Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हॉलीवूडने पठाण मधले रक्तबीज
हॉलीवूडने पठाण मधले रक्तबीज म्हणजी काय, त्याची चोरी कशी करतात ते शिकून घेऊन पिक्चर काढले पाहिजेत.
Nope मस्त सिनेमा आहे.
Nope मस्त सिनेमा आहे.
सिनेमा इलोजिकल नाहीये. विचित्र किंवा अचाट कल्पना =/= इल्लोजीकल. Internal consistency नसेल तर इल्लोजिकल.
Nope मस्त सिनेमा आहे.>>>+ १
Nope मस्त सिनेमा आहे.>>>+ १
Us पण पाहायचाय..प्राईमवर रेन्टवर आहे..नेफिवर नाही सापडला.
Nightcrawler पण नाही सापडला.. कुठे मिळेल?
मी कुठे पाहिलेला विसरलो. पण
मी कुठे पाहिलेला विसरलो. पण युट्यूबवर रेंटवर दिसतो आहे.
नोप मलाही बघायचायं. पीकॉकवर
नोप मलाही बघायचायं. पीकॉकवर आहे.
Internal consistency नसेल तर इल्लोजिकल.>>>>>+१ उदा. रणवीर सिंगचा सर्कस.
प्राईमवर The hustle बघितला. Ann Hathaway आणि Rebel Wilson या दोघी फसवाफसवी करणाऱ्या बायका असतात. त्या एकत्र येऊन मोठी धेंडं फसवतात, हलकाफुलका जरा चावट अगदी गोविंदाचा वाटावा असा मस्त टाईमपास आहे.
नेटफ्लिक्सवर वझीर बघितला. मला फरहान अख्तर फार्फार आवडतो. एक त्याचा आणि एक फक्त त्याच्या आवाजाचा फॅन क्लब हवा हेमास्पमआ. चांगला आहे, गाणी सुंदर आहेत. तेरे बिन तर रिपीटावर असते. अमिताभची व्यक्तिरेखा शेवटी फार फिल्मी होते पण तरीही आवडला. सिनेमा नैराश्य व अपराधी भावना यावर बेतलेला आहे, उदास आहे पण एन्गेजिंग वाटला. थ्रिलर आहे.
Dog Gone Trouble हा एक अगदी लहान मुलांचा मस्त सिनेमा आहे. दहा वर्षांच्या आतल्यांना आवडेल . नेटफ्लिक्सवर.
उदा. पाताल भैरवी हा
उदा. पाताल भैरवी हा अद्भुतरम्य रसाचा चित्रपट आहे. त्यात इल्लॉजिकल रस नाही.
काल व्हिक्टोरिया नावाच्या
काल व्हिक्टोरिया नावाच्या मराठी हॉरर पिक्चरबद्दल कळलंय. प्राईमवर आहे. (इथे रेंट किंवा बाय चा ऑप्शन दिसतोय) आयपीटीव्ही वर पण आहे.
यात ज्यु सोकु, पुष्कर जोग, आणि एक कोणीतरी अननोन हिरो आहे . स्कॉटलंडचं शुटींग आहे. मराठी माणसाचं व्हिकोरिया नावाचं गुढ हॉटेल, तिथे
काही दिवसांकरता राहायला येणारं कपल, तिला होणारे भास वगैरे वगैरे अशी साधारण कथा आहे. पण चांगला आहे असं ऐकलं. मराठी हॉरर मुव्हीज फार कमी येतात. कोणी बघितला तर उजेड पाडा.
योगायोग म्हणतात याला. चालू
योगायोग म्हणतात याला. चालू केला होता हाच सिनेमा.
सस्पेन्स म्हणून बघितला तर ठीक. हॉरर अजिबात नाही. स्कॉटलंड मधलं शूटींग हे वेगळेपण आहे. त्यामुळेच स्रूवातीला १९२१, २० च्या जातकुळीतला वाटत होता. रहस्यपट म्हणून क्लायमॅक्सच्या आधीचा धक्का छान. पण नंतर क्लायमॅक्स पूर्ण गंडला आहे. ग्लासगो शहरातले रस्ते, इमारती छान वाटतात. काही फ्रेम्स खूप देखण्या.
बहुतेक मॅन्शन हाऊस मधे शूट केलाय. सुरूवातीला भल्या मोठ्या हॉलमधला उजेड आणि कॉरीडॉर मधून बाहेर डोकावणारा अंधार यामुळे गूढपट असावा असे वाटले. पण नंतरच्या प्रकाशयोजनांमुळे तो निव्वळ योगायोग होता हे समजले. कॉरिडॉरमधे उलटापालटा कॅमेरा लावून कोणता इफेक्ट घ्यायचा होता हे कळले नाही.
स्केरी प्रसंग, स्वप्नं हे प्रेडिक्टेबल. त्याला नायिकेच्या मानसिक आजाराची जोड देण्याचा प्रयत्न जमला नाही.
एकंदरीत प्रयत्न चांगला होता पण कुठेतरी सगळंच कमी पडलं.
वैरी मंगळसूत्राचा, रक्ताने भरला मळवट बघायला सुरूवात करतो.
हॉरर अजिबात नाही >>> मला
हॉरर अजिबात नाही >>> मला वाटलंच होतं. मराठीत हॉरर्स बनतच नाहीत विशेष. एक तो बळी आला होता त्यात पुसटशी शंका यावी इतपतच हॉरर एलिमेंट होता. लपाछपी बरा होता. बाकी सगळे हॉररच्या नावाखाली सस्पेन्सच.
‘नोप’ लय भारी आहे.
‘नोप’ लय भारी आहे.
आपल्या दोन मुलांपैकी एक
आपल्या दोन मुलांपैकी एक तुमचं नाही हे वाक्य भोपळे चौकासारखं झालंय. दोन्ही चित्रपट फा फॉ करीत पाच पाच मिनिटांत पाहिले. आधी टीव्हीवर पाहिले होतेच. ***स्पॉयलर्स ***
पडछाया - रमेश देव , 'नवतारका ' वर्षा हे नवराबायको. सीमा आणि काशीनाथ घाणेकर ही मुलं. लहानपणीचा मुलगा सचिन पिळगावकर. बाई माझी करंगळी मोडली या गाण्यावर नाचलाय. यात नायिका व्हिलनला घाबरून बेशुद्ध पडते आणि त्यानंतर आपण गर्भार राहिलो असा तिचा समज होतो. बहुतेक पहिल्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून व्हिलनचं हृदयपरिवर्तन होतं. ह फ्लॅशबॅक.
वर्तमानात वर्षा आधीच अपघाताने जायबंदी असते, अपघात सुद्धा व्हिलनसारखा (म्हणजे हॅट घातलेल्या माणसाची सावली) कुणीतरी दिसल्याने घाबरून झाला असावा. डोक्याला बँडेज बिंडेज. घरातच असावी. शेजारी बसलेल्या रमेशचा डोळा लागलाय. ही उठून उभी राहते. कशाला काय माहीत आणि धाडकन पडते. नवरा तिला परत कुठे काय लागलंय का हे बघत नाही. उचलून बिछान्यात ठेवतो. मग "आपल्या दोन मुलां पैकी एक तुमचं नाही."
कलावंतीण - अविनाश मसुरेकर, (इन्स्पेक्टर) उषा नाईक (तमाशा कलावंत ) , दोन मुली. यातली एक रजनी चव्हाण. गदिमा . जोगिया कवितेवर आधारित लघुचित्रपट. कविता गदिमांच्याच आवाजात असा एक सुंदर प्रकार दूरदर्शनवर पाहिला होता. त्यातली 'ती' रजनी चव्हाण'. तो बहुधा रवींद्र मंकणी.
तर कलावंतीणमध्ये व्हिलन कुलदीप पवार. तो उषा नाईकवर बळजोरी करू पाहतो, तेव्हा ती थांब- आधी मला माझं मं गळसूत्र काढून ठेवू दे, असं सांगते. ती ते भिंतीवरच्या खुंटीला टांगते. ते बघून कुलदीपला रंजनाची आठवण येते. ही त्याच्यासाठी घरदार सोडून आलेली असते. आणि त्याला जवळ येऊ देण्यापूर्वी त्याच्या हातून मंगळसूत्र घालून / बांधून घेते. हे आठवताच कुलदीप उषाला बहीण मानतो.
पुढे उषा आणि रंजना डिलिव्हरीसाठी एकाच वेळी एकाच दवाखान्यात भरती असतात. इथे आवाज मध्ये मध्ये गायब आहे. उषाचं मूल दगावतं. रंजनाचं मूल जगतं, ती मरते. पोलिसांना चुकवत डॉक्टरच्या रूपात आलेला कुलदीप आपलं आणि रंजनाचं मूल उषाला देतो. म्हणून "आपल्या दोन मुलींपैकी एक तुमची नाही."
तो उषा नाईकवर बळजोरी करू
तो उषा नाईकवर बळजोरी करू पाहतो, तेव्हा ती थांब- आधी मला माझं मं गळसूत्र काढून ठेवू दे, असं सांगते. ती ते भिंतीवरच्या खुंटीला टांगते.
>>>>
आमच्या कंपनीत एक माळकरी होता.
आमच्या कंपनीत एक माळकरी होता. माळ घातल्यानंतर दारू पिता येत नाही.
पण संध्याकाळी गुत्त्यावर जाऊन दारू पिताना तो माळ नाकाच्या वर अडकवत असे. माळेच्या खालून पिले तर चालते असे त्याचे शास्त्र होते.
तर कलावंतीणमध्ये व्हिलन
तर कलावंतीणमध्ये व्हिलन कुलदीप पवार. तो उषा नाईकवर बळजोरी करू पाहतो, तेव्हा ती थांब- आधी मला माझं मंगळसूत्र काढून ठेवू दे, असं सांगते. >> धन्य आहे!
(No subject)
ऑक्सिजन नेटफ्लिक्स वर..
ऑक्सिजन नेटफ्लिक्स वर..(मूळ फ्रेंच, इंग्रजी भाषेत उपलब्ध)
एक स्त्री एका बंदिस्त मशिनसद्रुश पेटित जागी होते..शरीरावर जागोजागी वायर्स लावलेल्या आहेत..ती गोंधळलेली आहे..काहीच आठवत नाहीये..मदतीला एक रोबोट कम्प्युटर आहे आणि तीला इतरांचे फोन पण येत आहेत ..तीचा ऑक्सिजन पुरवठा संपत आलेला आहे..अगदी कमी वेळात तीला तीथून सुटका करायची आहे..ती कोण आहे..तीथे कशी आली..कधीपासून आहे..तिथून ती निघू शकेल का..प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर पहा ऑक्सिजन फक्त नेटफ्लिक्स वर
थरारक सिनेमा!
नेपाळी आहे का ?
नेपाळी भाषेत आहे का ?
(No subject)
केलं एडिट.
दोस्तीची केमिस्ट्री मला
दोस्तीची केमिस्ट्री मला मैत्रीपेक्षा 'आदमी हुं आदमीसे प्यार करता हुं'ची वाटली. (कथेत असतं तर वेगळी गोष्ट होती पण) फार लाडेलाडे बघतात एकमेकांकडे, डोळ्यांनी हितगूज करण्यात जरा रॉन्ग नंबर लागलाय>>>> अगदी अगदी मला ही अगदी अस्सेच वाटलेले बघताना!
गॉन गर्ल बद्दल बरेच प्रश्न
गॉन गर्ल बद्दल बरेच प्रश्न पडलेत. शेवट काही कळाला नाही.
स्पॉइलर देऊन कुणीतरी लिहा..की शेवट नक्की असा का झाला?
*gone girl spoilers*
*gone girl spoilers*
पोलिसांकडे किंवा कोणाकडेच एमिविरुद्द काही पुरावा नसतो. निकची इमेज तशीही चांगली नसतेच. जर त्याने त्याच्या इतक्या वाईट प्रसंगातून गेलेल्या बायकोला सोडले तर त्याची उरलीसुरली इमेज सुध्दा जाणार. त्यामुळे शेवटी त्याला इंटरव्ह्यूमध्ये एमी बरोबर प्रेमाचे नाटक करावे लागते. आणि ती प्रेग्नंट पण असते असे सांगते. एकूण काय, एमी जिंकते आणि निकला सायको बायकोसोबत त्याचे आयुष्य घालवावे लागते.
भरत
भरत
एकदम बहीण मानलं हेही जास्तच. परक्या स्त्रियांना काही नं काही मानावेच लागायचे तेव्हा !
मृ, ऑक्सिजनवर अमितने लिहिले होते तेव्हा बघितला होता. चांगला आहे.
आशु, अजून कुणी तरी आहे म्हणायचं.
नुसतं बहीण नाही मानलं, दर
नुसतं बहीण नाही मानलं, दर भाऊबिजेला तिला भेटायला यायचा. ओवाळणी म्हणून भारीपैकी साडी द्यायचा. एके वर्षी तुरुंग फोडून आला होता. तिनेही त्या सगळ्या साड्या कपाटात नीट जपून ठेवल्या. कधीही नेसल्या नाहीत.
भरत.
भरत.
नेटफ्लिक्सवरचा नवा नवा थ्रिलर ‘ल्युथर’ बर्यापैकी जमलाय.
ओह्ह चित्रपट आहे का तो? त्याच
ओह्ह चित्रपट आहे का तो? त्याच नावाचा इद्रिस एल्बाचा टीव्ही शो पण मस्त होता. मला वाटलं पुढचा सीझन आलाय त्याचा. काल लावणार होतो पण 'एव्हरीथिंग- एव्हरीव्हेअर ' प्राईमवर दिसला आणि मोह आवरला नाही. तो आधी संपवतो मग ल्युथर!
भरत
भरत
तुरुंग फोडून
एवढं तर नेहमीचे भाऊबहीणही करत नाहीत.
परक्या स्त्रियांना काही नं
परक्या स्त्रियांना काही नं काही मानावेच लागायचे तेव्हा ! >>>
ऑक्सीजन नावाचा आणखी एक थ्रिलर आहे- एड्रियन ब्रॉडीचा. तो ही जबरी आहे.
.
पुढे उषा आणि रंजना
पुढे उषा आणि रंजना डिलिव्हरीसाठी एकाच वेळी एकाच दवाखान्यात भरती असतात. >>>
असे सीन्स आपल्याकडे अनेक पिक्चर्स मधे असतात. काय कोऑर्डिनेशन असेल. Everything everywhere all at once! हे नाव आपल्याकडच्या अनेक पिक्चर्स ना खपून जाईल धरमवीर एक आठवला.
अमितव, आवडला नाही तर मारु नका
अमितव, आवडला नाही तर मारु नका.
इद्रिस एल्बा + ब्रिटिश अ
इद्रिस एल्बा + ब्रिटिश अॅक्सेंट असेल तर आधीच पैसे वसुल झालेत.
Pages