Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोजा आणि हम्मा गाणे गायचे
रोजा आणि हम्मा गाणे गायचे त्या शोच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते का?
की असेच एक्स्ट्रा गायले आहे?
ज्या पद्धतीच्या पोस्ट इकडे
ज्या पद्धतीच्या पोस्ट इकडे पडत आहेत ते पाहता या धाग्याचे नाव बदलून हेटक्लब करा
>.>>>>>
हुमायुन नेचर
मुद्दाम अमुक तमुक क्लबच्या वा समूहाच्या उलटे बोला.
बहुतांशवेळा हा आरोप माझ्यावर होतो. पण गंमत म्हणजे मी ईथे फॅनक्लब धाग्याला अनुसरून महेशच्या बाजूने आहे
"हेमाशेपो"चं काय झालं?
"हेमाशेपो"चं काय झालं?
पण धाग्याचे नाव फॅन क्लबच
पण धाग्याच्या नावात फॅन क्लबच राहू द्या.
कारण ईट ईजी टू हेट, बट लव ईज मोअर पॉवरफुल
"हेमाशेपो"चं काय झालं?
"हेमाशेपो"चं काय झालं?
>>>>
निरीक्षण शक्ती कमी पडतेय.
आंघोळ करून आल्यावर सांगतो.
ईतर कोणाला समजले असल्यास माझ्यातर्फे उत्तर द्यायचे असेल तर देऊ शकता
>>रोजा आणि हम्मा गाणे गायचे
>>रोजा आणि हम्मा गाणे गायचे त्या शोच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते का?
की असेच एक्स्ट्रा गायले आहे?>> लॉजिक कळले नाही. असेच एक्ट्रा म्हणजे कसेही चालवून घ्या होत नाही.
आवाज साथ देत नाहिये या कारणास्तव मुख्य गायकाने कमी गाणे आणि सह गायकाने जास्त गाणी गाणे चालेल, किंवा निवेदन करुन कार्यक्रम थोडक्यात आटोपला तरी चालते. गळा आहे, यंत्र नाही हे श्रोत्यांनाही कळते. आज गाणे नेहमीसारखे रंगले नाही पुन्हा येवून गाईन असे नम्रपणे सांगणारेही ऐकलेत. असो.
""हेमाशेहपो" म्हणाला होता तो
""हेमाशेहपो" म्हणाला होता तो
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे ट्रोलिंग झाले म्हणजे नक्की कसे झाले? उदाहरणांसहीत सविस्तर सांगा.
ऋन्मेष बास की आता! किती पीळ
ऋन्मेष बास की आता! किती पीळ प्रत्येक ठिकाणी!!
“ रोजा आणि हम्मा गाणे गायचे
“ रोजा आणि हम्मा गाणे गायचे त्या शोच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते का?” - प्रोफेशनल कॉन्सर्टमधे गायक कुठली गाणी म्हणणार आहे हे ‘पॅकेज’ त्याच्या टीमला सोडून इतरांना माहित असण्याचं एखादं उदाहरण देणार का?
तसंच ह्या ‘पॅकेज’ मधे काय इन्क्ल्युडेड होतं आणि काय नव्हतं ह्याचं उत्तर मायबोलीवर शोधण्यात काय हशील?
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे ट्रोलिंग झाले म्हणजे नक्की कसे झाले? उदाहरणांसहीत सविस्तर सांगा. > +१ मला वाटते ऋन्मेषना ट्रोलिंग म्हणजे काय त्याचा अर्थच अजून कळत नाहीये. तसेही आपले ईंग्रजी कच्चे आहे असे ते प्रामाणिकपणे सांगत असतातच. ईथे ट्रोलिंगच्या अदुष्य धाग्याला साप समजून ते लोकांनी रोजावर नाके मुरडण्यावर भूई धोपटत बसले आहेत. चालू द्या.
लॉजिक कळले नाही. असेच एक्ट्रा
लॉजिक कळले नाही. असेच एक्ट्रा म्हणजे कसेही चालवून घ्या होत नाही.
>>>>
असे मला म्हणू तर द्या आधी
आधी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर तर मिळू द्या.
ते पॅकेजमध्ये होते का? कोणाला काही आयड्या?
""हेमाशेहपो" म्हणाला होता तो
""हेमाशेहपो" म्हणाला होता तो Wink
>>>
धन्यवाद स्वरुप
ह हजाराचा..
शेवटून हजारावे होते ते..
महेश काळे यांच्याशी जे होतेय
महेश काळे यांच्याशी जे होतेय त्याला ट्रोलिंग हे मी एकट्यानेच न्हटले नाहीये तर अजून काही जणांनीही हा शब्द वापरला आहे.
ज्यांना ट्रोलिंगचा अर्थ माहीत आहे त्यांनी नवा धागा काढला तर फक्त मलाच नाही तर आम्हा सर्वांनाच तो समजेल
ऋन्मेष बास की आता! किती पीळ
.
ऋन्मेष बास की आता! किती पीळ प्रत्येक ठिकाणी!!
>>>>>
माझ्या दहा बारा पोस्ट ज्या कोणा एका व्यक्तीला टारगेट करायला नाहीत तर एका व्यक्तीला वाचवायला आहेत त्या तुन्हाला पीळ वाटत आहे.
मग आता जरा महेश काळे यांच्या जागी स्वत:ला ठेऊन विचार करा की त्यांच्यावर येणाऱ्या अश्या हजारो पोस्ट त्यांना कश्या वाटत असतील.
पण आम्हाला हे ट्रोलिंग वाटतच नाहीये.
पीळ तर ऋन्मेषच्या या धाग्यावरील पोस्ट आहेत.
चला लोकहो वॉकला जाऊन येतो. मोकळ्या हवेची गरज आहे जरा.
ज्यांना ट्रोलिंगचा अर्थ माहीत
ज्यांना ट्रोलिंगचा अर्थ माहीत आहे त्यांनी नवा धागा काढला तर फक्त मलाच नाही तर आम्हा सर्वांनाच तो समजेल>>>>
थोडक्यात सरांना अर्थ कळला नाहीये पण तरीही ते त्यावर खंडीभर पोस्ट पाडत आहेत.
आता अत्यंत आचरट मानभावी विधान येईल, हा धागा माझ्यावर नाही
सतत मी मी माझं माझं करुन पीळ मारणे आणि वर असली फडतूस वाक्ये टाकणे हे सरांनाच जमू शकते...
सर तुम्हाला ट्रोलिंग म्हणजे काय ते माहीती करुन घ्यायचं असेल तर तुमच्या ड्युआयडीना विचारा, स्ट्रेंजर वगैरे, तुम्हाला राग आल्यावर तुम्ही दुसरा आयडी घेऊन जे करता त्याला ट्रोलिंग म्हणतात
'जे होतंय' म्हणजे नक्की काय
'जे होतंय' म्हणजे नक्की काय होतंय मका यांश्याशी? विस्कटून सांगा.
बाकी या हजारो पोस्ट कुठेशा आहेत?
<< शेवटून हजारावे होते ते. >>
<< शेवटून हजारावे होते ते. >>
सर, मला तुमची निरर्थक बडबड आणि कोलांट्याउड्या आवडू लागल्या आहेत. पुढील वेळी 'हामाशेलापो' असे करावे.
हा माझा शेणाचा लाखावा पो.
आशूचॅंप
आशूचॅंप
विपुमध्ये या माझ्या. वॉकवरून आल्यावर बोलूया.
ईथे महेश काळेबद्दल बोलूया
विपुमध्ये या माझ्या. वॉकवरून
विपुमध्ये या माझ्या. वॉकवरून आल्यावर बोलूया.
ईथे महेश काळेबद्दल बोलूया
अत्यंत अपेक्षित पो
बाकी या हजारो पोस्ट कुठेशा
बाकी या हजारो पोस्ट कुठेशा आहेत?
>>>
मागच्या पानावर लोकं एकमेकांना विचारत //सांगत होते. मला ईण्टरेट नाही त्या असे शोधून वाचण्यात. फेसबूकवर जे मुळात मी कमी वापरतो तिथे काही नजरेस पडल्या. त्यांच्याबद्दल वाईट वाटण्यासाठी त्या पुरेश्या होत्या.
संदर्भ काय हे बघायला त्या पोस्टवरील चर्चा वाचता समजले की प्रतिसादातील बहुतेकांना हे प्रकरण ठाऊक झाले होते. कारण त्या पोस्ट फार वायरल झाल्या आहेत. तर हजारो पोस्ट म्हणजे हजार वेगवेगळ्या पोस्ट असे नाही तर काही दहाबाराच मीम्म्स का असेना ते हजारो लोकांनी शेअर करणे.
असो, बहुधा येथील जनतेचे ट्रोलिंगचे निकष आणि बेंचमार्क वेगळे आहेत, माझे वेगळे असावेत. त्यामुळे मला ट्रोलिंग वाटतेय ते प्रत्येकाला वाटेलच असे नाही.
झोपतो आता. उद्या बोलूया. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज _/\_
रोजा आणि हम्मा गाणे गायचे
रोजा आणि हम्मा गाणे गायचे त्या शोच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते का?
की असेच एक्स्ट्रा गायले आहे? >>>>>>> ही पोस्ट म्हणजे कमाल विनोदी आहे. मी लगेच कल्पना केली की XYZ ला केटरिंगची ऑर्डर दिली आहे. त्यांनी उदार होऊन जेवणात एक complimentary कोशिंबीर दिली. ती झाली अति खारट. पण मग ती पॅकेज मधे included नव्हती, त्यामुळे तक्रार करायची नाही.
कोणत्या कार्यक्रमाच्या प्रेक्षक/दर्शकांना कार्यक्रम बघता ऐकताना T&C माहित असतात. किती गाणी म्हणणार, किती फर्माइश घेणार, रसिकांबरोबर किती वेळ संवाद करणार हे कोणाला माहित असतं? चर्चा बेसुर गाण्याबद्दल आहे. तर वादासाठी उगीच काहीही मुद्दा का?
महेश काळेसुद्धा इतका चेकाळला
.
ट्रोलिंग म्हणजे काय? माहित
ट्रोलिंग म्हणजे काय? माहित नाही. पण मला वाटतं जे आहे ते ट्रोलिंगच आहे. माझे निकष वेगळे आहेत.
हजारो पोस्ट आहेत का? माहित नाही. मागल्या पानावर लोक चर्चा करत होती. म्हणजे असणारच. मी दोन तीन पाहिल्या. पण मी फेसबुक बघत नाही आणि तरीही दोन तीन दिसल्या म्हणजे हातखंब्यास कोंबडी मारली तर चार तास गेले तर आख्खी म्हस असेल तर त्रैराशिक मांडलं तर हजार तरी भरतीलच. परत मला ट्रोलिंग वाचण्यात इटरेस्ट नाही, तरीही मीम्स दिसले म्हणजे बघा खरे किती असतील!
ज्या दहा बारा पोस्ट दिसल्या त्यातील प्रत्येकाला ते प्रकरण माहित होते. ( आता पिंक टाकायला माझ्या निकषांनुसार माहित थोडी लागते! मी तर देतो ठोकून! म्हणजे सगळे तसेच करत असणार की! तर मुद्दा काय होता.... माझ्या स्वानुभवावरुन ... त्या १० वाचलेल्या पोस्ट वाल्या लोकांना ते प्रकरण माहित होते म्हणजे परत हातखंबा (ट्रिगर खंबा: 'दारू वाईट असते' मेसेज साठी एक दाबा, दारू दळणा साठी दोन दाबा. ) त्रैराशिकात मांडलं तर हजारो लोकांनी ते प्रकरण निश्चितच माहित नसतानाही त्यांनी टीकेची झोड उडवलेली असलीच पाहिजे. पण मी काय फेसबुक वाचत नाही. आणि मला ट्रोलिंग वाचण्यात इंटरेस्ट ही नाही. परत माझे वेगळ्या निकषांचे स्टॅटिस्टिक्स आहे. तर थोडक्यात काय ते वायरलच की! पटलं ना? नसेल तर सांगा. आणखी चार पोस्ट टाकून समजावुन सांगतो.
आणि हजारो पोस्ट म्हणजे हजार वेगळ्या पोस्ट नाही काही. तर १० पोस्ट १०० लोकांनी वाचल्या की झाल्या हजार. गणपतीत अथर्वशीर्ष पठण सहस्त्र वेळा करतात म्हणजे जसं १०० लोकं दहा वेळा म्हणतात तसंच. तिकडे कधी विचारलंत का की हजार म्हणजे वेगवेगळं का नाही ते! आले मोठे हजार मोजायला!
शब्दार्थः सहस्त्र = हजार.
अरे देवा... हे दळण अजुन चालुच
अरे देवा... हे दळण अजुन चालुच आहे का ?
समाज बदलतोय. ट्रोलिगप्रिय
समाज बदलतोय. ट्रोलिगप्रिय होतोय. आता हे दळण चालूच राहणार. जात्यात कोण कोण भरडले जातेय हेच आता बघायचे आहे.
@ आंधळी कोशिंबीर
ती खारट झाली तर आपण काय करतो?
कॅटरर्सशी भांडतो
आचाऱ्याची कॉलर पकडतो
पैसे परत मागतो.
निगेटीव्ह फिडबॅक देतो
ओळखीच्या लोकांना त्यांच्याकडे जाऊ नका हे सांगतो
की ती खारट बनवणाऱ्याचा फोटो काढून त्याची सोशल मिडीयावर टिंगल करत बसतो?
बर्र आपल्याला त्या पंगतीला जेवायलाच आमंत्रण नसेल. तरीही आपण हे करत असू तर मला ते जास्त विनोदी वाटते
जात्यात कोण कोण भरडले जातेय
जात्यात कोण कोण भरडले जातेय हेच आता बघायचे आहे.>> डायरेक्ट धमकी! एकदम पावलावर पाऊल हा! ऐकत नाही!
अगदी मका सारखेच झाले. हे त्याची एक अशीच डायरेक्ट धमकीची पोस्ट वाचली काल. https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...
लिंक बघितली. महेश काळे जाऊ दे
लिंक बघितली. महेश काळे जाऊ दे, मटाचे मराठी आवरा
जात्यात कोण कोण भरडले जातेय
जात्यात कोण कोण भरडले जातेय हेच आता बघायचे आहे.>> डायरेक्ट धमकी!
धमकी
कसली धमकी.. कोणाला धमकी...हे जे सोशल मिडीया फोफावल्याने ट्रोलिण्ग कल्चर सुरू झालेय त्याचा फटका सेलेब्रेटींना बसतोय. उदाहरणार्थ. सध्या क्रिकेटर राहुलचा फॉर्म खराब आहे तर त्यालाही झेलावी लागत आहे. कोण कोण भरडले जाणार आहे असे म्हटलेय.. यात धमकीचा ॲंगल कुठे आला? आणि कोणाला धमकी? काही घाई होतेय का? निव्वळ ऋन्मेषला कुठतरी मुद्द्यात पकडायचेय या एकाच उद्देशाने पोस्ट वाचल्या जात आहेत का?
Maharashtra Times ची लिंक
Maharashtra Times ची लिंक बघितली आणि वाचली.
तुम्हाला कोणालाच त्या व्यक्तीची comment offensive वाटत नाही का?
अरे तुरे ची भाषा?! आणि त्यावर महेश काळेंनी काहीच react करू नये? तरी खूपच संयमी आणि शांत उत्तर वाटतंय मला. कलाकार म्हणून थोडा सुद्धा मान ते deserve करत नाही का?
या उलट जर एवढाच प्रॉब्लेम होता त्या व्यक्तीला, तर “तुमचं गाणं काहीसं नाकात गायल्या सारखं वाटतंय” असं बोलता आला असतं की! Rude comments का? Feedback द्या, पण rudely नाही.
Pages