Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिली फलंदाजी मिळाली. तरी
पहिली फलंदाजी मिळाली. तरी देखील हरले.
पहिल्या डावात बढत मिळाली. तरी देखील हरले.
वाह इंग्लंड.
एक धक्का और दो. चौथा सामना जीत लो.
फार मस्त झाली लीड्सची टेस्ट.
फार मस्त झाली लीड्सची टेस्ट. हायलाइट्स बघितल्या मोस्टली पण मजा आली. इंग्लंडला फार कमी वेळा सपोर्ट केलेला आहे
मी avid England supporter
मी avid England supporter (ashes मध्ये) असल्याने कालचा पूर्ण दिवस replay बघितला. हॅरी brook चांगला खेळला. पण तरी शेवटापर्यंत टिकून राहिले पाहिजे त्याने. ऑसीज एक बोलर शॉर्ट होते असे वाटले. Starc, Cummins ना Bolland काहीच मदत करत नव्हता. नेक्स्ट मॅच कदाचित ड्रॉप करतील त्याला. Todd murfi la ही काहीच बोलिंग दिली नाही Cummins ne.
महिन्याभराच्या ब्रेक नंतर
महिन्याभराच्या ब्रेक नंतर भारत उद्या परत मैदानात उतरणार आहे.
प्री-मॅच प्रेस कॉन्फरन्स वरून तरी वाटतंय कि उद्या यशस्वी चा टेस्ट डेब्यू होईल आणि थिंकटॅंक गिल कडे आपला पुजारा चा सक्सेसर - लॉन्ग टर्म 3 नंबर चा फलंदाज म्हणून पाहत आहे.
हिस्टोरिक रेकॉर्ड पाहता डोमिनिका ची पीच प्रोग्रेसिवली ब्रेक डाऊन होत जाते आणि स्पिनर ना मदत देते, त्यामुळे मला वाटतंय कि जडेजा आणि अश्विन दोघेही खेळतील.
माझ्या मते सिराज आणि उनाडकत फिक्स आहेत पण तिसरा पेसर म्हणून कोण खेळणार हा एक प्रश्न आहे - बॅटिंग ऑर्डर वाढवायला शार्दूल ला खेळवायचं कि मुकेश / सैनी पैकी एका अननुभवी बॉलर ला चान्स द्यायचा ?
कोणा भरत साठीही हि मालिका क्रूशिअल आहे, जर इथेही (बॅट ने) छाप पाडायला जमली नाही तर त्याचे कसोटी विकेटकिपर म्हणून भविष्य कठीण असणार आहे
मला नव्या जर्सी नाही आवडल्या.
मला नव्या जर्सी नाही आवडल्या. फारच कॅज्युअल वाटल्या आणि उगीच निळ्या पट्ट्या लावल्यात इकडे तिकडे. तो टेस्ट जर्सीचा भारदस्तपणा नाहीये.
उगीच निळ्या पट्ट्या लावल्यात
उगीच निळ्या पट्ट्या लावल्यात इकडे तिकडे.
>>
अन् कलर्ड ड्रेस वर पांढऱ्या पट्ट्या
ओन युवर स्ट्राईप्स म्हणे...
आदीदास इतर (इंग्लंड / आफ्रिका) टीम चं किट स्पॉन्सर असताना असा आचरटपणा नव्हता...
आज दुलीप सामन्यात विहारी ला
आज दुलीप सामन्यात विहारी ला प्रूव्ह करायला चान्स आहे
आणि टेस्ट मधे गिल ला...
जयस्वाल डावखुरा असल्याने त्याला गायकवाड च्या आधी चान्स मिळतोय, त्यानी तो वाया घालवू नये...
विंडीज ने टॉस जिंकून बॅटिंग
विंडीज ने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. भारतासाठी किशन आणि यशस्वी चा डेब्यू तर विंडीज ने होतकरू फलंदाज अलिक अथानाझे ला डेब्यू दिला आहे.
आपले अकरा - रोहित, यशस्वी, शुभमन, विराट, अजिंक्य, किशन (WK), जडेजा, अश्विन, शार्दूल, उनाडकत, सिराज
जडेजा अन् आश्विन असे टॉप टू
जडेजा अन् आश्विन असे टॉप टू ऑलराऊंडर असताना शार्दुल च्या बॅटिंग स्किल ची खरंच गरज आहे का?
त्याच्या ऐवजी मुकेश ला ट्राय करता आलं असतं
आश्विन आज बहुधा 'तुम्ही
आश्विन आज बहुधा 'तुम्ही ओव्हलवर "हे" मिस केलंत लेको" असे ठसवणार असे दिसते. ऑलरेडी २.
वेस्ट इंडीजची दाणादाण. हे
वेस्ट इंडीजची दाणादाण. हे फक्त ro करू शकतो. कोहली असता तर इथे पण माती खाल्ली असती.
विंडीज चा डाव 150 ला आटोपला.
विंडीज चा डाव 150 ला आटोपला. अश्विन चा 33वा 5 विकेट हॉल.
काल विहारीनी 50 केली, आज शॉ
काल विहारीनी 50 केली, आज शॉ नी...
पण पुजारा, सूर्या, सर्फराज टोटल फेल गेले
वेस्ट झोन ची परिस्थिती बिकट आहे...
शार्दुल च्या बॅटिंग स्किल ची
शार्दुल च्या बॅटिंग स्किल ची खरंच गरज आहे का?
त्याच्या ऐवजी मुकेश ला ट्राय करता आलं असतं >> +१. एक नविन पेस बॉलर - विशेषतः बुमरा परत कधी नि किती टेस्ट खेळेल हे नक्की नसताना तरी हे करायला हवे होते. नुसत्या सिराज नि शमिवर किती दोवस ढकलायचे ?
पण पुजारा, सूर्या, सर्फराज टोटल फेल गेले >> सर्फराज एकदम हार्ट ब्रेक झाल्यासारखा तीन इनिंग्स खेळला आहे. काय भरोसा म्हणा. आधी धावा काढल्या म्हणून घेतला नाही - आता काढत नाही म्हणून घेतील
शार्दूल हा आपल्या संघाचा लकी
शार्दूल हा आपल्या संघाचा लकी चार्म आहे. म्हणून त्याला संघात घेतात.
रोहित ची १००, जयस्वाल ची
रोहित ची १००, जयस्वाल ची पदार्पणात १००
२२९ चा ओपनिंग स्टँड
..
..
बल्ले बल्ले
जयस्वाल प्रमाणे फार फाSSर
जयस्वाल प्रमाणे फार फाSSर पूर्वी दीपक शोधनने पण आपल्या पहिल्याच सामन्यात शतक केले होते.
पुनः त्याचे नाव ऐकू आले नाही.
गिल ६??
जयस्वाल प्रमाणे फार फाSSर
जयस्वाल प्रमाणे फार फाSSर पूर्वी दीपक शोधनने पण आपल्या पहिल्याच सामन्यात शतक केले होते. पुनः त्याचे नाव ऐकू आले नाही. >>>>
माझ्या क्रिकेट बघण्याच्या काळात पर्दापणाच्या सामन्यात शतक मारणाऱ्या भारतीय फलंदाजापैकी तीघे कसोटी क्रिकेट मध्ये मोठी करियर करू शकले - गांगुली, सेहवाग आणि रोहित.
उरलेले व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये मोठे प्लेयर झाले पण कसोटी क्रिकेट मध्ये कधीच जम बसला नाही - रैना, युवराज, शिखर
प्रवीण आमरेचं करियर कुठे आणि का संपलं हे मलातरी कळलं नाही.
श्रेयस अय्यर अजून भारतीय टीम मध्ये आपला जम बसवतोय आणि शॉ आत्तातरी भारतीय टीम पासून कोसो दूर आहे.
होपफुली यशस्वी पहिल्या (गेलाबाजार दुसऱ्या) कॅटेगरीत आपलं नाव ऍड करेल.
रोहितच्या कॅप्टनशीपखाली
रोहितच्या कॅप्टनशीपखाली खेळतोय म्हणजे यशस्वी पुढे जाऊन मोठा खेळाडू बनणार. कोहली असता तर यशस्वी टीममध्ये नसता.
“ जयस्वाल प्रमाणे फार फाSSर
“ जयस्वाल प्रमाणे फार फाSSर पूर्वी दीपक शोधनने पण आपल्या पहिल्याच सामन्यात शतक केले होते. पुनः त्याचे नाव ऐकू आले नाही. ” - झक्की, त्या लिस्टमधे बरीच यशस्वी नावंसुद्धा आहेत (लाला अमरनाथ, गुंडाप्पा विश्वनाथ (दुसरी इनिंग बहुदा), अझहरुद्दीन, गांगुली, सेहवाग). ह्या यशस्वीचं नाव त्या यशवंतांबरोबर जोडलं जावं ह्या शुभेच्छा!
त्या यशवंतांबरोबर
त्या यशवंतांबरोबर
>>
फेफ, तुमने वडापाव को वगळ्या
आता फॅन्स च्या पोस्टींच्या पावसाची तयारी ठेव...
फेफ, तुमने वडापाव को वगळ्या
फेफ, तुमने वडापाव को वगळ्या >> टेक्निकली रोहित शर्माची पहिली टेस्ट सेंच्यूरी होती हे कबूल असले तरी त्या आधी तो इतक्या वन डे नि टी -२० खेळला होता कि त्याला ह्या लिस्ट मधे बसवणे थोडे खटकते. रैना नि युवी च पण बर्यापैकी तीच केस आहे. जनरली अॅक्रॉस ऑल फॉर्मॅट मधे पहिल्या १०-१५ सामन्यांमधे एखाद्या फॉर्मॅट मधे पहिले शतक काढणे जास्त कौतुकास्पद वाटते. जय्स्वाल ने भारी पेशन्स दाखवलाय . गिल ने थोडे शिकायला हरकत नाही त्याच्याकडून. राहाणे त्याची परंपरा कायम ठेवली
“फेफ, तुमने वडापाव को वगळ्या”
“फेफ, तुमने वडापाव को वगळ्या” - अशी काही काँप्रेहेन्सिव्ह लिस्ट नव्हती माझी. जे पटकन आठवले ते लिहीले. असामी म्हणतो तसं शर्मा लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधे बर्यापैकी यशस्वी होता तोपर्यंत. (किंवा टेस्टमधे ‘तितकासा’ यशस्वी नाही अजून )
“जय्स्वाल ने भारी पेशन्स दाखवलाय . गिल ने थोडे शिकायला हरकत नाही त्याच्याकडून.” - टोटली सहमत!
मॅच मधे १२ (त्यात दुसऱ्या
मॅच मधे १२ (त्यात दुसऱ्या इनिंग मधे ७) विकेट्स घेऊन पण आश्विन सामनावीर होत नाही?? किती तो बॅटिंग धार्जिणा अप्रोच...
जयस्वाल ची खेळी स्पेशल होती, पण आश्विन च्या तुलनेत कमीच म्हणीन. आश्विन नी ६०% बळी मिळवले तर जयस्वाल नी ४०% धावा केल्या, सो आश्विन चा इंपॅक्ट जास्ती...
पण हे वगळता, दणदणीत विजय मिळवल्या बद्दल संघाचं अभिनंदन...
जयस्वाल पहिलाच सामना असा
जयस्वाल पहिलाच सामना असा खेळल्यामुळे त्याला सामनावीर दिले असावे.
अन्यथा कसोटीमध्ये गोलंदाजांना जास्त सामनावीर मालिकावीर पुरस्कार मिळतात. हा सामनावीर सुद्धा आश्र्विनचाच होता.
साऊथ झोनने वेस्ट झोनला आरामात
साऊथ झोनने वेस्ट झोनला आरामात हरवून दुलीप ट्रॉफी जिंकली.
ओव्हरऑल बघायचं झाल्यास साऊथ झोन चा पेस अटॅक हा डिफरंस मेकर होता. पहिल्या इनिंग मध्ये शॉ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पांचाल सोडल्यास कोणालाच त्यांच्या समोर टिकाव धरता आला नाही.
पुजारा आणि सूर्या सपशेल फेल गेले. सर्फराज ने दुसऱ्या इनिंग मध्ये 48 केल्या पण पेस बॉलिंग समोर तोही अजिबात कंफर्टेबल वाटला नाही.
बांगलदेश महिला टीम नी आपल्या
बांगलदेश महिला टीम नी आपल्या टीम ला पहिल्यांदा वन डे मधे हरवलं
जेमतेम दीडशे चं टार्गेट पण झेपलं नाही आपल्याला. तिसऱ्या टी २० प्रमाणे कुणीही बॅटर काहीही कमाल दाखवू शकली नाही...
मंधाना चा गेलेला फॉर्म, डोक्यावर चाढवलेल्या इतर काही खेळाडूंमुळे आपल्या संघाची अवस्था पुन्हा वाईट होती आहे... वेळीच लक्ष दिलेलं बरं...
किती तो बॅटिंग धार्जिणा
किती तो बॅटिंग धार्जिणा अप्रोच... >> +१. अश्विन ने दुसर्या डावात जी धमाल उडवलेली ती पाहिल्यावर खरच आश्चर्य वाटले.
ओव्हरऑल बघायचं झाल्यास साऊथ झोन चा पेस अटॅक हा डिफरंस मेकर होता. > सेमी मधे साउथ ची बॉलिम्ग बघून शंकेची पाल चुकचुकलेली होती. दोन्ही संघांच्या एकूण धावा बघता पिच बॉलिंग धार्जिणे होते असे वाटते आहे. मावीने पण सेमी मधे धमाल उडवली होती.
मेजर लीग च्या मॅचेस बघून नि असोसिअएट च्या क्वालिटी मधे किती फरक आहे ते जाणवते. ह्यातले काही जण मी प्रत्यक्ष खेळताना पाहिले आहेत किंवा त्यांच्या विरुद्ध खेळलो आहे. तेंव्हा ते जितके भारी वाटतात तेव्हढे इंटरनॅशनल स्टार समोर अजिबात वाटत नाही. एकूण अमेरिकन क्रिकेट कल्चर वाढायला भरपूर वाव आहे.
आपण विंडीजला धोपटत आहोत आणि
आपण विंडीजला धोपटत आहोत आणि इंग्लंड कांगारूना
कालचा अॅशेस चा दिवस ५१-४९
कालचा अॅशेस चा दिवस ५१-४९ म्हणता येईल नि आज १००-०. आज फक्त डॅमेज कंट्रोल !!!
Pages