खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

हे इतके पदार्थ घरी करणार्या लोकांना साष्टांग दंडवत. घरुन केटरिंग करता का?

पदार्थ व मांडणी भारी आहे. विशेषतः पापडी चाट.

म्हाळसादेवींचे बर्‍याच दिवसांनी आगमन झाले>> Happy हो काल बऱयाच दिवसांनी फोटो टाकले.
पदार्थ व मांडणी भारी आहे. विशेषतः पापडी चाट >> पापडी चाट डिपची सध्या फार ट्रेंड आहे म्हणून ट्राय करायचं होतं. तो आणि इडली फ्राय हे दोन्ही आयटम हिट झाले फार

मस्तच दिसतंय सगळं म्हाळसा.
हे इतके पदार्थ घरी करणार्या लोकांना साष्टांग दंडवत >> खरंच दण्डवत . पण मला वाटत परदेशात रहाणारी खूप मंडळी आपण इथे घरी करतो त्यापेक्षा खूप जास्त सैपाक घरी करतात. त्यांच्याकडे आपल्या सारखा केटरिंग option नसेल कदाचित. अर्थात एखाद्याला आवड ही असु शकेल. तसेच सोशलायझेशन साठी असे मित्र मंडळींबरोबर एकत्र जेवण ही तिकडची लोकं by choice जास्त वेळा करत असतील. असो. माझ्या फारच तुटपुंज्या माहितीवर , निरिक्षणा वर हे लिहिले आहे त्यामुळे चूक ही असू शकेल.

पण मला वाटत परदेशात रहाणारी खूप मंडळी आपण इथे घरी करतो त्यापेक्षा खूप जास्त सैपाक घरी करतात >> हो, अगदी तूप बनवण्यापासून डोसा इडलीचं पिठही बरीच लोकं इथे घरीच बनवतात. केटरींगचे ॲाप्शन्स आता बऱयापैकी आहेत .. घरी कोणाचा वाढदिवस असेल तेव्हा बाहेरूनच जेवण मागवलं जातं पण एऱहवी छोट्या मोठ्या गेटटूगेदरला मला घरी जेवण बनवायला आवडतं आणि त्याहून जेवणाचे फोटो काढायला जास्त आवडतं Happy

फोटो छानच दिसतायेत म्हाळसा. पापडी चाट डीप मलाही छान वाटले, ट्राय करायचे आहे. पण ती शेव वगैरे मौ नाही का पडत? ईडली फ्राय तळुन केली कि एअर फ्राय करुन?

शाकाहारात सर्वात जास्त आवडती भाजी
रोज खाल्ली तरी कंटाळा येत नाही मला..
शेण्गा खाऊन शेंगासारखा झाला आहेस असे घरचे बोलायचे लहानपणी..

IMG_20230413_190902.jpg

हे या विकेंडचे फोटो आधी खाऊगल्लीवर टाकणार होतो. ते आता आधी ईथे टाकतो.

ओवन वगैरे चोचले ऑफिसला जाऊ लागल्यापासून सुरू झाले
अन्यथा शाळा कॉलेजात मी माझ्या नॉनवेज डब्यासाठीच फेमस होतो. कारण चपाती किंवा तांदळाची भाकरी, फिशफ्राय, सारभात, कोलंबी सारे साग्रसंगीत असायचे. थंड गरम काही फरक पडायचा नाही. डबा उघडताच त्यात सत्ते पे सत्ता स्टाईल दहाबारा हात पडून चौथ्या मिनिटालाच तो फस्त झालेला असायचा Happy

IMG_20230426_022425.jpg

.

IMG_20230426_022452.jpg

हि सोलकढी.. हिला सुद्धा मी नॉनवेजच समजतो. कारण आमच्याकडे ही तेव्हाच केली जाते जेव्हा नॉनवेज जेवण असते. वेज जेवणाऱ्या पाहुण्यांचे आम्ही असे लाड करत नाही Happy

काही जण ऑफिसला डब्यासोबत ताक नेतात.
तसे मी एकेकाळी सोलकढी न्यायचो. अर्थात डब्यात नॉनवेज असेल तरच हे लाड Happy

IMG_20230426_022346.jpg

अक्षयतृतीया!

Screenshot_20230426-124232.jpgScreenshot_20230426-124222.jpg

C3F74A24-013B-4B75-8CBA-1422177BA6C5.jpeg
उत्त्पा वॉफल

वॉव प्राजक्ता ची नविन प्रवेशिकेत दमदार एन्ट्री Happy

ईथे माबो वर हमखास न फसता करता येणार्‍या ढोकळा ची रेसिपी आहे का? मधे कोरडा तरी राहतो नाहितर कमी शिजतो. Sad

धन्यवाद!
डाळीचे पीठ, मीठ, हळद, तिखट, जिरं, चिंचेचं पाणी एकत्र करून सरबरीत भिजवून घ्यायचं. अळूची पाने धुवून पुसून आणि शिरा काढून घ्यायची. छोटे तुकडे करायचे. पानं त्या पिठात घोळवून घ्यायची दोन्ही बाजूंनी. Nonstick pan वर २-३ चमचे तेलात खरपूस भाजून घ्यायची. ४-५ पानं होतात एका घाण्यात...

माश्याचं ताट, सोलकडी, उत्तप्पा वॅाफल्स , भरली घोसाळी सगळंच मस्त
शेवपूरीचा पिझ्झा तर झक्कास

शेवपुरी पिझ्झा ईंटरेस्टींग आहे.. काय केलेय नक्की लिहा ना.. हे मलाही जमेल आणि आबडेल असे वाटतेय Happy

यावर झब्ब्बू म्हणून आमच्या माझगावची शेवपुरी आणि भेलपुरी टाकतो. अशी चव ईतरत्र कुठे मिळत नाही...

IMG_20230427_235045.jpg

Pages