महेश काळे फॅन क्लब

Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27

सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुणी किरणी ऐकुन मी पण महेश काळे ची फॅन झाले होते...
पण.....
मग "सूर नवा ध्यास नवा" मधे जज म्हणुन तो आला आणि हळुहळु आवडायचा कमी झाला Happy
मला त्याचा आवाज जरी आवडत असला तरी त्याचा अ‍ॅटीट्युड अजिबात आवडत नाही. आणि मराठी च्या नावाखाली तो जे काही उच्च आणि संदर्भ नसलेलं मराठी तिथे बोलतो ते तर अजिबातच आवडत नाही. साधंसुधं मराठी बोलुन पण मुद्दा सांगता येतो. अवधुत गुप्ते च्या समोर त्याचं शिष्ट वागणं अजुनच उठुन दिसतं. काही दिवस मला वाटत होतं की त्याला तसं मुद्दाम वागायला सांगतात म्हणुन तो वागतो. पण कोरोनापूर्व काळात माझ्या भावाच्या कंपनी मधे पुण्यात महेश काळे यांना एकदा मुलाखतीसाठी बोलवले होते त्यावेळी २-३ तासाच्या मुलाखतीमधे काळे साहेबांनी एकही ओळ गाउन दाखवली नाही. लोकांनी खुप आग्रह केला तरी ढीम्म हलले नाहीत साहेब. उलट "आज संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे तिथे तुम्ही नक्की या " अशी स्वतः च्या पेड कार्यक्रमाची जाहिरात केली.इतका अ‍ॅटीट्युड बरा नव्हे. असो....
नुकतच एका कायप्पा च्या मेसेज वर महेश काळे आणि राहुल देशपांडे यांची गेट वे ऑफ इंडीया वरची जुगलबंदी पाहिली आणि त्यावेळी राहुल देशपांडे च्या समोर महेश मला थोडा फिका वाटला. तयारी नसताना अचानक गायले की काय कोण जाणे पण त्या व्हिडीओ मधे राहुल छा गये है एकदम...

Kanada Raja Pandharicha | Mahesh Kale | Sur Nava Dhyas Nava | महेश काळे | कानडा राजा पंढरीचा
https://www.youtube.com/watch?v=GA1x7iadCwo

एकदा आंघोळीला जाता जाता हे टीव्हीवर लागलेले. चांगली सुरुवात झाली म्हणून पाहिले आणि टॉवेल खांद्यावर घेऊन पुर्णवेळ ऐकतच राहिलो. आहाहा काय समा बांधला गेला. शेवटी उभ्या उभ्या समाधीच लागली माझी. नास्तिक आहे, त्यामुळे भक्तीभावाने वा विठ्ठल गजर ऐकून अंगावर शहारा आला असे होत नाही. तरीही तसे झाले. निव्वळ संगीताची जादू..

त्या आधी मला महेश काळे हे नावही माहीत नव्हते.
त्यानंतरही मुद्दाम शोधून काही ऐकले नाही.
पण हा आज हा धागा बघून आठवले आणि हे यूट्यूबर शोधून ऐकले पुन्हा.. मजा आली Happy

हे सुरांनो चंद्र व्हा!!!
पहिल्यांदा ऐकलं ते महेश काळेच्याच तो़ंडून. कुठल्यातरी अवॉर्ड फंक्शनमधे होतं. मंत्रमुग्ध होणं कशाला म्हणतात ते तिथल्या क्राऊडला बघून समजलं. स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं गाणं चालू असतानाच.
मला त्याचा आवाज जरी आवडत असला तरी त्याचा अ‍ॅटीट्युड अजिबात आवडत नाही. आणि मराठी च्या नावाखाली तो जे काही उच्च आणि संदर्भ नसलेलं मराठी तिथे बोलतो ते तर अजिबातच आवडत नाही. >>> सेम हियर. मुळात तो कार्यक्रमच आवडत नाही मला. गाणी राहिली बाजूला, ह्यांची भलतीच फालतूगीरी चालू असते.

‘अरुणी किरणी’ >>>> हा धागा बघून मी हे सुद्धा ऐकले आता. कट्यार काळजात घुसलीमध्ये हे आहे हे सुद्धा आताच कळले. वाह मजा आली. ते गाणे बघून चित्रपट बघावासा वाटतोय आता. शास्त्रीय संगीत म्हणजे काहीतरी बोर, आय मीन नॉट माय टाईप प्रकार समजत होतो मी. हे फार हॅपनिंग वाटले. मला आवडू लागलेय.

म्हणजे आतिफ अस्लम कॅटेगरी आहे वाटते
बरेचदा सूर घसरणे, पण आवाजात काहीतरी असते जे थेट काळजात शिरत असल्याने सूर हललेले इग्नोरले जाते.

राहुल देशपांडे कैकपटीने सरस. पन खरे तर पंडित जितेंद्र अभिषेकी व पंडित वसंत रावांचे ओरिजिनल कट्यार स्कोअर ऐका. महेश काळे फुलबाजी निव्वळ.

कानड़ा राजा पंढरीचा -> पं. वसंतराव देशपांडे व सुधीर फडके

हे सुरांनो चंद्र व्हा -> पं. जितेंद्र अभिषेकी

काही गाणी त्या त्या गायकांच्या आवाजातच ऐकावी वाटतात.

करोनापूर्व काळात हे सुरांनी चंद्र व्हा च्या फ्यूजनमुळे म. का. वर सो. मी वर भरपूर टीका झाली होती. अभिषेकीबुवांच्या काही जेष्ठ शिष्यांनी तो अभिषेकीबुवांचा शिष्यच नाहीये, तो खोटं सांगत असतो हे सांगितलं होतं.
करोनाची साथ सुरु झाली आणि मग म. का वाचला. आता परत आलाय तर नीट राहिला तर बरं.

महेश काळे आवडत नाही. गाण्यात कच्चेपणा, बेसुरेपणा, playing to the galleries approach आणि नको तेव्हढे अंगविक्षेप. आणि अर्थात attitude.
राहुल देशपांडे त्याच्या तुलनेत कितीतरी उंच आहेत असे माझे मत.

हो त्याची कोणतीही मुलाखत बघताना attitude च दिसतो , जज म्हणून पण बोअर वाटला होता, कट्यार मधली गाणी आवडतात पण.

राहुल देशपांडे कैकपटीने सरस>>>>> हो आणि नम्रता सुध्दा जाणवते , तसेच आनंद भाटे पण, जितके सरस आहेत तितके साधे आणि नम्रही वाटले.

कट्यार यु ट्यूबवर आहे
मोफत
>>>>>
लिंक मिळेल का प्लीज... शोधले, नाही सापडतेय
आणखी कुठे आहे का?

पण अभंग ऐकावे तर पंडित भीमसेनजींचेच. एवढा स्वर्गीय आवाज आणि साथीला तसेच संगीत, माझ्या दरवेळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. माझे आजोबाच वाटतात ते मला Happy

राहुल देशपांडे ह्यांचे सांवरे, आई जैयो हे मला आवडते. कबीरांची निर्गुणी भजने जी कुमारांनी गाऊन अफाट लोकप्रिय केली त्यातली काही राहुल ह्यांनी चांगली गायली आहेत. विशेषतः सुनता है गुरू ग्यानी. अर्थात कुमार ते कुमार. पण नव्या पिढीतले राहुलही श्रवणीय आहेत. त्यांच्या आवाजात घनता आणि गोडवा आहे. तान त्यांच्या आजोबांसारखी चपळ, चमकदार, तीक्ष्ण नसेल पण बुद्धिमान आहे. अर्थात बडे गवय्ये बनण्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. पण ते टीवी सारख्या झटपट कौतुक आणि प्रसिद्धी (आणि कदाचित पैसा)मिळवून देणाऱ्या माध्यमात अधिक रमलेले दिसतात.
महेश काळेंसाठीच्या धाग्यावर राहुल यांची स्तुती करून अवांतर केल्याबद्दल ऋन्मेssष ह्या आयडीस जबाबदार धरावे. Wink

टीव्हीवर गातात म्हणून लोकांना स्वस्तात ऐकायला मिळते.

तपश्चर्या करून मैफिल लावून बसले तर 10000 रु तिकीट लावतील , ते कोण देणार ?

अर्रेच्चा!! मी महेश काळे बद्दल धागा काढला तर राहुल देशपांडेवर सगळे का बोलतात आहेत?
disclaimer: मी सूर नवा पाहिलं नाही. एकही एपिसोड पहिला नाही. पाहणार ही नाही.
मुळात मला शास्त्रीय संगीत विशेष आवडत नाही आणि कळत तर त्याहूनही नाही. पण महेश काळे ऐकल्यावर उत्सुकता निर्माण झाली. राहुल देशपांडे उत्तम गायक आहेच पण म्हणून महेश काळे वाईट आहे, हे पटत नाही. गाणं मनाला भिडलं महेशचं
आणि माणूस म्हणून पण फारच ग्रेट वाटले मला ते. attitude वगैरे अजिबात वाटलं नाही त्यांच्यात. youtube वर स्पृहा ने घेतली आहे एक मुलाखत. काय मस्त बोलले आहेत ते. मी तर प्रेमात पडलेय. असो

महेश काळे सुरुवातीला चांगला वाटला होता, पण जास्त गाणी ऐकू तस तसा आवाज जरा हार्श , क्वचित कर्कश्य वाटायला लागला. विशेषतः राहुल देशपांडे सोबत जेव्हा त्यांची काही एकत्र गाणी ऐकली तेव्हा जाणवले ते.

महेश काळे माहीत आहे.. आवडतो आवाज त्याचा...
राहुल देशपांडे नवीन आलाय का मार्केट मध्ये.. बघायला पाहिजे गाणी..

राहुल देशपांडे नवीन आलाय का मार्केट मध्ये.. बघायला पाहिजे गाणी..
>>>>
मलाही माहीत नाही राहुल देशपांडे पण वरच्या काही पोस्ट पाहून तो जुना आणि महेश नवा वाटतेय.
आज रात्री शोधून दोघांची चार चार गाणी ऐकतो आणि दोघांत कोण माझ्या कानाला चांगला वाटतो याचे वैयक्तिक मत नोंदवतो Happy

कबीरांची निर्गुणी भजने जी कुमारांनी गाऊन अफाट लोकप्रिय केली त्यातली काही राहुल ह्यांनी चांगली गायली आहेत. विशेषतः सुनता है गुरू ग्यानी.>> कानाच्या पाळीला हात लावून सांगतो, माझे मत असे आहे की सुनता है गुरू ग्यानी हे कुमारजिंपेक्षा उत्तम गायले आहे Wink

आस्वाद >> I can relate to you

मलाही शास्त्रीय संगीतात अजिबात रुची नाही.
एकदा सहज म्हणून इंद्रायणी काठी ऐकत होतो गच्चीवर तेंव्हा महेश काळेंचे हे कानडा राजा suggestions मध्ये आले.
फार छान वाटले.नंतर त्यांची इतर गाणी ऐकली पण तितकीशी नाही आवडली.

राहुल देशपांडे >> एकदा त्यांचं गाणं इंडियन Idol मध्ये ऐकलं होतं. नम्रपणा आवडला.

Pages