चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी अमि, शाब्बास तुझी Happy इतकी कमी, चुकीचीपण माहिती देऊनही तू बरोब्बर सांगितलास चित्रपट. >>>> धन्यवाद Happy

मेट्रो ८ ए ए म अशा नावाचा चित्रपट दिसला. त्यात गुलशन देवरा आवडीचा दिसल्याने बघणे सुरू केले..साधारण तास भर बघितला. बरा वाटत असताना उदास वाणा वाटायला लागला मग थांबले. कुणी पाहिलाय का?

बीबी और मकानपेक्षा बनवा बनवी चांगला आहे. >> त्याबद्दल काहीही म्हणायचे नाही. अगदी वाईटातल्या वाईट कलाकृतीपासून जरी प्रेरणा घेतलेली असेल तरी श्रेय द्यावे असे वाटते.

बनवाबनवी आला होता तेव्हां बालगंधर्व मधे नारायणराव राजहंस यांच्या तसविरी पाहताना कथा सुचली असे छापून आले होते. म्हणजे आपल्या महागुरूंनीच ते महान वक्तव्य केले होते. तेव्हांपासून आजवर कधीही बीवी और मकान आणि बनवाबनवी इतके एकसारखे कसे याबद्दल त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही.

हो आचार्य, फार बंडल आहे. हिंदी गाणी व डबिंग मधे स्वर्गातला इंद्र व शकुंतला, दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. बघवत नाहीत. तो कण्व मुनी झाला आहे. सगळे त्याला 'कणव' मुनी म्हणण्याने आपल्याला शकुंतलेबद्दल कणव वाटत नाही.
जिवाचे हाल करून घेऊ नका. दुसरं काही बघा.

सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा >> Rofl

इंद्र व शकुंतला, दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलता >> Lol

त्यांना सर्व भाषा येतात. आपल्या सोयीसाठी ते हिंदी / उर्दू / मराठी बोलतात.

अस्मिता Lol

शाकुंतलमही खरे म्हणजे हिंदीत डब होउन "मै हूँ नं १ प्रिन्सेस्/ऋषीकन्या" अशा काहीतरी नावाने यायला हवा.

अस्मिता. Lol

आचार्य, तुम्ही आधी दहाड संपवा बघू. Proud

रिसायकल्ड मिशा Lol
मै हूँ नं १ प्रिन्सेस्/ऋषीकन्या Lol

-----
heiress म्हणजे भरपूर इस्टेटीची स्त्री वारसदार. 'भरपूर' नोट करा. Paris Hilton ही Hilton empire ची heiress आहे. दोन एकर शेती, एक पितळंचा तांब्या, दोन पळ्या वगैरे जर एखाद्या काकीला वाटणीत मिळाल्या असतील तर तिला कुणी heiress म्हणत नाही. Happy

Submitted by अस्मिता. on 28 May, 2023 - 07:45

Happy

आणि याचा उच्चार एअरेस असा करावा हेअरेस नाही!
पर्सन इज एअर टु प्रॉपर्टी!
जरा हवा येउ द्या!

Paris Hilton >> हे नाव ऐकले कि पॅरीसचा पुण्यातील रेंजहिल्स सारखा भाग असावा असे वाटते.
झरिना वहाब हे नाव लहान असताना ऐकले कि झरा वाहतो असे वाटायचे.

भीड बऱ्यापैकी अवस्थ करणारा सिनेमा आहे
स्टार कास्ट एकदम तगडी आहे
राजकुमार राव, पंकज कपूर, दिया मिर्झा, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा
आणि ब्लॅक अँड व्हाइट मध्ये घेतल्याने अजून इफेक्ट जाणवतो

पण सगळ्या मुद्यांना दाखवण्याच्या नादात पकड निसटली आहे शेवटी
दोन तीन गोष्टींवरच फोकस केला असता तर चाललं असत अस वाटलं

एकदा बघण्यासारखा आहे
अचानक लॉक डाऊन केल्याने स्थलांतर करणाऱ्या लोकांचे हाल झाले त्यावर आहे
त्यातली एक प्रातिनिधिक घटना

अस्मिता Lol

अस्मिता तुला स्पेशल धन्यवाद, बंडल पिक्चर्स बघून ते सहन करून आम्हाला त्याच्या जाचातून वाचवतेस.

दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. बघव
<<<<<<
यु मेड माय डे , अस्मिता Rofl

दुर्वास मुनी मधेमधे ऊर्दू बोलतात. सचिन खेडेकरच्या भुवया ह्या दुसऱ्या कोणाच्या तरी रिसायकल्ड मिशा आहेत. >>> Lol खतरनाक

आचार्य, तुम्ही आधी दहाड संपवा बघू. >>> Lol हो आणि मग कळवा इथे. म्हणजे जुन्या महाभारत सिरीयल मध्ल्या अस्त्रांसारखे सर्वांना एकमेकांवर स्पॉयलर्स सोडता येतील Happy

हो आणि मग कळवा इथे. म्हणजे जुन्या महाभारत सिरीयल मध्ल्या अस्त्रांसारखे सर्वांना एकमेकांवर स्पॉयलर्स सोडता येतील >>> Lol

तिकडे (वेबसिरीज) माबो कोळ्यांना नव्या धाग्याने जाळे विनण्याची विनंती केली होती. पण एकाही कोळियाने मनावर घेतली नाही. Lol

अस्मिता तुला स्पेशल धन्यवाद, बंडल पिक्चर्स बघून ते सहन करून आम्हाला त्याच्या जाचातून वाचवतेस. >>> या कामाची तुलना शेणादगडाचा मारा सहन करून लोकांना त्यातून बाहेर काढणार्‍या थोर समाजसुधारकांच्या कार्याशीच करता येईल. Light 1

रिसायकल्ड मिशा >> Biggrin

त्या शाकुंतलमच्या ट्रेलरमध्येच समंथाचे constipated looks बघून निराशा झाली होती .

सगळे त्याला 'कणव' मुनी म्हणण्याने आपल्याला शकुंतलेबद्दल कणव वाटत नाही.
>>>> Rofl Rofl

Pages