Submitted by पुरंदरे शशांक on 3 April, 2023 - 01:51
जाणिवा
डोळे जाणतीना काही
व्योम अफाट केवढे
दिसे पटलावरी ते
पाहूनीच धन्य होते
गंध फुलांचा मोहक
जरी जाणिवा सजग
जग सुगंधाचे थोर
काय जाणवे सलग !
स्पर्श रुप रस गंध
जाणिवेत मावेना की
एका सानुल्या देहात
लाभे जरासी झुळुकी
विश्व होऊनिया जरी
भोगे विशाल सोहळे
थिटी जाणिव फाटता
माझे मीपण मावळे
----------------------------------------
व्योम......आकाश, अंतराळ
पटल.....मानवी डोळ्याच्या आतील पडदा ज्यावर प्रतिमा उमटते/रेटिना
थिटी.... मर्यादित, क्षुद्र
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विश्व होऊनिया जरी
विश्व होऊनिया जरी
भोगे विशाल सोहळे
थिटी जाणिव फाटता
माझे मीपण मावळे
अप्रतिम...
छान!
छान!
https://www.maayboli.com/node/64366&
सुंदरच..!!
सुंदरच..!!
अप्रतिम! जाणीव-नेणीवेच्या
अप्रतिम! जाणीव-नेणीवेच्या सीमारेषेवरचे!
सुंदर
सुंदर
सुंदरच..!!
सुंदरच..!!
खूप सुंदर, गुढ अर्थ असलेली
खूप सुंदर, गुढ अर्थ असलेली कविता आहे. म्हणून एक छोटा बदल सुचवावासा वाटतो. ठीक वाटलं तर करा..
रूप रस गंध स्पर्शी
जाणिवेत मावेनाशी
एका सानुल्या देहास
लाभे झुळूक जराशी..