Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाहीतर एकेकाळी डॉन, अमर अकबर
नाहीतर एकेकाळी डॉन, अमर अकबर अँथनी वगैरेंचे रिमेक रजनी वगैरेंना घेउन तिकडे होत. >>>
अजूनही होतात. तेही हिंदीतल्या हिट सिनेमांचे रिमेक करण्यात काही मागे नाहीत.
क्रिकेट मधे कपिलचा रिव्हर्स
क्रिकेट मधे कपिलचा रिव्हर्स स्विंग असावा तशा मोटरसायकल्स हवेत स्विंगिंग इन होत असताना हलकासा ठुलका घेऊन आऊटस्विंग होतात.
>>>> मेले हसून हसून
अशा मऊ पडणार्या बाकरवड्यांचे बरेच रिटेलर्स आहेत - अक्षय कुमार (राउडी राठोड), कार्तिक आर्यन (शहजादा), आमिर खान (गजनी). अजून असतील. अर्थात जितूजी हे यातले आद्य घाउक व किरकोळ विक्रेते.>>>
फा याठिकाणी जितूंजींच्या मागे लागून त्यांना नको असलेला यावर्षीचा 'जीवनगौरव' देऊनच सोडणार आहेत असे दिसतेय.
अनिल कपूर पण का , मृ

घेवाणदेवाण चालली आहे मऊ बाकरवडीची, अक
फा याठिकाणी जितूंजींच्या मागे
फा याठिकाणी जितूंजींच्या मागे लागून त्यांना नको असलेला यावर्षीचा 'जीवनगौरव' देऊनच सोडणार आहेत असे दिसतेय. >>>
अनिल कपूर राहिले-लाडला,जुदाई, हमारा दिल आपके पास है,हम आपके दिल मे रहते है आणि बरेच... >>> ओह हे माहीत नव्हते.
अक - सध्या त्यांचे चित्रपट इतके "रिच" आहेत की हिंदीतून काही आणावे लागेल असे वाटले नव्हते.
बाकरवडी
बाकरवडी
बाकरवडी आणि रिव्हर्स स्विंग -
बाकरवडी आणि रिव्हर्स स्विंग -
रोचक माहिती
रोचक माहिती

लहाणपणी समस्त महिला गैंग, आजी,आई,काकवा थिएटरमध्ये जाऊन पाहून आलेल्या प्रसिद्ध सिनेमा आपला नाही..
अलका कुबल - माहेरची साडी(१९९१)
हा ओरिजिनल puttinti pattu cheera(१९९०)
https://youtu.be/zHhVbJ8Maoo
इथे रिवर्स, अशी हि बनवाबनवी (१९८८) आपला त्यांनी ढापला.
Chitra bhalare vichitram(१९९१) रिमेक
https://youtu.be/8uMe8wUXTVU सेम टु सेम सॉंग पण.
हा ओरिजिनल puttinti pattu
हा ओरिजिनल puttinti pattu cheera(१९९०) >> अॅक्चुअली हा पण ओरिजिनल नाही. ओरिजिनल १९८३ चा महियर नी चुंदडी आहे आणि माहेरची साडी हा या गुजराती सिनेमाचा रीतसर हक्क मिळवून केलेला ऑफिशिअल रिमेक आहे (संदर्भ: एकटा जीव. दादा कोंडके या गुजराती सिनेमाच्या निर्माते-दिग्दर्शकाचे मित्र. माहेरची साडी दादांचे पुतणे विजय कोंडकेंचा सिनेमा.) काही सोर्सेस ओरिजिनल १९८८ राजस्थानी बाई चाले ससुरिएला मानतात जेही चुकीचे आहे कारण राजस्थानी चित्रपटही मूळ गुजरातीवरून बेतलेला आहे.
मूळ गुजराती चित्रपट - https://youtu.be/ho2Sbflbrew
अशी हि बनवाबनवी (१९८८) >>>
अशी हि बनवाबनवी (१९८८) >>> हा ऋषीकेश मुखर्जींच्या बीबी और मकान १९६६ वरून श्रेय न देता बनवलेला आहे.
साऊथच्या अॅक्शन सिनेमांची सुरूवातच बॉलीवूडवरून ढापाढापी करून झाली आहे. रजनीकांतचे सुरूवातीचे बरेचसे सिनेमे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्ह्याच्या सिनेम्यांवरून घेतलेले आहेत. सन्नी देओल चा अर्जुन दक्षिणेत सूर्याने बनवला. त्या वेळीही के भाग्यराज आणि कमल हासनचे सिनेमे साऊथमधून हिंदीत यायचे. शंकराभरणम, स्वातीमुथ्थम हे ठळक आहेत.
ओरिजिनल १९८३ चा महियर नी
ओरिजिनल १९८३ चा महियर नी चुंदडी आहे >>>>
मुखर्जींच्या बीबी और मकान १९६६ वरून >>>>
ओह हे माहीत नव्हते.
आमिर खान (गजनी)
आमिर खान (गजनी)
>>>> जाहिर णिषेध… आवडलं मला यात आमिरचं कॅरॅक्टर व अभिनय पण. ओरिजिनल नाही पाहिलाय. तरीही मी काहीतरी भन्नाट करतोय असं दाखवायला जात नाही तोवर आमिर खान चांगलं काम करतो.
बाकी बाकरवड्यांबद्दल सहमती….
भोला बघितला..
भोला बघितला..
ग्राफिक्स जास्त वाटले.. लव स्टोरी add केली आहे हिरोची..
शेवट मोस्टली मैच केला आहे..एकंदरीत चांगला आहे.
त्या वेळीही के भाग्यराज आणि
त्या वेळीही के भाग्यराज आणि कमल हासनचे सिनेमे साऊथमधून हिंदीत यायचे. शंकराभरणम, स्वातीमुथ्थम हे ठळक आहेत. >>> हो अगदी १९८० च्या आसपास जितेंद्रचे अनेक चित्रपट तिकडून आले. हिम्मतवाला च्या आधीचेही. बहुतांश अफाट मेलोड्रामा टाइप होते. पुण्यात "वसंत" ला लागत. कौटुंबिक लोक आधी मंडई वगैरे करून मग डोक्याची मंडई करायल बघत. पुढे "मंगला" वर बच्चन असे. पण हिम्मतवाला/तोहफा ची लाट आली तेव्हा त्याच्या पिक्चर्सचा दर्जा घसरला होता. नास्तिक, कुली ई.
ही एक खारे वारे दिशेने आलेली बाकरवडी:
ओरिजिनल जस्टिस चौधरी. एनटीआर. गरागरा फिरणारी लायब्ररी व कॅमेरा. एकाच रूम मधे पन्नासएक कॅमेर्यांतून शूट केलेले गाणे वाटते. राजकपूर ते राम गोपाल वर्मा या रेंजमधले कॅमेरा अँगल्स एकाच गाण्यात आहेत. त्यात जस्टिस साहेब पुराणकाळातील दाखले देतात त्यातही बहुधा एनटीआर च्याच क्लिप्स आहेत असे वाटले. नीट माहीत नाही.
https://www.youtube.com/watch?v=3NoIbeMeuvA
आणि हे जितूजी. सगळा सेट सेम वाटतो. हात मागे घेउन प्रशस्त हॉलच्या एका टोकाकडून दुसरीकडे चालत जाण्याची स्टाइलही तीच. होपफुली चिरूट तरी नवीन वापरले असावे. यात पुराणातील दाखल्यांऐवजी भिंतीवर शास्त्री/नेहरू ई आहेत.
https://www.youtube.com/watch?v=aLJOc_neJVc&t=1422s
आणि ही मतलई वारे दिशेने गेलेली बाकरवडी.
अमिताभचा डॉन
https://www.youtube.com/watch?v=E7iFA58pgy8
रजनीचा "बिल्ला". सलीम-जावेद चा स्क्रीनप्ले व इतरांचा, यातील फरक दोन मिनिटांत दिसतो.
https://www.youtube.com/watch?v=AAC8hBFP900&t=290s
भारी आहे ही पोस्ट फारएण्ड.
भारी आहे ही पोस्ट फारएण्ड. स्वतंत्र धागा होईल या विषयावर.
गुंजनजवळ राहत असताना शाळेतून लवकर आलो कि ३ ते ६ चा शो बघायला जायचो आम्ही. त्या वेळी सुपरहीट झालेल्या पिक्चरची चर्चा मुलांमधे चालायची. जितेंद्र श्रीदेवी लाट असताना त्यातली गाणी, कादरखानची कॉमेडी पाहिली नाही का असे विचारायचे. डीबेस जाऊन फॉक्सप्रो मग फॉक्सप्रो व्हिजुअल आल्यावर आलेलं अपडेट आपल्याला माहीती नसल्यावर कसं वाटायचं तसंच व्हायच. त्यामुळे जस्टीस चौधरी पासून जितेंद्र श्रीदेवीचे बरेचसे सिनेमे पाहिले. हिम्मतवाला खूप उशिरा पाहिला. पण आपण पाहिला नाही असा बट्टा लागायला नको या भावनेने कर्तव्य पार पाडलं.
बिल्ला आणि डॉन मधे जमीन अस्मानाचा फरक आहे. मोठा फरक अमिताभ आणि रजनीतला आहे. सलीम जावेद यांची स्क्रिप्ट आणि अमिताभ बच्चन हे डेडली काँबीनेशन होतं. मलिक, मेहरा आडनावाचे लोक भारी वाटायचे. घार्या डोळ्यांचा डॉनचा राईट हॅण्ड , हेलन, बिंदू, परवीन बाबी असे लोक देवलोकातून आल्यासारखे वाटायचे. बिल्ला मधलं मंडळ नरकातल्या मोठ्या कढईतल्या गरम तेलात तळून काढल्यासारखं वाटतं.
आणि ही मतलई वारे दिशेने
आणि ही मतलई वारे दिशेने गेलेली बाकरवडी. >>>
अमिताभ च्या हम पेक्षा त्याच्या वरून उचललेला रजनी चा बाशा मात्र (मला तरी) फार उजवा वाटतो.
“होपफुली चिरूट तरी नवीन
“होपफुली चिरूट तरी नवीन वापरले असावे.” -
कुठे विचारू कळत नाही. पण हा
कुठे विचारू कळत नाही. पण हा धागा चित्रपटांचा तर इथेच विचारते. आधीच क्षमस्व.
एक हिंदी चित्रपट- नवरा कर्दनकाळ, बायकोचा अतोनात छळ. शेवटी सासू मदत करते अन त्याचा खून होतो. अशी कथा असलेला राजस्थानच्या पार्शभूमीवरचा चित्रपट. एव्हढचं खात्रीशीर आठवतय.
बाकी सगळं अंधूक. जसं सासूच्या भूमिकेत बहुदा वहिदा रेहमान होती? मुलगा दुसऱ्या लेव्हलचा नायक होता. बॉबी देवल किंवा तत्सम? तर चित्रपट कोणता हे कोणी चित्रपट दर्दी सांगेल का? फार दिवस डोक्याला भुंगा लागलाय
कुठे विचारू कळत नाही. पण हा
कुठे विचारू कळत नाही. पण हा धागा चित्रपटांचा तर इथेच विचारते. आधीच क्षमस्व.>>>> कोइ मेरे दिल से पुछे ????
वहिदा रेहमान मुळे जया बच्चन,
वहिदा रेहमान मुळे जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांचे भाऊ बहीण होतात.
"फागुन" मधे वहिदाजी जयाजींच्या आई झाल्या आहेत. "त्रिशूल" मधे अमिताभच्या तर "ओम जय जगदीश" मधे अभिषेकच्या. एकाच आईची लेकरं !
ऐश्वर्याच्या आईचा रोल केला असता तर एक भावंड वाढलं असतं.
The Songs of Scorpion (२०१७) मधे वहिदा रेहमान सासूच्या भूमिकेत आहेत. पाहिलेला नाही. त्यामुळे तोच आहे का माहिती नाही.
अमि, रघु बघते. थँक्यु
अमि, रघु बघते. थँक्यु
मी अमि, शाब्बास तुझी इतकी
मी अमि, शाब्बास तुझी
इतकी कमी, चुकीचीपण माहिती देऊनही तू बरोब्बर सांगितलास चित्रपट. थँक्यु सो मच
रघु आचार्य काय लॉजिक
मी सुध्दा त्याच (साँग ऑफ द
मी सुध्दा त्याच (साँग ऑफ द स्कॉरपियनस) पर्यंत पोहोचलेलो. वहिदा रहमान - other movies - म्हाताऱ्या बाईंचा रोल करतील अश्या काळातले सिनेमे - सासू - तो सिनेमा.
मला जया, वहिदा का वाटली, हा
मला जया, वहिदा का वाटली, हा गहन प्रश्न आहे
Crash landing on You -
Crash landing on You - नेटफ्लिक्स बघत आहे.
स्टोरी टाईपायला कंटाळा म्हणून गूगाळून कॉपीपेस्ट करतो.
A paragliding mishap drops a South Korean heiress in North Korea - and into the life of an army officer, who decides he will help her hide
मस्त आहे. बॉलीवूड टच आहे. मजा येत आहे बघायला. रोमांटीक ॲंगल फार आवडला आहे. मूळ भाषा कोरीअन असल्याने बायकोने हिंदी डब वर्जन लावले आहे त्यामुळे मलाही झेपत आहे. दिड दिड तासाचे पिक्चरसारखे मोठमोठे एपिसोड सलग बघणे चालू आहे
heiress म्हणजे काय ?
heiress म्हणजे काय ?
स्त्री वारसदार
स्त्री वारसदार
धन्यवाद कॉमी. माझा पुन्हा
धन्यवाद कॉमी. माझा पुन्हा गूगाळून घ्यायचा त्रास वाचवलात.
या ॲंगलमुळे जब वुई मेट या चित्रपटाची आठवणही येत आहे.
IB71 पाहिला. आवडला. कुठे ही
IB71 पाहिला. आवडला. कुठे ही कंटाळा आला नाही.
Overall बालिश वाटला पण सत्यकथेवर आधारित आहे.
वि.ज. रूबाबदार दिसतो.
कठहल बघितला, आवडला. राजपाल
कठहल बघितला, आवडला. राजपाल यादव व रघुवीर यादव दोघेही आहेत या सिनेमात. त्यात रघुवीर यादवला दलालाच्या रोलमध्ये कधी बघितल्याचे आठवत नाही. सगळ्यांची कामं आवडली. सिनेमा सेक्सिस्ट व पुरूषसत्ताक मतांना हलकेफुलके धक्के देतो . तेही subtly , तलवार घेऊन नाही. ते आवडलं, चांगलं blend-in झालंय असं वाटलं.
-----
heiress म्हणजे भरपूर इस्टेटीची स्त्री वारसदार. 'भरपूर' नोट करा. Paris Hilton ही Hilton empire ची heiress आहे. दोन एकर शेती, एक पितळंचा तांब्या, दोन पळ्या वगैरे जर एखाद्या काकीला वाटणीत मिळाल्या असतील तर तिला कुणी heiress म्हणत नाही.
फा
फा
दोन्ही लिंक व पोस्ट धमाल आहे. नवीन धागा होऊ शकतो.
भेडीया बघितला. चांगला आहे,
भेडीया बघितला. चांगला आहे, कॉमेडी वन टाईम वॉच. लांडग्यांच्या पौर्णिमेला ओरडण्याशी (मराठी शब्द माहित नाही, कोल्हेकुई असते तसं लांडग्याच्या बाबतीत काही शब्द आहे का?) हिमेशच्या 'ओ ssss हुजूर'ला जोडल्याचा सीन बेस्ट आहे.
Pages