खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

काल रविवार निमित्त एक कार्यालयातील एका सहकार्‍याला घरी जेवायला बोलविले होते शेजारी देखिल एक सहकारी राहतात त्यांनाही बोलाविले त्यांच्या सौं चा नवरात्री उपवास मगे तेही आले.
त्यानिमित्त घातलेला भोजनाचा घाट.
पनीर-मटार मसाला, दाल फ्राय, जीरा राईस, पोळी आणि शेजार्‍यांकडील ज्वारीचे पापड आणि मुगाचे वरण( त्याला हात लागलाच नाही)

जेवणानंतर शेवटी पाडव्याला केलेल्या रबडीमधील शिल्ल्क फ्रीजर मध्ये ठेवलेल्या रबडीची कुल्फी.

bet.jpg

या विकेंडला माहेरी गेलेलो.
आईच्या हाताच्या प्रॉब्लेममुळे तिच्या हातचे तर खाता आले नाही,
पण दक्षिण मुंबईतील हॉटेलची चव सुद्धा भावूक करून गेली Happy

IMG_20230327_111807.jpg

अरे वाह.. ईंच का पिंच.. आजच पहाटे पाच वाजता मी पोरांसाठी पास्ता बनवला. फोडणी वगैरे प्रकार मला जमत नाही पण भरपूर अमूल बटर टाकायचे एवढे जमते Happy

Happy

@आबा
सोप्पंय
- पास्ता उकळून शिजवून घ्यावा.
- कढईत तेल गरम करून, मोहरी, उडद डाळ अर्धा छोटा चमचा,चना डाळ अर्धा छोटा चमचा, कडिपत्ता, हिरवी मिरची, कांदा, घरात उकडलेले कॉर्न होते म्हणून टाकले.. परतून घेऊन.. शिजवलेला पास्ता टाकला, मीठ चवीनुसार,पाच मिनटं झाकून ठेवलं..झालं.
खूप मस्त नाही लागत पण मला आवडले.. वरून टोमॅटो सॉस टाकू शकता..मला प्लेनच आवडते.

मेथी मलाई मटर पनीर... खीर शिकरण कस्टर्ड.. गोडधोड जेवणाचा बेत.. आणि मी मटण पाव टाकायला आलेलो ईथे..

जवळपास दोन वर्षांनी आईच्या हातचे मटण Happy

बोकडही छान चरबीयुक्त ईदचा पोसलेला असतो तसा होता.

IMG_20230409_103025.jpg

सोबत माझगावच्या रोशन बेकरीतले पाव.
मुंबईबाहेरच्या बरेच लोकांनी मटणपाव हे कॉम्बिनेशन पाहिले नसते. वा खाल्ले नसते.

IMG_20230409_103011.jpg

दुसऱ्या दिवशीचे शिल्लक मटण आणि रस्सा. हे आणखी टेस्टी लागते Happy

IMG_20230409_103044.jpg

विकेंडचा मेन्यू: मटर पनीर, घरगुती श्रिखंड आणि पुरी, बटाट्याची भाजी, पापडी चाट, दाल फ्राय, जीरा राईस
891E2B5E-30F9-4074-B76F-DBA44461DA8B.jpeg

हे श्रीखंडापासून एवढे सगळे घरचे आहे का? आणि एकट्याने केलेले आहे का Uhoh

फोटोतली मांडणी आणि पदार्थांवरून म्हाळसादेवींचे बर्‍याच दिवसांनी आगमन झाले आहे हे नाव न पाहताच कळले. पार्टीला आलेल्या लोकांची मज्जाय.

Pages