Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00
तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?
उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
द बर्निंग ट्रेन मध्ये ही असेच
द बर्निंग ट्रेन मध्ये ही असेच. ट्रेन मधल्या लोकांना लाल कपडा हवा असतो झेंडा म्हणून, तर आशा सचदेव आपली लाल साडी उतरवून देते. हेही एकवेळ मान्य. पण मग तिथे असलेली दुसरी एखादी महिला तोपर्यंत माझी ही निळी साडी नेस वगैरे ऑफर करत नाही
हो किंवा निळा किंवा इतर
हो
किंवा निळा किंवा इतर कोणत्याही रंगाचा कपडा बाहेर फेकला तर विनोद मेहरा बुचकळ्यात पडणार आहे का, की अरे आपण यांना लाल सांगितला होता. तो काय सिग्नल आहे अचूक रंग असायला
प्रवाश्यांनी तुमचा संदेश पोहोचला हे कन्फर्म करायला लाल कपडा ट्रेन मधून बाहेर टाका असे सांगितलेले असते. निळा टाकला तर "अरे लाल नसेल म्हणून निळा टाकला असेल" असे कॉमन सेन्स वाले लोक समजतील. पण हे बॉलीवूड आहे. इथे नवीन ट्रेनच्या पहिल्या सफरीत इंजिनाच्या मागे ज्वालाग्राही पदार्थांनी भरलेली वॅगन लावतात.
त्या डब्यांवर "कृपया लूज शंटिंग न करे" लिहीतात तसे "कृपया लूज लॉजिक न लगाये" सुद्धा लिहायला हवे
फारएंड ! आता समजलं !
होस्टेल मधल्या एखाद्या विनोद न कळणार्या मित्राला समजावून सांगताना जसे वाटते तसे वाटले असणार तुला...!!!
ही कहानी की मांग .. फारच अचाट कृत्यं करवून घेते बिचार्या नायिकांकडून!
आणि बर्निंग ट्रेन मधे........ प्रत्येका कडेच सूट केस मधे साड्या असतीलच की... आशा सचदेव ला द्यायला.......
पण..पुन्हा कहानी की मांग...!!!
शास्त्रात काय म्हटलेय ?
शास्त्रात काय म्हटलेय ?
यदि यानं अग्निम् आधाय ,
सुन्दरी स्वस्य रक्तवस्त्रं दानं कृतवती ||
अरे, त्याग आणि भोग एकाच
अरे, त्याग आणि भोग एकाच कृतीतून सिद्ध केलाय त्यांनी, जो जे वांछिल तो ते बघो.
परवीन बाबी होती ना यात मग ज्वालाग्राही पदार्थ आणि आशा सचदेव हा द्राविडी प्राणायाम कशाला केला.
पण मग तिथे असलेली दुसरी एखादी
पण मग तिथे असलेली दुसरी एखादी महिला तोपर्यंत माझी ही निळी साडी नेस वगैरे ऑफर करत नाही

तो काय सिग्नल आहे अचूक रंग असायला
आणि बर्निंग ट्रेन मधे........ प्रत्येका कडेच सूट केस मधे साड्या असतीलच की... आशा सचदेव ला द्यायला
>>>>>
(No subject)
बुडणाऱ्या व्यक्तीच्या (ही
बुडणाऱ्या व्यक्तीच्या (ही बहुधा हिरॉईन असते) पोटात गेलेलं पाणी तोंडाला तोंड लावून ओढून काढावं लागतं हेही काम मजबूरी म्हणून आपल्या हिरोंना करावं लागतं. साप चावलेल्या ठिकाणीही ते हा (तोंडाने पाण्याऐवजी विष काढण्याचा) प्रयोग करायला मागेपुढे पहात नाहीत.
(पोटातलं पाणी काढण्याचा तुषार दळवी-रेशम टिपणीसचा जिवलगा सिनेमातला सीन यूट्यूबवर मिळेना!)
बुडणाऱ्या व्यक्तीच्या (ही
डबल पोस्ट.
आपल्या हिरोंना करावं लागतं.
आपल्या हिरोंना करावं लागतं. साप चावलेल्या ठिकाणीही ते >>> हिरवीणीही यातून सुटलेल्या नाहीत
(सीनची लिंक दिली असती. पण 'राजा की आयेगी बारात' सिनेमा सापडला नाही यूट्यूबवर
)
बाय द वे एका मुलीने खरोखरच
बाय द वे एका मुलीने खरोखरच आपल्या आईला नाग चावला असताना त्याचं विष तोंडाने शोषून घेऊन हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत आईला तगवलं आणि ती वाचली(सुदैवाने मुलीला तोंडात फोड वगैरे नसावेत, त्यामुळे तीही व्यवस्थित राहिली)
https://www.dnaindia.com/india/report-karnataka-brave-daughter-saves-mot...
यदि यानं अग्निम् आधाय ,
यदि यानं अग्निम् आधाय ,
जबरी.
सुन्दरी स्वस्य रक्तवस्त्रं दानं कृतवती || >>>
> तो काय सिग्नल आहे अचूक रंग
> तो काय सिग्नल आहे अचूक रंग असायला
गुलाबी, राणी कलर किंव अगदी नारंगीही चालली असती. अजून भाजपाची स्थापना झाली नव्हती
समस्त हिरविणी - जिसे हम
समस्त हिरविणी - जिसे हम कुर्बानी का अंजाम समझे, वो इब्तिदा थी कहानी की मांग की |
बॉलिवूडच्या लीला फार वरच्या दर्जाच्या आहेत, त्याला केवळ भौतिक वस्तुंच्या त्यागापुरते सीमित ठेवणे अयोग्य ठरेल.
एक खूनी, ज्याच्या विरुद्ध सर्व साक्षी-पुरावे आहेत, त्याच्या मानसिक स्थितीची कारणमीमांसा करून "बदले कि राह पर भटके एक इन्सान को बदले कि इस भावना से मुक्ती मिल सके" या उदात्त हेतुने हिरवीण एक रात्र खूनी/हिरो सोबत लॉकअप मध्ये काढण्याचा निर्णय घेते.
https://youtu.be/UoTabqopK8Q?t=2258
फा, आचार्य आणि पायस, मानाचा
फा, आचार्य आणि पायस,
मानाचा मुजरा घ्यावा!!
त्या डब्यांवर "कृपया लूज
त्या डब्यांवर "कृपया लूज शंटिंग न करे" लिहीतात तसे "कृपया लूज लॉजिक न लगाये" सुद्धा लिहायला हवे Happy >>>॥हा हा हा हा हा.....
धन्यवाद फेफ
धन्यवाद फेफ
कुठे मिळतात तुम्हाला ही रत्नं
कुठे मिळतात तुम्हाला ही रत्नं, पायस?
‘तुम मेरी इज्जत लुट सकते हो, जान ले सकते हो’ ती पॉसिबिलीटीज सांगतेय का आवतण देतेय? इज्जत न हुई, खैरात हुई, लुटते जाओ… ते ही पोलिस कोठडीत?
ह्या धाग्या वरचे अपडेट्स खूप
ह्या धाग्या वरचे अपडेट्स खूप मिस करतेय.. टाका की कुणीतरी रत्न..
काही महिन्यांपूर्वी ऋषी
काही महिन्यांपूर्वी ऋषी कपूरचा 'कर्ज' बघत होतो. ('बघत' म्हणण्यापेक्षा 'चाळत' म्हणणे योग्य होईल. पूर्वी पुस्तके चाळली जायची तसे आजकाल युट्युब मुळे सिनेमे चाळले जातात) तर त्यात सुरवातीचा भाग, ज्यात सिमी ग्रेवाल हि राज किरण ची हत्या करते, भारीच मनोरंजक घेतला आहे. अगदीच अ आणि अ टाईप नसला तरी तो आ आणि आ टाईप नक्कीच आहे. कारण एकंदर सीन ज्याप्रकारे चित्रित केलाय ते पाहताना अखंड आ वासला जातो:
https://youtu.be/hTwJusqeWzs?t=425
गाडीच्या रेडीएटर मध्ये साधे नळाचे पाणी चालते, मान्य आहे. पण म्हणून काय रस्त्याकडेच्या तळ्यातले कसलेही घाणेरडे गढूळ पाणी टाकायचे? ते सुद्धा पत्र्याच्या गंजलेल्या डब्यातून? आणि तो डबा सुद्धा आपला हिरो पुढच्या इंजिनच्या बॉनेट मधून उचलतो. तिथेच कायमचा डबा असायचा का पूर्वी गाड्यांत?
इथूनच आ वासला जातो. आणि आणि आपली चिकणी हिरवीन सिमी गाडी पुढे मागे करून त्याला ज्या प्रकारे ठार मारते ते सगळे पूर्ण होईतोवर वासलेला आ तसाच राहतो. हिरो सुद्धा पूर्ण ठार मारून घेतो, पळून जायचा जराही प्रयत्न करत नाही. आणि सगळ्यात शेवटी त्या काळातल्या स्टाईल प्रमाणे नहीSSSSS
अरे हॉस्पिटल मधून डेड बॉडी निदान देताना रक्त वगैरे पुसून तरी द्यायची ना. तशीच? 
हॉरर पिक्चर मधे नेहमी
हॉरर पिक्चर मधे नेहमी तळ्यातलं (डबके) पाणी आणतात. मला आधी या गाडय़ा पाण्यावर चालतात असं वाटायचं.
हो तो सीन आठवला
हो तो सीन आठवला
खरं तर गाडीचा वेग पाहता त्याला बाजूला उडी मारायला भरपूर वेळ होता
खरं तर गाडीचा वेग पाहता
खरं तर गाडीचा वेग पाहता त्याला बाजूला उडी मारायला भरपूर वेळ होता
>>>
तर काय! साधा रस्त्यावरून खाली उतरला असता/किंवा जरासे वर चढून गेला असता तरी चालण्यासारखे होते. ती काय हिमालयन कार रॅलीमध्ये पार्टीसिपेट करून आली नव्हती जीप ऑफ रोड घालायला.
आणि तिने तरी तो पाणी आणायला पाठ वळवून जात असताना स्पीड अप करून का नाही उडवले? रिवर्स घ्यायची गरज नसती पडली.
आणि ग्लास वाजवून मॅकमोहनला काय चाललेय हे कसे समजते? 'सर ज्युडा को जबान नही दि है भगवानने लेकिन अकल ज़रूर दि है' ठीक आहे. पण जबानबरोबर शिक्षण पण नाही का दिलंय भगवानने? लिहून नाही का सांगता येणार?
"आणि 'सर ज्युडा को जबान नही दी है'. मग त्याला कोर्टात रवी वर्माच्या समोर कशाला उभे केलेय? उलट तपासणी कशी घेतली होती? ग्लासं वाजवून?
ते ८ जानेवारीपर्यंत लग्न करून ११ जानेवारीपर्यंत त्याला मारायची काय टाइमलाईन आहे? ८ जानेवारीच्या ऐवजी ८ फेब्रुवारीला लग्न झाले तर वसियत बदलून जाईल का? आणि वडलांची जायदाद असते ना? कोर्ट पण रवी वर्माला जायदाद देऊन टाकते? आणि तो मेल्यावर डायरेक्ट त्याच्या बायकोला? 'क्लास अ वारस', हक्कसोड पत्र वगैरे माहिती नाही का या लोकांना?
फॅक्टरी वगैरे पार्टनरशिप मध्ये घेतात लोकं. ओके. राहते घरपण ?
पण म्हणून काय रस्त्याकडेच्या
पण म्हणून काय रस्त्याकडेच्या तळ्यातले कसलेही घाणेरडे गढूळ पाणी टाकायचे?>> हा हा… नुकताच खड्डा खणून त्या पाणी ओतल्यासारखे दिसले.
हिरो सुद्धा पूर्ण ठार मारून घेतो
>> ग्लास वाजवून मॅकमोहनला
>> ग्लास वाजवून मॅकमोहनला
हे तर हद्द आहे. मोर्स कोड वगैरे एकवेळ समजू शकतो. पण याला कसलेच लॉजिक नाही. तो फक्त टिंग टांग टिंग वाजवतो आणि त्याचे भाषांतर करताना मॅकमोहन मात्र लांबच्या लांब वाक्ये बोलतो. नुसत्या टिंग टांग चा एवढा अर्थ? एव्हढे डेटा कॉम्प्रेशन आजच्या काळात सुद्धा शक्य नाही हो
>> तळ्यातलं (डबके) पाणी आणतात. मला आधी या गाडय़ा...
>> नुकताच खड्डा खणून त्या पाणी ओतल्यासारखे दिसले
मी खरेतर डबकेच लिहिणार होतो. आणि ते खरेच डबके आहे. ते दोघे गाडीतून येताना आधी एक तळे दाखवले आहे. जेणेकरून प्रेक्षकांना तळ्यातले पाणी वाटावे. पण शूटिंग करताना डबके खणून पाणी ओतलेय हे लगेच लक्षात येते.
सर ज्युडाचा ग्लास >>
सर ज्युडाचा ग्लास >>
बॉलिवूडमध्ये अशा संगीतमय डेटा कॉम्प्रेशनची मोठी परंपरा आहे. एकवेळ सर ज्युडाचा मोर्स कोड डिकोड होईल पण जॅक गौड या सीनमध्ये जे काही करतो आहे ते डिकोड करणे केवळ अशक्य आहे.
जॅक गौड सीन >> https://youtu.be/rvILTZ29yrc?t=684
अतुल आणि माझेमन
अतुल आणि माझेमन

लिंक बद्धल धन्यवाद- मला
लिंक बद्धल धन्यवाद- मला हिमेसभाई चा karz माहित होता फक्त
कर्ज एकेक कमेंट्स
कर्ज एकेक कमेंट्स
हा कर्ज बघितलेला अतिपूर्वी tv वर .
कर्ज - सगळ्या पोस्टी
कर्ज - सगळ्या पोस्टी
कर्ज बघायचा तर ऋषी कपूरच्या एनर्जीसाठी आणि गाण्यांसाठी.

ऋषी कपूर कोणतंही वाद्य वाजवण्याची अॅक्टिंग कसली सही करतो!
बाय द वे, कर्जमध्ये मॉन्टी गिटार, पियानो, व्हायलीन, सॅक्सोफोन सगळं वाजवतो
Pages