ड्रीम ईलेव्हन, माय ईलेव्हन, माय सर्कल वगैरे नावांनी जे बेटींग ॲप निघाले आहेत त्याला सरकार कशी परवानही देतेय कल्पना नाही. कदाचित महसूल जास्त मिळत असेल. पण आजूबाजूला दिसणारी तरुण पिढी अक्षरशा या नादाला लागलेली दिसत आहे.
वेळ जातोय. पैसा जातोय. युवा पिढीची क्रयशक्ती बरबाद होतेय. जुगाराने कसे लोकं बरबाद होतात, होऊ शकतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच..
बर्रं दारूच्या थेट जाहिरातींवर बंदी आहे तसे याच्या जाहीरातींबाबत काही दिसत नाही. उलट क्रिकेटप्रेमींच्या आवडीचे खेळाडूही एकेका ॲपसोबत जोडले गेले आहेत. आणि लोकांना हा जुगार देखील एक खेळ असल्याचे भासवून खेळायला उद्युक्त करत आहेत.
क्रिकेट भारतीयांचा आवडता खेळ आहे. आपल्याला तो खेळायला आवडतो, बघायला आवडतो, त्यावर चर्चा करायलाही आवडते. आता कदाचित त्यावर जुगार खेळायला जास्त आवडू लागले आहे.
मी माझ्यापरीने माझ्या काही तरुण मित्रांना समजावून सांगायचा प्रयत्न केला. पण आपल्याला क्रिकेटमधील बरेच कळते तर ते नॉलेज वापरून पैसे का कमावू नये असा काहींचा ॲटीट्यूड दिसला. तर काहींनी आनंदासाठी शे पाचशे रुपये गेले रोजचे तर त्यात काय एवढे असाही सूर लावला. जुगारची चटक लागलेल्यांना समजावणे अवघड असते.
सरकारच आता यावर निर्बंध आणू शकते. पण त्याआधीही आपण याचा निषेध करणे गरजेचे.
केशवकूल, तुम्ही ट्रोल नाहीये
केशवकूल, तुम्ही ट्रोल नाहीये इथे.
A troll is a person who posts or makes inflammatory, insincere, digressive, extraneous, or off-topic messages online (such as in social media, a newsgroup, a forum, a chat room, an online video game), or in real life, with the intent of provoking others into displaying emotional responses, or manipulating others' perception, thus acting as a provocateur. The behavior is typically for the troll's amusement, or to achieve a specific result such as disrupting a rival's online activities or purposefully causing confusion or harm to other people.
उबो आभारी आहे. ॠ हा असा एक
उबो आभारी आहे. ॠ हा असा एक अद्वितीय आहे. आम्ही जे काही करतो त्याला फ्रेंडली बॅंटर हा शब्द आहे. असो. जुगाराकडे वळूया.
लोक कुठ फसतात माहित आहे ?
The classic example of the gambler's fallacy occurs when someone flips a coin. If the head lands face up, say, four or five times, most people will believe that the coin will land on the tails side next time, occasionally even arguing that the repeated “heads” coin increases the likelihood of a future “tails” coin.
पण ईथे ईविल जुगार नसून मनाचा
पण ईथे ईविल जुगार नसून मनाचा कमकुवतपणा, अभ्यासाचा अभाव आणि फाजील आत्मविश्वास आहे. असा फाजील आत्मविश्वास आपण राँग एंट्रीतून जाण्यापासून, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यात ते चालू गॅस सोडून घरात ईकडेतिकडे काम करण्यापर्यंत दिवसातून अनेक वेळा दाखवतो.>>>>>>
मी अश्विनी, खुप सुंदर प्रतिसाद. माझ्याही मनात हेच होते पण इतक्या उत्तम रितीने ते मांडता आले नसते. भावनेत वाहावत जायला जुगारच लागतो असे कुठे आहे? आमच्या एवढुश्या गावात एका तरुणाने ७०-८० लाखाचे कर्ज घेऊन शेअरमार्केटात घालवले. कर्ज देणारे गावात येऊन हत्यारे घेऊन त्याला शोधायला लागल्यवर पुर्ण कुटुंब पळुन गेले. त्या भानगडीत
त्यांचा कापायला आलेला ऊस सुकुन गेला. गुरे शेजारी सांभाळताहेत. ते कुटुंब कुठे आहे कोणालाही माहिती नाही.
निल्सनला अनुमोदन.
निल्सनला अनुमोदन.
ऋन्मेषला विरोध करण्याच्या नादात जुगाराच्या बाजूने लिहिणे हे महान आहे! अर्थात ऋन्मेषच्या बाजूने लिहिणे हे ट्रोलर्सना उत्तेजन देणं आहे हे माहिती असताना मीही हे इथे लिहितेच आहे.
जुगाराच्या बाजूने लिहीणारे
जुगाराच्या बाजूने लिहीणारे मला विरोध म्हणूनच लिहीत आहेत की त्यांचे खरेच तसे मत आहे हे कळायला मार्ग नाही.
काही देशात जुगार लीगल आहे. याचा आधार घेऊन बरेच जण जुगाराची पाठराखण करताना या आधीही पाहिले आहेत.
लिटल जुगार इज गुड फॉर हेल्थ.
लिटल जुगार इज गुड फॉर हेल्थ.
आपल्या बेचव आयुष्यात थोडे तरी झिंग असावी.
निल्सन, साधना दोन्ही घटना
निल्सन, साधना दोन्ही घटना वाचून वाईट वाटलं.
वावे +1
मलाही प्रतिसाद बघून असच वाटतंय की उगीच करायचा म्हणून विरोध /चेष्टा चाललीय. बाकी इतरही गोष्टीत क्रयशक्ती वाया चाललीय हे अगदी खरं असलं तरी धाग्याचा विषय कमी गँभिर ठरत नाही.
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा कपटाने खेळला ना.
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा कपटाने खेळला ना.
+786
काल अगदी हेच मी लिहीणार होतो. नंतर कामाच्या नादात राहिले
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा कपटाने खेळला ना.>>
कपटी डोक्याने म्हणा.
काही जण डोक्याचा उपयोग फक्त कपट कारस्थानं करण्यासाठी करतात.
त्यामुळे जुगारात शक्ती/पैसा घालवण्यापेक्षा विधायक बरेच करता येऊ शकते. त्यातुन त्या जाहिराती. सगळ्यांचे लाडके खेळाडू अभिनेते करतात मग ते जास्त आकर्षक होते आपणही मग अमीरखान/ शारुख/ शर्मा/बुमरा होऊ असे लोकांना वाटते. ही पिढी लगेच त्याकडे आकर्षित होते. हातात मोबाईल नामक खेळणे आहेच.
लिटल जुगार इज गुड फॉर हेल्थ.
लिटल जुगार इज गुड फॉर हेल्थ.
>>>
आयुष्य हेच जुगार आहे वगैरे फिलॉसॉफिकल वाक्य ऐकायला छान वाटतात, पटतात कारण ती बहुतांशी खरीही असतात. पण या दोन्ही जुगारातील फरक लक्षात घ्यायला हवा. ईथे तुम्हाला जुगार खेळायला उद्युक्त केले जातेय. आमिष दाखवले जातेय. त्यातून पुढे जाऊन तुमचा र्हास होईल याची काळजी घेतली जातेय. हे एक जाळे आहे हे लक्षात घ्यायला हवे. मनोरंजन करायला ईतरही कैक साधने आहेत, जुगारातून मिळणारे सो कॉल्ड थ्रिल व्यवसायात रिस्क घेऊनही मिळवू शकतो. तिथे तुम्ही यशस्वी झालात तर तुमचे कौतुकही होईल. तिथल्या यशाचे समाधानही वेगळे असेल. जर ड्रीम ईलेव्हनमध्ये तुम्ही एक दोन करोडचे बक्षीस जिंकला तर त्या कारणास्तव तुम्हाला काही क्रिकेटचे एक्स्पर्ट समजले जाणार नाही. त्यामुळे प्लीज असल्या जुगारात थ्रिल शोधू नका.
जर ड्रीम ईलेव्हनमध्ये तुम्ही
जर ड्रीम ईलेव्हनमध्ये तुम्ही एक दोन करोडचे बक्षीस जिंकला तर त्या कारणास्तव तुम्हाला काही क्रिकेटचे एक्स्पर्ट समजले जाणार नाही. >>
हरकत नाही. येऊ द्या एक करोड! काय राव उगाच मधाच बोट लावताय?
ठराविक दिवसांनी काहीतरी धागा
ठराविक दिवसांनी काहीतरी धागा काढलाच पाहिजे त्याशिवाय आपण चर्चेत कसे येणार?
आणि बाकी लोक्स असल्या धाग्यावर चर्चा करतात त्यामुळे असल्या लोकांना पाठबळ मिळते.
कृपया सरांची तळमळ लक्षात घ्या
कृपया सरांची तळमळ लक्षात घ्या. एकतर ते दुसरे सर या सरांना काही चान्स मिळू देत नाही, दुसरं धागा काढायला विषय सापडत नाही. मग सरांनी करावं तरी काय. आणि वर खुद्द सरांनी सांगून ठेवलंय की "मनोरंजन करायला ईतरही कैक साधने आहेत," मग धागे काढणे, दुसऱ्यांचे धागे पटरी वरून ढकलुन देणे, गरज नसतांना मा बो वर शारुक सरांना ओढून आणणे हे मनोरंजनाचेच तर प्रकार आहेत.
केशवकूल
केशवकूल
तुम्ही बेचव आयुष्यात झिंग असावी हा मुद्दा काढला त्यातला फोलपणा मी दाखवला.
जर तुम्ही पैश्याच्या लालसेने वा उद्देशाने जुगार खेळत असाल तर अर्थातच प्रोबॅबिलिटीनुसार जुगार खेळणारेच हरायचे चान्सेस जास्त असतात. लगेच द्या एक करोड असे नसते ना..
@ वीरू. ओके
सर
सर
तुमचा धागा आणि इतर लोकांचे टोमणे वाचून मला उपरति झाली. आणि आज पासून मी जुगार सोडला म्हणजे सोडला.
माझी प्रिय पत्नीने तुम्हाला थन्क़ु कळवायला सांगितले. तसेच माझी मुले आता शेजार पाजाऱ्या कडे जाऊन अभिमानाने सांगत आहेत, "माझ्या बाबाने जुगार सोडला."
सर next मायबोलीभूषण तुम्हालाच.
फोटो असेल पाठवा म्हणजे मायबोली पंचायतन मधे ठेवून पूजा करीन म्हणतो.
सर तुमच्यातल्या हजार प्रतिसादातले थोडे प्रतिसाद माझ्याकडे पण वळवा ना!
केशवकूल कळला आपला ऊपरोध.
केशवकूल कळला आपला ऊपरोध.
मायबोलीवरच्या चर्चा वाचून कोणी आपले आचार विचार बदलत नाही असा रोख दिसतोय आपला.
मग कुठलीच चर्चा करायचीच नाही का ईथे?
असो, ईतर कोणी बदलो न बदलो. जर जनतेने नाराजगी व्यक्त केली आणि विरोध दर्शवला तर कदाचित या खेळांवरच कुर्हाड पडेल. मग खेळणाऱ्यांची कितीही का ईच्छा असेना काय फरक पडतो?
अवांतराबद्दल आधीच क्षमस्व!
अवांतराबद्दल आधीच क्षमस्व!
सर तुमच्यातल्या हजार प्रतिसादातले थोडे प्रतिसाद माझ्याकडे पण वळवा ना!
>>>>
मग माझ्या मागे हात धुवून लागणारे आयडीही वळतील.. चालेल का
जोक्स द अपार्ट - आपण छान दर्जेदार लिहीता. प्रतिसादावर कुठे त्याचे मोल ठरवता. कित्येकांना तुमचे वैज्ञानिक लेख झेपत नाहीत असे समजा आणि लिहीत राहा...
ऋन्मेषला विरोध करण्याच्या
ऋन्मेषला विरोध करण्याच्या नादात जुगाराच्या बाजूने लिहिणे हे महान आहे! >>> वावे माझा प्रतिसाद निल्सन ह्यांना ऊद्देशून त्यांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुषंगाने होता. त्यात ऋन्मेषसरांच्या समर्थनार्थ वा विरोधात असे काही नाही.
मी जे लिहिले ते फॅक्ट्स आहेत. लीगल गँबलिंग व गेमिंग आणि स्पोर्ट्स बेटिंग ह्या एकट्या अमेरिकेतच प्रत्येकी १०० बिलिअन डॉलर्सच्या ईंडस्ट्रीज आहेत. गँबलिंग भारतातही गोवा, दमन, सिक्किम्मध्ये वगैरे लिमिटेड एरियामध्ये लीगलच आहे. स्पोर्ट्स बेटिंगही चांगले वाढते आहे, ह्याबद्दलचे कायदे अजून जुने आहेत आणि ते अपडेट करायला हवेत. पण सध्या तरी स्पोर्ट्स बेटिंग ना लीगल ना ईलीगल अशा अँबिग्युअस परिस्थितीत आहे. एकंदर जगातल्या स्पोर्ट्स बेटिंगची दिशा बघता नवीय नियम आणून ते लीगल करण्याकडेच सराकारांचा भर असेल.
तुम्हाला नैतिक पातळीवर ह्या सगळ्याला 'जुगार' म्हणत तो करणे अयोग्य वाटत असले तरी कायद्याअंतर्गत तो चालवणे अयोग्य नाही. बर्याच वेळा आपण आपली नैतिकतेची शिकवण एक्झाजुरेट करून पुढे रेटत राहतो. नकळत्या वयातल्या मुलांना ह्यापासून लांब राहणे हितावह असे सांगणे वेगळे. पण खुल्या जगात हे अयोग्य आहे असे सांगत फिरणे माझ्यामते नाईव आहे.
जुगारातल्या अपयशातून आत्महत्या हे व्यवसायातल्या, परिक्षेतल्या, प्रेमसंबंधातल्या, कौटुंबिक नातेसबंधातल्या ईतकेच काय अध्यात्म, खेळ आणि कलेच्या क्षेत्रातल्या अपयशामुळे घरदार ऊध्वस्त ते आत्महत्या असे सगळे ह्या जगात रोजच घडतच असते. कुटुंबे ऊध्वस्त होतात, आत्महत्या घडतात म्हणून आपण परीक्षा, प्रेम, लग्न, व्यवसाय, कला ह्यावर बंदी आणत नाही. व्यसन, वहावत जाणे, काऊंसिलिंग/मदत ऊपलब्ध नसणे, सेल्फ हार्म विचारांशी कसे डील करणे हे माहित नसल्याने आत्महत्या होतात.
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा
शकुनी डोक्याने म्हणण्यापेक्षा कपटाने खेळला ना. >> टीवीवर ड्रामाटायझेशन साठी टोकाचे विलनाईझ केलेल्या शकुनीने जरासंधाच्या की सुबलाच्या हाडांचे फासे बनवले वगैरे गंमत चंमत कथा बाजुला ठेवून मूळ टेक्स्ट पाहिले तर त्यात आर्यावर्तात अर्जून जसा एकमेवाद्वितीय धनुर्धारी होता तसाच शकुनी एकमेवाद्वितीय द्युतपट्टू होता. युधिष्ठीर स्वतःला अव्वल द्यूतपटू समजत असे पण त्याचा आपल्या भावनांवर चाप नाही हे शकुनी ओळखून होता अशा अर्थाचेच लिहिले आहे.
म्हणून तो दुर्योधनाला बलाने पांडवांना नामोहरम करणे तुला शक्य नाही तू त्याचा नाद सोडून दे असेच सांगतो. पण ईरेला पेटलेला दूर्योधन ते ऐकत नाही तेव्हा त्याला पांडवांशी थेट दोन हात करून आत्मनाश ओढवून घेण्यापासून परवृत्त करण्यासाठी शकुनी त्याला द्युताचे माध्यम सुचवतो.
सर,
सर,
तामिळनाडू विधानसभेेत ह्या विरुद्ध ठराव पास झाला आहे. पण तो राज्यपाल. सही करायला वेळकाढू पणा करतो आहे.
जुगारातले अपयश आणि परीक्षा
जुगारातले अपयश आणि परीक्षा प्रेमसंबंधातले अपयश याची तुलना खरेच होऊ शकते का?
जुगार खेळणाऱ्यांनाही हे पटणार नाही..
जुगार खेळायला स्किल लागते. शकुनी काळापासून ज्याच्याकडे जुगारात जिंकायची कला आहे तो कमावू शकतो. बर्र ठिक आहे पण बाकीच्यांचे काय? त्यांनी दूर राहावे का या खेळापासून.. एकदा व्यसन लागल्यावर हे शक्य आहे का?
शाळा कॉजेजच्या शेजारी डान्सबार उघडला आणि सभ्य पोरांनी मनावर कंट्रोल करावा आणि तिथे जाऊ नये असे सांगितले तर चालेल का.
बर्र तो शकुनी एकमेवाद्वितीय कसा होता? कोणीही जुगारात एकमेवाद्वितीय कसे असू शकतो जिथे स्किलसोबत लक फॅक्टर सुद्धा ईन्वॉल्व्ह असतो.
तामिळनाडू विधानसभेेत ह्या
तामिळनाडू विधानसभेेत ह्या विरुद्ध ठराव पास झाला आहे
>>>
छान. कोणीतरी कुठेतरी आवाज ऊठवतेय..
शकुनी लिजण्ड आहे... मॅन ...
शकुनी लिजण्ड आहे... मॅन ... आज असता तर वेगास गाजवला असता.. प्रत्येक वेळी फायर बेट .. एकही कॅसिनो आणि क्रॅप्स टेबल सोडला नसता ... कोणीतरी शकुनी फॅन क्लब काढा...
सुदैवाने शकुनी आपल्याकडे
सुदैवाने शकुनी आपल्याकडे कपटीच समजला जातो. आणि युधिष्टरालाही त्याने जे जुगारात केले (पत्नीला डावावर लावणे आणि हरल्यावर लाचारासारखे वस्त्रहरण बघत बसणे) त्याबद्दल फारशी ईज्जत मिळत नाही. एकंदरीत महाभारतातही जुगार कौशल्याचे उदात्तीकरण टाळले आहे. त्याचे दुष्परीणामच दाखवले आहेत.
पण जनतेचा भरवसा नाही हल्ली. रावणालाही फॅन मिळतात तर शकुनीलाही मिळू शकतात.
रावणालाही फॅन मिळतात तर
रावणालाही फॅन मिळतात तर शकुनीलाही मिळू शकतात> महाराष्ट्रात अफजल खान औरंगजेबाचेही फॅन आहेत.
वीरु, नकोच प्लीज.
वीरु, नकोच प्लीज.
ऋन्मेऽऽष यांना विरोध करायच्या
ऋन्मेऽऽष यांना विरोध करायच्या नादात ठराविक id काहीही लिहतात आणि मग तोंडावर आपटतात, ऋन्मेऽऽष मात्र या सगळ्यांना पुरून उरतात.
ओके आचार्यजी.
ओके आचार्यजी.
कविता
कविता
दोन हाणा पण सेन्सीबल म्हणा
सेन्सिबल मी सेन्सिबल
मायबोलीचा मी सेन्सिबल
ओ माझा धागा आला या हो प्रतिसाद द्या ना काही,
घेऊन जाऊ धागा
शंभर पार
सेन्सिबल मी सेन्सिबल
मायबोलीचा मी सेन्सिबल
बहीष्कार टाकला तर
पिशाच्चे नाचवणार
टुकूटुकू का होईना
धागा पळवणार
आणि दिलात विरोधात प्रतिसाद
अर्थ काढेन तिकडमबाज
वैताग आणीन वैताग
म्हणा मला अक्कलबाज
अक्कलबाज अक्कलबाज
नाहीतर होईन राडेबाज
वेठीस धरेन वारंवार
ओ माझा धागा आला या हो प्रतिसाद द्या ना काही,
घेऊन जाऊ धागा
लंडन पार
सेन्सिबल मी सेन्सिबल
मायबोलीचा मी सेन्सिबल
चांगला चाललेला धागा मुद्दाम
चांगला चाललेला धागा मुद्दाम वाकड्या वळणावर का आणून ठेवावा?
Pages