ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..
बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.
क्रिकेट भारतीयांचा आवडता खेळ आहे. आपल्याला तो खेळायला आवडतो, बघायला आवडतो, त्यावर चर्चा करायलाही आवडते. आता कदाचित त्यावर जुगार खेळायला जास्त आवडू लागले आहे.
मी माझ्यापरीने माझ्या काही तरुण मित्रांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्याला क्रिकेटमधील बरेच कळते तर ते नॉलेज वापरून पैसे का कमावू नये असा काहींचा ॲटीट्यूड दिसला. तर काहींनी आनंदासाठी शे पाचशे रुपये गेले रोजचे तर त्यात काय एवढे असाही सूर लावला. जुगारची चटक लागलेल्यांना समजावणे अवघड असते.
सरकारच आता यावर निर्बंध आणू शकते. पण त्याआधीही आपण याचा निषेध करणे गरजेचे.
मला माझ्या आजूबाजूच्या
मला माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पैशापेक्षा आपले अंदाज आजमावण्याकरता खेळणाऱ्यांची संख्या जास्त दिसते
सगळ्यांनाच क्रिकेटवर गप्पा मारायला मायबोलीसारखा प्लॅटफॉर्म किंवा कट्ट्यावरचे मित्र मिळतातच असे नाही मग त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे!
पैसे न लावता खेळता येणाऱ्या अनेक फ्री लीग्जही आहेत तिकडे
पण मला या सगळ्यापेक्षा ESPN ची सुरुवातीची फॅंटसी लीग जाम आवडायची.... त्यात पूर्ण टूर्नामेंटमध्ये मिळून लिमिटेड चेंजेस मिळायचे आणि Points accumulate होत जायचे.... खेळाडूंच्या प्राईसेस आणि संघाचे बजेट हे गणित जुळवतानाही कस लागायचा..... जास्त आव्हानात्मक होते ते
ESPN ची सुरुवातीची फॅंटसी लीग
ESPN ची सुरुवातीची फॅंटसी लीग.. जास्त आव्हानात्मक होते
>>>>
कारण त्याचा हेतू वेगळा होता.
ईथे हेतू प्राधान्याने जुगाराचा आहे.
त्यामुळे सोपे सुटसुटीत ठेवले जाते. या आणि जुगार खेळा..
सगळ्यांनाच क्रिकेटवर गप्पा
सगळ्यांनाच क्रिकेटवर गप्पा मारायला मायबोलीसारखा प्लॅटफॉर्म किंवा कट्ट्यावरचे मित्र मिळतातच असे नाही मग त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे!
>>>>>
हे साईडचे फायदे आहेत.
हे म्हणजे दारू प्यायला बसले की मित्रांची छान मेहफिल जमते अश्यातला प्रकार झाला.
आमचा ऑर्कुटपासून नेटफ्रेडसचा व्हॉटसप ग्रूप आहे. जसे पॉर्न शेअरींग वा राजकारण चर्चा यासाठी स्वतण्त्र ग्रूप बनवले जातात तसे आमचा क्रिकेट ग्रूप स्वतंत्र आहे. मॅच असो नसो तिथे रोज घमासान चर्चा चालते. पण तरीही ८० टक्के मेंबर पन्नास पन्नास रुपयांच्या दहा दहा टीम बनवून हा जुगार खेळत राहतात. आणि असे बरेच आहेत जे एकापेक्षा अनेक टीम बनवतात. नुसते अंदाजांची मजा घेणे ही सुरुवात असेल. शेवट मात्र जुगाराचा नाद लागण्यातच होतो.
आता तीन पत्ती, रमी सर्कल
आता तीन पत्ती, रमी सर्कल वगैरे भावंडेही फॉर्मात आली आहेत. त्याच्या नादाला किती जण आहेत कल्पना नाही. पण सुसंस्कृत शालीन वाटाव्यात अश्या बायका याच्या जाहीराती करतात. हे असे ऑनलाईन जुगार लीगल असतात की हे काही जुगार नसून गेम्स आहेत असा निकष लाऊन परवानगी मिळते कल्पना नाही.
Guys.. don’t!
Guys.. don’t!
सर, आपल समाज सुधारक कार्य
सर, आपल समाज सुधारक कार्य चालू ठेवा. आधी मद्य आता जुगार.
पण हे कसे थांबवता येणार? महाभारत कालापासून चालत आल आहे.
उत्पन्न जर मिळत असेल तर
उत्पन्न जर मिळत असेल तर सरकारला असले ऑनलाईन जुगारही मान्य आहेत, भले लोकांचे संसार बरबाद झाले तरी चालतील.
एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय करू शकतो यावर चर्चा झाली पाहिजे.
अत्यंत समयोचित आणि सुंदर लेख
अत्यंत समयोचित आणि सुंदर लेख
सरांचे सर पण करतात जाहिरात
सरांचे सर पण करतात जाहिरात मला वाटलं सर पण गेले सरान सोबत खेळायला
हा धागा म्हणजे सुरक्षा कवच
हा धागा म्हणजे सुरक्षा कवच म्हणून काढल्यासारखा वाटतोय. उद्या कोणी म्हणले की नुसते दारू वर का बोलता, माय इलेव्हण बद्दल का बोलत नाही ?
तेव्हा तुम्ही हा एकदोन प्याराग्राफ असलेला सपक धागा दाखवणार - बघा धागा काढलेला...
म्हणजे दारू बद्दल बोलताना कायम तुम्ही इत्यादी ईमोजी वापरता ते इथे जाणवले म्हणून असे वाटले.
तसे नसेल तर वाईट मानू नका.
जाळे पसरले आहे. जाळ्यात फसू
कॉमी आपली कॉमेण्ट
कॉमी आपली कॉमेण्ट ईण्टरेस्टींग आहे
व्यसन दारूचे असो वा जुगाराचे. दोन्ही वाईटच हे लोकांनी मान्य करणेही हल्ली खूप वाटते. अन्यथा नॉर्मल आहे बोलून हल्ली बरेच चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले जाते.
मी दारू आणि जुगार दोन्हींच्या विरोधात आहे. झाल्यास हिंसाचार, लूटमार, खून, बलात्कार, भ्रष्टाचार, सिगारेट, ड्रग्स, मुलांची तस्करी वगैरे बरेच गोष्टींच्या विरोधात आहे. प्रत्येकाचा धागा काढत नाही. त्याची गरजही वाटत नाही. कारण यातल्या बरेच गोष्टी वाईट आणि चुकीच्याच आहेत हे सर्वमान्य असते. जिथे ते मान्य नसते वा लोकांना समजून घ्यायचे नसते वा लोकं प्रवाहासोबत चुकीच्या वाटेने जाण्यात धन्यता मानतात तिथे जनजागृतीची गरज असते. ती मीच काय ते करतो असे नाही. पण लोकांचे लक्ष वेधून चर्चा होईल हे बघतो.
आणि हो,
आणि हो,
धागा एकदोन पॅराचा असला तरी प्रतिसादात लिहितोय. ही फक्त धाग्याची सुरुवात आहे.
@ केशवकूल,
@ केशवकूल,
पण हे कसे थांबवता येणार?
>>>
नक्की माहीत नाही.
पण काहीच न करता थांबणारही नाही हे माहीत आहे.
महाभारत कालापासून चालत आल आहे.
>>>>
आणि सुदैवाने त्यात याचे दुष्परीणामच दाखवले आहेत
धन्यवाद प्रथम म्हात्रे
धन्यवाद प्रथम म्हात्रे
उत्पन्न जर मिळत असेल तर सरकारला असले ऑनलाईन जुगारही मान्य आहेत, भले लोकांचे संसार बरबाद झाले तरी चालतील.
>>>>>
हो. आणि हे सर्वच सरकार असे करतात. त्यामुळे राजकीय चर्चेत एकमेकांच्या नेत्यावर/सरकारवर आरोप प्रत्यारोप करणारे सोशल मिडीया कार्यकर्ते अश्या मुद्द्यांवर सोयीची तटस्थ भुमिका घेतात.
एवढ्या मोठ्या राष्ट्रीय
एवढ्या मोठ्या राष्ट्रीय समस्येवर धागा काढल्याबद्दल आणि आम्हाला जागरूक केल्याबद्दल धन्यवाद.
तसेही क्रिकेटवर वांझोट्या गप्पा मारणारे आपल्याकडे ढिगाने आहेतच कि, काहींना गप्पा मारून मोठेपणा मिळतो तर काहींना ११ जणांची टीम लावून काही पैसे मिळतील याची आस धरण्यात मजा वाटते, तर काहींना पुचाट धागे सोडून जन जागरण केल्याचे समाधान मिळते.
सिरीअसली कवट्या..
सिरीअसली कवट्या..
ही एक राष्ट्रीय समस्याच आहे.
ज्यात युवा पिढी बरबाद होणार आहे.
ज्यांना या जुगाराच्या प्रकाराची चटक लागली आहे ते महिलांच्या क्रिकेट सामन्यांवरही पैसे लावत होते. जे कधी एक खेळ म्हणून कधीच महिला क्रिकेट फॉलो करत नव्हते.
कवट्या नाही. (तू मुद्दाम
कवट्या नाही. (तू मुद्दाम लिहिले आहेस हे समजते.)
कवठ्या महाकाळ
कवठे महांकाळ नावाचे आमच्या कडे एक गाव आहे. ते जावूदे.
मला जुगार आवडतो. देवाशी / दैवाशी कुस्ती आहे ती.
दोन घटका करमणूक. त्याच्या आड का येता सर!
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच.. >>जुगार न खेळताच टीवीवर रोज तासनतास क्रिकेट बघितल्याने वेळ, पैसा, युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होत नाही का हो सर?
मी अश्विनी
मी अश्विनी
छंद आणि व्यसन यात गल्लत होतेय का?
मलाही क्रिकेट बघायला फार आवडते. आता ती क्रेझ राहिली नाही. पण फार छान आठवणी दिल्यात या खेळाने. बघतानाही आणि खेळतानाही. त्यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्र धाग्यात.
पण त्याचवेळी मी जुगाराचेही व्यसन अनुभवले आहे. फार बेक्कार चस्का लागतो त्याचा. त्यावर मी आधीच लिहून झाले आहे माझ्या वाईट सवयी लेखमालिकेत.
असो. हे म्हणजे दारू वाईट म्हटले की चहा जास्त पिणेही वाईट बोलत सगळ्यांना एकाच पंक्तीत बसवायचे आणि दारूचे समर्थन करायचे.. प्लीज ईथे तसे करू नका
मला जुगार आवडतो. देवाशी /
मला जुगार आवडतो. देवाशी / दैवाशी कुस्ती आहे ती.
>>>>
कुठला देव जुगार खेळायला सांगतो?
@ कवट्या महाकाल
हे धडाकेबाज चित्रपटातील व्हिलनचे नाव होते.
छंद आणि व्यसन यात गल्लत होतेय
छंद आणि व्यसन यात गल्लत होतेय का? >> ऑफकोर्स गल्लत आमच्यासारख्या पामरांकडूनच तर होणार सर! तुच्याकडून झोपेत डाव्या हाताची करंगळी सुद्धा चुकून हलली तर त्यात गर्भितार्थ लपलेला असतो हे सगळ्या मायबोलीला ठाऊक आहे.
त्यामुळे तुमचा तो छंद बाकीच्यांचे ते व्यसन... हं! येऊच द्या अजून.
प्लीज ईथे तसे करू नका >> नाही हो नाही बिल्कूल नाही. कर्ता करविता तुम्हीच तर आहात सर. तुमच्यापुढे म्या पामराची काय कथा.
चुकून दोन शब्द लिहिण्याची हिंमत केली ..माफी असावी.
मी आश्विनी ओके
मी आश्विनी ओके
सरांनी तुम्हाला उदार मनाने
सरांनी तुम्हाला उदार मनाने माफ केले आहे.
(No subject)
उबो
उबो
मी ट्रोल नाही.
मी सरांचा (डोळस) भक्त आहे. आम्ही "हाडा"चे भक्त नाही/आहोत.
हल्ली ऋन्मेषला विरोध करताना
हल्ली ऋन्मेषला विरोध करताना आपण नकळत चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहोत हे पब्लिकला कळत नाहीये का? की ऋन्मेष विरोध हेच ध्येय आहे.
या असल्या ऑनलाईन जुगारात मी जवळची व्यक्ती गमावली आहे. पत्त्यांचा जुगार खेळताना बघितले तर घरातल्यांच्या शिव्या मिळत पण मोबाईल वर आपला मुलगा जुगार खेळत असेल हे आईबापाला समजलेच नाही. लाखोंचे कर्ज करुन तरुण मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्यांना समजले.
त्याला पाठिंबा दिला तर
त्याला पाठिंबा दिला तर चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला होईल, काळ सोकावतो! याचा अनुभव अनेकांनी अनेक वेळा घेतला आहे. या ठिकाणासाठी लेसर एव्हिल कोण आहे ते सगळे जाणतात म्हणून असं होतं.
तुम्ही अगदी हाच धागा काढला असता तर असं झालं नसतं, याची मला खात्री आहे. कारण शेवटी काय करतो बरोबरच कोण करतो त्याला महत्त्व असते. जेन्युअनली कोण लिहितोय आणि त्रास द्यायला कोण लिहितो त्याची कल्पना जन्तेला असते. इथल्या कोणालाही जुगाराचं पर से समर्थन करायचं नाही. पण... बाकी तुम्ही जाणताच.
.@ निल्सन
.@ निल्सन
या असल्या ऑनलाईन जुगारात मी जवळची व्यक्ती गमावली आहे.
>>>>>>>>>>>>>
आणि मी बालपणातली बरीच सुखे गमावली आहेत. पर्सनल आहे फार. पुन्हा कधीतरी.
मोबाईल वर आपला मुलगा जुगार खेळत असेल हे आईबापाला समजलेच नाही. लाखोंचे कर्ज करुन तरुण मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्यांना समजले.
>>>>>>>
मोबाईलवर तर असेही मुले काय करतात यावर लक्ष ठेवावे. हल्ली मुलांची प्रायव्हसी जपायचे जे फॅड सुरू झालेय ते ही मला चुकीचे वाटते ते याचसाठी.
माझी मुलगी सहासात वर्षांची असताना मला एकदा म्हणालेली. मोबाईलवर काही ऑनलाईन गेम्स खेळून पैसे कमावता येतात. तू तसे कर मग तुला ऑफिसला जायची गरज नाही. पाहिले तर ती तीन पत्ती खेळाबद्दल बोलत होती. मग मी तेव्हाच तिला जुगार हा कसा वाईट असतो हे समवायला प्रोबॅबिलिटीचे नियम लावता त्यात शेवटी आपणच कसे हरतो हे सांगितले.
पत्त्यांचा जुगार खेळताना
पत्त्यांचा जुगार खेळताना बघितले तर घरातल्यांच्या शिव्या मिळत पण मोबाईल वर आपला मुलगा जुगार खेळत असेल हे आईबापाला समजलेच नाही. लाखोंचे कर्ज करुन तरुण मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्यांना समजले. >> दुर्दैवी घटना. आईवडिलांबद्दल आणि मुलाबद्दलसुद्धा सहानुभुती आहे.
पण ईथे ईविल जुगार नसून मनाचा कमकुवतपणा, अभ्यासाचा अभाव आणि फाजील आत्मविश्वास आहे. असा फाजील आत्मविश्वास आपण राँग एंट्रीतून जाण्यापासून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात ते चालू गॅस सोडून घरात ईकडेतिकडे काम करण्यापर्यंत दिवसातून अनेक वेळा दाखवतो.
कैक लोकांनी जुगार (मग ते स्पोर्ट्स बेटिंग असो किंवा प्रोफेशनल पोकर) हा करिअर पाथ निवडून त्यात आयुष्य (पैसा, घर दार, गाड्या, ईमेज) कमावले आहे. अगदी पीएचडी होल्डर मॅथेमॅटिशिअन, स्टॅटिस्टिशिअन, फिजिसिस्ट, ईंटेलिजन्समध्ये काम करणारे ते घराच्या बेसमेंटमधून ऑपरेट करणारे विडिओ गेमर्स, काऊच पोटेटोज किंवा बोअर्ड हाऊसवाईव्ज सगळेच आले. हा हाय रिस्क गेम्/प्रोफेशन आहे आणि व्यवस्थित अभ्यास करून रिस्क मॅनेज करून खेळल्यास मानसिक समाधानासहित लहान सहान गेन मिळवत रेग्युलर साईड हसल म्हणून ईन्कम सुद्धा मिळवता येऊ शकते. पुन्हा आपली स्ट्रॅटेजी ठरवून ती टेस्ट करत मजबूत बनवण्यासाठी नोशनल अमाऊंट घेऊन (नुसते ऑन पेपर) खेळता येते.
पण रिस्ककडे दुर्लक्ष करून ईमोशनल निर्णय घेत वहावत गेल्यास तुम्ही लिहिल्या तश्या केसेस होतात.
द्युतात युधिष्ठिर नाही तर शकुनी हीरो ठरला कारण तो डोक्याने खेळत असे आणि युधिष्ठिर भावनांत वहावत जाऊन.
Pages