एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
कृषीतज्ञ कि कृषितज्ज्ञ >>
कृषीतज्ञ कि कृषितज्ज्ञ >> कृषितज्ज्ञ
परतंत्र्य कि पारतंत्र्य >> पारतंत्र्य
शिवाय दोन्ही प्रश्नांत की मध्ये दुसरी वेलांटी हवी - हे बोनस
मी कृषीतज्ज्ञ समजत होते इतके
मी कृषीतज्ज्ञ समजत होते इतके दिवस. बरं झालं समजलं ते.
एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ
एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावेत.
(भरत यांनी निदर्शनास आणुन दिल्यानुसार 'नि' वगळून)
>>> परतंत्र्य कि पारतंत्र्य >
>>> परतंत्र्य कि पारतंत्र्य >> पारतंत्र्य
मग चर्चाप्रस्तावात 'संसदीय' ('सांसदीय'ऐवजी) हे योग्य रूप लिहिलं आहे ते कसं?
धन्यवाद हपा, मानव, स्वाती.
धन्यवाद हपा, मानव, स्वाती.
एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ लिहावेत. >>> ध्यानात ठेवीन
परतंत्र्य कि पारतंत्र्य >>
परतंत्र्य कि पारतंत्र्य >> पारतंत्र्य>>>
मग दवणीय की दावणीय?
य आणि ईय हे वेगवेगळे प्रत्यय
य आणि ईय हे वेगवेगळे प्रत्यय आहेत.
ईय प्रत्यय लागताना मूळ शब्दात बदल होत नाही. काही ठिकाणी क वाढवावा लागतो. भारतीय, परकीय, स्वकीय, इ. ही विशेषणे आहेत.
य हा प्रत्यय लागताना मूळ शब्दात बदल होतो. औचित्य, वैविध्य, वैशिष्ट्य, आतिथ्य , पावित्र्य. ही सगळी भाववाचक नामे आहेत.
-----------------
सामासिक शब्दाच्या पूर्वपदातील मूळ शब्दात र्हस्व इकार , उकार असतील तर ते तसेच राहतात. लघुकथा, गुरुदक्षिणा, कविसंमेलन.
-------------------
नि हा एकाक्षरी शब्द र्हस्व आहे.
आलं लक्षात. धन्यवाद, भरत.
आलं लक्षात. धन्यवाद, भरत.
अच्छा. नि वगळून म्हणावे लागेल
अच्छा. नि वगळून म्हणावे लागेल मग हा नियम.
आता पाहिले शब्दकोषात तर नी - आणि या अर्थी मोल्सवर्थ आणि वझे मध्ये दीर्घ तर दाते मध्ये दीर्घ आणि ~हस्व दोन्ही दिले आहेत.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BF
नि स्वर याला शब्द म्हणता येईल का?
अंत्य इकार , उकार दीर्घ
अंत्य इकार , उकार दीर्घ असावेत या नियमाला आणि, नि , परंतु हे अपवाद हे पक्के लक्षात आहे.
शब्दरत्नाकरात र्हस्व आणि दीर्घ दोन्ही नि आहे
'नि' नि 'परंतु'साठी धन्यवाद
'नि' नि 'परंतु'साठी धन्यवाद भरत.
मो. रा. वाळंबे:
मो. रा. वाळंबे:
१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उ-कार दीर्घ उच्चारला जातो म्हणुन तो दीर्घ लिहावा:
मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू, रू.
८) पुढील तत्सम अव्यये व 'नि', 'आणि' ही दोन मराठी अव्यये ~हस्वांतच लिहावी:
परंतु, अद्यापि .... (इत्यादी.)
(इत्यादी हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घांत लिहावा).
म्हणजे यानुसार शब्दकोषात दीर्घ नी दिलाय तो चूक म्हणावा लागेल.
मस्त चर्चा. छान माहिती मिळतेय
मस्त चर्चा.
छान माहिती मिळतेय
मी कृषीतज्ज्ञ समजत होते इतके
मी कृषीतज्ज्ञ समजत होते इतके दिवस >> माझाही गोंधळ होतो. पण हा तद्भव शब्द असल्यामुळे शब्दाचं मूळ रूप पदांतर्गत आल्यास त्याचे ऱ्हस्व दीर्घ मूळ आहेत तसेच ठेवावे लागतात. कृषी लिहिताना मराठीचा नियम लागून तो दीर्घ होतो, पण कृषितज्ज्ञ लिहिताना मूळ ऱ्हस्व तसाच राहत असावा. अर्थात मूळ शब्दात दीर्घ नाही ना हे बघायला पाहिजे. माझा कयास आहे की या शब्दात नाही.
मूळ शब्दात दीर्घ आहे असाच
मूळ शब्दात दीर्घ आहे असाच माझा समज आहे/होता.
धातुरूपावली वाचून पाहिली.
धातुरूपावली वाचून पाहिली. कृष् (= ओढणे {नांगर वगैरे}) धातूला इक् प्रत्यय लागून (क् चा लोप होतो) कृषि हा मूळ शब्द तयार होतो. त्यात पहिली वेलांटी आहे. मराठीत नियमानुसार शब्दांती इकार आल्यास तो दीर्घ होतो, पण अंतर्गत आल्यास मूळ आहे तसाच राहतो.
कृषी हा तत्सम की तद्भव ?
कृषी हा तत्सम की तद्भव ?
क्षमस्व. तत्सम आहे. लक्षात
क्षमस्व. तत्सम आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल आभार भरत.
सामासिक शब्द लिहिताना समासाचे
सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द ) तत्सम र्हस्वान्त (मला नीट लिहिता येत नाहीये यात ) असेल (म्हणजे मुळात संस्कृतात र्हस्व असेल ) तर ते पूर्वपद र्हस्व च ठेवायचे जसे बुद्धि - बुद्धिवैभव
लक्ष्मी - लक्ष्मीसहित
तसेच कृषि - कृषितज्ज्ञ चे असणार बहुतेक
कृषि हा शब्द तत्सम आहे. पण जर
कृषि हा शब्द तत्सम आहे. पण जर तो कृषी ह्या स्वरूपात रूढ झाला आणि शब्दकोषातही स्वीकारला गेला तर तो तद्भव ठरेल.
हा धागा उपयोगी होतो स्वतःच्या
हा धागा उपयोगी होतो स्वतःच्या चुका दुरुस्त करायला. इथे भाषाविद्वान फार छान माहिती देतात.
काही शब्दरूपे प्रचलित असली तरी बरोबर नाहीत असे वाटत राहते. उदा. आज्जी.
आजोबा-आजी असेच शिकलो आहे. आज्जोबा-आज्जी हे गेली १०-१२ वर्षे वाचण्यात येत आहे, त्याआधी कधीही नव्हते.
अनेक जागी 'बालदी' लिहिलेले असते, तो शब्द 'बादली' असा शिकलो आहे. आशीर्वाद /आर्शिवाद / आशिर्वाद हा घोळ अनेकांचा असतो.
'तुप', 'फुल', 'पुजा', 'कुल लूक' असे आता डिजिटल लेखनात असतेच, छापील दैनिकात -पुस्तकात सर्रास दिसते. ते तूप, फूल, पूजा, कूल लुक' असे असावे हे कुणाला सांगावेसेही वाटत नाही. 'चुक' आहे का ?
निर्भत्सना की निर्भर्त्सना
निर्भत्सना की निर्भर्त्सना ?
https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=4778396961641107726
इथे चुकीचे लिहिले आहे काय? मलाही ऑटोकरेक्ट 'निर्भर्त्सना' हे सुचवत होतं पण मी दुर्लक्ष केलं.
चतुरस्र हेच बरोबर आहे नं ? काही ठिकाणी 'चतुरस्त्र' वाचले आहे.
निर्भत्सना .. उच्चार तरी असाच
निर्भत्सना .. उच्चार तरी असाच करतो. भ नंतर आणखी एक र कुठुन आणला काय माहित त्यांनी.
हल्ली काय स्मार्ट... आपलं चतुर बनवतील सांगता येत नाही.
स्मार्ट व्हेपन म्हणून चतुरस्त्र लिहित असतील.
आपटे निर्भर्त्सना म्हणताहेत.
आपटे निर्भर्त्सना म्हणताहेत. मूळ धातू भर्त्स् असा आहे.
चतुरस्र.
मी दोन्ही शब्द चुकीचे समजत होतो. कधी लिहिले नसावेत.
चतुरस्र म्हणजे चोहीकडून सारखा, चौकोनी.
चतुरस्र म्हणजे चोहीकडून सारखा
चतुरस्र म्हणजे चोहीकडून सारखा, चौकोनी. >> ह्म्म
मी हे बहुतेक वेळा पॉलीमॅथ अशा अर्थाने वापरलेले ऐकले / वाचले आहे - अनेक विषय / कलांचा अभ्यास किंवा व्यासंग असलेली व्यक्ती किंवा लिखाण
मी काल प्रतिसादात बरोबर रूप
मी काल प्रतिसादात बरोबर रूप चूक वाटून चुकीचे लिहिले.
'चतुरस्र' म्हणजे सर्वगुणसंपन्न ह्या अर्थाने वापरले आहे.
उदा. 'चतुरस्र' अभिनेता म्हणजे चौकोनी अभिनेता नाही.
निर्भर्त्सना बरोबर आहे .
निर्भर्त्सना बरोबर आहे .
चतुरस्र असा उच्चार आहे. चतुरस्त्र कधी ऐकलं नाही.
वावे +१
वावे +१
पण दातेसुद्धा 'चतुरस्त्र' म्हणतायत.
>>> चतुरस्र' अभिनेता म्हणजे
>>> चतुरस्र' अभिनेता म्हणजे चौकोनी अभिनेता नाही
चौकोनी नव्हे, परिपूर्ण, 'चौरस आहार' म्हणतो तसं.
होय गं. सर्वगुणसंपन्न लिहिलं
होय गं. सर्वगुणसंपन्न लिहिलं नं
'चतुरस्र' बद्दल मला खात्री होती तर आता दाते 'चतुरस्त्र' म्हणतेय. निर्भत्सनाही 'निर्भर्त्सना' निघालं.
Pages