Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
म्हाळसा तुम्ही रॅले, नॉर्थ
म्हाळसा तुम्ही रॅले, नॉर्थ कॅरोलिनामध्ये आहात का?
हो, रालेजवळच रहाते
हो, रालेजवळच रहाते
क्लाऊड किचेन सुरु करा...
क्लाऊड किचेन सुरु करा...
मस्तच. मी कॅरीमध्ये आहे. मला
मस्तच. मी कॅरीमध्ये आहे. मला तुमच्या फूड पोस्ट्स आवडतात. शक्य असल्यास भेटू.
मी सुद्धा कॅरीमध्येच
मी सुद्धा कॅरीमध्येच
ज्वारीच्या पिठाचा गुळ घालून बनवलेला शीरा
interesting !
interesting !
वॉव काय सुंदर फोटो एक से बढ
वॉव काय सुंदर फोटो एक से बढ कर एक. अस्मिता पफ पेस्ट्री कशी बनवायची? काही युट्युब लिंक किंवा धागा आहे का ईथे?
टेम्प्/मोड काय ठेवायचा ओवन ला?
रेडी मिक्स होतं त्याची पोळी
आशू,
रेडी मिक्स होतं त्याची पोळी कापून दिलेल्या सूचनेप्रमाणे भाजून घेतलं, सारण बटाट्याचं.
संज्याेत कीरच्या रेसिपीने
आज कणकेचा शिरा.
संज्याेत कीरच्या रेसिपीने आप्पेपात्रातली बाटी करून दालबाटी केली.
शिरा, दालबाटी तोंपासू !
शिरा, दालबाटी तोंपासू !
मस्त!
मस्त!
आप्पेपात्रातल्या बाट्या खरपूस
आप्पेपात्रातल्या बाट्या खरपूस दिसताहेत.
कणकेच्या शिर्याला तूप घालताना हात मागे घेतला का? वर म्हाळसांचा ज्वारीचा शिरा आहे रेफरन्ससाठी
ज्वारिच्या पिठाचा शिरा कसा
ज्वारिच्या पिठाचा शिरा कसा केलास? क़णकेच्या शिरासारखा? क्रुती दे बर
आज मी शिर्याच्या क्रुतीच मागतेय.
अस्मिता दाल बाटी मस्तच..
अस्मिता दाल बाटी मस्तच..
आई ग शिरा!!!!
आई ग शिरा!!!!
ज्वारीच्या पिठाचा शीरा
ज्वारीच्या पिठाचा शीरा
Sounds interesting!
Parting delights of Indian
Parting delights of Indian winter - तुरीचे हिरवे दाणे !
आता यांची कचोरी करणार
किंवा मग हिरव्या मिरच्यांशी लग्न लावणार, रस्साभाजी करुन
अप्पे पात्रातली दालबाटी
अप्पे पात्रातली दालबाटी जबरदस्त (हेच बाकी होतं :P)
ज्वारीचा शिरा-
अर्धी वाटी ज्वारीचं पिठ
तीन चमचे गुळ
तीन मोठे चमचे तूप
पिकलेलं अर्ध केळं
पाऊण ग्लास गरम पाणी
चिमुटभर मीठ
वेलची पूड
कृती-
गरम तूपावर पिठ भाजून घ्या, त्यात मिठ, गरम पाणी घालून गुळ ॲड करून शिजवा. एका वाफेनंतर केळं घालून परता. वरून वेलची पूड, ड्रायफ्रूट्स घालून अजून एक वाफ घेऊन गॅस बंद करा. शिरा तयार. कणकेच्या शिऱ्यापेक्षा कमी वेळात होतो.
धन्यवाद् म्हाळसा
धन्यवाद् म्हाळसा
ज्वारी पीठ शिर्यात दुध नाही
ज्वारी पीठ शिर्यात दुध नाही घालत का?
दूध घालून थोडा पातळ करायचा.
दूध घालून थोडा पातळ करायचा.
त्याला भाकरीचे
कॅरमलपुडिंग म्हणतात मग.(No subject)
कालचं डिनर: स्टाईल चणा करी,
कालचं डिनर: तमिळ स्टाईल चणा करी, डोसा.
सुपर्ब लागतं हे कॉम्बिनेशन.
सांग सांग रेसिपी सांग.कांड्या
सांग सांग रेसिपी सांग.कांड्या खोबऱ्याच्या वाटणापेक्षा वेगळे करून पाहायला हवे.
एकदम सोपी आहे रेसिपी देवकीतै.
एकदम सोपी आहे रेसिपी देवकीतै.
एका panमधे, जराशा तेलात
दहा बारा सांबर ओनिअन्स.
एक छोटा टोमॅटो
चार लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
सुकं/ ओलं खोबर्याचा एक तुकडा
हे परतून, गार करून, मिक्सरमध्ये फिरवून ठेवा.
आता कुकरमध्ये तेलात तेजपत्ता, दोन इलायची, छोटा तुकडा दालचिनी, जीरे , मग हे वाटण घाला
हळद,धने पावडर,लाल मिरची पावडर,गरम मसाला घालून परतणे.
रात्रभर भिजवलेले वाटीभर हरभरे घालून पाच मिनटं परता.
हवं तेवढं पाणी, मीठ घालून, कुकरला सात-आठ शिट्ट्या.. कि चणा करी तयार..
भात,चपाती, इडली, डोसे, सगळ्या बरोबर छान लागते.
शिवरात्रीला केलेली सा खि
शिवरात्रीला केलेली सा खि
होळीची पुपो
बीटाची कोशिंबीर
चिया बियांची खीर/porridge. नुसतं दुधात भिजवून.
थालिपीठ, तूप, दही+तिखट+काळा मसाला, शेंगदाण्याची चटणी.
*
@अस्मिता, बिट कोशिंबिरीची
@अस्मिता, बिट कोशिंबिरीची लिस्ट देणार का ?खूप म्हणजे खूप टेम्पटिंग दिसतेय।
वा!
वा!
थालीपीठ मस्तय .. भूक लागली
थालीपीठ मस्तय .. भूक लागली बघून
थालीपीठं,खिचडी, बीटकोशिंबीर
थालीपीठं,खिचडी, बीटकोशिंबीर,खीर,पुरणपोळी.. सही!!! तोंपासू सगळे पदार्थ....
भाताचा आयटम शोधत होते
Pages