Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
द्रविड नी अंडर १९ आणि ए टीम
द्रविड नी अंडर १९ आणि ए टीम कडे लक्ष दिलेलं बेटर.
सिनियर टीम साठी या लोकांच्या स्टारडम चा घंटा फरक न पडणारा फिरंग बेटर...
जस्टिन लॅंगर वगैरे कुणीतरी असायला पाहिजे...
सर्फराज नी म्हणे रणजी
सर्फराज नी म्हणे रणजी मॅचमध्ये (शतक) सेलिब्रेट करताना मॅच बघायला आलेल्या चेतन शर्माकडे बघून काही इशारे (gesture) केले, जे शर्माजींना भावले नाहीत, अन् त्यामुळे त्याला डावलला असं कुणीतरी बीसीसीआय ऑफिशियल नी म्हंटल्याचं ऐकलं...
मी तीन गोष्टी वाचल्या
मी तीन कारणे वाचली ह्याबद्दल
१. वरचे गेश्चर - त्यावर तेंव्हा अंकोला तिथे होता नि चेतन शर्मा नव्हताच हे मुंबई असोशिएशन ने दिलेले स्पष्टीकरण. समजा वादाकरता असे धरून चालू कि ते शर्मा लाच उद्देशून होते. तर नक्कीकाय बिघडले ? चेतन शर्मा सिलेक्शन कमिटी मधे होता तर त्यात कसली डोंबलाची अचिव्हमेंट आहे ? आणि त्याने सर्फराज चा तीन वर्षांचा रेकॉर्ड बाद होतो ? व्हॉट द हेल ? एव्हढा कसला माज सिलेक्शन कमीटी ला ? शर्मा ची हकालपट्टी झाली ना काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वरून ?
२. फिटनेस - ह्यापेक्षा मोठा जोक नसावा. सरफराज ने ज्या दीर्घ कालावधी मधे ज्या सरासरीने नि जितक्या धावा काढल्या आहेत हे बघता फिटनेस बद्दल काय शंका येऊ शकतात ? हे महाभाग कोण आहेत ज्यांना शंका येतात ? संपूर्ण भारतीय संघ दुखापतग्रस्त आहे ते दिसत नाही का ? परत जो काही फिटनेस बेंचमार्क आहे तो सर्फराज ने पास केला आहे आधीच. मग नक्की घोडे कुठे अडलय ?
३. शॉर्ट बॉल प्रॉब्लेम : हे तर अगदीच सॉरी एस्क्यूज आहे. आयपीलमधे हे उघड झाले. तिथे तो २ -३ सामने नि १०-१२ बॉल्स खेळला त्यावरून हे कळले ? मग त्याने तीन वर्ष धावांछा जो रतीब घातला होता तेंव्हा समस्त डोमेस्टीक टूर्नामेंट मधले बॉलर्स काय झोपा काढत होते का ह्या पर्सीव्हड वीकनेस बाबत ? आणी असे कोण आहेत मआईचे लाल आहेत भारतीय संघामधे जे शॉर्ट बॉल मधे कधी चाचपडतच नाही ? वेस्ट इंडिज मधल्या पिचेस वर शॉर्ट बॉल टाकणारे किती बॉलर्स असणार आहेत ?
सरळ सरळ आयपील मधल्या चमक धमक मधे ईस्वरन, विहारी नि सर्फराजची डोमेस्टीक स्कोअर्स हरवून गेले सांगा ना.
तो मुस्लीम आहेना! त्यांचा
तो मुस्लीम आहेना! त्यांचा कोटा संपला.
हो मलाही आता असेच वाटायला
हो मलाही आता असेच वाटायला लागले आहे. सिराज नि शमी मधे कोटा संपला.
मला सर्फराज ला न घेण्याचं एकच
मला सर्फराज ला न घेण्याचं एकच कारण दिसतंय,
मिडल ऑर्डर मधे जागा नाही.
रहाणे नी कमबॅक करून स्लॉट भरला. त्यात आता तो व्हाइस कॅप्टन, त्यामुळे तो खेळणारच
शर्मा अन् कोहलीने ब्रेक घेतला असता, तर गिल अन् सर्फराज ला ३-४ वर खेळवता आलं असतं
मिडल ऑर्डर मधे जागा नाही. >>
मिडल ऑर्डर मधे जागा नाही. >> हो पण बरोबर घेऊन गेले असते तर त्यालाही अनुभव आला असता ना ? गिल बरोबर पुढची फळी कधी बिल्ड करणार ? राहाणे काय नि कोहली काय १-२ वर्षांमधे निघतील ना ? ह्या सायकल च्या शेवटी रोहित, कोहली, राहाणे, पुजारा हे नसतील असे धरले तर चार पर्याय आत्तापासूनच ट्राय करावे लागतील. राहुल नि श्रेयस (नि गिल) धरले तर चौथा कोण असणार ?
Netherlands vs West Indies
Netherlands vs West Indies पाहिली का कोणी ? काहीच्या काही प्रकार झाला. होल्डर टोटल कोअर डंप, सुपर ओव्हर मधे ३० रन्स दिले . व्हॅन डीर ने सिंगल हँडेडली मॅच खेचली.
“ होल्डर टोटल कोअर डंप, सुपर
“ होल्डर टोटल कोअर डंप, सुपर ओव्हर मधे ३० रन्स दिले” - राजस्थान रॉयल्सच्या फॅन्सना देजा-वू मोमेंट होती.
खरं तर यापुढे कुठल्याही टेस्ट
खरं तर यापुढे कुठल्याही टेस्ट टूर ला शर्मा, कोहली, पुजारा, रहाणे यापैकी कुणीही दोघं च टीम मधे असायला हवेत (फॉर्म / परफॉर्मन्स सर्व इग्नोर मारून रोटेशन लावा).
कॅप्टन मात्र या चौघां खेरीज कुणीतरी हवा. माझा चॉईस अय्यर किंवा पंत (राहुल as a कॅप्टन बिलकुल इफेक्टिव वाटत नाही, तो कधी रणजी कॅप्टन ही नव्हता)
Netherlands vs West Indies
Netherlands vs West Indies पाहिली का कोणी ?
>>
क्लासिक विंडीज... टोटल बेभरवशी... आज चॅम्पियन सारखे खेळतील तर उद्या गल्ली टीम पेक्षा वाईट
यापुढे कुठल्याही टेस्ट टूर ला
यापुढे कुठल्याही टेस्ट टूर ला शर्मा, कोहली, पुजारा, रहाणे यापैकी कुणीही दोघं च टीम मधे असायला हवेत (फॉर्म / परफॉर्मन्स सर्व इग्नोर मारून रोटेशन लावा). >> +१ आआणि दोघेही एकाच वेळी टीममधे असायलाच हवे हवेत असेही जरुरी नाही. काहि सामने जरुर हरू पण पुढची फळी जमत जाईल.
काहि सामने जरुर हरू पण पुढची
काहि सामने जरुर हरू पण पुढची फळी जमत जाईल.
>>
हे डिसिजन घ्यायचं डेअरिंग द्रविड कडून अपेक्षित होतं. अंडर १९ ला जसं त्यानी एक प्लेअर एक टूर्नामेंट पॉलिसी लावली तसं सीनिअर टीम चा कोच झाल्यावर त्याला काही पाथ ब्रेकिंग करता आलं नाहीये, आणि याचं एक मुख्य कारण मला सेलिब्रिटी स्टेटस झालेले अन् आम्हाला सगळं कळतं टाईप माईंडसेट असलेले प्लेअर्स वाटतात. हा माईंडसेट होण्यात मला शास्त्री बुवांच्या 'कोचिंग' चा साईड इफेक्ट वाटतो. जिथे प्लेअर्स ना मोकाट सूट होती अन् कोच चा वचक शून्य.
म्हणून सीनिअर टीम चा कोच हा परदेशीच असावा या मताचा मी झालोय. द्रविड असो वा कुंबळे, लक्ष्मण असो वा सेहवाग काहीही फरक पडणार नाही. जर कुणी रवी शास्त्री टाईप तुम्ही ही मजा करा, मी ही मजा करतो टाईप असेल तर मात्र पॉप्युलर होईल (सक्सेसफुल होईल का नाही देव जाणे कारण सगळंच राम भरोसे)
शास्त्री सक्सेसफुल होता म्हणू
शास्त्री सक्सेसफुल होता म्हणू शकतो ..
मला तर शास्त्रीच परत यावा असे वाटते..
सीनिअर टीम चा कोच झाल्यावर
सीनिअर टीम चा कोच झाल्यावर त्याला काही पाथ ब्रेकिंग करता आलं नाहीये, आणि याचं एक मुख्य कारण मला सेलिब्रिटी स्टेटस झालेले अन् आम्हाला सगळं कळतं टाईप माईंडसेट असलेले प्लेअर्स वाटतात. >> शास्त्रीपेक्षा द्रविड चा से अधिक असणार हे बघता शास्त्रीच्या काळातले किमान यशही रीपीट करता येत नसेल तर तो द्रविडच्या कोचिंगचा फॉल्ट नाहि होणार का ?
द्रविडच्या कोचिंगचा फॉल्ट
द्रविडच्या कोचिंगचा फॉल्ट नाहि होणार का
>>
अर्थातच
पण शास्त्री कोच झाला तेंव्हा त्यानी कोच म्हणून फारसं काही केलं असं मला वाटंत नाही. प्लेअर्स फॉर्म मधे होते अन् परफॉर्म करत होते.
द्रविड कोच झाल्यापासून फुल स्त्रेंथ टीम टेस्ट मधे फार कमी खेळली आहे अन् त्यात वेग वेगळे कॅप्टन. त्यात प्लेअर्स आऊट ऑफ फॉर्म. ज्यानी ओव्हर ऑल परफॉर्मन्स डाऊन झाला.
याची सुरुवात शास्त्री च्या काळातच झाली होती, पण हे सगळं द्रविड सुधारेल अशी अपेक्षा टोटल फोल ठरली. सुधारणा तर नाहीच, उलट चौथ्या इनिंग मधे बॉलर्स नी माती खायचं नवं झेंगाट मागं लागलं...
म्हणजे शेवटी काय तर कोच इज अ
म्हणजे शेवटी काय तर कोच इज अॅज गुड अॅज प्लेयर्स!
म्हणजे शेवटी काय तर कोच इज अ
म्हणजे शेवटी काय तर कोच इज अॅज गुड अॅज प्लेयर्स!
>>
आणि कॅप्टन ही...
एक्झिक्यूट करणारे खेळाडू नसले तर भले भले प्लॅन फेल होतात. आणि खेळाडूंनी जर परफॉर्म केलं तर नसलेले मास्टर स्ट्रोक पण क्रेडिट होतात...
म्हणजे शर्मा धोनी कोहली आणि
म्हणजे शर्मा धोनी कोहली आणि आपला राहुल.. द्रविड नाही के एल.. हे कप्तान म्हणून सगळे एकाच पात्रतेचे आहेत असे समजावे का
शास्त्री दोन वेगवेगळ्या काळात
शास्त्री दोन वेगवेगळ्या काळात कॅप्टन होता नि दोन्ही वेळेला त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. मला वाटते दारू, वाढलेले पोट, मुलींचा घोळका ह्यापलीकडे त्याचे मूल्यमापन करायची वेळ आहे. नुसता फॉर्म हा घटक नसून एकंदर टीम सिनर्जी, डावपेच नि लाँग टर्म मधे टीम बिल्डींगची दिशा कशी दिसते हे कोचिंग साठी मोठे घटक आहेत. टेस्ट खेळणार्या खेळाडूंना फारसा टेक्निकल ज्ञान लागत नसावे - अॅडजस्ट्मेंट पुरेषा होत असाव्यात.
म्हणजे शर्मा धोनी कोहली आणि आपला राहुल.. द्रविड नाही के एल.. हे कप्तान म्हणून सगळे एकाच पात्रतेचे आहेत असे समजावे का >> तुलाच माहित बाबा, आयपील च्या ५ ट्रॉफ्यांचा गजर तुझ्याकडूनच होत असतो
इंग्लंड नशिबवान आहे. दिवसभर
इंग्लंड नशिबवान आहे. दिवसभर सिमिंग कंडिशन्स नि रूट विकेट घेऊन जातो. हेडला शॉर्ट बॉलचा मारा हे टॅक्टिक तीन इनिंग्स फेल गेलय. १२०-१३० मधे बॉलिंग करताना शॉर्ट बॉल काय कामाला येणार ?
काल इंग्लंड नी मस्त सुरुवात
काल इंग्लंड नी मस्त सुरुवात केली होती पण क्रॉली ची 50 अन् डकेट ची 100 व्हायला हवी होती.
लायन ची कमी नक्की जाणवणार ऑसीज ना...
ऑसीज नी दुसऱ्या च बॉल वर
ऑसीज नी दुसऱ्या च बॉल वर स्टोक्स ला काढून इरादे स्पष्ट केले अन् 46 धावांत इंग्लंड च्या 6 विकेट्स खोलून 91 रन चा लीड घेतला
आता ख्वाजा अन् वॉर्नर दुसऱ्या डावात सावध खेळताहेत.
उद्या दुपारपर्यंत खेळून इंग्लंड ला सुमारे 100 ओव्हर मधे 400+ टार्गेट दिलं पाहिजे...
उद्या दुपारपर्यंत खेळून
उद्या दुपारपर्यंत खेळून इंग्लंड ला सुमारे 100 ओव्हर मधे 400+ टार्गेट दिलं पाहिजे... >> लॉयन नाही नि बर्यापैकी पाटा पिच मूळे हे कमी टारगेट आहे. इंग्लंड चा सध्याचा hubris बघता ते सहज चेस करतील असे वाटाते लॉयन असता तर गोष्ट वेगळी होती.
बाकी ह्या दोन मॅचेस मधली पिचेस नि फायनल चे पिच बघितल्यावर इंग्लंड ने ऑसी फास्ट बॉलिंङ पेक्षा बाझबॉल अधिक प्रीफर केलय असे वाटते. जरा स्पायसी पिचेस असती तर दोन्ही बाजूंचे पेसर्स इफेक्टीव्ह ठरले असते पण ऑसी नी पेस च्या जोरावर बाझबॉल स्टाईल मधे खेळणे सळो कि पळो करून सोडले असते . एकूण पुढच्या इंग्लंड च्या भारतवारीसाठी सरळ स्पिन फ्रेंडली पिचेस बनवा नि मजा बघा.
आगरकर चीफ सिलेक्टर होणार हि चांगली गोस्।ट आहे सर्फराज च्या दॄष्टीने. तो मुंबई चा सिलेक्टर कि कोच होता तेंव्हा पण त्याने सर्फराझची पाठराखण केली होती. क्रिक इंफो ने सर्फराज पहिल्या चारात खेळत नाही म्हणून सिलेक्टर त्याच्या धावांना कमी वेटेज देतात ( तेंव्हा बॉलर्स थकलेले असतात नि रणाजी मधे बॉलिंङ डेप्थ एव्हढी नाही कि पुरेसे होईल) असे कारण दिले आहे. त्यांनी बर्यापैकी हिस्टॉरिकल डेटा दिला आहे. ते सगळे ठीक असले तरी रणजीच्या शंभर वर्षांमधे ह्या सरासरीने तीन वर्ष धावा काढणारा कोणी निघाला नाही हे दिसत नाही का ?
सर्फराज सुमार खेळाडू आहे.
सर्फराज सुमार खेळाडू आहे. त्याला घेतला तर आनंदाच्या भरात अजून जाड होईल.त्याला संघात घेऊन विनाकारण सूर्यावर अन्याय करू नये.
सर्फराज सुमार खेळाडू आहे.
सर्फराज सुमार खेळाडू आहे. त्याला घेतला तर आनंदाच्या भरात अजून जाड होईल.त्याला संघात घेऊन विनाकारण सूर्यावर अन्याय करू नये.
>>
उनकी सुमारता के बारेमे कुछ बताईये...
सूर्या ला फक्त टी 20 ला खेळावावा
सध्याचं वय बघता लाँग टर्म खेळवता येईल तिथे.
टेस्ट च काय, वन डे ला सुद्धा सूर्या नको
लॉयन असता तर गोष्ट वेगळी होती
लॉयन असता तर गोष्ट वेगळी होती.
>>
मी काल हे म्हणालो असतो. पण आज सकाळच्या 6 विकेट्स बघता ऑसीज मॅनेज ,करतील असं वाटतं
काहीच नाही तरी, इंग्लिश
काहीच नाही तरी, इंग्लिश बॅटस्मन चांगले शेकून निघतील हे हे नक्की आहे.
बाकी क्लिक बेटकडे दुर्लक्ष करे रे. आपले एक सर पुरे आहेत
थोडं वेगळं मत मांडतो. परवा
थोडं वेगळं मत मांडतो. परवा इंग्लंडची बॅटिंग बघितली. प्रत्येक बॉल तडकावण्याचा प्रयत्न बघून कंटाळा आला. टेस्ट क्रिकेट असं unidirectional नसतं असं मला वाटतं. test cricket is all about adaptability. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ह्या आचरटपणाला चांगलं प्रत्त्युत्तर दिलंय असं वाटतंय.
आज वेगळ्या मतांचा शुक्रवार
आज वेगळ्या मतांचा शुक्रवार आहे माझा. सर्फराझला संधी मिळावी असं माझंही मत आहे. पण त्याच्या अॅटिट्यूडविषयी प्रतिकूल मत पहिल्यांदा नाही ऐकलंय. मागे सुद्धा जेव्हा तो मुंबईकडून उत्तर प्रदेशकडे गेला होता तेव्हा ही कुजबूज ऐकली होती. क्रिकेट हा टीम स्पोर्ट आहे. ड्रेसिंग रूममधे ही लोकं इतका वेळ एकत्र घालवतात कि कंपॅटिबिलिटीचा मुद्दा अगदीच दुर्लक्षित करता येत नाही. त्याचे इश्यूज सॉर्ट आऊट होऊन त्याने इंडियन टीममधे यावं आणि घवघवीत यश मिळवावं ह्यासाठी त्याला भरभरून शुभेच्छा!
Pages