खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

सोया ६५ (रणविर ब्रारची रेसिपी),
41F0C2B3-7FD8-4B39-B723-5A6EB33D51B6.jpeg
रोस्टेड रेड पेपर-टोमॅटो सुप-सावरडो ब्रेड पानीनी,
36D5FF23-47F1-4E20-A2A3-A0FC5A661187.jpeg
आलु पराठा-छुन्दा-मसाला योगर्ट

8CFD79BA-E763-45EA-9622-3088DF6A2266.jpeg

मस्त

मटण खीमा पाव Happy

IMG-20230605-WA0057.jpg

दुसर्‍या दिवशी आणखी छान लागतो. मसाले मस्त मुरतात

IMG_20230610_123939.jpg

आजचा मेनू - काश्मिरी दम आलू, स्वीट कॉर्न सुंदल, टॉमेटोचे सार, पुलाव (इथे नाहीये), मॅंगो क्रम्बल विथ आईस्क्रीम
IMG_6415.jpegIMG_6416.jpeg

मनमोहन चपाती वर ठिपके के सुरेख आलेत..मेंदीच्या कोनाने काढल्यासारखे !!!

सर्व ताटे तोपासू.

मंजुताई मसूर मिलेट पुलाव ची रेसिपी द्या प्लिज.

वाह फिश थाळी..
पण ती सोबत पांढरे काय आहे? ताक तर चालत नाही फिश सोबत

मनमोहन चपाती वर ठिपके के सुरेख आलेत..मेंदीच्या कोनाने काढल्यासारखे !!!....... अगदी अगदी!ते डिझाईन इतके छान दिसले की मी पापलेटच्या तुकडेही पाहायला विसरले.

धन्यवाद सगळ्याना Happy
Runmesh, सोलकढी च आहे पण सोले जुनी असल्याने रंग नाही येत एवढा. आणि थोडी घेतली तरी आंबट आहेत फार Happy

चपाती ग्रिल वर भाजली आहे येस Happy

Runmesh, सोलकढी च आहे >>>> हो, ते पोस्ट केल्यावर पुन्हा विचार करता लक्षात आले माझ्या Happy

आमच्याकडे काल पावसाळी मेनू होता.
दुपारी अंड्याचे कालवण आणि गरमागरम भात.
रात्री पिठीभात आणि सुके बोंबील चटणी.

रात्रीचा फोटो नाही. दुपारचा गोड मानून घ्या..

IMG_20230625_095805.jpg

मसूर मिलेट पुलाव
एक वाटी मसूर भिजवून मोड काढून. दीड वाटी मिलेट आठ तास भिजवून. मी कोडो घेतलेत.
भाज्या तुमच्या आवडीच्या (ऐच्छिक)
उभा कापलेला एक मोठा कांदा, एक चमचा आलंलसणाचं वाटण, एक बारीक चिरलेला टोमॅटो, हिमि आपल्या क्षमतेनुसार, आख्खे मसाले(५ लवंग ,कामि,एक मोठी वेलची,तेजपान, छोटा तुकडा दालचिनी) पाव चमचा गरम मसाला, मीठ आणि पाणी
फोडणीचं साहित्य
कृती : पाव वाटी तेलात मोहरी,जिरे,हिंग,हळद, आख्खे मसाले, हिमि ,कांदा लाल परतला की उपसलेले कोडो (पाणी पुलावात वापरायचं ) मसूर व गरम मसाला टाकून परतायचं. टोमॅटो, पाणी (चार वाट्या.मिलेट भिजवलेले पाणी व पाणी) चवीनुसार मीठ घालून उकळी आली की भाज्या घालायच्या. कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी काढावी. कुकर थंड झाला की साजूक तूप टाकून हलवून गरमागरम रायतं व पापडाबरोबर खावा.

खीमा, मसूर पुलाव, फिश थाळी, नॉन वेज थाळी मस्तच..
मसूर पुलाव लिस्टमधे होताच. सोप्पी रेसिपी मिळाली. मंजूताई आभार…

आजचा डबा - चपाती गार्लिक बटर चिप्स व मॅंगो साल्सा.
IMG_6423.jpeg

Pages