Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या पूर्वपुण्याईवर आता
त्या पूर्वपुण्याईवर आता वाट्टेल ते प्रयोग करायला लागला तर उगीच कौतुक का करावं?>>> १००%
पण यामुळे तुम्हाआम्हाला त्यांना ट्रोल करायचा अधिकार आहे का? >>> अधिकार वगैरे चा प्रश्न येत नाही.
लोकं जेव्हा डोक्यावर घेतात तेव्हाही कधी कधी ते उगाच वारेमाप कौतुक होते, पण तेव्हा हे सेलिब्रिटी म्हणत नाहीत कि माझी तेव्हढी लायकी/ वकूब नाही
पण जेव्हा हेच लोकं त्यानंचं काम नाही आवडलं म्हणून टीका करतात तेव्हा ती टीका हि त्यांनी झेलायला शिकली पाहिजे.
आता ती टीका शाब्दिक नसून मिम्स किंवा व्यंगचित्रांमधून झाली तर लोकं त्याला जास्त कनेक्ट होतात आणि उचलून धरतात.
मका चा लाईव्ह कार्यक्रम मी बघितला होता, अक्ख सभागृह त्यांच्या आवाजातील आणि स्वरातील जादूने मंत्रमुग्ध झालं होतं.
पण रोजा आणि हम्मा गाणी म्हणजे त्याच्या बरोबर उलट होतं. इतकं भयंकर वाईट. मला वाटत कॉलेज किंवा घरगुती समारंभात पण याहून चांगलं म्हणत असतील.
जरी गाण्यातील जास्त काही काळात नसल तरी वाईट गाणं तरी कळत
त्याने एक प्रयोग केला. नाही जमला. ईटस ओके.>>>> प्रयोग करायला काहीच हरकत नाही पण तो त्यांनी खाजगीत करून त्याचा प्रतिसाद चांगला असेल तर लोकांसमोर सादर करावा. लोकं त्यांचे पैसे, वेळ देऊन येतात त्याच तरी भान ठेवलं गेलं पाहिजे.
"वट्ट पैसे मोजल्यावर " लोकं बोलायला का मागे रहातील.
कुठलाही शेफ आधी प्रयोग करून चांगला झाला तरच ती डिश त्याच्या रेस्टारंट मेनू मध्ये समाविष्ट करतो.
मागे ऊषा ऊथुपजींने असेच
मागे ऊषा ऊथुपजींने असेच अडेलचे स्कायफॉल गायलेले....ते ही माझ्या मते फसलेच होते पण ऊषाजींचा एकंदर कूल डिमिनर, एक्सपेरिमेंटल अॅटिट्यूड, ऑनेस्टी, मॉडेस्टी बघता श्रोत्यांनी आधी लाईव आणि नंतर यू ट्यूबवर ऊषाजींचा हा परफॉर्मन्स चांगलाच ऊचलून धरला.
महेश काळे आणि त्यांच्या एकंदर पर्सनॅलिटी आणि अॅटिट्यूड बद्दल काही विशेषणे वापरावीत त्यात काही भारावणारे आहे असे म्हणता येत नाही. पुन्हा फॉर ऑबविअस रिझन्स त्यांच्या प्ले बॅक आणि लाईव सिंगिंगच्या क्वालिटी मध्ये सुद्धा खूप फरक असतो असे मला वाटते.
१) लोकं जेव्हा डोक्यावर घेतात
१) लोकं जेव्हा डोक्यावर घेतात तेव्हाही कधी कधी ते उगाच वारेमाप कौतुक होते, पण तेव्हा हे सेलिब्रिटी म्हणत नाहीत कि माझी तेव्हढी लायकी/ वकूब नाही
२) पण जेव्हा हेच लोकं त्यानंचं काम नाही आवडलं म्हणून टीका करतात तेव्हा ती टीका हि त्यांनी झेलायला शिकली पाहिजे.
>>>>>
क्रमांक १ मध्ये त्या गायकाने लोकांना स्वत: सांगितले असते का की मला डोक्यावर घ्या? लोकं त्यांना अमुकतमुक आवडले म्हणून डोक्यावर घेतात. ती त्यांची चॉईस असते. म्हणून न आवडल्यास जोड्याने मारायचा अधिकार त्यांना मिळत नाही.
असो,
महेश काळे फार छान गायले असे ईथे कोणी बोलत नाहीये.
पण उगाच विरोधाला विरोध म्हणून ट्रोलिंगचे समर्थन करू नका.
आणि हो, ट्रोलिंग आणि निगेटीव्ह फिडबॅक यातलाही फरक लक्षात घ्या. दुर्दैवाने तो ईथे बरेच लोकांना कळला नाही असे वाटतेय.
तुम्हाला त्याचे गाणे नाही आवडले तर तसे मत मांडायला कोणीच अटकाव केला नाहीये. आक्षेप ट्रोलिंगला आहे.
विचार करतोय थांबूया आता...
नाहीतर दोनचार दिवसाने अशीही चर्चा व्हायची की लोकांना महेश काळे आवडत होता. पण ऋन्मेषने त्याचे वारेमाप कौतुक केले म्हणून तो लोकांना आवडेनासा झाला
"वट्ट पैसे मोजल्यावर " लोकं
"वट्ट पैसे मोजल्यावर " लोकं बोलायला का मागे रहातील.
>>>>
हे वाक्य मात्र फार त्रास देऊन गेले.
कलेची किंमत पैश्यात करणाऱ्या लोकांनी खरे तर जाऊच नये अश्या मेहफिलीला.. कारण सूर कधी लागतो तर कधी नाही याची समज रसिकांना हवीच.
पण मुळात त्या पैसे मोजलेल्या उपस्थित प्रेक्षकांना तितका त्रास दिसला नाही. ट्रोल करणारी जनता तर युट्यूबवर फुकट विडिओ बघणारी आहे. त्यामुळे त्यांनी तरी हा पैश्यांचा रुबाब दाखवू नये
कलेची किंमत पैश्यात करणाऱ्या
कलेची किंमत पैश्यात करणाऱ्या लोकांनी खरे तर जाऊच नये अश्या मेहफिलीला.. कारण सूर कधी लागतो तर कधी नाही याची समज रसिकांना हवीच.>>>>>>> सगळीकडेच बादरायण वाक्यांचा सपाटा आहे. खरे कलाकार आपल्या चौकटीत राहतात किंवा समजा चौकट मोडून पुढे जायचा प्रयत्न करतात तेव्हा तो पण एक जबरदस्त अनुभव ठरु शकतो प्रेक्षकांकरता. इथे म्हणजे क्लासिकल सिंगर म्हणून माणूस बघायला येतो आणि काहीही पोरखेळ सुरु केला की ज्यांना क्लासिकलची जाण आहे, ते लोकं वैतागतीलच ना? आणि क्लासिकलची जाण जाऊ देऊ एक मिनिट. जाण नसलेल्या लोकांना पण तो सगळा प्रकार हास्यास्पद वाटत आहे.
काहीही कैवार घ्यायचं अन पौष्टिक जांभळाच्या झाडावर चढायचं असं सुरु आहे मल्टिपल बाफंवर.
ट्रोल करणारी जनता तर
ट्रोल करणारी जनता तर युट्यूबवर फुकट विडिओ बघणारी आहे. त्यामुळे त्यांनी तरी हा पैश्यांचा रुबाब दाखवू नये Happy >> यू-ट्यूब पाहणार्या जनतेने शास्त्रीय संगीताची बैठक लाभलेल्या गायकाने खराब अॅटिट्यूड दाखवत (आपल्याला न जमणार्या गोष्टी लोकांच्या डोक्यावर मारणे) जनतेच्या आवडत्या गाण्याचे बेसुरे भजे केल्याबद्दल महेश काळेंवर ताशेरे ओढले आहेत.
ईथे आशाजी, सोनू निगम ते अगदी ईंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक म्हणून चमकलेल्या गायकांचे लाईव कॉन्सर्ट होतात. सोनू निगम, शान आणि सुखविंदर, केके, श्रेया घोशाल, राहत फतेह अली, राहुल देशपांडे ह्यांच्या गायकी, पर्फॉर्मन्स आणि अॅटिट्यूडबद्दल नेहमी चांगलेच ऐकले आहे . आशाजींबद्दल अॅटिट्यूड वरून मिक्स्ड रिअॅक्शन ऐकली आहे. बाकी सगळे गायक बहुधा सेलिब्रिटी मोडमध्येच असतात त्यांच्याबद्दल काय बोलणार.
ट्रोलिंग आणि निगेटीव्ह फिडबॅक
ट्रोलिंग आणि निगेटीव्ह फिडबॅक यातलाही फरक लक्षात घ्या. दुर्दैवाने तो ईथे बरेच लोकांना कळला नाही असे वाटतेय.>>> समजावून सान्गा प्लीज.
कलेची किंमत पैश्यात करणाऱ्या
कलेची किंमत पैश्यात करणाऱ्या लोकांनी खरे तर जाऊच नये अश्या मेहफिलीला.. कारण सूर कधी लागतो तर कधी नाही याची समज रसिकांना हवीच.>>>>>>>कलेची किंमत नाही त्या कलाकाराला ऐकायची किंमत.
खऱ्या गायकांने कलेची उपासना करावी, साधना करावी उगाच या पैशांच्या मायाजालात अडकून आपली कला विकू नये.
युट्यूबवर फुकट विडिओ बघणारी आहे. >>> यू ट्यूब वर बघणारे फुकटात बघत नसतात ते मोबदला पैशात देत नाहीत पण त्यांची खाजगी माहिती विकून उलट यूट्यूब आणि चॅनेल दोघांनाही त्याचेच पैसे मिळवून देत असतात. ते बघतात म्हणून ह्यांना पैसे मिळतात.
कला नंतर आधी अर्थकारण असतं
मैत्रेयी, फेसबुकवर 'एक कोटी
मैत्रेयी, फेसबुकवर 'एक कोटी चंद्र झालेल्या सुरांचा ग्रुप' अश्या नावाचा ग्रुप आहे. तिथे सापडतील सगळे ते मीम्स. नाव पण काय नामी आहे ग्रुपचं!
कधीतरी सूर नाही लागला तर तो
कधीतरी सूर नाही लागला तर तो नेहमीप्रमाणे प्रकाशमान सूर नसेल एखादवेळेस पण म्हणून तो बेसूर कधीच नसतो. गायक न गाता खाली बसेल सूर बेसूर झाला तर.
महेश काळे खालीच बसून गातो
महेश काळे खालीच बसून गातो
सकाळी ऊठल्यावर ईथल्या पहिल्या
सकाळी ऊठल्यावर ईथल्या पहिल्या पानापासूनच्या पोस्ट वाचल्या. बहुतेक महेश काळे यांच्या ॲटीट्यूडशी बहुतेकांना प्रॉब्लेम आहे. ईथलीच जनता असे नाही तर ओवरऑल सर्व प्रेक्षकांबाबत हे बोलत आहे. त्यामुळे नावडत्या माणसाचे स्कोअर सेटलिंग असा जो एक प्रकार असतो तो ही या ट्रोलिंगला कारणीभूत असावा. पण तरीही ट्रोलिंग कधीच समर्थनीय होत नाही. किंबहुना जे लोकं एखाद्याचे ट्रोलिंग हिरीरीने करतात त्यांनी ईतर कोणाच्या ॲटीट्यूडला नावे ठेवण्यात अर्थ नाही.
असो,
कामात आहे जरा
सवडीने येतो..... तोपर्यंत ऋमाल!
>> नावडत्या माणसाचे स्कोअर
>> नावडत्या माणसाचे स्कोअर सेटलिंग असा जो एक प्रकार असतो तो ही या ट्रोलिंगला कारणीभूत असावा.>>
नावडता माणूस वगैरे असे काही नाही हो! ट्रोलिंग तर कुणाचेच होऊ नये. पण आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात जसे विडीओ व्हायरल होवून कौतुक, डोक्यावर घेणे होते तसेच हे ट्रोलिंगचे होते. त्यातून व्यक्तीचा सोशल मेडीआवर सातत्याने वावर , टिव्ही शो द्वारे लोकांसमोर झालेली गायक या पलिकडे परीक्षक-अभ्यासक इमेज हे सगळे बघता इतके सुरांना हललेले गाणे लोकं कसे चालवून घेतील? मी हे गाणे जरा वेगळ्या प्रकारे सादर करतोय असे म्हणून तेच गाणे वेगळ्या प्रकारे पण सुराला पक्के असे इथे नाहीये. शो मध्ये परीक्षक म्हणून तुम्ही केलेल्या कॉमेंट्स , तुमच्या इतर गायकांकडून असलेल्या अपेक्षा आणि आत्ताचे तुमचे सादरीकरण यातली एवढी मोठी तफावत बघून माध्यमात प्रतिक्रियाही तितकीच तीव्र उमटली असावी. कार्यक्रम करता तेव्हा एकतर पूर्ण तयारीने गावे किंवा मग तुमची फर्माईश आहे पण हा माझा प्रांत नव्हे असे नम्रपणे सांगून विषय संपवावा. आज आवाज तितकासा साध देत नाहीये पण प्रयत्न करेन, सांभाळून घ्या असे म्हटलेले प्रेक्षकांना चालते. इथे तसेही नाहीये.
सवडीने येतो..... तोपर्यंत
सवडीने येतो..... तोपर्यंत ऋमाल!
इसे मै धमकी समझूं या चेतावनी ?
काही असो, ऋन्म्याचे बाटलीभर रक्त काढून त्यापासून हाय बी पी चे औषध बनवायला हवे.
हम्मा हम्मा पाहून हसून हसून
हम्मा हम्मा पाहून हसून हसून पडलो !!! का हा स्वतःचे इतकं हसू करून घेतो
राहुल देशपांडे फारच चांगला आहे याच्यापेक्षा
किंवा मग तुमची फर्माईश आहे पण
किंवा मग तुमची फर्माईश आहे पण हा माझा प्रांत नव्हे असे नम्रपणे सांगून विषय संपवावा.
>>>>>>
हो. नाहीतर आम्ही तुला ट्रोल करू...
अरे त्याला ठरवू द्या ना. त्याला काय करायचे आहे. तुम्ही का लादत आहात?
काय चालू आहे हे. लोकं ईतके हिरीरीने ट्रोलिंगचे समर्थन का करत आहेत?
याची मला दोन कारणे दिसत आहेत.
१) तो कलाकार नावडता असणे
२) आपण स्वत:ही ट्रोलिंग हा प्रकार एंजॉय करत असणे.
मी त्या कलाकाराचे कौतुक केले तेव्हा त्याला बरे चालले. आता मला त्याची कला नाही आवडली तर मी ट्रोल केले तर गळे कश्याला काढायचे...
काय युक्तीवाद आहे यार हा?
रोज मी ऑफिसमधील एका मुलीला तिचे छान छान ड्रेस बघून कॉम्प्लीमेंट देत असेल आणि ती खुश होत असेल. तर एके दिवशी तिने केलेली फॅशन गंडली तर मी तिला चारचौघात, काय माकडे आज काय घालून आलीस असे म्हटलेले तिने चालवून घ्यावे ही कुठली अपेक्षा यार??
आय रीपीट, मी कुठेही म्हणत नाही की त्याने चांगले गायले वा तितकेही वाईट नाही वगैरे. पण तुम्ही कोण आहात यार त्यावर न्यायनिवाडा करून त्याला ट्रोलिंगची शिक्षा देणारे. झुंडशाही आहे ही ईतके साधे खरेच कळत नाहीये का कोणालाच ईथे?
ऋन्मेऽऽष यांचे बरोबर आहे, हे
ऋन्मेऽऽष यांचे बरोबर आहे, हे ट्रोलिंग आहे आणि झुंडशाही आहे
मी ऐकलं ते रोजा जानेमन आता
मी ऐकलं ते रोजा जानेमन आता शोधून.तसं फार वाईट नाहीये. लाईव्ह मध्ये आळवून व्हेरिएशन हरिहरन पण घेतात.फक्त ते तबला पेटी ढपटक ढपटक नको होतं मात्र.रस्सम वर पिनट बटर किंवा पिझ्झा वर कढीपत्ता उडीद फोडणी खाल्ल्याचा भास होतोय.
मला तर महेश काळेचा चेहराही
मला तर महेश काळेचा चेहराही बघवेना गाताना. एरवीही त्याची गाणी ऐकत नाहीच. क्लासिकल नाही गायलं हे नशिब प्रेक्षकांचं. त्या मैफिलीतले प्रेक्षक एन्जॉय करताना दिसतायत. त्याला न गेलेलेच ट्रोल करतायत असं दिसतंय.
हरिहरन लाईव्ह गाताना फार
हरिहरन लाईव्ह गाताना आळवून, सरगम वगैरे घुसडून गायला लागले की फार विचित्र गातात. महेश काळे त्या मानाने बराच बरा म्हणायचं!
कदाचित तेव्हा ते स्वत:साठी
कदाचित तेव्हा ते स्वत:साठी गात असावेत.
पण दुर्दैवाने आपण अश्या गायकांना तो हक्क नाकारला आहे.
जे आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे ते आणि तसे गा
अन्यथा ट्रोल व्हायला तयार राहा
ऋन्मेष यांच्याशी सहमत. एखाद
ऋन्मेष यांच्याशी सहमत. एखाद दुसर गाणं नाही जमलं म्हणून ट्रोल करणे चुकीचे आहे. हा धागा 2021 ला काढलेला आहे आणि 6 एप्रिल 2023 ला परत वरती आला. पण सध्या जे काळेंवर टीका करत आहेत त्यातले बहुतांशी लोक 2021 ला सुद्धा टिकाच करत होते. एखादा गायक आवडत नसेल तर त्याच गाणं ऐकू नये.
आस्वाद, व्वा धाग्याचा विषय
आस्वाद, व्वा धाग्याचा विषय फारच छान...
पण लोकहो तुम्हाला दुसरा गायक वा गायिका आवडत असल्यास कृपया दुसरे धागे काढून त्यावर प्रतिसाद लिहा, हा धागा मका विषयीच असु द्या
फॅन क्लब काढणारीनेच म्हटलंय
फॅन क्लब काढणारीनेच म्हटलंय की तो आता आवडत नाही. आणखी काय हवं?
फॅन क्लब काढणारीनेच म्हटलंय
फॅन क्लब काढणारीनेच म्हटलंय की तो आता आवडत नाही. आणखी काय हवं?
>>>>>
यात काय म्हणायचेय ते कळले नाही.
धागाकर्त्याची आवड बदलली म्हणून त्यानुसार धाग्याचा उद्देश बदलत नाही. तो आपल्या जागीच राहतो.
त्यांची आवड खरेच बदललीही असेन पण अजूनही असे बरेच जण असतील ज्यांना महेश काळे आवडत असतील. पण अश्या ट्रोलिंग काळात ते आपली आवड सांगायला टाळत असतील. (हे असे होते. हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे.)
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल
ऋन्मेऽऽष, तुम्ही ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल करताय. हे देखील चुकीचं आहे.
[ किंवा मग तुमची फर्माईश आहे
[ किंवा मग तुमची फर्माईश आहे पण हा माझा प्रांत नव्हे असे नम्रपणे सांगून विषय संपवावा.
>>>>>>
हो. नाहीतर आम्ही तुला ट्रोल करू...
अरे त्याला ठरवू द्या ना. त्याला काय करायचे आहे. तुम्ही का लादत आहात?] >>
मी माझ्या प्रतिसादात ट्रोलिंगचे समर्थन केलेले नाही. मात्र परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून कलाकाराने काही पथ्ये पाळावीत हे माझे मत. या वर्षीच्या हरिवल्लभ संमेलनात महेश काळे गायले. चांगले गायले तर मी ओळखीत बर्याच जणांना लिंक पाठवली, वाईट गायले असते तर नसती पाठवली.
Do not feed 'THE' troll.
Do not feed 'THE' troll.
मी 'मकाचे गाणे आवडत नाही'
मी 'मकाचे गाणे आवडत नाही' फॅन क्लब मध्ये. लय, सूर सगळे सुट्टीवर गेले आहेत असे त्यांचे लाईव्ह कार्यक्रम ऐकताना जाणवते.
चांगले गायले तर मी ओळखीत बर्
चांगले गायले तर मी ओळखीत बर्याच जणांना लिंक पाठवली, वाईट गायले असते तर नसती पाठवली.
>>>>
एक्झॅक्टली एवढेच अपेक्षित आहे.
वाईट गायल्यावर झोडपायची गरज नसते.
तसेच जे झोडपत आहेत त्यांना काही न बोलता गायकानेच वाईट गाऊन चूक केली म्हणून त्यालाच ऊलट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यालाही अर्थ नाही.
Pages