अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

मला खात्री आहे की तो हीरो बराच आधी शुद्धीवर आला होता. पण जे चालले आहे ते आपण कशाला थांबवा असा विचार केला असेल Happy मात्र किमान नंतर या कोणी तिला अ‍ॅप्रन्स दिले की नाही ते बघायला हवे. की इथे डॉक्टर व नर्स अ‍ॅप्रन हेच मुख्य कपडे म्हणून फिरत होते माहीत नाही.

अर्ध्या तासाच्या बोलीवर मिळेल, अनामत रक्कम भरा आधी असे म्हणाली असेल >>> Happy टोटली!

मनिषाच्या भांगेतले रक्त >>> भांगातील Happy "ती भांग" दिग्दर्शकाने घेतली असावी. पण तो कन्सेप्ट परफेक्ट आहे.

त्रिकोण लॉ़जिक ने शिल्पा नंतर पुढे कोठेतरी मरत असेल, किंवा तिचा हीरो वेगळा असेल.

पायसची पोस्ट आता वाचली. Lol
पण जे चालले आहे ते आपण कशाला थांबवा असा विचार केला असेल >>> Lol त्यागात विघ्न नको..

इथे डॉक्टर व नर्स अ‍ॅप्रन हेच मुख्य कपडे म्हणून फिरत होते माहीत नाही.>>> Lol हेच मनात आलं. तंबू फाडला असेल शेवटी.

पण जे चालले आहे ते आपण कशाला थांबवा असा विचार केला असेल >> Lol
भांगातील >> उप्स, गलतीसे मिष्टेक मोमेंट Happy
रच्याकने दिग्दर्शक मनोज कुमार आहे Happy

बाय द वे, ऑपरेशन च्या जागी होणारा धूर आणि त्याने मरणोन्मुख हिरो ला होणार असलेला त्रास याबद्दल काय?

अरारारारा अशक्य हसतेय तो सीन पाहून Rofl
"ती भांग" दिग्दर्शकाने घेतली असावी >>> Lol

नंतर हिरोचा काढून ठेवलेला शर्ट दिला असेल शिल्पाला घालायला Wink "भांगेत" नसलं तरी हिरोचं थोडं रक्त तिच्याही वाट्याला येऊदे की इतक्या त्यागानंतर Proud

तो टॉर्च मांत्रिकाकडून आणलेला असतो. जर कुणी ( शक्यतो कुमारिका) आपले वस्त्र अग्नीस स्वाहा केले तरच टॉर्च पेटेल असे त्याचे शास्त्र असणार.

Submitted by रघू आचार्य on 18 March, 2023 - 09:53 >>>>ती नर्स टॉर्च अशी काही हलवत आहे जणू काही तिच्या हाताला जीवचं नाही ते समुद्रावर लाईटहाऊस मधली लाईट सुद्धा इतकी फिरत नसेल .

अरे देवा परमेश्वरा
साधी बाई आहे.आणि आजूबाजूला साधे लोक आहेत.आमच्या घरातल्या लोकांच्या आसपास असं घडलं असतं तर 'कृपा करून डोकं चालव राजा.दोन्ही हात एकाच गजातून बाहेर काढ' 'अरे नको, हात अडकेल, त्यापेक्षा मला दे, मी तुझ्या वतीने मंगळसूत्र वहिनीच्या गळ्यात घालतो' 'ए काय कटकट आहे.इथे नवरा मरायला टेकलाय आणि तुला मंगळसूत्राची पडलीय.हे घे हातात आणि स्वतः घाल.आणि निघताना परत काढून पर्समध्ये टाकून पर्स छातीशी धर.पोलीस स्टेशन च्या जवळपास खूप चोर असतात.' वगैरे हजार सूचना मिळाल्या असत्या.

मी डायरेक्टर असतो तर ती मानेला एक हिसडा देते आणी मंगळसूत्राच्या शक्तीमुळे गज वाकतो, असे दाखवले असते. ( एक फूट मंगळसूत्र की तकत तुम क्या जानो दरोगा जी )

मंगळसुत्र Lol …. त्याने खांब स्वतच्या बाजुला खेचल्यावर नशीब तिचा गळा शाबुत राहिला Lol

शिल्पा शिरोडकर सीनपण अचाट्पुचाट Lol (तिला बिचारीला असले सीन फार दिले गेले).

सही आहे तो सीन Lol

मंगळसूत्र काढायच्या ऐवजी गज तोडणं सोपं वाटलं. >> हो आपल्या पिक्चर्स मधले हीरो गजाआड असतात ते केवळ गज वाकवायचे योग्य कारण तोपर्यंत निर्माण झालेले नसते म्हणून.

“आपल्या पिक्चर्स मधले हीरो गजाआड असतात ते केवळ गज वाकवायचे योग्य कारण तोपर्यंत निर्माण झालेले नसते म्हणून.” - Lol

धमाल सीन आणि प्रतिक्रिया.

हीरो गजाआड>> लहानपणी पेपरात गजाआड हा शब्द वाचून मला वाटायचं की हत्तीच्या आड.

इथं मराठी बायको असती तर शंख केला असता

काय मेलं एक काम सांगितलं तर धड करता येत नाही, परवा म्हणलं साधं की गळ्यात मंगळसुत्र घाला तर लोखंडी गज बघेल का नाही माणूस हा, नाहीच मग ताकद लावून गज वाकवून दाखवला. सध्या गोष्टी अवघड करणयात या लोकांचा हातखंडा आहे. नेहमीच आहे हे, बाजारातून येताना अर्धा किलो गाजर आणा म्हणलं तर रोपं घेऊन आलेत, म्हणे गच्चीत भाजीपाला बाग करून त्यात गाजरं लावू, काय बोलावं आता
सासूबाई पण अशाच, काही म्हणजे काही काम करत नाहीत...

परवाच...... इ.इ सुरूच Happy Happy

एक फूट मंगळसूत्र की तकत तुम क्या जानो दरोगा जी )
“आपल्या पिक्चर्स मधले हीरो गजाआड असतात ते केवळ गज वाकवायचे योग्य कारण तोपर्यंत निर्माण झालेले नसते म्हणून.”
काय मेलं एक काम सांगितलं तर धड करता येत नाही, परवा म्हणलं साधं की गळ्यात मंगळसुत्र घाला तर लोखंडी गज बघेल का नाही माणूस हा,
Biggrin Biggrin

मात्र किमान नंतर या कोणी तिला अ‍ॅप्रन्स दिले की नाही ते बघायला हवे. की इथे डॉक्टर व नर्स अ‍ॅप्रन हेच मुख्य कपडे म्हणून फिरत होते माहीत नाही. >>>> मनीषा देते

की इथे डॉक्टर व नर्स अ‍ॅप्रन हेच मुख्य कपडे म्हणून फिरत होते माहीत नाही...
मला ह्या वाक्याचा अर्थ कळला नाही!!!

बाय द वे, ऑपरेशन च्या जागी होणारा धूर आणि त्याने मरणोन्मुख हिरो ला होणार असलेला त्रास याबद्दल काय? >>>>>>> तो हिरो मनोजकुमारचा हिरो आहे.

मला ह्या वाक्याचा अर्थ कळला नाही!!! >>> आंबट गोड - डॉक्टर लोक अ‍ॅप्रन्स हे त्यांच्या नेहमीच्या कपड्यांच्यावर घालतात ना? म्हणजे आत त्यांचे नेहमीचे कपडेही असणार. त्यांनी कपडे म्हणून फक्त अ‍ॅप्रनच घातलेत आणि ते ते काढू शकत नाहीत असे तर नाही.

मग जाळायचे तर आधी अ‍ॅप्रन जाळायला हवेत. म्हणजे कोणाला निर्वस्त्र वगैरे होण्याची गरज नाही. पण त्याने कहानी की माँग निर्माण होऊ शकत नाही. म्हणून शिल्पाने जे केले ते ठीक आहे. पण निदान नंतर इतका त्याग केल्यानंतर किमान काम झाल्यावर यांच्यापैकी कोणीतरी अ‍ॅप्रन तिला दिला का हे विचारत होतो Happy

अजनबी यांनी मनीषा देते असे वरती लिहीले आहे आता Happy

अमेरिकन सिरीज मधे असे जे विचारतात ते प्रश्न आपल्याकडच्या पिक्चर्स मधे पडत नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=FZASMwBp7b4

द बर्निंग ट्रेन मधे सुध्दा आशा सचदेव अंगावरचा कपडा फाडून देईपर्यंत आख्ख्या रेल्वे डब्यात कोणाला लाल कपडा दिसत नाही.

Pages