Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल करताय. हे देखील चुकीचं आहे. Happy
>>>>
छे हो ह पा.
हे म्हणजे असे झाले की एखाद्या खुनाच्या अपराध्याला फाशीची शिक्षा सुनावणारा न्यायाधीशही खुनी झाला
आणि तसेही ईथे कोणी थेट ट्रोलर आहे असे वाटत नाही. ते तर जे लोकं ट्रोलर्सना पाठीशी घालायला बघत आहेत वा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ट्रोलिंगचे समर्थन करत आहेत त्यांना मी सावध करतोय.
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल करताय. हे देखील चुकीचं आहे. Happy
>>>>
छे हो ह पा.
हे म्हणजे असे झाले की एखाद्या खुनाच्या अपराध्याला फाशीची शिक्षा सुनावणारा न्यायाधीशही खुनी झाला
आणि तसेही ईथे कोणी थेट ट्रोलर आहे असे वाटत नाही. ते तर जे लोकं ट्रोलर्सना पाठीशी घालायला बघत आहेत वा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ट्रोलिंगचे समर्थन करत आहेत त्यांना मी सावध करतोय.
“ न्यायाधीशही खुनी झाला”
“ न्यायाधीशही खुनी झाला” स्वतःकडे स्वयंघोषित न्यायाधीशाची भुमिका घेणं हे preposterous आहे.
preposterous
preposterous
मराठीत सांगा.
माझे उदाहरण वेगळ्या मुद्द्याला होते.
पण तुमच्या वाक्याला +७८६
महेश काळे यांना ट्रोल करणारी आणि त्याचे समर्थन करणारी जनता स्वत:ला न्यायाधीशच समजू लागली आहे.
जनतेला उद्देशून नाही म्हटलं
जनतेला उद्देशून नाही म्हटलं मी. तुझ्या वाक्यावर लिहिलंय.
ते कळले मला.
ते कळले मला.
म्हणून म्हटले ना माझे उदाहरण वेगळे होते. त्यात मी सैनिकाचे उदाहरण दिले असते तर मी स्वत:ला सैनिक समजतो असे झाले नसते. ते मुद्दा पटवायला होते.
ते असो,
पण ट्रोलिंग करणाऱ्या जनतेला आपले वाक्य बरोबर लागू झाले. त्याबद्दल धन्यवाद
“पण ट्रोलिंग करणाऱ्या जनतेला
“पण ट्रोलिंग करणाऱ्या जनतेला आपले वाक्य बरोबर लागू झाले.” - मी त्यांना काहीही म्हटलेलं नाही. उगाच तुझ्या रोखानं म्हटलेलं त्यांच्यावर ढकलू नकोस.
“त्यात मी सैनिकाचे उदाहरण दिले असते” - उगाच ‘मधूच्या आत्याबाईंना मिश्या असत्या‘ छाप वाक्य आहे हे.
कशाला नादाला लागताय फेफ. गिरे
कशाला नादाला लागताय फेफ. गिरे तो भी टांग उपर प्रकार आहे. इग्नोअर मारा नी पुढे जा.
त्यातून व्यक्तीचा सोशल
त्यातून व्यक्तीचा सोशल मेडीआवर सातत्याने वावर , टिव्ही शो द्वारे लोकांसमोर झालेली गायक या पलिकडे परीक्षक-अभ्यासक इमेज हे सगळे बघता इतके सुरांना हललेले गाणे लोकं कसे चालवून घेतील? मी हे गाणे जरा वेगळ्या प्रकारे सादर करतोय असे म्हणून तेच गाणे वेगळ्या प्रकारे पण सुराला पक्के असे इथे नाहीये. शो मध्ये परीक्षक म्हणून तुम्ही केलेल्या कॉमेंट्स , तुमच्या इतर गायकांकडून असलेल्या अपेक्षा आणि आत्ताचे तुमचे सादरीकरण यातली एवढी मोठी तफावत बघून माध्यमात प्रतिक्रियाही तितकीच तीव्र उमटली असावी. >> १००%
फेसबुकवर 'एक कोटी चंद्र झालेल्या सुरांचा ग्रुप' अश्या नावाचा ग्रुप आहे.>>>> थँक्स हपा !
मस्त मिम्स आहेत, एका पॉईंट नंतर दया आली मका ची.
कॉमेंट्स वाचून असे वाटते इकडेच काही लोक खूप हर्ट झाले. पण मका ला मिम्स वाचून(किन्वा टीकेने?) काही वाटले नसावे. लोकांनी एव्हढी टीका टिपण्णी करूनही गडी काही बांधला नाही.
२०२२ पासून, त्यांनी लताजींना श्रद्धांजली दिली तेव्हापासूनचे मिम्स आहेत. म्हणजे तेव्हापासून मका गाण्याची वाट लावून गातोय.
मी मका चा फॅन क्लब म्हणून धागा बघितला तेव्हा रोजा कळलं, रोजा इतकं भयंकर गायलंय. मग यूट्यूब ने लगेच हम्मा हम्मा दाखवलं. तेव्हा "हा तोच मका का ?" असा प्रश्न पडला.
मग एक हजार चंद्र चा ग्रुप कळला त्यात त्याने अजून भयाण गायलेली गाणी कळली. बर त्याने त्यातली काही स्वतःच्या accnt वरूनही पोस्ट केलीयेत(?).
म्हणजे तो एखाद गाणं चुकुन चुकलेला नाहीये तर तो हेतुपुरस्पर असं गातोय.
आणि हम्मा हम्मा कुठल्या लॉजिक ने छोट्या मुलांचं गाणं आहे ??
Trolling is when someone posts or comments online to deliberately upset others.
An internet troll, or online bully, deliberately tries to offend, cause trouble or directly attack people by posting derogatory comments on Facebook posts, blogs, under YouTube videos, on forums and other social media, such as Twitter and Instagram.
Trolling वरून एव्हढं वरती जे बोललं गेलय तेव्हढं खरंच रौद्र, खुनशी किंवा भयंकर मला तरी कुठे दिसलं नाही.
आवडल्या तर टाळ्या वाजवा पण आवडलं नाही तरी काही कंमेंट्स करायच्या नाहीत असं कसं ?
फेरफटका,
फेरफटका,
हो मला माहीत आहे तुम्ही ते स्वयंघोषित न्यायाधीश ट्रोलिंग करणाऱ्यांना म्हटले नाहीये.
मी ते त्यांना लागू होतेय म्हणून माझ्यातर्फे म्हणतोय. तुमच्याशी नाही येणार ते भांडायला. डोंट वरी
एका पॉईंट नंतर दया आली मका ची
एका पॉईंट नंतर दया आली मका ची.
>>>>
+७८६
हा पॉईंट येतोच.
कारण एकदा ट्रोलिंग सुरू झाली की पातळीची जी घसरण सुर होते तिला थांबवणे अवघड. मग तो कंट्रोल कोणा एकाच्या हातात राहत नाही. त्यात कोणी महिला असेल तर पातळी सुटलेल्या कंबरेखालच्या पोस्टही लवकरच सुरू होतात.
आवडल्या तर टाळ्या वाजवा पण
आवडल्या तर टाळ्या वाजवा पण आवडलं नाही तरी काही कंमेंट्स करायच्या नाहीत असं कसं ?
>>>
आवडले तर टाळ्या वाजवायची सक्ती नसते
क्रिकेटर्सना हा फार अनुभव येतो. जिंकले तर डोक्यावर घ्या. हरले तर पायदळी तुडवा. २००७ वर्ल्डकप हरल्यावर धोनी सारख्याच्या घरावर दहडफेक झाली होती. ही तीच लोकं होती ज्यांनी त्याआधी त्याचा ऊदोउदो केला होता.
नंतर त्याच वर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली आपण २०-२० वर्ल्डकप जिंकल्यावर त्या दगडफेक करणाऱ्या लोकांना असेही वाटण्याची शक्यता आहे की आम्ही याला ईंगा दाखवला तर बघा कसा सुधारला
छन्दिफन्दी, आभोआपोफ.
छन्दिफन्दी, आभोआपोफ.
(No subject)
@
@
धागा महेश काळे यांच्यावर आहे. माझ्यावर चर्चा करून भरकटवू नका. नंतर ते ही बिल माझ्यावरच फाटते.
मुद्द्याला मुद्याने उत्तर देऊन मुद्द्याचे तेवढेच बोलूया.
छन्दिफन्दी, आभोआपोफ. >>> सायो
छन्दिफन्दी, आभोआपोफ. >>> सायो , आभोआपोफ?
माबो वरची भाषा शिकत्ये
छन्दिफन्दी, आभोआपोफ. >>> सायो
छन्दिफन्दी, आभोआपोफ. >>> सायो , आभोआपोफ?
माबो वरची भाषा शिकत्ये
आता भोगा आपल्या पोस्टची फळं.
आता भोगा आपल्या पोस्टची फळं.
@छन्दिफन्दी, आभोआपोफ ..म्हणजे
@छन्दिफन्दी, आभोआपोफ ..म्हणजे आता भोगा आपल्या पोस्टची फळं
.
.
Thanks
Thanks
त्या मैफिलीतले प्रेक्षक
त्या मैफिलीतले प्रेक्षक एन्जॉय करताना दिसतायत. त्याला न गेलेलेच ट्रोल करतायत असं दिसतंय.
Submitted by सायो on 8 April, 2023 - 09:41
>>>
+७८६
अचूक निरीक्षण
विडिओ बघताना मी देखील मुद्दाम प्रेक्षकांचे चेहरे न्याहाळत होतो
एकुण आपल्यावर टीका होत असेल
एकुण आपल्यावर टीका होत असेल तर त्या निमित्ताने लोक आपली दखल घेताहेत, आपले आधीचे काम शोधताहेत, आपला व्ह्युवर काऊंट वाढतोय याचा आनंद मानायचे दिवस आलेले आहेत.
जरा काऊंट कमी होतोय असे वाटले की काहीतरी, कसेतरी रेका.. लोक लगेच धावत धावत येतात टीका करायला… मग परत जातो काऊंट वर…. आपल्याला काय, कसेही करुन पैसे येऊदे..
रच्याकने, आज भाऊ घरी आलाय, त्याने सकाळपासुन राहुल देशपांडे अप्लग्द्ड लाऊन ठेवलेय कॉम्प्युटर वर. कामे सुरु आहेत व गाणीही…
महेश काळेचा आवाज मलाही आजिबात
महेश काळेचा आवाज मलाही आजिबात आवडत नाही. त्याच्या आवाजाची टोनल क्वालिटीच विचित्र आहे. राहुल देशपांडेच्या तुलनेत तर त्याचे गाणे निकृष्ट वाटते. त्याच्या आवाजात काही विशिष्ट गाणीच जरा बरी वाटतात मात्र बाकी तो ओव्हररेटेड आणि खरे म्हणायचे तर 'आम्ही बुवा शास्त्रीय संगीत ऐकतो' वाल्या दिखाऊ लोकांनी विनाकारण डोक्यावर घेतलेला गायक आहे. रोजा हे गाणे म्हणण्यासाठी लागणारी मेहनत त्याने घेतली नाही. आपले वाह्यात बदल करून ते गाणे अर्धवटपणे श्रोत्यांच्या माथी मारले त्याने, त्यासाठीची तयारी नव्हती त्यामुळे हसे झाले. त्यामानाने राहुल हिंदी फिल्मी, नॉन फिल्मी, उपशास्त्रीय गाणीही फारच तयारीने गातो. त्याच्या आवाजाची मर्यादा मान्य करूनही सूरांना तो कधी चुकलाय असे कधीच वाटत नाही. मकाची जी ट्रोलिंग झाली आहे ती त्याच्या इन्काँपिटंसमुळे. त्यात एवढे काही नाही.
राहुलच्या आवाजतले आये कुछ अब्र पुढे दिले आहे. ते ऐका आणि मग परत मकाचे हे रोजा ऐका.
https://www.youtube.com/watch?v=Z87wkBYWEBI
आमीर खान हा मिस्टर
आमीर खान हा मिस्टर पर्रफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. एखादी भुमिका साकारायला कमालीची मेहनत घेतो. पण तरीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर तो आणि त्याचे चित्रपट असतातच.
त्यामुळे असे वाटते एखादा कलाकार आपली कला साकार करताना किती कमी पडतोय हा निकष बहुधा ट्रोलिंगमागे नसावा. त्यावर ईतर कारणांनी असलेला राग बाहेर पडत असावा. तसेच एकदा ट्रोलिंग सुरू झाली की टवाळा आवडे ट्रोलिंग म्हणत ईतरही वाहत्या गंगेत हात धुवून घेत असावेत.
आपला व्ह्युवर काऊंट वाढतोय
आपला व्ह्युवर काऊंट वाढतोय याचा आनंद मानायचे दिवस आलेले आहेत
>>>
यातही तथ्य आहेच.
काही कलाकार नक्कीच असे असतील. पण दुर्दैवाने सरसकट सारेच कलाकार असाच विचार करत असतील असे लोकांना वाटते आणि ट्रोल होणाऱ्यांना सहानुभुती न मिळता स्टंटबाज समजले जाते.
नाण्याची दुसरी बाजू जरूर बघावी. पण त्या नादात पहिली विसरायची गल्लत होता कामा नये.
पुंबा, मी महेश काळे विशेष
पुंबा, मी महेश काळे विशेष ऐकलेला नाही कारण शास्त्रीय संगीत आवडत नाही, कळत नाही. पण जेव्हा के व्हा त्याने गायलेलं काही कानावर पडलं आहे तेव्हा ते गाणं आणि तो अपील झालेला नाही त्यामुळे फार माहित नसूनही तुमच्या पोस्टला सहमती द्याविशी वाटते आहे.
मागच्या पानांवर वत्सलाने राहुल देशपांडे आणि त्याच्या मुलीबद्दल जे लिहिलं होतं त्याच्याशीही सहमत. लॉकडाऊनमध्ये त्याचे काही व्हिडीओ पाहिले होते पण फक्त गाण्यावर फोकस न करता मध्ये मध्ये मुलीला घेऊन फुटेज खाणं कंटाळवाणं झालं.
सर तुम्ही ट्रोलिंग बद्दल
सर तुम्ही ट्रोलिंग बद्दल बोलताय?
<< एखादा कलाकार आपली कला
<< एखादा कलाकार आपली कला साकार करताना किती कमी पडतोय हा निकष बहुधा ट्रोलिंगमागे नसावा. त्यावर ईतर कारणांनी असलेला राग बाहेर पडत असावा. >>
आत्ता मला कळलं की मायबोलीवर सरांचे ट्रोलिंग का होते ते. खरंच, कलाकाराच्या कलेची किंमतच राहिली नाहीये.
एकुण आपल्यावर टीका होत असेल
एकुण आपल्यावर टीका होत असेल तर त्या निमित्ताने लोक आपली दखल घेताहेत, आपले आधीचे काम शोधताहेत, आपला व्ह्युवर काऊंट वाढतोय याचा आनंद मानायचे दिवस आलेले आहेत. >>>>>> हे माबो बाबतीत ही ओळखीचं वाटत नाही का? माबोवरील आयडी आठवा. उदाहरण मिळेल.
बाकी रविवारी फुरसद असताना, बाकी काही करमणुक नसताना, ऋन्मेषचा थयथयाट मात्र चांगली करमणुक करतो आहे. चालु द्या.
Pages