चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

विक्रम वेधा पाहिला
हृतिक आणि सैफ
डाव प्रतिडाव चांगले आहेत.
स्टोरी खुलत जाते.
पण ह्याच मार्गाने का गेला किंवा जायचे हे कळाले नाही.

कठल - सो सो वाटला
डार्क ह्युमर असेल असं वाटलेलं, प्रयत्न बऱ्यापैकी तसाच होता, तगडी स्टार कास्ट होती
पण म्हणावं तितका अपेक्षित परिणाम होत नाही
ना धड फार्सीकल, ना विनोदी आणि ना डार्क
सगळ्याचा गुंता
शेवट तर बऱ्यापैकी हास्यास्पद
आणि स्पॉयलर अलर्ट

चोर दाखवले आहेत ते तर पटण्यापलीकडे, 15 किलोचे दोन फणस काहीही सुगावा न लागू देता लंपास करणे हे शक्य नाही

15 किलोचे दोन फणस काहीही सुगावा न लागू देता लंपास करणे हे शक्य नाही>> वास नाई येणार ?! बरोबरे.

>>>>>चोरांच्या मानाने
>>> वास नाई येणार ?
लॉजिकली ते सर्व बरोबरे पण गावातील वातावरणनिर्मिती बघा.
शंकर पाटलांची आठवण येते मला.

15 किलोचे दोन फणस काहीही सुगावा न लागू देता >>>> कुठला पिक्चर हा. मला आमची लहानपणीची फणसचोरी आठवली. Happy

कटहल

मला आमची लहानपणीची फणसचोरी आठवली>> सर स्पॉयलर अलर्ट आहे, कृपया सिनेमा बघा आणि मग मी मी माझं माझं चं तुणतुणे सुरू करा
डोंगर जाळण्यापासून ते फणस चोरीपर्यंत सगळं तुमचं लहानपणीच करून झालंय हे आता वैश्विक सत्य आहे
विश्वगुरु नंतर सगळं लहानपणीच करून बसलेले तुम्हीच आहात

सानिया गोड दिसते.>> हो तिच्या होरीसोबत लाडात येण्यापासून ते त्याला झापण्यापर्यंत आणि आपलं काम काय आहे, काय करतो आहोत याची चिडचिड न दिसू देता होय सर म्हणून फोर्स कामाला लावण्यापर्यंत सगळं मस्त उभे केले आहे
तिने एकटीने सगळा सिनेमा उचलून धरलाय

'कटहल' असेल का ते नाव? हिंदीत फणसाला कटहल म्हणतात, त्यावरून विचारते आहे - मी सिनेमा पाहिलेला नाही.
लॉजिक गंडलेलं असेल तर पाहाणारही नाही. Proud

कच्च्या फणसाचा पण वास येतो का? लोणच्या साठी कच्चच हव होत ना अंकल हॉन्ग?
मला आवडला. सानियाच काम मस्त झालं आहे

मला आवडला कटहल.
हलका फुलका आहे.
सानियाचं काम छान झालं आहे.

तिने एकटीने सगळा सिनेमा उचलून धरलाय>>> +१ मस्त आहे तिचा वावर, तिच्यामुळे सिनेमा शेवटपर्यत बघावासा वाटतो.

काल भोला अर्धा पाहिला. अगदीच कथ्थी सारखा आहे. प्रसंगही तसेच.
अलिकडे अजय देवगण सिनेमे बनवेपर्यंत साऊथवाले त्याची कल्पना ढापून त्याच्या आधीच रिलीज करतात सिनेमे.
सिंघम , दृश्यम, भोला..

आचार्य Lol
अजय देवगण तिकडचे हिट सिनेमे घेऊन इकडे त्याचं दुकान चालवतो जे अमेरिकेत पुण्याहून आलेली चितळे बाकरवडी मऊ पडते तसं झालंय.

मला दृष्यम २ विशेष वाटला नाही. तो नवीन विमानाचा तर बघितलाही नाही. कंटाळा आला आहे ह्या कधी ओव्हर कधी अंडर ॲक्टिंगचा. साऊथवाले नेहमी ओव्हरच करतात पण डबिंग व्हर्जन मधे अजय दे स्वतःचं काही तरी घुसडतो. त्यानं व्हिलनच करावा 'खाकी' सारखा.

तुम्ही उपरोधाने म्हटले असेल तर एक >>> अर्र्र अस्मिता - असे विचारावे लागले म्हणजे ह्यूमर कोशंट ०.००१ ने कमी झाला. लौकर भरपाई करणे.

Lol

Lol

चितळे बाकरवडी ने भरपाई केली आहे >>> Lol

भोला मधले फाईट सीन्स पाहताना कधी काळी देव दानव युद्धे अशीच झाली असतील याची खात्री पटते. अजय देवगण च्या अंगातून रक्त काढणार्‍या खलकार्यकर्त्याचं कौतुक वाटलं.

क्रिकेट मधे कपिलचा रिव्हर्स स्विंग असावा तशा मोटरसायकल्स हवेत स्विंगिंग इन होत असताना हलकासा ठुलका घेऊन आऊटस्विंग होतात.

जेनेलिया पंख्यांसाठी - वेड आला आहे डिस्नेवर Happy

Lol परफेक्ट. अशा मऊ पडणार्‍या बाकरवड्यांचे बरेच रिटेलर्स आहेत - अक्षय कुमार (राउडी राठोड), कार्तिक आर्यन (शहजादा), आमिर खान (गजनी). अजून असतील. अर्थात जितूजी हे यातले आद्य घाउक व किरकोळ विक्रेते.

नाहीतर एकेकाळी डॉन, अमर अकबर अँथनी वगैरेंचे रिमेक रजनी वगैरेंना घेउन तिकडे होत.

क्रिकेट मधे कपिलचा रिव्हर्स स्विंग असावा तशा मोटरसायकल्स हवेत स्विंगिंग इन होत असताना हलकासा ठुलका घेऊन आऊटस्विंग होतात. >>> Lol

Pages