनी कोणालातरी त्याच्या खास आवाजात सांगतोय "आग, पानी और भाइजीसे पंगा नही लेनेका. आग जलाती है, पानी डुबाता है और भाइजी तडपाता है"![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन एक,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोणीतरी राजकारणी आहे त्याने एका इन्स्पेक्टरला बोलवल आहे आणि म्हणतोय की "ती" फ़ाइल मला दे. त्यावर हा त्याला नाही अस बाणेदारपणे उत्तर देतो.
त्यावर तो राजकारणी (तो मंत्री म्हणे) त्याला तसाच जावु देतो पण जायच्या आधी एक जबरा डायलॉक मारतो.
"साले तुझे इमानदारीकी खुजली हो रही है, जा घर जा और खुजाते रह तेरी इमानदारी. जिंदगीभर खुजाते रहेगा और हात कुछ नही आयेगा"
मेलेल्या इन्स्पेक्टरच्या जागी सुनील शेट्टी येतो. तो येतो तो डायरेक्ट रात्रीच ड्युटी करण्यासाठी डिरेस बिरेस घालुन ठेसनात. तिथे एक हवालदार झोपलेला असतो.
त्यावर ह्याचा डायलॉक " मेरा नाम XYZ बक्षी है लेकीन मै ड्युटीपे सोनेवालोको बक्षता नही"
ह्या चित्रपटाच नाव काय आहे कोणी सांगु शकेल का??
मला तो चित्रपट पाहण्याची तहान लागली आहे आता :p
अमोल, श्रद्धा लक्ष ठेवा
अरे हो अजुन कोणी त्रिदेव वर का नाही लिहिल तिकडे???
तो तर लयी भारी आहे. आज थोडा वेळ पाहिला आहे.
अमोल, श्र नक्की बघाच त्रिदेव.
झकास राव
झकास राव चित्रपटाचे नाव बलवान आहे. सुनिल शेट्टिचा पहिलाच चित्रपट.
बरेच दिवस
बरेच दिवस लिहायचे होते. प्रत्येक सिरीयलच्या एपिसोड आधी नेहमी एक Disclaimer असतो की सर्व "नावे आणि Characters काल्पनिक आहेत वगैरे....." मालिकेत जे काही दाखवतात, नवरा-बायकोची लफडी, घरातील एक व्यक्ती बाकी सर्वांचे खुन पाडण्यासाठी उतावळी, मुलांचे (औरस की अनौरस) आईबापाशी नाते, वडिलाची २-४ लग्ने...... , हे पाहिल्यावर (चुकून जरी खरे असले तरी) कोण अभिमानाने छाती फुलवून जाहीर करेल की हे सर्व आमच्याच घरातील आहे.
काल
काल चुकून्...झी मराठी वर वहिनीसाहेब चा १ सीन पाहिला...
त्यात ते बाळ कर्वे म्हणत होते की...
कुटुम्बीयाना सोडून (म्हणजे १ तर ते मरुन किन्वा घर सोडून जाऊन ) राहण्याचा कधी विचारच केला नाही
त्यामुळे आता अवघड जातय...
घ्या... जगात कोणी तरी कधीही असा आधीच विचार केला असेल का??![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मी परवा
मी परवा कसमसे नावाची रॉयल अ आणि अ मालिका पहात होते. त्यात दोन बायका लाल साडी नेसून मारामारी करत होत्या. एकमेकींच्या झिंज्या उपटत होत्या. त्यातली एक पल्लवी शिर्के होती आणि दुसरी नेहमीचीच गोबर्या गालाची हिंदिवाली चमचम होती. आणि मी हसून हसून लोळत होते. दिवसभराचा सगळा स्ट्रेस गेला वाहून त्या खिदळण्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
सिनेमा:
सिनेमा: गंगा जमुना सरस्वती
क्लायमॅक्स म्हणतात तो सीन.... क्लायमॅक्सच पण अचाट नि अतर्क्यपणाचा!
मोठ्ठे पटांगण. त्यात टकला अमरिश पुरी जोधपूर म्हणतात ती पँट, वरती चमचम करणारा चांदीच्या रंगाचा कुर्ता, दागिने, आणि पायात गुडघ्यापर्यंत येणारे बूट घालून उभा. त्याने मीनाक्षी शेषाद्रीला पकडून ठेवलेले.
खांद्यावर जिवंत मगर बांधून घेऊन अमिताभ प्रवेश करतो. त्या मगरीला पटांगणात एका कडेला सोडतो. मगर एका विशिष्ट अंतरापलिकडे येऊ शकत नाही. (अमिताभने लक्ष्मणरेषा आखली असावी.) आता अमरीश पुरीला तो मारामारी करायचे आव्हान देतो. त्याआधी हे म्हणतो, की काय काय हिशोब चुकता करू? 'मां के सुहाग का' एक हिशोब असतोच नेहमीप्रमाणे. त्याच्या वडलांना अमरीश पुरीने त्याच मगरीच्या तोंडी दिलेले असते. मगरींची आयुर्मर्यादा काय?
आणि नेमकी हीच ती मगर हे कसे कळले? (बहुधा मगर डायरी मेंटेन करत असावी.
दि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.)
तुंबळ मारामारी अमरीश आणि अमिताभ ची. पहिले अमिताभ मार खातो, अमरीश हसतो. मग आईने 'उठ गंगे, मार इसको.' असा पटांगणाजवळच्या हवेलीच्या सहाव्या मजल्यावरून आरडाओरडा केल्यावर (म्हातारी असली तरी फुफ्फुसं मजबूत!) अमिताभ उठून त्याला मारतो.
मग एकदा त्याच्या छाताडावर बसून म्हणतो, याद है इसी जगह तुमने मेरा एक दूध का दांत तोडा था, और तभी मैने कहा था की एक दिन यहींपे मै तुम्हारी बत्तिसी तोड दूंगा. आसपास प्रेक्षकही असतात! ते त्याच्या नावाने जयघोष करतानाच एक ठोसा आणि दात बाहेर.
आणि मारामारी अब्रप्टली संपली. मीनाक्षी पळत पळत तिथे येते आणि जयाप्रदाही. माझे डोके लगेच चालू लागले. (इसका मतलब कहानी अभी बाकी है मेरे दोस्त.......)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
दोन हिरविणी, आणि मगरीचा योग्य उपयोग झाला नाही म्हणजे अजून व्हिलन पुरता नेस्तनाबूत झालेला नाही.
तस्सेच झाले दोन मिनिटांत. व्हिलन उठला, त्याने बंदूक चालवली अमिताभवर, मध्ये जयाप्रदाने (सिनेमातले नाव सरस्वती) ती गोळी झेलली स्वतःवर आणि गंगा जमुना संगमाचा मार्ग मोकळा करून दिला. (कारण काय तर, गंगा जमुना सरस्वतीचा संगम होताना सरस्वती लुप्त होते.)
मग मगरही आपले काम चोख करते.
आणि आता सिनेमा संपतो. त्रिवेणी संगमावर जाऊन अमिताभ राख ओततो आणि त्या राखेची पाण्यावरची रांगोळी असावी तशी 'समाप्त' अशी अक्षरे बनतात. ~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
दि.
दि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(म्हातारी असली तरी फुफ्फुसं मजबूत!)
>>>>>>>
खास श्र टच!
चित्रपटः
चित्रपटः बाबा
अभिनेता: रजनिकांत
रजनीकांत खलनायकाचा पाठलाग करत एका गोदामात प्रवेश करतो. कोलांटी उडी मारून एका लोखंडाच्या टेबलावर चढतो. त्यावर बूट घासून चालू लागतो. बुटाच्या आणि लोखंडी टेबलच्या घर्षणातून ठिणग्या बाहेर पडतात. रजनीला फार जोरात धावणे नामंजूर. तो फक्त पावलाला हेलकावा देतो. त्याच्या पायातील बूट सुदर्शन चक्रासारखा फिरत (ह्यावेळी हेलिकॉप्टरसारखा आवाजही येतो) खलनायकाच्या डोक्याला मागून जोरात प्रहार करतो. खलनायक जमिनीवर बेशुद्ध होऊन पडतो. मग तो बूट रिबाउंड होऊन परत रजनीकडे येऊ लागतो. रजनी फक्त पाऊल पुढे करतो. बूट येऊन पायात पहिल्यासारखा फिट्ट बसतो.
ह्या पूर्ण निवेदनात कुठेही अतिशयोक्ती नाही. जसा प्रसंग पाहिला तस इथे नमूद केला आहे.
>>(बहुधा मगर
>>(बहुधा मगर डायरी मेंटेन करत असावी. दि. २५-जानेवारी-१९६०: अपचन. गंगाच्या वडलांना खाल्ले.)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
रजनी च्या
रजनी च्या चित्रपटांमधल्या साहसदॄश्यांचे वर्णन करताना 'अतिशयोक्ती' हा शब्द सुद्धा खुप निरर्थक वाटायला लागतो...
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(कारण काय
(कारण काय तर, गंगा जमुना सरस्वतीचा संगम होताना सरस्वती लुप्त होते.) जबरी.....
अरे त्या
अरे त्या "बाबा" मध्ये सगळ्यात जबरी आहे ती व्हॉलीबॉल मारामारी.. हॉकी स्टीक, बेसबॉलचं दांडकं वगैरे बर्याच सिनेमात मारामारीसाठी वापरतात.. पण व्हॉलीबॉल??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि तो तंबाखू मळून तोंडात तोबरा भरतो आणि त्याची विडी होवुन ती त्याच्या तोंडातून बाहेर काढतो ह्याच्यापेक्षा अजब कल्पनाशक्ती मी पाहिली नाहिये आजवर...
शिवाजी
शिवाजी विडी म्हणतात ती तीच असावी का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
श्रद्धा, हे बरोबर नाही. गंगा जमुना सरस्वती म्हणजे अ. आणि अ. चे ठासून भरलेले इंधन आहे, त्यावर पूर्ण लिही. मगरीची डायरी जबरी
मोहम्मद अझीझ किंवा शब्बीर चा 'डिस्को भांगडा' ("डान्स कर दिखाऊ आईसा माईकील जैकसन के जैसा" वगैरे) भाग हुकले का तुझे? त्सेच बर्फाखालून वाहणारी मीनाक्षी, "साजन मेरा उस पार है" ई.
एकदा, तूफान व हा असे डबल करायला पाहिजे
श्र, येडा
श्र, येडा![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरा
अमोल
तुला अनुमोदन रे. पुर्ण फिल्लम वर येवु दे की.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
श्र, काय हे?
श्र, काय हे? किती अन्याय?
ज्या चित्रपटावर एक अध्याय लिहिला जाऊ शकत होता तिथे तु इतकेच लिहिलेस.
दिग्दर्शकाला किती वाईट वाटले असेल,,,
अमोल, मला पण मीनाक्षीच तोच सीन आठवला.. तिचे कपडे आणि मेकप वर बरंच लिहिता येइल...
श्र, ह.
श्र, ह. ह.पु.वा.
" तंबाखू
" तंबाखू मळून तोंडात तोबरा भरतो आणि त्याची विडी होवुन ती त्याच्या तोंडातून बाहेर काढतो " , >>> खी खी खी .. :फिदी:.. श्रद्धा मगरीची डायरी आणि मजबूत फुफ्फुसं जबरी !!!
लोकहो,
लोकहो, येकडाव मापी द्या.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हपिसात उगीचच काम करत जास्त वेळ बसल्याने सिनेमा हुकला आहे बराच. एकदा 'नेट' लावून (यूट्यूबवर मिळाला तर) बघते.
आणि नंतर समग्र चिरफाड टाकते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
त्या
त्या चिरफाडीच तेवढ मनावर घेच माते ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मगरींची चिरफाड
बरं तो
बरं तो पर्यंत हे बघा. आजकाल अशी दर्जेदार नृत्ये व चिरस्मरणीय अभिनय बघायला मिळत नाही, हॉरर तर सोडाच पण इतरही.
श्रद्धा
श्रद्धा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमोल, YKK, योगेश, टन्या
विडी तर
ते दर्जेदार नृत्य तर अहक्य कहर आहे बाबा
***
The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.
फारेंडा,
फारेंडा, डीप्रेशन आलं मला तो व्हिडीयो पाहून! चेहर्यावर हताश भाव वगैरे आले!!:फिदी:
हा त्याचा नाच आज त्याच्या बायको-मुलांनी पाहिला तर त्यांना काय वाटेल रे????????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारेंड,
फारेंड, कुठून असले व्हिडिओज शोधून काढतोस? वेड्यासारखी एकटीच बसून हसतेय ते बघताना. ते पाहून मला काही हौशी लोक आपल्या लहान मुलांना सिनेमांच्या गाण्यांवर नाच करायला लावून व्हिडिओ काढतात तसलं वाटलं.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्लार्टी, तूफान + गंगा जमुना सरस्वती असा धडाकेबाज कॉम्बो घेऊन तूच अ नि अ मध्ये पदार्पण का करत नाहीस बरं?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
Order is for idiots. Genius can handle chaos.
आईशप्पथ!
आईशप्पथ! फारेंडा, आधी वॉर्निंग देत जा रे बाबा! चहा पिताना जोरदार ठसका लागला हसून!
(आमच्या घराच्या गल्लीच्या टोकाशी एक वेडा बापडा कायम तोंड पाडून बसायचा. मधूनच खीक करून बत्तिशी दाखवायचा तसं वाटलं.) तो प्राणी वेळी अवेळी म्हसोबा अंगात आल्यासारखं नाचलाय पण! त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर! बापरे, अगदी अविस्मरणीय!
अगदीच मख्ख कुठेय? मधे एकदा हसलाय ना तो हिरो!
अरे काय
अरे काय भीषण आहे हा प्राणी!!! त्या लालीला घेऊन जो काय अचानक किल्ली दिलेल्या खेळण्यासारखा हलतो तो... ह ह म ची वे आ!!
>>तो प्राणी वेळी अवेळी म्हसोबा अंगात आल्यासारखं नाचलाय पण! त्यानं झाडीत तोंड घातल्यावर मागून ती हिरॉइन त्याच्या पार्श्वभागावर जोरदार हाणते की काय असं वाटलं क्षणभर! <<
अगदी अगदी!!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अशक्य
अशक्य कॉमेडी प्रकार आहे !! डान्स तर सुपर्ब!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे बापरे
अरे बापरे ,
तो डान्स पाहून माझ्या मनातले डिप्रेशन कुठल्या कुठे पळून गेले.
कुणीतरी त्या चित्रपटाची क्यासेट श्रद्धाला पाठवा रे!
बाप
बाप रे
अशक्य आहे... कुणी आला हीरो म्हणून घेतला असेल. अभिषेकला मख्ख म्हणायची सोय राहिली नाही...
नन्दू,
नन्दू, अभिषेकला बोलायचं काम नाही हां.. तो intense actor आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages