Submitted by निखिल मोडक on 21 June, 2023 - 17:03
काटे वाट्यास आले, हे ना सांगावयाचे
केले जखमी फुलांनी, कोणा सांगावयाचे?
नव्हता अंधार नशिबी, हे तो खरे जरीही
मज पोळले दिव्यांनी, कोणा सांगावयाचे?
जो मार्ग चाललो तो, होता खरे सुगंधी
ते रान केतकीचे, कोणा सांगावयाचे?
सत्यात उतरली स्वप्ने, नसता ध्यानीमनी हे
उडवून झोप ती गेली, कोणा सांगावयाचे?
झाल्या असतील कविता, मागे काही बऱ्याही
मज काळजी नव्याची, कोणा सांगावयाचे?
©निखिल मोडक
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
निखिल जी, यात "कोणा
निखिल जी, यात "कोणा सांगावयाचे" हा रदीफ असल्याचे भासते आहे, परंतु मतल्यामध्ये रदीफ केवळ "सांगावयाचे" इतकाच असल्याचे स्पष्ट होते. "कोणा सांगावयाचे" हा शब्दगट प्रत्येक शेरात शेवटी येत असल्याने त्यालाच रदीफ ठेवून एखादा वेगळा काफिया वापरला असता तर मजा आली असती. हे माझे प्रामाणिक आणि नम्र मत आहे, कृपया राग मानू नये.
अभिषेक जी आपल्या
अभिषेक जी आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! जाणकारांकडून दुरुस्ती सुचवली गेल्यावर आनंदच होतो. मी अजून गझल ह्या प्रकाराशी पूर्णपणे वाकिफ नाही त्यामुळे अशा सूचना मधून सुधारणेला वावच मिळतो. आपले पुन्हा एकदा आभार!
आपण नम्रपणे सुचवलेला अभिप्राय
आपण नम्रपणे सुचवलेला अभिप्राय तितक्याच नम्रतेने आणि कुठल्याही कटुते शिवाय स्वीकारला गेल्याचे पाहुन बरे वाटले. मीही कोणी जाणकार वैगेरे नाही, हल्लीच भटसाहेबांच्या गझला वाचून रुची वाढली आणि गझलेच्या एकूण रचनेबद्दल कुतूहल निर्माण झाले.