आई कुठे काय करते!-२

Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00

आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<अनुपमामध्ये तिच्या मोठया मुलाला पॅरालाईज झालेला दाखवला आहे.>>>

इकडे अभि मात्र एकदम टुणटुणीत आहे, आईकडे त्याने टोमॅटो साराची फर्माइश केली, अनघा त्याच्या डोक्याला लागलेल्या मारासाठी (दाखवताना मात्र मानेचा दाखवला) स्वतःला दोष देते आहे, एकुण काय अभिच्या आयुष्यात सगळं नॉर्मल चाललंय.

एकुणच अरु च्या लग्नाच्या वेळी अचानक समजूतदार झालेले सगळे समृद्धी मेंबर्स आता नॉर्मल झालेत. इशा ला आपल्या वडिलांवर पडणार्या आर्थिक ताणाचा विचार न करता थीम साखरपुडा हवाय, ती परत अरूंधतीला दोष द्यायला लागलीय. अनिरुद्ध संजना भांडणांमध्ये कांचन अनिरुद्ध ला रसद पुरवतेय. अप्पा स्वतः चा अल्झायमर विसरुन सगळं उरकल्यावर नेहमी प्रमाणे संजना ची समजूत काढताहेत आणि यश गौरी वियोगाच दु:ख घेऊन हे सगळं फ्रंटसिट वर बसुन बघतोय.
तिकडे अनिश ला इतक्यातच कळलय म्हणे की तो समृद्धी त आल्यामुळे अनिरुद्ध चा संताप होतो, त्यामुळे पंतग उडवायला येणारा तो आता अभिचा ऍक्सिडेंट झाला तरी आला नाही.

अभिषेकच्या डोक्याला लागलं होतं ना? मग ब्लड क्लॉट तयार होईल आणि पुढे पॅरालिसिस होईल.

या मालिकेत चांगलं काय असेल तर स्टार प्रवाहवरची ही एकच मालिका आहे जीत कोणी कोणाचा (म्हणजे आपल्याच नात्यातल्या, घरातल्या लोकांचा) खून करायचा किंवा शारीरिक हानी पोचवायचा प्रयत्न करीत नाही. वासरांत लंगडी गाय. पण त्याची भरपाई करायला विबासं , अफेअर्स, ब्रेक अप्स यांचा ओव्हरडोस. कांचन , सुलेखा आणि कांचनची मुलगी सोडल्या तर सगळ्यांचं कुठे काय ना काय चालू आहे किंवा होतं.

अवांतर - महाराष्ट्र शाहीर चित्रपटातला अश्विनी महांगडेचा फोटो पाहिला. ती अगदी चारुशीला साबळेंसारखी दिसते आहे.

हिन्दी मध्ये अभि ला पॅरालिसिस अनिरुद्दशी भाण्डल्यानन्तर झाला आहे. प्रॉपर्टी साठी भाण्डतो, नन्तर त्याला हार्ट अ‍ॅटेक येतो, मग पॅरालिसिस होतो.

इतके गंडलेले संवाद - सापुची तारीख काढायला आलेत आणि गुरुजींचा सहज फोन आल्यावर तारीख कोण विचारतं ?
मुलाचे आई- वडील नाहीतच ठरवायला. त्यांना असं काय काम असणारे ? द्यायला पैसे नाहीत म्हणून कमीत कमी सीन्समधे आहेत बिचारे.
इशाचा पॅटर्न आहे - ती आक्रस्ताळेपणा करते आणि मग एका फटक्यात समजूनही घेते. आशुरुच्या लग्नाच्याही वेळी तसचं.
आज कांचनने जोरदार फटकेबाजी केली बोलणी करताना.

मुलाचे आई- वडील नाहीतच ठरवायला. त्यांना असं काय काम असणारे ? द्यायला पैसे नाहीत म्हणून कमीत कमी सीन्समधे आहेत बिचारे. >> ते इंदूर ला गेले ते सुद्धा गुपचूप , कोणाला न सांगता, कोणाचा निरोप न घेता .

ही लोकं सतत इशाची काळजी करतात. त्याने इशाला संभाळले पाहिजे, तिला फसवायला-दुखवायला नको. सगळं इशाच्या मनाप्रमाणे होऊ दे.. याऊ अन त्याऊ! पण एकालाही अनिषची काळजी वाटली नाही. इशाचा थयथयाट त्याला आयुष्यभर झेलावा लागणार आहे.
ती आक्रस्ताळेपणा करते आणि मग एका फटक्यात समजूनही घेते. >>+१ अनिषसुद्धा काल लगेच बदलला. आतापर्यंत मी तुझी पंचींग बॅग होईल, तुला हवे तसेच होईल म्हणणारा अनिष एकदम साधा साखरपुडा मान्य नसेल तर आताच नकार दे म्हणाला.

<<<अनिषसुद्धा काल लगेच बदलला. आतापर्यंत मी तुझी पंचींग बॅग होईल, तुला हवे तसेच होईल म्हणणारा अनिष एकदम साधा साखरपुडा मान्य नसेल तर आताच नकार दे म्हणाला.>>>

सोनल फार हसले मी, अनिश खरच लेखिकेच्या सोईसाठी अर्धा तास वेगळ्या ट्रॅक वर फिरुन आला.

आजच्या भागात अभि अनघाला म्हणाला, " बाबा आईशी जे लागले त्यावरून आपण त्यांना जज करतो, पण एक मुलगा आणि वडिल म्हणून ते फार चांगले आहेत?"

मी तर हतबुद्ध झाले ते ऐकून. अनिरुद्ध चे संजना शी अफेअर करणं हा फक्त अरुंधती चा प्राॅब्लेम आहे? त्यामुळे त्याच्या आई वडिलांना आणि मुलांना त्रास नाही झाला? त्यांना होणार्या त्रासाची त्याने कधी पर्वा केली? शिवाय स्वतंत्र पणे कांचन ला घराबाहेर काढले, इशा ला कोंडुन ठेवले, अभिच्या अनघाशी होणार्या लग्नात विघ्न आणली, घराचे पेपर्स परस्पर कुणाकडे तरी गहाण टाकायला निघाला होता! लेखिका विसरते आणि त्यामुळे अभी दिवसेंदिवस जास्तच निर्बुद्ध वाटतो.

ईशाला यांनी कौन्सेलिंग दिलं हो तं ना मागे? ते सतत द्यायला हवं. पळून जाऊन लग्न करायची वेळ आली होती. आता घरचे लग्न लावून देतात तर थाटमाट हवा? सध्या संजना सोडली तर कोणालाच कामधंदे नाहीत. अरुंधतीच्या कॉलेज आणि म्युझिक स्कूलला तर तिच्या लग्नानिमित्त वर्षभर सुट्टी आहे.

वेगळा धागा नाही, म्हणून इथेच लिहितो. तू चाल पुढे मालिकेतला एक संवाद - घटस्फोट घेतलेल्या बाईला तिचा मित्र म्हणतो, अगं पण तू अल्युम्नी नको सांगितलंस ना? alimony चं alumni केलं. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता यांच्यातल्या कोणालाही कळलं नाही.

भरत.. Lol ...
काहीही चाललंय.
ईशा किती आक्रस्ताळेपणा करते!. काय आवडलं हिच्यात त्या अनीश ला?
आले लेखिकेच्या मना..तिथे अनीश चे चालेना....
आशु आणि त्याची आई..गोडगोड वागून -बोलून अति वाटायला लागलेत..नॉन ह्युमन!!

आता अनिष साठी आणलेली अंगठी हरवली आहे!
यांचं हे नेहमीचेच आहे! Angry
मागे अभि च्या पाहिल्या साखरपुड्याच्या वेळी मारे हिर्‍याची अंगठी आणलेली त्या अंकिता साठी..आणि ती अविनाश च्या बायकोने चोरलेली.

मग अर्थातच झुंजार अरु ने ती परत मिळवली आणि या कानाचे त्या कानाला कळू दिले नाही.....!!
आताही तसेच काही असेल!!!!
लेखिका फार विसरते आणि तेच ते प्रसंग चित्तथरारक म्हणून लिहिते...याला काय म्हणावे..??

ईशाला आधीपासून छानछोकी आवडते. आठवा संजनाने ईशाच्या वाढदिवसाला मोठया हॉटेलमध्ये दिलेली पार्टी आणि अरुने घरी केलेला केक आणि फुगवलेले फुगे. तेव्हाही ईशाने तेव्हड्यापुरती माफी मागून प्रकरण निभाऊन नेले होते. परत येरे माझ्या मागल्या. अरुच्या तीनही मुलांना उपचाराची गरज आहे.

अरुच्या तीनही मुलांना उपचाराची गरज आहे.>>> तिघांनाही झटके येतात. कधी चांगले वागण्याचे तर कधी तिरसटलेपणाचे. बापावर गेलेली आहेत तिघं.
गौरी थोडक्यात सुटली. अनघा पस्तावतेय अधेमधे. आता अनिशवर राज्य आहे.

हा इशाचा डायलॉग मला फारच आवडला तुम्ही सगळे दोन दोन वेळा लग्न करताय आणि माझ्या मात्र पहिल्या लग्नातच काचकूच करताय.

पहिल्या लग्नातच काचकूच करताय.>>अगदी.
अरू पण किती गूळलाऊन कि इशाने घरात खूप भांडणे बघितली आहेत म्हणून ती अशी आहे. बाळ-बाळ म्हणत लग्न लावत आहेत त्यापेक्षा अन्या म्हणत होता तसे दूर शिकायला पाठवायला हवे होते तेही ठराविक पॅाकेटमनीवर.
अनिशवर राज्य Lol

अनिशला दुकानात न नेता त्याच्या मापाची अंगठी कशी काय घेतली ?

बहुतेक दिल चाहता है अँगल आणणार - वीणा यश.

पण अरुंधती च वागणं कुणाला खटकल नाही का ? ती दर वेळी एखाद्या गोष्टीच्या हात धुवून मागे लागते, समोरच्याची ऐकण्याची इच्छा असो अथवा नसो. मागे अभिचा पर्दाफाश करण्यासाठी हट्टाला पेटली होती अन्घाई, आशु, नितीन सगळे थांबायला सांगत होते तरी आणि आता ईशाच्या बाबतीत पण तेच.

इशा संतापली की कोणाचंच ऐकून घेत नाही आणि आपल म्हणणं तिला कधीच पटत नाही ह्या दोन्ही गोष्टी माहिती असताना आणि स्वतः च तिचा साखरपुडा करुन द्यायचा हे ठरवलं असताना आता ह्या प्रवचनांची टेप कशाला. फार तर अनिश ला तिला समजवायला सांगितले तेव्हा त्याच्या कडे सगळ्या हव्या असलेल्या सगळ्या गोष्टींची यादी द्यायची. तिने आता आशुतोष चा, " योग्य गोष्टी पण चुकीच्या वेळी सांगु नये" , हा सल्ला सिरीयसली घेण्याची गरज आहे.

कोणते प्रवचन दिले तिने? ईशाच्या बाबतीत तर मला अरुंधती चे बोलणे योग्य वाटते की ओरबाडून घेऊ नये... जरा मर्यादेत खर्च करावा, बाकीच्या लोकांचा, भविष्याचा, आपल्या स्वतः च्या योग्यतेचा, ऐपतीचा विचार करावा.....
ईशा फारच आक्रस्ताळी आणि उद्धट अहे... म्हणे स्वतः मस्त चैनीत राहतेस आणि आम्हाला काटकसर करायला सांगते !
ईशा केवळ अनिश च्या पैशांकडे पाहून त्याच्या प्रेमात पडलीय का?

हो म्हणण बरोबर आहे तिचं पण इशा ऐकायला तयार नाही हे माहीत असताना स्वतः तेच तेच समजावत असते आणि तिला आक्रस्ताळेपणा करायला स्कोप देते. वर पुन्हा जो दिसेल त्याला तिला समजवायला सांगते. समोरची व्यक्ती आक्रस्ताळेपणा करतेय हे लक्षात आल्यावर परत परत तेच बोलुन फायदा काय? मागे आत्ताच बोलायच म्हणून अभिच्या बाबतीत आग्रह धरला आणि मग अभि डिप्रेशन मध्ये गेला म्हणून रडत बसली. आताही आशुतोष तिला समजवातोय का थोडी थांब तर आत्ता ही तेच.

बाकी <<<बहुतेक दिल चाहता है अँगल आणणार - वीणा यश.>>>>

हे लोक इतकं धाडस दाखवतील असं मला वाटतं नाही. मागे इथे कोणीतरी लिहलेले ना की अरुचा पुनर्विवाह लोकांच्या पचनी पडला नाहीये आणि फेसबुक पेज वर ते शिव्या घालताहेत. अश्या प्रेक्षकांना हे झेपण अशक्य आहे.

नो नो...वीणा यश वगैरे नाही शक्य! ती अनुष्का च तर कुठे गायब केलीय आता कोण जाणे!
Happy बाय द वे, अरु तेच तेच सांगते हे बरोबर आहे..पण मग आपण सुद्धा पालक म्हणून तेच करतो ना.. ? मुलगा ऐकत नसला तरी त्याला जे योग्य आहे तेच सांगत राहतो! त्याला ते तेच ते वाटते आणि त्याचे कान किटतात..हे वेगळे!

पण अरुंधती च वागणं कुणाला खटकल नाही का ? ती दर वेळी एखाद्या गोष्टीच्या हात धुवून मागे लागते, समोरच्याची ऐकण्याची इच्छा असो अथवा नसो. मागे अभिचा पर्दाफाश करण्यासाठी हट्टाला पेटली होती अन्घाई, आशु, नितीन सगळे थांबायला सांगत होते तरी आणि आता ईशाच्या बाबतीत पण तेच.>> मला खटकते नेहमीच. तिच्या डोक्यात काही तरी आदर्शवादी विचार असतात १९७० च्या वेळचे. व दुसृयांच्या डोक्यावर थोपत असते.
सार खेच टोकरले तर कोणीही वैतागेल. इशाची सासू खर्च करते आहे तरी हिला का प्रॉब्लेम? गप्प म्हणून बसत नाही. तेच तेच धुवट बोलत राहते.
आज अन्या बरोबर बोलला तिला. आणि उगीच समृद्धीत का येत असते.?

इशाच्या हातून अनिशची अंगठी हरवणे हे केवळ यशला ती मिळावी आणि काहीतरी आठवून वेळ काढणे होतं.

वीणा यशपेक्षा फार मोठी नाहीये त्यामुळे जमू शकेल. नाहीतरी ह्यांचे सगळे नातेवाईक देशमुख-संजना-आशु ह्याच घराण्यात फिरतात.

Pages