अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो म.को. सीन पाहिलाय. कायच्या काय आहे तो. हिरो किती छपरी.. एखाद्या फूटकळ निर्मात्याचा नेपो बेबीच असावा..
तो एकजण मला आधी अमृता सिंग वाटला>>>> अर्रे काय हे? Rofl

हिरोचा तोल ढळला नाही हो >>> हे शब्दशः अर्थाने खरे आहे पण इतर साहित्यिक अर्थाने नसावे. कारण पुढे एका सीन मधे मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते.>>>> अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रररररररर Lol

तो एकजण मला आधी अमृता सिंग वाटला>>>>> हा माझा बायको पार्वती Lol

साहित्यिक अर्थाने नसावे. कारण पुढे एका सीन मधे मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते >>>>>>>>>> आजकालच्या सिनेमांमधे नसतं हां असं काही... चावटच होते तेव्हाचे सिनेमे Lol

साहित्यिक अर्थाने नसावे. कारण पुढे एका सीन मधे मकोला चक्कर येते. ती माँ बननेवाली असते

उच्च कोटी ! फाचे असणार हे लगेच ओळखले ! This is why I love mabo !

मनीष कुमार हिरो कमी साड्यांच्या दुकानाच्या मालकाचा मुलगा जरूर दिसतोय >>> Lol Lol
तो बडजात्यांच्या चित्रपटात शोभेल. पण ते सलमान खान घेऊन त्याचा मनीष कुमार करून टाकतात.

महान थिअरी आहे Happy
आमच्याकडे दही वडा घरी बनला की 5 मिनिटांत मटकवण्याचा ट्रेंड आहे.त्यामुळेच प्रेम राहून जात असावे.

हा सीन बहुतेक 'लोहा' मधला आहे. कधीतरी पाच मिनिटे बघितला होता. मिथुन काळ्या झब्ब्यात देवदास होऊन हिंडत होता. कुठलेतरी गम चघळत (हिंदी गम) रात्रभर शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कोण हिंडते एवढ्या गमात. मग रस्त्यात कोणीकोणी भेटले की 'काय सांगू माझा कोतबो' म्हणून अजून चिंगम खेचणार. मग घरी बस नं, दरवेशी का झाला आहेस. बाहेर हंबरडा फोडल्यानंतर लोक विचारणारच. त्याच 'ट्रिप'मधे लेडी पोलिसलाच काही गुंड छेड काढताना बेदम हाणले. तोपर्यंत गाणे झाले होते. मग ती गोड लेडी पोलिस हिंट देऊ लागली, फ्लर्टिंग करू लागली. ते या भोळ्या सांबाला कळले नाहीच, हाच उलट आकाशाकडे बघत तिला काफ्काचे सुविचार सांगू लागला. संपले च्युईंगम. Lol

मधल्या दृश्यात डोके आपटले गेलेल्या पात्राशी प्रेक्षक चटकन कनेक्ट होऊ शकतात. कारण तिथवरच्या 'मिथुनलीला' पाहून डोके आपटून घ्यायचीच इच्छा होते :डोके आपटून घेणारी इमोजी:

खरा मुद्दा हा - असे कसेही सीन दिग्दर्शकाने टाकले किंवा लेखकाने लिहिले तरी काही न म्हणता एकदम सिरियसनेस ने पूर्ण अभिनय करून पडद्यावर साकार करणे हे त्याचे यश आहे.

कुठलेतरी गम चघळत (हिंदी गम - - - > चिंगम Lol
काल दिसलीच नाही कि ही मजेशीर कमेंट.

आपण ऑनलाईन असताना खूप दिवसांनी हा धागा वर आला की मग आपल्या हातात काही राहत नाही. Lol

टोटल स्ट्रेसबस्टर आहे.

मधल्या दृश्यात डोके आपटले गेलेल्या पात्राशी प्रेक्षक चटकन कनेक्ट होऊ शकतात. कारण तिथवरच्या 'मिथुनलीला' पाहून डोके आपटून घ्यायचीच इच्छा होते>> Rofl

Pages