Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आभोआकफ. +१
आभोआकफ. +१
आभोआकफ > म्हन्जे??
आभोआकफ > म्हन्जे??
आता भोगा आपल्या कर्माची फळ.
आता भोगा आपल्या कर्माची फळ.
बरोबर का भरत जी
इतके प्रतिसाद वाचून आता मलाही
इतके प्रतिसाद वाचून आता मलाही महेश काले अवडेनासा झालाय...
ईथे महेश काळे सारे टाईप्स
ईथे महेश काळे सतत टाईप्स करून असेल वा त्याची गाणी यूट्यूबवर शोधून ऐकली म्हणून असेल. पण मला फेसबूकवर महेश काळे संदर्भात बरेच काही काही सजेस्ट होऊ लागलेय गेल्या दोन चार दिवसात.
त्या मटेरीअलमध्ये काही मीम्स सुद्धा मिळत आहेत. हे सुरांनो चंद्र व्हा हा नक्की काय प्रकार आहे त्याच्याशी संबंधित बरेच मीम्स त्यावरच आधारीत होते. म्हणजे त्याने गायलेले गाणेच असणार, पण विशेष काय आहे त्यात?
लोकांना एखादा कलाकार आवडणे नावडणे असू शकते, पण त्यावरून मीम्स बनवून त्याची टिंगल का करतात? स्पेशली मराठी कलाकार कोणी जास्त प्रसिद्ध होऊ लागला की त्याबाबत हे हमखास आढळते असे एक निरीक्षण आहे. मुद्दाम उदाहरणे देत नाही, कारण धागा त्यांच्यावर जायला नको. महेश काळेवरच राहू दे..
कट्यार काळजात घुसली इथे
कट्यार काळजात घुसली इथे मिळेल
https://einthusan.tv/movie/watch/2783/?lang=marathi
This site can’t be reached
^^^ This site can’t be reached
माफ करा. ती link फक्त
माफ करा. ती link फक्त भारताबाहेर वापरता येते. तुमच्याकडे VPN असल्यास बाहेरील servers ना connect करून बघता येऊ शकेल.
अजून कुठे सापडल्यास इथे माहिती देईन.
ओके
ओके
चुकीचे उत्तर द्या:
चुकीचे उत्तर द्या:
मेरुदंड म्हणजे काय? >> कॅब ड्रायव्हर ला झालेला फाईन
मे महिन्यात ऋन्मेषला झालेला
मे महिन्यात ऋन्मेषला झालेला फाईन. मेऋदंड
'कट्यार काळजात घुसली ' मधील
'कट्यार काळजात घुसली ' मधील गाणी आणि नंतर देखील मी मका फॅन क्लब मधे होते. पण मग त्याने गायलेलं ' हे सुरांनो ' आणि लेटेस्ट ' रोजा ' ऐकल्यावर मी ताबडतोब फॅन क्लब मधुन पळ काढला आहे. (आता मला तो त्याच्यावर होणाऱ्या असंख्य मिम्समुळे आवडतो आहे. लोकांची creativity उतु जाते आहे. एवढे मस्त मीम्स पाहिले आहेत )
महेश काळेबाबत लोकं अति करत
महेश काळेबाबत लोकं अति करत आहेत.
हे नवीन ट्रोलिंग कल्चर सुरू झालेय त्याला बळी पडलाय बिचारा
त्याने एक प्रयोग केला. नाही जमला. ईटस ओके. त्याने त्याच्यातील प्रतिभा कमी होत नाही. ना त्याने आधी गायलेली गाणी कवडीमोल होतात. ऊलट काही प्रयोग केले याबद्दल मला त्याचे कौतुकच वाटते. पण ट्रोलर्स असा विचार करत नाही. त्यांचे दुकान एखाद्याला मिळणाऱ्या अपयशावरच चालते.
महेश काळेने शाहरूख खान ॲटीट्यूड बाळगावा आणि कमाल खान छाप ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करावे हेच उत्तम
लेटेस्ट ' रोजा ' ऐकल्यावर मी
लेटेस्ट ' रोजा ' ऐकल्यावर मी ताबडतोब फॅन क्लब मधुन पळ काढला आहे. >> काहा हय तू ... कैसी हय तू....रो SSSSS जा
भयंकर आहे ते.. हम्मा हम्मा पण आहे कुठेतरी... लाभ घ्यावा.
हम्मा हम्मा बेष्ट आहे. आणि
हम्मा हम्मा बेष्ट आहे. आणि त्यात तो स्वतःच म्हणालाय की प्रेक्षकांमध्ये कुणी लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी म्हणून हे म्हणलं.
>>त्यात तो स्वतःच म्हणालाय की
>>त्यात तो स्वतःच म्हणालाय की
हो ना!! त्याला स्वतालाच कळत होते की तो काहीच्या काही गायलाय ते!!
पण ट्रोलर्सना तेव्हढेच निमित्त मिळते
त्याला स्वतालाच कळत होते की
त्याला स्वतालाच कळत होते की तो काहीच्या काही गायलाय ते!!
पण ट्रोलर्सना तेव्हढेच निमित्त मिळते
>>>
हो. तसे तो म्हणालेला. रिक्वेस्टवर गायलेले. कदाचित त्याला मेहफिलीत जो शास्त्रीय गायकीचा जो सूर लागलेला असतो त्यापासून दूर जायचे नसावे. मला ईतले गाण्यातले तांत्रिक बाबी कळत नाही पण ऐकून सोडून द्यावे.
हे म्हणजे असे झाले की राहुल द्रविडला रिव्हर्स स्कूप मारायला सांगावे आणि मारताना तो धडपडला तर त्याच्यावर हसावे. बर्र नाही ट्राय करणार बोलला तरी श्या नाही मारता येत म्हणून चिडवावे.
तेच की!! आता धोनीला इतके वर्ष
तेच की!! आता धोनीला इतके वर्ष खेळूनही नाही मारता आले सब कॉटीनंटच्या बाहेर एकही शतक म्हणून काय त्याला आता त्यावरुन ट्रोल करणार काय?
एक्झॅक्टली !
एक्झॅक्टली !
विनिंग चेस मध्ये ज्याचा १०० चा एवरेज आहे त्या ऑल टाईम ग्रेटेस्ट फिनिशर धोनीची शतके का मोजावीत?
पण ट्रोलर्सना नेमके तेच दिसते जे नसते.
जर धोनी २०११ फायनल खेळला नसता आणि तो वर्ल्डकप आला नसता तर शंभर शतके मारणाऱ्या सचिनच्या नशिबी वर्ल्डकप नाही म्हणून तो ही ट्रोल झाला असता.
पुन्हा कारण तेच,
ट्रोलर्सना नेमके तेच दिसते जे नसते. हाच माझा मुद्दा आहे.
माफ करा रुन्मेश भाउ... तुमचंच
माफ करा रुन्मेश भाउ... तुमचंच बरोबर.. काळे साहेब सुंदर गायलेत रोजा आणि हम्मा....
एक वेळ महेश काळे मान्य करतील की ते वाईट गायलेत ही गाणी. पण तुम्हाला सांगायला कोण जाणार..असो....
तेच की धोनीचे स्थान वेगळे;
तेच की धोनीचे स्थान वेगळे; सचिनचे वेगळे; द्रवीडचे वेगळे..... आणि त्यांची त्यांची बलस्थाने आणि मर्यादा पण त्यांना माहित असतात पण चहापेक्षा किटल्याच जास्त गरम होतात त्याला कोण काय करणार?
माफ करा रुन्मेश भाउ... तुमचंच
माफ करा रुन्मेश भाउ... तुमचंच बरोबर.. काळे साहेब सुंदर गायलेत रोजा आणि हम्मा....
एक वेळ महेश काळे मान्य करतील की ते वाईट गायलेत ही गाणी. पण तुम्हाला सांगायला कोण जाणार..असो....
नवीन Submitted by स्मिता श्रीपाद on 6 April, 2023 - 14:08
>>>>
तुम्हाला मुद्दा कळला नाहीये का?
ते चांगले गायले नाहीत हेच म्हणत आहे मी..
पण यामुळे तुम्हाआम्हाला त्यांना ट्रोल करायचा अधिकार आहे का?
गंनत म्हणून ठिक आहे.. पण हे अति होतेय असे नाही का वाटत...
ट्रोलाच्या उलट्या बोंबा!
ट्रोलाच्या उलट्या बोंबा!
अमित
अमित
मला बघायचीयेत ती रोजा मीम्स पण फार दिसली नाहीत कुठे.
सूर हा कुठल्याही गायकीत सूरच
सूर हा कुठल्याही गायकीत सूरच असतो. बडबडगीत म्हटलं तरी सूर हालत नाही कसलेल्या गायकांचा. त्यामुळे सर्वात(टुकार)मक्याला माफी नाही.
एक वेळ महेश काळे मान्य करतील
एक वेळ महेश काळे मान्य करतील की ते वाईट गायलेत ही गाणी. पण तुम्हाला सांगायला कोण जाणार..>>>>>>>> स्मिता, precisely. एवढ्याच साठी ऋन्मेश (त्याची पोस्ट) दिसला की मी पुढे वाद घालत नाही. व्यर्थ असतं.
सगळ्यांनी वाईट म्हटलं की भाऊ बेस्ट म्हणणार हे नक्की. रोजा गाणं किती बेसुर आहे. एक शास्त्रीय संगीताचा गायक असा गायला तर टिकेस पात्र होणारच ना. पूर्वी गायलेल्या गाण्यांचा काही संबंध नाही. मी त्यावर टीका केली नाही. पण त्या पूर्वपुण्याईवर आता वाट्टेल ते प्रयोग करायला लागला तर उगीच कौतुक का करावं?
स्मिता, मेधावी, मीरा +1
स्मिता, मेधावी, मीरा +1
मीरा तुला एक कॅडबरीही
अगदी सुरुवातीला नवा गायक म्हणून मीही कौतुक केल्लं. पण मग गाडी उताराला लागली. रोजा अन हम्मा तर टोटल बाद.
लोकं काहीही गायला सांगतील, तुम्हाला ठरवता येत नाही? अन समजा गायलातच तर बेसिक लेव्हलतरी ठेवाव? ही त्या गाण्यांची टर उडवणं वाटलं, तेही ती गाणी समजून न घेता. ज्या क्षेत्रात आहात त्याचा किमान, मान राखावा न?
पुढे जाऊन टर उडवायलाही हरकत
पुढे जाऊन टर उडवायलाही हरकत नाही. किमान सुरात तरी गा!
>>सूर हा कुठल्याही गायकीत
>>सूर हा कुठल्याही गायकीत सूरच असतो. बडबडगीत म्हटलं तरी सूर हालत नाही कसलेल्या गायकांचा. >> +१
चित्रपटातील गाणे आहे तेव्हा अगदी सहज जमेल वगैरे गैरसमजापोटी गायचे धाडस केले की काय न कळे.
माझं गारुड ४-६ महिन्यांतच
माझं गारुड ४-६ महिन्यांतच उतरलं. त्यामुळे आता त्याला कोणी काहीही म्हटलं तरीही मला किंचितही वाईट वाटणार नाही अर्थात कट्यारचे गाणे अजूनही फार आवडतात. बादवे, हे मिम्स काही मी पहिले नाहीत. रोजा पण ऐकलं नाही. मी त्याला unfollow केल्यामुळे असेल पण FB ने मला काही दाखवलं नाही बघते सवडीने
Pages